नमस्कार मायबोलीकर......
तुमची मदत हवी आहे.
माझ्या मिस्टरांना नोकरी निमित्त फिनलॅंड येथे दोन वर्षासाठी फॅमिली सकट जाण्याच्या योग आला आहे. येणार्या नोव्हेबंर/डिसेंबर २०१७ मधे जाण्याची शक्यता आहे. आम्ही मुळचे भारतातील पुणे येथे वास्तव्यास आहोत. परंतू
मला काही प्रश्न पडले आहेत. त्यामुळे जायचे की नाही अशी द्विधामनस्थिती झाली आहे. माझ्या प्रश्नांच निरसन मायबोलीकर करतील आणि मला निर्णय घेण्यात त्याची मदत होईल अशी आशा आहे.
मला पडलेले प्रश्न.....
१. मायबोलीकरांपैकी कोणी फिनलँड मधे आहे का? किंवा कोणी जाऊन आले आहे का? कुणाचे तिथले काही अनुभव आहेत का?
२. आर्थिक दॄष्ट्या ह्या देशात राहणे कसे आहे? किंवा तिथे रहायचे असेल तर किमान मासिकप्राप्ती किती असायला हवी?
३. तसेच आमचा मुलगा आत्ता ईयत्ता ६ वीत आहे. तरी त्याच्या दृष्टीने शाळा बदलणे ( मिडटर्म मधे किंवा पुढ्च्या ईयत्तेसाठी) कितपत योग्य ठरेल?(सध्या तो एस.एस. सी बोर्डातून शिकत आहे. )
४. तिकडची शैक्षणीक पद्धती कशी आहे?
५. आम्ही शाकाहारी आहोत . तिकडे भारतीय पद्धतीचे काय काय मिळते?
६. जायचे ठरले तर जाताना आम्हाला काय काय तयारी करावी लागेल?
आतापर्यंत माबोकरांनी जे सल्ले दिले आहेत ते नक्कीच उपयोगी पडले आहेत.
तुम्ही कुठल्या शहरात जाणार
तुम्ही कुठल्या शहरात जाणार आहेत हे लिहीलं नाही.
जर तुम्ही हेलसिंकी मध्ये राहणार असाल तर शिक्षण आणि शाकाहारी जेवणाचा काहीच प्रॉब्लेम होणार नाही. मी स्वतः तिथे काही वर्षे बायको आणि मुलाबरोबर राहिलो आहे.
अधिक माहिती करता व्यनि करा.
प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
प्रतिसादा बद्दल धन्यवाद. अधिक माहीती करीता तुम्हाला व्यनी करेन.