डीबीके अॅकॅडेमी, अहमदनगर
(देसरडा-भंडारी-करडक अॅकॅडेमी, उर्फ डॉ. भारत करडक अॅकॅडेमी!)
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सुरु केलेला हा नवा उपक्रम. महेश ट्युटोरिअल्स ची फ्रँचाईजी! नगर शहरातील दोन ठिकाणी व पाथर्डी या तालुक्याच्या ठिकाणी असे तीन ठिकाणी उत्तमरित्या चालु आहे.
इ. ८-९-१० ला शहरात उत्तम प्रतिसाद आहे.
इ. ११-१२ ला पाथर्डी मध्ये उत्तम प्रतिसाद आहे. नगर शहरात एप्रिल २०१८ ला इ ११ वी नव्याने लाँच करित आहोत!
धन्यवाद!
शिक्षण पद्धतीतील क्रांतीकारी बदलासाठी नगरकरांनो व्हा सज्ज !!!
सुप्रीम कोर्टाने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (मेडिकल/ इंजिनिअरींग्/फार्मसी इत्यादी) प्रवेशासाठी पात्रता परिक्षा घेणे बंधनकारक केल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. मेडिकल व इंजिनिअरिंग साठी अनुक्रमे नीट व जेईई सारख्या परिक्षा त्याचसोबत राज्य पातळीवरील (लवकरच बंद होणारी) सीईटी परिक्षा, एम्स व आयआयटी, आर्किटेक्ट प्रवेशासाठीच्या वेगळ्या परिक्षा, आदी च्या अपुर्ण माहितीमुळे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी-पालक-शिक्षक यांचेमध्ये भविष्याची चिंता वाढली आहे. गेल्या काही वर्षात प्राथमिक व माध्यामिक शिक्षण पद्धतीमधील वेगवेगळ्या प्रयोगामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला जात आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची योग्य पायाभरणी होत नाही. स्पर्धा परिक्षेचे तंत्र व शास्त्रशुद्ध माहिती यांच्या अभावामुळे गुणवंत विद्यार्थी यशापासुन दुर जात आहेत. बोर्ड परिक्षेत अगदी ९०% मार्क मिळवणारे विद्यार्थी अश्या पात्रता परिक्षेत खुप कमी गुण मिळवताना दिसत आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या मनोधैर्यावर परिणाम होताना दिसत आहे. यावर उपाय म्हणुन पालक आपल्या पाल्यांना पुणे, मुंबई ला पाठवण्यासाठी माहिती मिळवु लागले आहेत. परंतु सर्वच पालक विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई ला पाठवु शकत नाही, ही देखील वस्तुस्थिती आहेच. यामध्ये शहर बदलणे, खाण्याच्या सवयी बदलणे, आरोग्याचे प्रश्न निर्माण होणे, अशी शंका देखील अनेक पालकांना सतावत आहे. परंतु विद्यार्थ्यांनी निराश व्हायची गरज नाही.
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पात्रता परिक्षा या स्पर्धा-परिक्षाच आहेत. त्यांचा अभ्यास हा पारंपारिक परिक्षा पद्धतीपेक्षा पुर्णतः वेगळा आहे. त्यामुळे पारंपारिक ट्युशन -कोचिंग क्लासेस आता निरुपयोगी ठरले आहेत. केवळ पाठांतरावर भर न देता, संकल्पनांचे संपुर्ण आकलन व त्याचे प्रत्यक्ष व्यवहारातील उपयोग यांचे सखोल ज्ञान विद्यार्थ्याला असावे, हेच या परिक्षेत अभिप्रेत आहे. यामुळे, केवळ बोर्ड परिक्षेतील दीर्घ उत्तरांचे पाठांतर आता उपयोगाचे नाही. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परिक्षांसाठी (नीट/ जेईई /नाटा /आय.आय.टी./ एम्स /सीईटी ) पाठांतरापेक्षा विषयाची समज व स्मरणशक्ती महत्वाची आहे.
या परिक्षांसाठी चा अभ्यासक्रम हा सी.बी.एस.ई. बोर्डाचा असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी भांबावुन जावु शकतात. परंतु, इयत्ता आठवी पासुनच जर राज्य मंडळांच्या अभ्यासक्रमासोबत सी.बी.एस.ई. च्या अभ्यासक्रमाचा मागोवा घेण्यास सुरुवात केली, तर पुढील अडचणी टाळता येवु शकतात. इयत्ता ११वी व १२ वी च्या महत्वाच्या दोन वर्षात वेळ वाचवण्यासाठी व प्रभावी उजळणी होण्यासाठी दृक-श्राव्य माध्यम, रेकॉर्डेड व्हिडीओ यासारख्या आधुनिक तंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. आठवी ते बारावीचा सखोल अभ्यास भविष्यात लोकसेवा आयोगाच्या (UPSC/MPSC) परिक्षांसाठी फायदेशीर आहेच!
ही गरज ओळखुन अहमदनगर येथे गेली १५ वर्षे कॉमर्स व सी. ए. क्षेत्रात शिक्षणाचे काम करणार्या "देसरडा-भंडारी प्रोफेशनल अॅकॅडेमी प्रा. लि" यांचे सहकार्याने " देसरडा-भंडारी-करडक अॅकॅडेमी " यांनी मुंबई येथील सुप्रसिद्ध "महेश ट्युटोरिअल" यांचेशी सामंजस्य करार करुन अहमदनगर जिल्ह्यातील पहिले राष्ट्रीय दर्जाचे नीट, सी ई टी, ना.टा., जे. ई.ई., आय. आय. टी.,एम्स, आदी परिक्षांसाठीचे एकमेव मार्गदर्शन केंद् सुरु केले आहे.
