भाज्या: भेंडी, गवार, स्नो-पीज शेंगा, वांगे, कारले, फरसबी, बटाटा, भोपळी मिरची, अळंबी, तोंडली .. सगळ्या भाज्या उभ्या (लांब) कापून.
(तीन चार ओंजळी भरतील एवढ्या)
१ मध्यम कांदा, २ रसरशीत टोमॅटो.
पाऊण चमचा तवा फ्राय मसाला, पाव चमचा पावभाजी मसाला , आवडत असेल तर पाव चमचा आमचूर. तिखट, हळद मीठ.
१ १/२ टेबलस्पून तेल
१. Oven Broil वर ५०० ला चालू करा.
२. कांदा , टोमॅटो वगळता सगळ्या भाज्या एका ट्रेवर घालून Oven मधे टाका. त्यावर थोडा Pam-Spray मारा. १५ मिनिटात भाज्या भाजल्या जातील. थोड्या कच्च्या राहिल्या तरी चालतील.
३. एका पॅन मधे तेल टाका. तापल्यावर त्यावर कांदा टाका. कांदा फार शिजवायची गरज नाही. एक दिड मिनिटाने टोमॅटोच्या फोडी टाका. शिजवून घ्या. बटाटा इतर भाज्यांसारखा पटकन शिजला नसेल तर भाज्यातला बटाटा वेगळा काढून तो त्यात टाका. दोन मिनिटे परतून घ्या.
४. त्यावर मसाले टाका, आणि भाज्या टाकून ढवळून घ्या. दोन मिनिटं शिजवून घ्या.
यात कुठल्याही फळभाज्या घालता येतात. बटाटा एखादाच घालावा.
कारले घातल्यास लांब फोडी चिरून थोडा वेळ मिठाच्या पाण्यात टाकून , निथळून घ्यावे.
भाजीत पाणी घालू नका.
तेल पण फार लागत नाही.
टोमॅटोचा ओलसरपणा पुरतो.
पोट साफ होते.
मस्त आणि सोपी रेसिपी.
मस्त आणि सोपी रेसिपी.
मस्त रेसिपी. पुढच्या गटगला
मस्त रेसिपी. पुढच्या गटगला एक्झॉटिक म्हणून आम्हांला खायला घाला.
सोपी आहे कृती. एक मिक्स
सोपी आहे कृती. एक मिक्स भाज्यांचं पॅक मिळतो तो वापरून करता येइल.
मस्त ! पोट साफ होते
मस्त !
पोट साफ होते
एक मिक्स भाज्यांचं पॅक मिळतो
एक मिक्स भाज्यांचं पॅक मिळतो << कृपया असे काही करू नका... फार वाईट असतो तो..
...
पुढच्या गटगला एक्झॉटिक म्हणून आम्हांला खायला घाला. >> पोट साफ होईल त्याचे काय ?
मस्त पाकृ ! फोटो कुठेय ?
मस्त पाकृ ! फोटो कुठेय ?
एक मिक्स भाज्यांचं पॅक मिळतो << कृपया असे काही करू नका... फार वाईट असतो तो.>>>>>>का बरं ? मलाही मिक्स भाज्यांचं पाकीट आठ्वलेलं . त्यात काय वाईट असतं ?
मलाही मिक्स भाज्यांचं पाकीट
मलाही मिक्स भाज्यांचं पाकीट आठ्वलेलं . त्यात काय वाईट असतं ? <<< फ्रिजरमधले पाकीट असेल (असे मला वाटले) त्यात पाणी (बर्फ) असते.
>>> मस्त रेसिपी. पुढच्या
>>> मस्त रेसिपी. पुढच्या गटगला एक्झॉटिक म्हणून आम्हांला खायला घाला.
+१
होऊ दे खर्च!
बटाट्याला कशाने रिप्लेस करता
बटाट्याला कशाने रिप्लेस करता येईल?
>>फ्रिजरमधले पाकीट असेल (असे
>>फ्रिजरमधले पाकीट असेल (असे मला वाटले) त्यात पाणी (बर्फ) असते.>> बरोबर. पिचपिचीत असतात त्या भाज्या.
बटाटे रिप्लेस करायला पनीर हाच एकमेव उपाय उरतो.
बटाट्याला कशाने रिप्लेस करता
बटाट्याला कशाने रिप्लेस करता येईल? << बटाटा घालूच नका ना.. यातल्या कोणतीही एक भाजी हवीच अशी नाही. (मी घरी असतील त्या वापरतो).
मस्त आहे. स्नो पीज शेंगा
मस्त आहे.
कोवळे मटार. ज्यात बाहेरची
कोवळे मटार. ज्यात बाहेरची शेंग/ साल पण खाता येते.
ओहह अमितव थँक यु. मी गुगलवर
ओहह अमितव थँक यु. मी गुगलवर जाऊन बघितलं. मग इथे एडीट केलं.
मी यात अळंबी (मश्रूम) आणि
मी यात अळंबी (मश्रूम) आणि तोंडली पण घातलेली आहेत. (तोंडली मला आवडत नाहीत पण या भाजीत चालतात)
तोंडली पण घातलेली आहेत.
तोंडली पण घातलेली आहेत. (तोंडली मला आवडत नाहीत पण या भाजीत चालतात)>> हे तोंड देखलंच म्हणताय ना!!
तोंड देखलंच म्हट्लं तर तोंड
तोंड देखलंच म्हट्लं तर तोंड दाखवायला जागा रहाणार नाही..
या भाजीत 'तवा फ्राय मसाला'
या भाजीत 'तवा फ्राय मसाला' घातलाय म्हणून 'तवा भाजी' का ? पावभाजीच्या गाडीवर मिळणारी तवा भाजी तर वेगळी असते.
या भाजीत 'तवा फ्राय मसाला'
या भाजीत 'तवा फ्राय मसाला' घातलाय म्हणून 'तवा भाजी' का ? <<< खरं आहे... खरेतर या भाज्या तळून घ्यायच्या असतात. पण त्यामुळे खूप तेलकट होतात. तेव्हा कोरडी म्हणूनही तवा भाजी