मापो तोफु Mapo tofu (麻婆豆腐)

Submitted by मेधा on 28 July, 2017 - 09:19
mapo tofu
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सॉफ्ट तोफु एक पाकीट
चिकन खिमा पाव किलो ( आवडत / चालत / मिळत असल्यास बीफ / पोर्क खिमा घालू शकता)
चिनी तिळाचे तेल १ टेबलस्पून
लाइट सॉय सॉस चवीप्रमाणे
कॉर्न स्टार्च १ टेबलस्पून - ऐच्छिक
फर्मेंटेड ब्लॅक बीन्स - दा शि (豆豉) १ टेबल स्पून थोड्या पाण्यात ५ मिनिटे भिजवून
स्पाइसी बीन पेस्ट , बीन पेस्ट - Doubanjiang १ टेबलस्पून प्रत्येकी
पातीचा कांदा, लसणीची पात बारीक चिरून अर्धी वाटी
आले बारीक चिरून एक टी स्पून
लसूण बारीक चिरून एक टी स्पून
तेल २ चमचे
चिनी पेपर कॉर्न ( Sichuan pepper) १ टेबलस्पून मंद आचेवर कोरडे परतून भरड पूड
मीठ

क्रमवार पाककृती: 

तोफूचे साधारण अर्धा इंच तुकडे करुन गरम पाण्यात घालून २-३ मिनिटे उकळून घ्या
चिकन खिमा , १/२ टी स्पून मीठ , तिळाचे तेल एकत्र मिसळून ५-७ मिनिटे ठेवा
पसरट कढईत ( वोक ) मधे १ टेबलस्पून तेल तापवून त्यातून खिमा परतून घ्या. खिमा शिजून कोरडा झाला की एका ताटात काढून घ्या
अजून एक टेबलस्पून तेल घालून त्यात स्पाइसी आणि रेग्युलर बीन पेस्ट घालून मिनिटभर परता
आले, लसूण, फर्मेंंटेड बीन्स, कांदा पातीचा पांढरा भाग घालून मिनिटभर परता
अर्धा कप पाणी घालून हे सर्व मिश्रण २-३ मिनिट उकळू द्या
तोफूचे तुकडे घाला आणि हलक्या हाताने सर्व मिश्रण सारखे करा
मिनिटभराने चिकन खिमा घाला आणि परत सर्व मिसळून घ्या .
सॉय सॉस घाला
२-३ मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. वापरत असल्यास कॉर्न स्टार्च थोड्या पाण्यात ढवळून ते मिश्रण वॉकमधे घाला. हळू हळू घालावे नाहीतर कॉर्न स्टार्चच्या गुठळ्या होतील
चिनी पेपर कॉर्न थोडे भरड कुटून शिंपडा
लसणाची पात, पातीच्या कांद्याचा हिरवा भाग घाला

गरम भाता बरोबर फस्त करा

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

मी याच्यात गाजर, फुगी मिरची बारीक चिरुन घालते
आवडत असल्यास बीन पेस्ट बरोबर थोडे रेड चिली ऑइल पण घालू शकता
भात + मापो तोफू मुलं डब्यात आवडीने नेतात
शाकाहारी मंडळींसाठी खिमा वगळून सुद्धा करू शकता. खिम्या एवजी आवडत्या भाज्या परतून घालता येतील

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण , इण्टरनेट आणि स्वत:चे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही!
रेसिपी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यात येईल. Happy

वॉव चिकन खीमा... मटणाचा खीमा पर्याय म्हणून चालेल का.. मला तो जास्त आवडतो..
पण फायनल फोटो कुठे आहे?
आणि ते शीर्षकात पाकृपुढे चिन्हे कसली आहेत? चिकनची उरलीसुरली हाडे आहेत का Happy

ॠणझुण पाखरा, ती प्रश्नचिन्हे नसून चिनी भाषेतली अक्षरे आहेत. तुला दिसत नाहीत कारण तुझ्या काम्पुटरात/फोनात तो फाँट आलेला नाही.