नोटबंदीचे सु-परीणाम भाग २

Submitted by मिलिंद जाधव on 15 July, 2017 - 04:52

पुर्वी " नोटबंदीचे सु-परीणाम " असा ऐक धागा काढलेला होता. त्या धाग्यावर आता प्रतिक्रीया सुविधा बंद केलेली असल्याने नविन धागा उघडलेला आहे.

नोटबंदी हा आजच्या सरकारने घेतलेला महत्वाचा व धाडसी निर्णय होता. सरकारचे प्रमुख ह्या नात्यांने पंतप्रधान यांना हा निर्णय घ्यायचा होता तो त्यांनी घेतला. नोटबंदीचा पर्याय हा सरकारच्या अर्थ विभागाच्या यंत्रणेने दिलेला असावा व त्याचे बरे वाईट परीणाम काय होतील ह्याची माहिती सध्याच्या सरकारला दिलेली असेलच. स्वतःच्या ( पर्यायाने भाजपाच्या ) राजकीय कारकिर्दीला क्षणात नष्ट करु शकेल असा निर्णय घेणे सोप्पे नसावे. ज्या सरकारी यंत्रणेने नोटबंदीचा पर्याय सुचवलेला त्यांनी नोटबंदीचा आवाका, त्यामुळे होऊ शकणार्या समस्यां व त्यावरचे उपाय ह्यावर ईतका सखोल विचार केलेला नव्हता हे नोटबंदीच्या नंतरच्या काळात समोर आल होत.

नोटबंदी मुळे जनतेला त्रास झाला, १०० लोक मरण पावली, आणी नोटबंदी ही विरोधी पक्षाच्या मते आताच्या सरकारच्या अपयशातील अजुन एक प्रकरण ठरली .

आता भाजपाला झोडपायला नोटबंदीचा उच्चार पुरेसा आहे अस वाटत असतानाच नविन माहीती समोर आलेली आहे. ही माहिती मटाच्या बातमीत दिलेली आहे. अर्थात आताच्या सरकारच्या चांगल्या कामावर आलेल्या सर्व बातम्या बिनबुडाच्या खोट्या असतात हे सर्व स्विकारुनच ही बातमी ईथे दिलेली आहे.

कॅशलेस व्यवहार ८०० अब्जांवर!
http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/cashless-t...

नोटाबंदीनंतर सर्वसामान्य जनतेला बँकांबाहेर मोठमोठ्या रांगा लावण्याची वेळ आली खरी...पण आता आठ महिन्यानंतर या निर्णयाचे फायदेही दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. काळ्या पैशावर नियंत्रण येण्याखेरीज ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाणही वाढले आहे. नोव्हेंबर ते जून या कालावधीत देशातील कॅशलेस व्यवहार अंदाजे ८०० अब्ज रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

एका अहवालानुसार नोटाबंदीचा निर्णय घेतला नसता, तर ८०० अब्ज रुपयांचे कॅशलेस व्यवहार होण्यासाठी २०२० पर्यंत वाट पाहावी लागली असती. कॅशलेस व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचा सर्वाधिक फायदा केंद्र सरकारला झाला असून, सर्वच व्यवहारांवर नजर ठेवणे सोपे झाले आहे. शिवाय काळ्या पैशाच्या निर्मितीला लगाम घालणेही शक्य झाले आहे.

Group content visibility: 
Use group defaults

जी एस टी आणि नोटबंदी ही पारदर्शक व्यवहारांकडे टाकलेली महत्वाची पावले आहेत. त्यांच्या अंमलबजावणीत झालेला / होऊ शकणारा गोंधळ लक्षात घेऊनही ती पावले महत्वाचीच आहेत.

मुळात 'नोटबंदी फेल झाली' असे म्हणणारे सोकॉल्ड ढोंगी पुरोगामी, तथाकथित लिबरल्स, कॉंग्रेजी व डावे पक्ष इत्यादी ज्यांचे नोटाबंदीने पुढील सात पिढ्या सुखाने जगु शकतील ह्या हिशोबांने, भ्रष्टाचार व घोटाळे करुन जमा केलेली सर्व संप्पती एका झटक्यात मातीमोल झाली अशी लोक 'नोटबंदी फेल झाली' वगैरे बकवास करत होती.

