अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा -फेसबुक साठी रेडीमेड स्टेटस - कविन

Submitted by कविन on 28 August, 2017 - 06:34

sapshidi adv 1.jpgसापशिडी.कॉम भरौसा आयडीभरका;
लॉगिन के पेहले भी.. लॉग आऊट के बाद भी..

तुमच्या लाईक्स आणि फ़ेम च्या मार्गातले साप तुमच्या पोस्टींना गिळंकृत करुन तुम्हाला पदच्युत करण्यापुर्वीच आम्ही तुम्हाला यशाच्या शिडीपर्यंत घेऊन जातो. तुम्ही तुमच्या यशाला "अंगठा उंचावून" अभिवादन करता तेव्हाच आम्हाला खरा आनंद होतो.

We would like you to enjoy your success fully & be there for you anonymously. म्हणूनच आजवर गिऱ्हाईकांना लिहून दिलेल्या स्टेटसचा गवगवा आम्ही इथे आमच्या नावाने करु शकत नाही. तरी एक छोटस उदाहरण म्हणून एका गिऱ्हाईकाचा उल्लेख जरुर करु इच्छितो. हि व्यक्ती ३ वर्ष १ महिन्यापासून आमची क्लाएन्ट आहे. आणि आमच्या फ़ॉर्म्युला १ चा वापर करुन आज माबोवर लोकप्रियही आहे. चर्चेत रहाण्याचं कसब या व्यक्तीला फ़ॉर्म्युला १ मुळे पुरेपूर मिळालं आहे आणि मला खात्री आहे की आमच्या या जाहिरातीचाही वापर करुन हि व्यक्ती पुन्हा नवी चर्चा सुरू करुन अजून लोकप्रिय होणार आहे.

नाव जाहीर करणं आमच्या नितीनियमांमधे बसत नाही पण यांचेच फ़ेसबूक अकाउंट देखील आम्ही तितकेच "हॅपनिंग" करुन दिले आहे. त्यांनीच पुढे येऊन जाहीर मान्यता दिली याला तर आमची ना नाही पण एथिक्स मुळे आम्ही मात्रं नाव जाहीर करु शकत नाही.

आमचे स्टेटस दर हे तुमच्या गरजेप्रमाणे आणि वाटेत किती साप आहेत, किती शिड्या तुम्हाला द्याव्या लागतील त्याप्रमाणे बदलतील याची कृपया नोंद घ्यावी.

संपर्कासाठी पत्ता : सापशिडी.कॉम, फ़ासे मंझील
सापटाळा नाका, शिडी रस्ता
मुक्काम पोस्ट १२१००
saapshidi1to100@fame.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol भारी
पण ९८ ला सापच हवा आणि तोही एकदम कडेलोट करणारा Proud

Ant killer powder.jpg

अनु, तू ही आयुर्वेदिक पावडर घे बघू दुध/ दही/ मध / पाण्यातून

ही कल्पना आणि शक्ती दोघांना आलेल्या मुंग्या मारते Proud

लोकं हळूहळू औट ऑफ द बॉक्स जाऊन डोक्यालिटी लढवू लागलेत Happy

हि व्यक्ती ३ वर्ष १ महिन्यापासून आमची क्लाएन्ट आहे. आणि आमच्या फ़ॉर्म्युला १ चा वापर करुन आज माबोवर लोकप्रियही आहे. चर्चेत रहाण्याचं कसब या व्यक्तीला फ़ॉर्म्युला १ मुळे पुरेपूर मिळालं आहे आणि मला खात्री आहे की आमच्या या जाहिरातीचाही वापर करुन हि व्यक्ती पुन्हा नवी चर्चा सुरू करुन अजून लोकप्रिय होणार आहे.
>>>>>>>>>
मला माबोवर येऊना ३ वर्षे १ महिने झाले... खरेच... पताही नही चला Happy