महेश ट्युटोरिअल्स ही मुंबई स्टॉ़क एक्सचेंज मध्ये नोंदणीकृत असलेली देशातील एकमेव शिक्षण संस्था असुन तिचे मुल्य २५० कोटी रुपयांहुन अधिक आहे. मुलुंड येथील मुख्य कार्यालयात ५०० हुन अधिक विषय शिक्षक इ. ८ वी ते १२ वी च्या प्रत्येक प्रकरण / टॉपिक नुसार नोट्स / प्रेसेंटेशन / व्हिडीओ बनवत असतात. त्याचा लाभ देशभरातील १ लाख ५० हजार विद्यार्थ्यांना दर वर्षी मिळतो. प्रत्येक विषयाला अंदाजे ५० शिक्षक नियुक्त केलेले असतात. या तज्ञांच्या मार्गदर्शनाने परिपुर्ण स्टडी मटेरिअल आता नगर जिल्ह्यामध्ये उपलब्ध होणार आहे!
त्यामुळे, शिक्षण पद्धतीतील क्रांतीकारी बदलासाठी नगरकर सज्ज झालेले आहेत! आता, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परिक्षांसाठी नगर जिल्हा सोडुन इतरत्र जाण्याची आवश्यकता नाही. सर्व विषय एकाच छताखाली शिकवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत्, शास्त्रशुद्ध पद्धतीने संकल्पना समजावुन सांगणारे तज्ञ व अनुभवी शिक्षक्/मार्गदर्शक्/समुपदेशक उपलब्ध आहेत. वातानुकुलित व डिजीटल क्लासरूम ची सुविधा दिलेली आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये इ. ८ वी पासुनच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परिक्षांच्या तयारीची पायभरणी सुरु केली जाते. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परिक्षांसाठी (नीट/ जेईई /नाटा/आय.आय.टी./ एम्स /सीईटी ) पाठांतरापेक्षा विषयाची समज व स्मरणशक्ती वाढवण्यावर भर दिला जातो. परिक्षेच्या तंत्रानुसार अभ्यासासाठी साहित्य (स्टडी मटेरिअल), टेस्टसिरिज, अचुक प्रश्नोत्तरांचा अमर्याद साठा उपलब्ध आहे. परिक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या शंकांना / प्रश्नांना उत्तर देवु शकेल असे २४ तास सेवा उपलब्ध आहे. बाहेरगावच्या / इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी वीकेण्ड (शनिवार- रविवार) बॅचेस उपलब्ध करुन दिली आहे.
विषयानुसार, गुणांनुसार, संकल्पने नुसार, परिक्षेतील महत्वानुसार प्रत्येक प्रकरणाच्या शिकवण्याच्या वेळेचे नियोजन केलेले आहे. अनेकदा उजळणीसाठी व सरावासाठी विषयवार इलेक्ट्रॉनिक स्वरुपात व्हिडिओ तसेच प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात (पुस्तक स्वरुपात) नोटस उपलब्ध केलेया आहेत. प्रत्यक्ष परिक्षेप्रमाणे दर आठवड्याला परिक्षा घेतली जाते व संगणकीय प्रणालीद्वारे उत्तरपत्रिका तपासुन उत्तरांचे विश्लेषण (अॅनालिसिस) विद्यार्थ्याला दिले जाते, त्यामुळे त्याच्या उणीवा व कमतरता वेळीच ओळखता आल्याने त्यावर उपाय सुचवला जातो. इथे पारंपारिक शिक्षण पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिलेली आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दृक-श्राव्य (ऑडिओ-व्हिडिओ) व अॅनिमेशन या आधुनिक तंत्रज्ञानाचा शास्त्रशुद्ध वापर केला जातो. तज्ञ शिक्षकांचे रेकॉर्ड केलेले व्हिडीओस विद्यार्थ्यांकडे मोबाईल् /टॅब / लॅपटॉप मध्ये दिले जातात. विद्यार्थी हे व्हिडीओज विना इंटरनेट कितीही वेळा पाहु शकतात. एकच विषयाची अनेकदा तज्ञ शिक्षकामार्फत उजळणी होत असल्याने, विषय समजुन घ्यायला मदत होते.
उपलब्ध कोर्सेसः इ . 8 वी ते 10 वी (State / CBSE ) , इ. 11 वी-12 वी (PCMB) व NEET / JEE / NATA / IIT/ CET बॅचेस)
जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रीय दर्जाच्या मार्गदर्शन केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालकांनी केले आहे.
इतर तालुक्यामध्ये व मोठ्या शाळा/ महाविद्यालयांमध्ये खास मार्गदर्शन वर्ग सुरु करण्याची योजना आहे. त्यानुसार पाथर्डी येथील श्री तिलोक जैन कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इ. ११ वी व १२ वी च्या ६० विद्यार्थ्यांसाठी खास वर्ग दि. १ जुन पासुन सुरु केला आहे.
पत्ता :
1) मुख्य शाखा / कार्यालय - सहकारी क्रांती, दुसरा मजला, जुने बीएसएनएल ऑफिस, मार्केट यार्ड, अहमदनगर.
2) सावेडी शाखा : किंग्ज कॉर्नर, सोना नगरचौक, कुष्ठधाम रोड, सावेडी, अहमदनगर.
3) श्री तिलोक जैन कनिष्ठ महाविद्यालय, पाथर्डी.
संपर्क : 0241- 2323173, 9119 555 888, 8999 41 44 11
फेसबुक : http://www.facebook.com/dbpa.nagar
शुभेच्छा!
शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा....
अभिनंदन आणि शुभेच्छा....
छान.
छान.
शुभेच्छा !
शुभेच्छा !
आम्ही यंत्रमानव तर होत नाही
आम्ही यंत्रमानव तर होत नाही ना?