सर्व सामन्य जनतेने जो त्रास होतोय तो सहन करुन सरकारच्या निर्णयाला पाठींबा दिला. नोट बंदी विरोधात ममता बॅनर्जी व अरविंद केजरिवाल यांनी दिल्लीतील जंतर मंतर वर आयोजीत केलेल्या धरणे आंदोलनाला आआप व टिएमसी च्या कार्यकर्त्यां व्यतिरिक्त काळ कुत्र देखिल फिरकले नव्हते. यावरुन जनतेला मोदींचा निर्णय पटला होता हे मान्य करायला हवे.

सामन्य जनतेला त्रास झाला, मात्र भ्रष्टाचार कमी करण्याकरता कधीनाकधी नोटबंदी सारखे पाऊल उचलावेच लागेल, हे सर्वसामन्य जनतेला मोदींनी पटवून दिले व पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीनी घेतलेला नोटबंदींचा निर्णय योग्यच होता ह्याचा पुरावा नंतर झालेल्या निवडणुकीतील विजयाने दाखवुन दिला.

मोले घातले रडाया
नाही आसू नाही माया.

..
माणसं मिळेनात की काय ? ४ च प्रतिसाद ?

अहो बाबू,
सहा पैकी 4 तुमचेच प्रतिसाद आहेत, आणि सातवा माझा
ते ही दिले नसतेत तर ग्रंथ 2 प्रतिसादात आटोपला असता,

नोटबंदीचा कालच समोर आलेला सुपरिणाम

नॉटबंदीमुळे 3लाख करोड रुपयांचा काळा पैसा उघडकीस आला- पंतप्रधान
https://www.google.co.in/amp/m.timesofindia.com/india/demonetisation-rev...

कुठे? कसा? कधी? याचे तपशील मागू नयेत, मिळणार नाहीत

नोटबंदी मधून देशाला नेमके काय मिळाले याचा हिशेब मागायची वेळ आली आहे,
खाली एक आवाहन आहे, मी या सभेला उपस्थित राहू इच्छितो असे त्यांना कळवले आहे, अधिक माहितीच्या प्रतीक्षेत आहे.

>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>

पिछले वर्ष 8 नवम्बर रात 8 बजे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदीजी ने नोटबन्दी की घोषणा की. इस निर्णय का विपरीत परिणाम कृषि और अन्य असंघटित व्यावसायिकों पर हुवा है. लाखो रोजगारों का हनन हुवा. नोट बदलने की अफरातफरी में कुछ लोगों ने प्राण भी गंवाए.

प्रधानमंत्री जी ने न तो इस हानि पर अफसोस जताया, और न ही मृतकों को श्रद्धाजंलि अर्पित की.

इस् हानि के ऐवेज में देश को क्या मिला इसका कोई भी हिसाब किताब सरकार आज तक नहीं दे पाई है.

आनेवाली 8 नवम्बर को, नोटबन्दी के प्रथम स्मृतिदिन को भारत के प्रमुख शहरों में रात आठ बजे एकसाथ एकही तरिके से जमा होकर एकही सवाल सरकार से करते है. पुख्ता जवाब तलब करते है .

"नोटबन्दी से हमें क्या मिला ?"

क्या इस कार्यक्रम के लिए आप एक -दो घण्टे का समय निकाल सकते है?

क्या आपके शहर में आप ऐसे कार्यक्रम के आयोजन की अगुवाई कर सकते है?

अगर जवाब हाँ है, तो कृपया अपना नाम, फोन नम्बर, शहर का नाम,

thekelarepublic@gmail.com

इस मेल id पर ईमेल द्वारा भेजें.
कार्यक्रम की रूपरेखा के बारे में अगर आपके कुछ सुझाव हो, तो वह भी अवश्य भेजे. और आपके मित्र परिवार में भी यह संदेश पहुंचाए.

धन्यवाद.
टीम - केलारिपब्लिक.
>>>>>>>>>>>>>

अडमीन, आशा स्वरूपाचे आवाहन मायबोलीच्या नियमात बसत नसेल तर कृपया उडवून टाकावे

नोटाबंदी घोषणेला 9 महिने 9 दिवस होऊन गेले, परंतू ना अद्याप 'सुपरिणाम ' बाहेर येत ,ना काही 'हालचाल' दिसत आहे. काळजी वाटायला लागली... काही.... नको नको ते...

