Submitted by मुकुंद on 12 June, 2017 - 00:35
मायबोलीवर बर्याच दिवसांनी आलो. परागचे टेनिसचे धागे आत्ता कुठे आहेत? फ्रेंच ओपन २०१७ चा धागा काढला आहे का त्याने? राफाच्या १० व्या फ्रेंच विजेतेपदाबद्दल अभिनंदन करायला इथे लिहायला आलो .
काय खेळला सबंध टुर्नामेंटमधे... एकही सेट गमावला नाही त्याने. आजच्या फायनल मधेही जबरीच खेळला. फेडरर व त्याच्यातल्या या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमधेही तो मस्त खेळला होता पण तेव्हा तो हरला. आता फेडरर व त्याच्यात विंबल्डनला परत एक एपिक फायनल व्हावी अशी खुप इच्छा आहे...२००६,२००७ व २००८ विंबल्डन फायनलसारखी..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
पराग सध्या गायब आहे
पराग सध्या गायब आहे मायबोलीवरुन त्यामुळे नवीन टेनिस चे धागेच निघत नाहीत...
पण कालची मॅच फारच एक तर्फी झाली... मरेला हारवल्यावर स्टॅन कडून अपेक्षा वाढल्या होत्या.. पण राफा तुफान खेळला... अजिबातच चान्स दिला नाही..
हो काल सुरवातीचे २ सेट्स
हो काल सुरवातीचे २ सेट्स पाहिले. काही चान्सच दिला नाही राफा ने.
आमच्या आवडत्या क्ले कोर्टाच्या बादशहाचे अभिनंदन !!!
ऑस्टिपेंको पण भारी खेळली...
ऑस्टिपेंको पण भारी खेळली... लांबी रेस ची घोडी आहे नक्कीच
रोहन बोपन्नाने मिश्र दुहेरीचा
रोहन बोपन्नाने मिश्र दुहेरीचा किताब जिंकला .छान वाटलं ही बातमी ऐकून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोणी बघत आहे का राफा- फेडरर
कोणी बघत आहे का राफा- फेडरर फ्रेंच ओपन सेमिफायनल .. २ ओल्ड वॉरिअर्स.. परत एकदा.....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पहिला सेट राफाने घेतला... पहिल्या सेट्च्या सेट पॉइंट ला कसला जबरदस्त बॅक हँड क्रॉस कोर्ट विनर मारला राफाने... मजा आ गया.. सम थिंग्स नेव्हर गेट् टु ओल्ड! जस्ट लाइक द रायव्हलरी बिट्विन दिज टु लेजेंडरी प्लेयर्स अँड मॅचेस बिटविन देम!
बघतोय.. पण क्ले मध्ये स्लाईड
बघतोय.. पण क्ले मध्ये स्लाईड जरूरी आहे आणि फेडेक्स लॅक्स इट.
स्ट्रेट सेट्स मध्ये हरवेल नादाल त्याला. मॅक्स 4 सेट्स.
दुसरा सेट... ९ वा गेम....
दुसरा सेट... ९ वा गेम.... नदाल.. डाउन ०-४०.. केम बॅक.. वन दॅट गेम.. अँड वेंट ऑन टु विन द सेकंड सेट ... हाउ डिमोरलायझींग फॉर फेडरर....
राफाने जरी पहिले दोन सेट घेतले असले तरी मॅच स्कोर सांगतोय तशी एकतर्फी नाही.. मस्त रॅलिज.. पण राफा इज विनिंग मेनी ऑफ दोज लाँग रॅलीज.. विथ बोथ अमेझिंग क्रॉस कोर्ट अँड पासिंग शॉट्स अॅट द एंड...
दुसर्या सेंटच्या नवव्या गेम
दुसर्या सेंटच्या नवव्या गेम नंतर सगळ बिघडले. भेटू लवकरच विंबल्डनला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
का, फायनल आहे की बाकी
का, फायनल आहे की बाकी
आमच्या साठी संपलं.
आमच्या साठी संपलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जोकोला स्लॅमची संधी. पण थीम छान खेळतोय.
हो ना... राफा— जाकोव्हिक..
हो ना... राफा— जाकोव्हिक.. अजुन एक एपिक मॅच .... ५५ वी बहुतेक.. होइल बहुतेक यंदाच्या फ्रेंच ओपन फायनलमधे..
