अभिप्राय तुमचे

Submitted by चाफा on 7 November, 2007 - 22:23

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २००७ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे तर ते वाचण्याची आम्हाला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हाला इथे जरुर कळवा.
-संपादक मंडळ

विशेषांक लेखन: 

मुखपृष्ठ उत्तम, बासरी सुरेल, अंकाचा लेआउट मस्त. अंक वाचला नाही अजुन तरीही 'देखण्या अंकाला'प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहावल नाही.
संपादक मंडळाने घेतलेली मेहनत जाणवते.
आत्तापर्यंत असामी ची लांडगा वाचली , कथा म्हणुन उत्तम पण security, loss prevention setup मधे आणि २ गोष्टी असतात १- कोणताही मेजर आलार्म कन्ट्रोल dual combination नेच disable करता येतो, एक कोड घालुन नाही -२- bank मधे cashier/alarm controll रुम ऍक्सेस कन्ट्रोल्ड असते ज्याचा log maintain होतो. तसेच या भागात motion detector coupled PTZ (pan tilt zoom) camera आणि recorder असतो. त्यांमुळे तांत्रिकदृष्ट्या ही कथा नाही पट्ली.

vinay C ने काढलेले व्यंगचित्रपण आवडले

मुखपृष्ठ आणि एकुण मांडणी मस्तच.
संपादकीय आवडले.
अजुन पुर्ण अंक वाचुन व्हायचा आहे. पण हलके-फुलके विभागातील 'मॅच' वर click केले की error येते ("Access denied
You are not authorized to access this page.'' )

सुंदर अंक काढल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन!
शुभ दीपावली!!

- महागुरु

जसा वाचतोय तशी प्रतिक्रिया देतो, डिझाईन खूप छान आहे. GPS एकदम धमाल, 'चाय' ने बर्‍याच आठवणी जाग्या केल्या. संदीप, तू ही गरवारेत होतास काय? 'मयुरेश्वर' वरून वाटले.
तो 'मॅच' चा error मला ही आला.
बाकी अजून वाचून सांगतो.
संपादक मंडळ आणि 'श्रेयनामावली'तील सर्वांचे अभिनंदन!

आत्ताच दिवाळी अंक बघितला....... Happy यावर्षीचा अंक सुद्धा भारी देखणा झालाय Happy उघडल्याबरोबर प्रसन्न वाटतंय.

अभिजित..... क्या बात है........अतिशय सुरेल आणि तरल सूर आहेत रे तुझ्या बासरीचे.... Happy

संपादक मंडळ, आणि श्रेयनामावलीतले सगळे जण....... तुमचं मनापासून अभिनंदन Happy

अजून फ़क्त चाळणं झालंय. जसंजसं वाचून होईल तशातशा प्रतिक्रिया देईनच.

स्वाती तुझं गाणं ऐकलं .... सगळ्यात पहिले. अ प्र ति म !!! हा एकच शब्द सुचतोय माझ्या तोकड्या बुद्धिला. तुला गोड गळ्याची देणगी मिळालीये गं....! छान छान काव्य आणि त्याला साजेसा सूर....... क्या सही combination आहे यार !! मजा आ गया जानेमन Happy अशीच गाती रहा गं.....! वैभव चे शब्द आणि विवेकचं संगीत उत्कृष्ठ आहेच Happy

सगळी रेखाचित्रं, प्रकाशचित्र सुरेख !!

सुंदर अंक!
अगदी डोळ्यात झोप होती तरी जागून वाचून काढला अंक. आवडीने आणि अगदी मायबोलीवरील प्रेमाने माझा अभीप्राय देतेय् ,(अजून बराच वाचयचाय)

सारीपाट : गोष्ट आवडली ....... संसार म्हणजे ... हा भाग आवडला सुमॉ.
अबोली: माझ्या डोळ्यात पाणी आले पूनम.
घरचा पाहुणा : एकदम मान डोलवली. अगदी जवळचाच अनुभव असाच घरात झालेला.
सुखात्मे : शेवट काही कळला नाही.