परत आलेल्या जुन्या नोयांचे RBI काय करते आहे याचा कधी विचार केला आहे का?

परत आलेल्या नोटा, श्रेडर मध्ये घालून तो भुसा प्लायवूड बनवणाऱ्या फॅक्टरी ला विकला जातोय, तिकडे तो हार्डबॉर्ड बनवायला वापरतात.

ही प्रक्रिया अगदी nov 2016 पासून चालू आहे,

जर सगळ्या नोटांची अशी पहिल्या आठवड्यापासून विल्हेवाट लावली जात होती तर उर्जित पटेल गेले 9 महिने काय मोजतोय?

भ्रष्ट राजकारण्याचा पैसा लाकर मधेच नष्ट झाला...हा मोठाच फायदा झाला...नाहितर त्या रा*****च्यानि देश विकायला काढला असता...
आता माझा पैसा गेला हे काहि कोणि उघड सान्गणार नाहि म्हणा..... पण निश्चितच रात्रितुन( मतदानाचि आदलि रात्र्)निकाल फिरवणार्याचि गोचि झालि हे निश्चितच........ फक्त महाराष्ट्रात १४ लाख सरकारि कर्मचारि आहेत यान्चे व राजकारणि यान्चे मिळुन महाराष्ट्रातच २-४ लाख कोटि नहिसे झाले असततिल.....भुजबळाच्या सापडलेल्या सम्पत्ति वरुन ह्या पेक्षा जास्तच च असतिल पण कमि नाहि हे निश्चितच

मतदान तर पूर्वीच झाले व त्यात भाजपे जिंकले ना ?>>>>>>नन्तर झलेल्या निवडणुकात ...हो बाबु...राव.....यात सर्वच राजकारणि आले भाजपा सुध्दा.. ......माझ्या ओळखिचे काहि आमदार खाजगित आता निवडणुक लढवणे अवघड असे बोलत असतात यात सर्व पक्श आले....

मतदान तर पूर्वीच झाले व त्यात भाजपे जिंकले ना ?>>>>>>नन्तर झलेल्या निवडणुकात ...हो बाबु...राव.....यात सर्वच राजकारणि आले भाजपा सुध्दा.. ......माझ्या ओळखिचे काहि आमदार खाजगित आता निवडणुक लढवणे अवघड असे बोलत असतात यात सर्व पक्श आले....

मतदान तर पूर्वीच झाले व त्यात भाजपे जिंकले ना ?>>>>>>नन्तर झलेल्या निवडणुकात ...हो बाबु...राव.....यात सर्वच राजकारणि आले भाजपा सुध्दा.. ......माझ्या ओळखिचे काहि आमदार खाजगित आता निवडणुक लढवणे अवघड असे बोलत असतात यात सर्व पक्श आले....या वरुन मि अन्दाज बान्धला...

http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/post-demon...

नोटाबंदीच्या काळात चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० च्या किती नोटा परत आल्या याची माहिती ८ महिन्यानंतरही केंद्र सरकारने दिलेली नाही. त्यामुळे सामान्य माणसांसह सर्वोच्च न्यायालयही हैराण आहे. पण आता रिझर्व्ह बँकेने आपल्या वेबसाइटवर एक संख्या जाहीर केली आहे. त्यावरून एक हजारांच्या सुमारे ९९ टक्के नोटा बँकेकडे परत आल्याचे निष्पन्न झाले आहे.

जेएनयूमधील अर्थशास्त्राचे प्राध्यापक सुरजीत मजुमदार यांनी सांगितले की, 'ज्या पद्धतीने एक हजार रुपयांच्या नोटा परत आल्या त्याच प्रकारे ५०० रुपयांच्या नोटाही परत आल्या असणार. याचा अर्थ नोटाबंदीतून कोणताही काळा पैसा बाहेर आलेला नाही.'

धिस इज गूड वन सिम्बा!