आज वार्याने बराच घोळ घातला .. आताही थिम- जाकोव्हिक मॅच थांबवली आहे .. वार्यामुळे..
आज मी तरी आयुष्यात प्रथमच फेडररला मॅचमधे चिडुन .. वार्यामुळे फ्रस्ट्रेट होउन .. दुसर्या सेटचा महत्वाचा ९ वा गेम हरल्यावर..बॉल रॅकेटने.. स्टेडिअमच्या बाहेर फेकुन मारताना पाहिला.. रेअर डिस्प्ले ऑफ इमोशन फ्रॉम हिम...
आजचा वारा बघुन मला माझाच इथला १०-१२ वर्षापुर्वी लिहिलेला माझा फ्रेंच ओपनबद्दलचा पहिला लेख आठ्वला..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नादाल थियम होईल
नादाल थियम होईल
ज्योको ला पहिल्या सेटमध्ये
ज्योको ला पहिल्या सेटमध्ये तरी काहीच करता आलं नाही आणि तो ही नेहेमीच्या त्याच्या "नौटंकी" मोड मध्ये वार्याविषयी फ्रस्ट्रेशन दाखवतो आहे.
“जुन ८, १९८५ ची पॅरिसच्या
“जुन ८, १९८५ ची पॅरिसच्या वसंत ऋतुच्या उत्तरार्धातील एक दाट धुक्याची एक रम्य सकाळ.... त्या सकाळच्या दाट धुक्यातुत पॅरिसचा आयफेल टॉवर नुकताच डोके वर काढत होता व अचानक सर्व पॅरिसला पाहता पाहता काळ्या ढगांनी वेढा घातला. परत एकदा सबंध पॅरिस शहर त्या ढगांच्या छायेने अंधारुन गेले. पॅरिसमधे जुन महिन्यामधे येत असलेली व अल्पकाळच टिकणारी ही रेन स्टॉर्म्स पॅरिसवासीयांना नवी नाहीत.. पण अश्या रेन स्टॉर्म्स व त्या स्टॉर्म्समधे व त्यानंतर घोंगावणार्या वार्याने...पॅरिसमधे त्याच सुमारास होणार्या रोलँड गॅरसवरच्या फ्रेंच ओपन स्पर्धेच्या इतिहासात... भल्या भल्या टेनिस पटुंची भंबेरी उडवुन दिलेली आहे.आणी तुम्हाला त्याची साक्ष हवी असेल तर जा आणी विचारा त्या जिमी कॉनर्सला...नाही तर जॉन मॅकेन्रोला अथवा बोरिस बेकरला किंवा पिट सँप्रासला... आणी स्टिफान एडबर्गला... इतकच कशाला? जा विचारा त्या रॉजर फेडररला.. ते सगळे साक्ष देतील की ते कोणाशीही टेनिसमधे चार हात करायला कचरत नसतील.. पण या पॅरिसच्या वसंतातिल घोंगावणार्या वार्याबद्दल मात्र त्यांच्या मनात प्रचंड भिती(का घृणा?)आहे. त्या घोंगावणार्या वार्याने.. पॅरिसच्या रोलँड गॅरसवर त्यांच्या सर्व्ह अँड व्हॉली गेमची नेहमीच दैना उडवली आहे. त्याची साक्ष म्हणजे त्या सगळ्यात मिळुन ते जवळ जवळ ५० च्या वर ग्रँड स्लॅम चँपिअनशिप्स त्यांच्या गळ्यात मिरवत आहेत.. पण तुम्हाला त्यामधे एकही फ्रेंच ओपन चँपिअनशिप दिसणार नाही.”
