फुले वेचीता...

Submitted by शिवाजी उमाजी on 10 July, 2017 - 04:49

फुले वेचीता...

फुले वेचीता देवासाठी
मनी एक विचार आला
दिलेले त्याचे सारे काही
आपण अर्पितो त्याला !

खरचं माझे माझे म्हणता काय असतं आपल? आपल्याला सतत वाटत कि मी हे केलं, मी ते केल वगैरे पण खरच काय करतो आपण? आपला श्वास सुद्धा कधी आपला उरत नाही. सारं तर त्या इश्वरानेच निर्माण केलेलं आहे, तरीही अहंकारी व स्वर्थी माणुस स्वतःला प्रत्येक बाबतीत जोडत असतो, त्याचंच नेहमी नवल वाटतं.

वास्तविक आपण आपले षड़रिपु म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, द्वेष, मत्सर यांचा त्याग देवापाशी करता आला पाहिजे ते देवाला देवुन त्या बदल्यात त्याच्या कडून प्रेम, वात्सल्य, माया प्राप्त करायला हवी ज्या मुळे आपले जीवन समृद्ध व्हायला ख-या अर्थाने मदत होईल.
= शिवाजी सांगळे, मो. +91 9545976589

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults