१. बासमती तांदूळ – १ वाटी
२. बेसन – १ वाटी
३. तेल – ४ टेबलस्पुन
४. दही – २ टेबलस्पुन
५. हळद – १/२ टी-स्पुन
६. तिखट – २ टी-स्पुन
७. जिरे – १ टी-स्पुन फोडणी करता
८. लवंग – ३-४
९. काळीमिरी- ३-४
१०. दालचिनी- अर्ध्या बोटा इतका एक तुकडा (आमच्याकडे नव्हता)
११. तमालपत्र- १
१२. मसाल्याची वेलची – १ (काळी वेलची)
१३. मीठ – चवीनुसार.
प्रथम एका ताटलीत बेसन घेऊन त्यात अर्धा चमचा तिखट, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ एकत्र करून , त्यात दोन चमचे दही आणि एक चमचा तेलाचे मोहन घालावे. हे सगळे एकत्र मळून त्यात गरजेनुसार पाणी घालून ते बेसन घट्ट मळून घ्यावे. मळून घेतल्यावर त्याच्या लांब लांब वळ्या करून (साधारण अंगठ्या इतक्या जाड) ठेवाव्यात.
आता एका पातेल्यात पाणी गरम करून (अंदाजे लोटाभर) त्याला उकळी फुटल्यावर त्यात तयार गट्टा सुरळी अलगद सोडाव्यात. गट्टा सुरळी आधी पाण्यात बुडतात. त्या पाण्यावर तरंगायला लागल्या की त्या शिजल्या असे समजावे. मग त्या पाण्यातून काढून थोड्या थंड करून त्यांचे बोटाच्या पेरा इतके तुकडे करावेत. हे झाले आपले गट्टे तयार.
आता एका कुकर मध्ये २ चमचे (टेबल स्पुन) तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, तमालपत्र, मसाल्याची वेलची, दालचिनी घालून थोडे परतावे. आता त्यात कापून ठेवलेले गट्टे घालून ते अंदाजे दीड दोन मिनिटे परतावेत. परतणे झाल्यावर त्यात भिजवून ठेवलेले तांदूळ घालावेत. त्यावर हळद, तिखट अन चवीनुसार मीठ घालून नीट परतावे तांदूळ (अंदाजे २ मिनिटे). ते परतून झाल्यावर त्यात गट्टे उकळलेले गरम पाणी दोन वाट्या घालावे. हे महत्वाचे आहे कारण ह्याने एकतर ते पाणी वाया जात नाही अन गट्टे अंगच्या चवीत शिजतात. आपण पाणी गरम घालणार आहोत त्यामुळे कुकरचे झाकण लावून फक्त २ शिट्या घ्याव्यात. जास्त घेतल्यास भात मऊ होऊन पुलाव खराब होऊ शकतो. एक शिटी घेतल्यावर एलपीजी थोडा कमी करावा. अन दुसरी शिटी थोड्या वेळाने घ्यावी.
दुसऱ्या शिटी नंतर कुकर गार होऊन झाकण पडेस्तोवर ठेवावा मग गट्टे के चावल गरमागरम सर्व करावेत.
गट्टे के चावल पारंपारिकरित्या आंबूस अन घट्ट कसुरी मेथी घातलेल्या मारवाडी कढी सोबत खातात. पण वेळ नसल्यास आपण कुठलेही एक रायते, किंवा ताजे फेटलेले घट्ट दही थोडे तिखट मीठ अन जिरेपूड घालून सोबत खायला घेऊ शकता. आम्ही बुंदी चे रायते ठेवले होते.
९०० रुपरे किलो....अबबं.
९०० रुपरे किलो....अबबं.
सीझनल असते ना ही भाजी?
http://www.maayboli.com/node
http://www.maayboli.com/node/33833 इथे आहे केर सांगरीची पाकृ.
सोन्याबापू, कोणत्या शब्दात आभार मानावेत कळत नाहीये. दिनेशजींची उणीव भरुन काढलीत आज. फार सोप्या पद्धतीने सर्व लिहीलेय. अजून राजस्थानी पाकृ येऊ द्यात.
सनव, हो, ग्रेव्हीवाले छोलेच
सनव, हो, ग्रेव्हीवाले छोलेच आहेत पण ग्रेव्ही जरा आटल्यामुळे ड्राय दिसतायत.
होय सांगरी सिझनल असते, आत्ता
होय सांगरी सिझनल असते, आत्ता उन्हाळ्यात ओल्या शेंगा येतात मग त्या खुडून वाळवून बेगमी केली जाते, ओल्या शेंगांचीही भाजी करतात (बैकू न सांगितलं आहे) पण मी कधी खाल्लेली नाही बुआ.
सायो, मस्त फोटो .
सायो, मस्त फोटो .
बापूसा, मारवाडी सासर म्हणजे चंगळ आहे तुमची. जमल्यास ती राजस्थनी कढी ची पाकृ टाकाल का ?एका मैत्रिणीकडे खाल्ली होती.भयंकर टेस्टी लागते ती .कृपया जमवाच
सोपी वाटतेय रेसिपी .एकदा
सोपी वाटतेय रेसिपी .एकदा ओरिजिनल आणि एकदा सायोच्या पद्धतीने करुन पाहणार .
तुम्ही एक आर्मीवाल्यांच्या मटण रेसिपीचा उल्लेख केला होतात कधी तरी. ती कधी टाकताय ?
फोटो आणि रेसिपी भारी मस्त.
फोटो आणि रेसिपी भारी मस्त.
सगळ्यांचे आभार मंडळी,
सगळ्यांचे आभार मंडळी,
मेधाताई, नक्की कुठली रेसिपी म्हणता आहात? संदर्भ दिलात तर शोधायला बरे पडेल,
जाई, मारवाडी कढी म्हणजे कसुरी मेथीची पाने चुरून घातलेली घट्ट कढी (सिक्रेट इन्ग्रेडीएन्ट बडीशेप) उद्या करायला लावतो बायकोला अन रेसिपी टाकतो इकडं
नक्की .वाट पाहते रेसेपीची
नक्की .वाट पाहते रेसेपीची
Pages