उद्या पुर्ण अंक वाचेन...........

अजून अंक पूर्ण वाचलाही नाहीय. पण स्वाती, तुझं गाणं ऐकलं आणि राहवेना. अप्रतिम गोड गळा आहे ग तुझा. फारच सुरेख. जयूला पूर्ण अनुमोदन. आज दिवाळीच्या सकाळी तुझं गाणं ऐकलं अन सारं घरच संगीतमय होऊन गेलं. अशीच गात रहा.
वैभवची कविताही तोडीस तोड देखणी.
संपादक मंडळ आणि श्रेयनामावलीतल्या सर्वांचंही अगदी मनापासून अभिनंदन.

अतिशय सुंदर दिवाळी अंक. मुखपृष्ठ विशेष आवडले.

अरे वा! काय सुरेल सुरवात आहे...आखिव्-रेखिव अंक अगदि देखणा झाला आहे..मुखप्रुष्ठ खासच!
कलर स्किम आवडलि..फ॑क्त चाळलाय.
पुढिल प्रतिक्रिया नंतर.....

छान जमलाय दिवाळी अंक. सगळ्या गोष्टी अजून वाचल्या नाहीत पण ट्यु, दाद, संघमित्रा ह्यांच्या लिखाणाची भट्टी छान जमून आलीये.

अजून अंक उघडलाच नाहीये. मुखपृष्ठ पाहून आणि बासरीवरची धून ऐकूनच इतका आनंद झाला की लिहील्याशिवाय राहवेना.
किती प्रसन्न वाटतंय !! नीलूताई आणि अभिजीत, तुम्ही ग्रेट आहात!! Happy

अंक अतिशय देखणा दिसतोय. संपादक मंडळाने घेतलेले कष्ट दिसून येतायत मांडणीत. अभिनंदन संपादक! Happy
बाकी अंकावर वाचेन तसतश्या प्रतिक्रिया देईनच.

जयू आणि सुमॉ, धन्यवाद. Happy

वा!!! मस्त दिसतोय अंक. मुखपृष्ठ आवडल. रांगोळी, कंदिल ह्यांची चित्र पण मस्त आहेत.
अजुन वाचुन व्हायचाय पण रहावल नाही म्हणुन लिहिल. सर्व संपादक मंडळींचे अभिनंदन.
स्वाती तुझ गाण ऐकल, आवडल. खरच कसकाय कॉरडिनेट केलत ग?? तुम्हा तिघांचही अभिनंदन.

-अमृता.

अत्यन्त सुन्दर अंक.

मना पसून आवडला.

रश्मि.

चांगला अंक आहे.

विनय... ही सगळी गुजराथी मुल अशीच असतात का, मला देखील माझ्या एका जवळच्या मित्राने असेच गोड गोड बोलुन ५०,००० ला फसवले होते.

अतिशय देखणा अंक. सगळ्यानी घेतलेली मेहनत जाणवत आहे. मनापासून अभिनदन.
(अनुस्वार कसा द्यायचा?)
अन्जली.

संपादक मंडळ तुमच अभिनंदन.
अंक खुपच मस्त झाला आहे. स्वर-चित्रे सहीच. मुखपृष्ठ पण सहीच. रंगसंगती आवडली.

बाकी अंक आता चहा अन चकल्यांबरोबर वाचायला सुरुवात केलीच आहे.

परत एकदा संपादक मंडळाचे अभिनंदन.

नरेंद्र गोळे यांच्या प्रवास वर्णनात 'उद्गिरच्य' असे झाले आहे, मला वाटते ते 'उदगीरच्या' असे असायला हवे आहे.
(१९ वी ओळ, ४था परिच्छेद- २री ओळ)

धन्यवाद!
- महागुरु

दिवाळी अंक एकदम अप्रतीम.. मांडणी एकदम देखणी झालीय. खरंतर पूर्ण अंकाबद्दल एकदम लिहिता येणार नाही म्हणून मग एका एका सदराबद्दल.