युपी इलेक्शन जिंकले ५००/१००च्या नोटा बाद करून - याचसाठी केला होता अट्टाहास

Q: How do you know Demonetisation was a failure?

A: Modi chose to celebrate Advani's birthday today Proud

https://www.thehindu.com/news/national/farmers-badly-hit-by-demonetisati...

संसदेच्या स्टँडिंग कमिटी ला उत्तर देताना कृषी मंत्रालयाने ही माहिती दिली.
26 करोड शेतकरी मुख्य: कॅश वर अवलंबून आहेत.
नोव्हेंबर महिन्यात शेतकरी खरीप पिके विकणे आणि रब्बी साठी बियाणे विकत घेण्याच्या लगबगीत होते, संपूर्ण कॅश नाहीशी झाल्याने या दोन्ही साठी प्रचंड त्रास झाला.

मोठ्या शेतकऱ्यांना सुद्धा मजुरांना पैसे देणे कठीण झाले.
नॅशनल सीड कार्पोरेशन कडे 1.38 लाख क्विंटल बियाणे न खपल्यामुळे पडून राहिले, शेवटी सरकारने बियाणे घेण्यासाठी जुन्या नोटा सांगितले, त्या नंतर सुद्धा विक्री वाढली नाही.

कित्ती ने सुपरिणाम.

https://www.ndtv.com/india-news/in-180-degree-on-notes-ban-agriculture-m...

180 अंशात फिरून कृषिमंत्रालयाने आधी दिलेली माहिती नाकारली आहे.
माहिती एकत्रित करताना झालेल्या चुकीमुळे निश्चलीकरण शेतकऱ्यांसाठी त्रासाचे ठरले असा रिपोर्ट दिला गेला.
ननविन माहिती नुसार, निर्धनीकरण कृषी क्षेत्रासाठी अतिशय फायदेशीर ठरले आहे, या काळात बियाण्याची विक्री वाढली आणि लागवडीखालील क्षेत्र सुद्धा वाढले.

बनावट नोटा हा भ्रम होता हे नोटबंदीमुळे सिद्ध झाले असल्याचे मत गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. तसेच यानंतरही रिझर्व्ह बँक नोटांचा आणि शिक्क्यांचा आकार आणि डिझाईन का बदलत आहे, असा सवालही न्यायालयाकडून करण्यात आला.

चलनातील नोटा आणि नाणी दृष्टीहिनंना सहजपणे ओळखता याव्यात यासंदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान, न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला नोटांचे आणि शिक्क्यांचे आकार, तसेच वैशिष्ट्ये का बदलण्यात येत आहेत, याबबात सवाल केला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. नॅशनल असोसिएशन ऑफ दि ब्लाईंडद्वारे यासंदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मुख्य न्यायाधील प्रदिप नांदरजोग आणि न्यायमूर्ती एन.एम. जामदार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवरील सुनावणी करण्यात आली. नोटांच्या आणि शिक्क्यांच्या बदलत्या आकारामुळे आणि वैशिष्ट्यांमुळे दृष्टीहिनांना त्या ओळखण्यात अडचण येत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.कोणत्याही देशांच्या नोटांचे आकार आणि त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये लवकर बदल होत नसतात, असे उच्च न्यायालयाने यावेळी सांगितले. रिझर्व्ह बँक नोटांच्या आकारात आणि त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये का बदल करत आहे, याची माहिती देण्याचे निर्देशही न्यायालयाने यावेळी दिले. दरम्यान, येत्या सहा आठवड्यांमध्ये रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेशही न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/bombay-high-court-demonetisati...

उत्तर रिझर्व्ह बॅंक देणार की झोला महाराज ?

बास की आता ब्लॅककॅट, किती हसे करून घेणार स्वतःचं? तुम्हाला मत आणि निकाल यातला फरक कळत नाही वाटत Lol

न्यायालयाची असली मतं ते अधिकृत कागदपत्रांत लिहुन जाहीर करतात काय? . ते न्यायमूर्तींचे व्यक्तिगत मत असते. कुणाच्यातरी व्यक्तिगत मतांवर आधारित फुटकळ आरोप करून दिवस ढकलणेच आता काँगी समर्थकांच्या हातात राहिलंय.

Pages