त्या लेखाच्या सुरुवातीला लिहीलेले.. आजही खरे आहे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
“जुन ८, १९८५ ची पॅरिसच्या
“जुन ८, १९८५ ची पॅरिसच्या वसंत ऋतुच्या उत्तरार्धातील एक दाट धुक्याची एक रम्य सकाळ.... त्या सकाळच्या दाट धुक्यातुत पॅरिसचा आयफेल टॉवर नुकताच डोके वर काढत होता व अचानक सर्व पॅरिसला पाहता पाहता काळ्या ढगांनी वेढा घातला. परत एकदा सबंध पॅरिस शहर त्या ढगांच्या छायेने अंधारुन गेले. पॅरिसमधे जुन महिन्यामधे येत असलेली व अल्पकाळच टिकणारी ही रेन स्टॉर्म्स पॅरिसवासीयांना नवी नाहीत.. पण अश्या रेन स्टॉर्म्स व त्या स्टॉर्म्समधे व त्यानंतर घोंगावणार्या वार्याने...पॅरिसमधे त्याच सुमारास होणार्या रोलँड गॅरसवरच्या फ्रेंच ओपन स्पर्धेच्या इतिहासात... भल्या भल्या टेनिस पटुंची भंबेरी उडवुन दिलेली आहे.आणी तुम्हाला त्याची साक्ष हवी असेल तर जा आणी विचारा त्या जिमी कॉनर्सला...नाही तर जॉन मॅकेन्रोला अथवा बोरिस बेकरला किंवा पिट सँप्रासला... आणी स्टिफान एडबर्गला... इतकच कशाला? जा विचारा त्या रॉजर फेडररला.. ते सगळे साक्ष देतील की ते कोणाशीही टेनिसमधे चार हात करायला कचरत नसतील.. पण या पॅरिसच्या वसंतातिल घोंगावणार्या वार्याबद्दल मात्र त्यांच्या मनात प्रचंड भिती(का घृणा?)आहे. त्या घोंगावणार्या वार्याने.. पॅरिसच्या रोलँड गॅरसवर त्यांच्या सर्व्ह अँड व्हॉली गेमची नेहमीच दैना उडवली आहे. त्याची साक्ष म्हणजे त्या सगळ्यात मिळुन ते जवळ जवळ ५० च्या वर ग्रँड स्लॅम चँपिअनशिप्स त्यांच्या गळ्यात मिरवत आहेत.. पण तुम्हाला त्यामधे एकही फ्रेंच ओपन चँपिअनशिप दिसणार नाही.”>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्व आणि वोली चा जमाना गेला
सर्व आणि वोली चा जमाना गेला आता, जो पुढं आला त्याचा पॉईंट गेलाच समजा.
दुसरा सेट... ९ वा गेम....
दुसरा सेट... ९ वा गेम.... नदाल.. डाउन ०-४०.. केम बॅक.. वन दॅट गेम.. अँड वेंट ऑन टु विन द सेकंड सेट . >>>> इथून पुढे फेडरर ढपलाच एकदम!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मजा आली आज !!
त्रिविक्रम, कसं काय?
मुकुंद, हा कुठला लेख? लिंक द्या.
रच्याकने, फेडरर वि राफा मॅचमुळे बर्याच जणांचं दर्शन झालं आज. आपले ते हे आणि हे दिसले नाहीत..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
माझा अंदाज खरा ठरला.. थियम
माझा अंदाज खरा ठरला.. थियम नादाल फिनाले.
डॉमिनिक थिम... फायनली
डॉमिनिक थिम... फायनली ग्रँड स्लॅम फायनलमधे...
त्याच्या सारखाच.. ऑस्ट्रिया मधुनच .. असलेला अजुन एक क्लेकोर्ट स्पेशिअलिस्ट.. थॉमस मुस्टर... क्वार्टर सेंचुरी अगो.... १९९५ मधे.. फ्रेंच ओपन जिंकुन गेला होता.. त्याची आज मला आठ्वण आली.
पराग.. माझा ख्रिस एव्हर्ट वर लिहीलेला लेख.. १० वर्षापुर्वी..
फायनली ग्रँड स्लॅम फायनलमधे..
फायनली ग्रँड स्लॅम फायनलमधे... >>>> मागच्या वर्षी पण होता की फायनलमध्ये..
लेख वाचतो परत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्ट्रेट सेट मध्ये मारेल नादाल
स्ट्रेट सेट मध्ये मारेल नादाल जर उद्या मॅच असेल तर.
आज महिलांना बक्षीस द्यायला
आज महिलांना बक्षीस द्यायला ख्रिस एवर्ट होती. सामना अगदीच एकतर्फी झाला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवटच्या सेट मधे थीमने मॅच पाॅईंट घालवले. पण शेवटी छान जिंकला. त्याची काॅमेंट " काही झाल तरी इथे फायनल नादालशीच खेळायची असते.
मुकुंदराव तुमचा लेख मस्तच.
पराग तुम्हाला विंबल्डनला ऑलरेडी आमंत्रण दिलंय. वाट बघतोय.