मुखपृष्ठ आगदी दिवाळी अंकाला शोभेलसे. दिवाळा अंकाच्या मुखपृष्ठावर बाई हवीच ('माझे शत्रूपक्ष'- पुल) ही प्रथा पण पाळली गेलीय.
दिवाळी अंक जरी अंक असला तरी तो जालावर आहे हे लक्षात आलेच नाही. कारण ईयरफोन काढून ठेवलेले. आधीच्या प्रतिक्रिया
वाचताना तिथे बासरी आहे म्हणून कळलं, मग पुन्हा एकदा अंक उघडला आणि मनसोक्त बासरी ऐकली. मुखपृष्ठावरचे चित्र पण मस्त आहे.
ज्या पद्धतीने केस चितारले आहेत त्या पध्दतीची चित्रं मी खूप पूर्वी कुठेतरी बघितलेली आठवतात. निलूला चित्राबद्दल जास्त माहीती विचारायला हवी.

'परदेसाई' विनय देसाई

हो मलाही येथील प्रतिक्रिया वाचून कळाले बासरीबद्दल. मुखपृष्ठ पाहिल्यावर आतील मजकूर वाचण्याच्या घाईत त्यावर पटकन क्लिक करत होतो, पण तेव्हढ्या मिनिटात एक 'बीप' ऐकू यायचा आणि कळायचे नाही ते काय आहे Happy मग या प्रतिक्रिया वाचल्यावर तेथेच थांबलो आणि मग ती बासरी ऐकू आली. छान वाटते ती बासरी ऐकायला, विशेषतः बाहेर दिव्यांची माळ, खायला केदार म्हणतो तशी चकली वगैरे असताना! त्या मुखपृष्ठावर बासरी वाजवायची आयडिया मस्त आहे.

धन्यवाद, महागुरु. तुम्ही सुचविलेली सुधारणा केली आहे.

BRAVO ! केवळ अप्रतीम आहे अंक. हा अभिप्राय सादरीकरण, मांडणी, सजावट इत्यादइ बद्दल आहे. नुसता चाळला आत्ता अंक. जसजसा वाचून होइल तसतशा प्रतिक्रिया देईनच.

पण संपादक, सल्लगार, चित्रकार, designers सगळ्यांचं अभिनंदन आणि इतका देखणा अंक तयार केल्या बद्दल धन्यवाद !

परागकण

मिनोती, केदार, छान लेख.
विनय, साधी सोपी पण उपयुक्त कथा.
अज्जुका, फारच सुंदर वर्णन, आणि खरच सुरेख प्रवास. स्वत: करतो आहे अस वाटल. फोटोंमूळे बहार आली.
झुलेलाल, नेहमीप्रमाणे सुरेख साधी पण उत्कट कथा.
लोपा, खलास कथा. सुरेख जमली आहे भाषा.
मुलाखती खूपच छान.
अजून इतर वाचायचे आहे.
बासरी खलास आणि मुखपृष्ठही.

मस्त दिवाळी अंक जमलाय.. सगळ्या कथा वाचुन काढल्या सकाळपासुन

१२९४ मध्ये अल्लाऊद्दिन खिलजीने देवगिरीवर हल्ला करून रामदेवरायाचा पराभव केला. पण तह होऊन सत्ता रामदेवरायाकडेच राहिली >

