पालक आणि कोथिंबीर एकत्र भाजी..

Submitted by परदेसाई on 27 November, 2017 - 17:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. अर्धी जुडी पालक चिरून
२. अर्धी जुडी कोथिंबीर चिरून
३. २ टोमॅटो
४. ३/४ लाल सुक्या मिरच्या.
५. १ टीस्पून जिरे.
६. १/२ टीस्पून हळद.
७. १ टीस्पून धणेपावडर.
८. १/२ टीस्पून गरम मसाला.
९. १ टेबलस्पून चणा/मूग डाळ भिजवून
१०. १ टेबलस्पून तेल.
११. १/४ कांदा बारीक कापून

क्रमवार पाककृती: 

१. टोमॅटो आणि लाल मिरच्या ब्लेंडरमधे टाकून बारीक करून घ्या.
२. तेल तापत ठेवा. त्यात जिरे टाकून परतून घ्या.
३. त्यात डाळ / कांदा टाकून २ मिनिटे परतून शिजवून घ्या.
४. चिरलेली पालक्/कोथिंबीर त्यात टाकून शिजवून घ्या ( ५/६ मिनिटे).
५. त्यात हळद, धणेपावडर टाकून १ मिनिटभर शिजवा.
६. आता त्यात टोमॅटो/मिरचीची पेस्ट टाका.
७. दोन तीन मिनिटे शिजवून घ्या, आणि मग त्यात गरम मसाला टाका..
हवे असल्यास हॅण्ड मिक्सर मारून नीट मिसळून घ्या (शिजलेली डाळ नीट मिळून यावी म्हणून)

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी..
अधिक टिपा: 

१. माझ्याकडे खूप कोथिंबीर उरली होती (चुकून आणली गेली).
२. खूप मस्त लागते , वेगळाच स्वाद येतो.

माहितीचा स्रोत: 
उरल्या सुरल्यावर प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वेगळा दिसतोय प्रकार. घरी सगळ्या वस्तू आहेत, उद्याला करेन ही भाजी. रच्याकने, पाव कांदा तिकडला की इकडला?
इथे १ मध्यम घ्यायला लागेल बहुतेक.

मस्त रेसिपि
कालच जवळपास असाच प्रयोग केला.....

फक्त पालक एवजी मेथी वापरली. सध्या पुण्यात मेथी आणि कोथिंबिर खुप स्वस्त आहेत.
ब्लेंडर आणि हॅण्ड मिक्सर नाही वापरला. टॉमेटो आणि मिरचीचे जेवढे बारिक तुकडे करता येतिल तेवधे केले होते आणि शेवटी चमच्याने सगळी भाजी मिक्स केली.

पुढच्या वेळी पालक आणि कोथिंबिर...