गोळे तुमचे प्रवास वर्णन व त्याचे तपशिल आवडले. फक्त एक तपशिल देवगीरी बाबत लिहीतो. (इतिहास माझा विक पॉईंट त्यामुळे ... )
हा किल्ला सह्याद्री सारख्या रांगात नाही तर बैठा आहे. ह्या किल्यावर तोफा डागुन वा हल्ला चढवुन कोणीही कधीही जिंकले नाहीय. खिलजी ने हरपाल्देवास ( जो रामदेवरायाच मेहुना होता) फितुरीने राज्य देतो असे सांगीतले पण आधी देवगिरी स्वाधीन कर असा करार केला. त्यात हरपालदेवाने त्याला किल्यात कोण कसे लपुन बसते ही माहीती दिली व हल्ला चढवला, तो पुर्ण व्हायच्या आतच रामदेवराय शरन आला कारण जी दार उघडली जात होती ती दर्यांची वा तेलाचा कढईंची नसुन महालाची होती त्यामुळे रामदेवरायला हार पत्कारावी लागली. रामदेवरायाला नंतर बहुतेक फाशी दिले व किल्ला हरपालदेवाकडे गेला.
ही एकमेव लढाई या किल्यावर झाली. बाकीच्या पुर्ण इतिहासात हा किल्ला फक्त हस्तांतरीत झाला. आजही ह्या किल्याला चढाई करुन हरविने अशक्य आहे. ( त्या काळच्या साधनांनी).
पैठन ( प्रतिष्टाण) मधील ज्ञानेश्वर उद्यान हे पण सुंदर आहे. पेशव्यांचा ( अन पुण्याचा) फार फार आधी हिच नगरी महाराष्टाची सांस्कॄतीक तसेच व्यावहारीक राजधानी होती.

झुलेलाल बरसात आवडली. खासच.
दोन शेवट - एकदम डिफरंट, आवडली.
सुखात्मे आवडली, त्यावरुन एक पेटीतला माणुस (बहुतेक मुळ लेखक टॉलस्टॉय ची) आठवन झाली.

धन्यवाद सव्या.

मुखपृष्ठ सुंदर, मांडणीपण छान आहे, श्रवणीय फारच सुंदर.
बडबडीची कथा आवडली,
सुखात्मे खुपच वेगळी भावली,
केदार जोशीचा लेख आवडला.
सध्या इतकेच....

अथ पसून इति पर्यंत अंक केवळ उच्च आहे!
संपादक मंडळाला, समस्त सहाय्यकांना आणि दिवाळी अंकात सहभागी होणा-यांना शतश: धन्यवाद!
आवर्जून अभिप्राय देणा-यांचे, कौतुक करून उत्साह वाढवणा-यांचे आणि कृतकृत्यतेचा भावानंद देणा-यांचे विशेष आभार! Happy

वैभवा, तुझा ते 'रे सूर तुझे मधला'- रे... विवेकचे अचुक स्वरसाधन.... आणि स्वातीचे सुरसंधान!
सारेच जीवघेणे!
स्वाते, आय हाय!

अजून काहीच बघितलेले नाही.... सवडीने अभिप्राय ही धुंद उतरल्यावर!

तिघेही... जियो!

अजुन फक्त चाळलाय, पण खुप आनंद झाला बघुन.
बाकी लिहिणारे सगळे रथी-महारथी आहेतच आपल्या मायबोलीवरचे!!
सगळे लिहिणारे (काव्य, कथा, ई.), संपादक, श्रेयनामावलीतले सगळे---सगळ्यांचे आभार.

स्वातीचं गाणं ऐकलं, "तुझे सूर वेड लावतायत" खरच. शब्दांकन आणि संगीत पण उत्तम.
अजय यांची २१०७ सालातली व्यंगचित्र पण खासच.

पण लोकहो, जरा मदत करा. ते बासरीचे सुर कुठे सापडत नाहियेत. कुठे आहे त्याची लिंक?

आणखी जास्त शब्द सुचत नाहीत, ईतरांसारखीच बासरी ऐकायची राहून गेली होती. पण प्रतिक्रीया वाचल्यावर आवर्जुन ऐकली मस्त अनुभव ,
बाकी बडबडी , दाद.......... ग्रेट, आजुन सगळा अंक वाचायचा आहे पण सुरुवात छान झालीये.
सादरीकरणातली मेहनत जाणवते आहे. सगळ्याच संपादक मंडळाचे आणि संबंधितांचे मनपुर्वक अभिनंदन.
------------- चाफ्फा ( आशिष )

Pages