बेहद - सोनी टीवी वरील मालिका

Submitted by बी.एस. on 9 June, 2017 - 11:30

सोनी टीवी वर रोज रात्री 9.00 वाजता बेहद ही मालिका लागते. खरं तर मालिका सुरू होऊन बरेच महिने झालेत.. पण सुरवातीपासून ही मालिका फार आवडतेय. मी एकही एपिसोड मिस करू शकत नाही.. रोज नवीन सस्पेन्स, वेगवान घडामोडी, सर्व कलाकारांचा मस्त अभिनय.. ह्या बाबी मस्त जमून आल्या आहेत.
सर्वात बेस्ट म्हणजे माया.! अभिनय, दिसणं, अटिटयूड.. मस्त कॅरी करतेय.. तिच्या साठी हा धागा.. Happy Happy
चला तर मग इथे बेहद ची चर्चा करुया..
beyhadh 1.jpgmaya 2.jpgmaya.jpg

Group content visibility: 
Use group defaults

माया सहजासहजी नाही सोडू देणार अर्जुनला असं... पण अर्जुन काहीतरी बोलला बाबा आज..आणि हे बंदर बंदर काय लावलंय... स्वतःच्या बाळाला बंदर... अवघड आहे...बंदर च म्हणतायत ना का मला काही वेगळं ऐकू येतंय ....

नटुकाकी सहमत.. बंदर म्हणण काही झेपलं नाही/पटलं नाही.... सहमत. एखादे वेळेस ठीक आहे.सारखं काय बंदर..

पण अर्जुन काहीतरी बोलला बाबा आज...पण स्वतःच्या आईला पण बोलला ना..त्याला कळत नाही का मायाचं वागणं ?
मेंटल हॉस्पिटल वाले फोन करून सांगत का नाही की मायाने ६ महिने गोळ्या घेतल्याच नाहीत म्हणून..
ती वंदना पण सांगत नाही की तिने माय्याला चप्पल धुताना पाहिलयं..घरात माय्याच्या पावलांचे ठसे पाहिलेत, मायाने स्वतः कबूल केलयं आयान ला मारल्याच..

सांझ नेमकी वेळेला गायब.. नाहीतर काय. वंदनाला एकटं सोडायचं कशाला ? सांझच्या घरी सोडायचं ना..
आणि माया हॉस्पिटल मधून तशीच आली घरी..त्याच कपड्यांवर फिरते.. Sad Sad Sad

काल नक्की काय झालं? अर्जून खूप बोललाय मायाला आणि तिच्याशी नातं तोडलं..
ईकडे माया पोच्ली वंदनाला मारायला..

>>>संपलं अर्जुनच्या आईच काम..कसली डेंजर आही माया..
सांझ नेमकी वेळेला गायब..>>
हो ना...मला तर ती सांझ काहीच कामाची वाटत नाही... काहीच करत नाही ती...फक्त तिला बघितलं की माया चिडते एवढंच काम आहे वाटत तिला मालिकेत...आधी पण अयान तुरुंगात होता तेव्हा पण नाही सोडवू शकली ती..वडिलांना नाही वाचवू शकली...आता एवढी मायाला ओळखते तरी पण अकॅशन घेत नाही काही...थांबायचं ना तिथे आता अर्जुन ची आई एकटीच आहे म्हटल्यावर...आणि तिला डाऊट येतोय ना कुणी आहे...कुणी म्हणजे आता यांची एकच दुष्मन आहे ना माया म्हणजे तीच असणार ना...काय स्मार्टनेसच नाहीये...तरी बर वकील आहे...नुसती रडत असते सारखी...मग चिडते आणि पुढे काहीच करत नाही... समय मस्त होता तिच्यापेक्षा... मायाला बरोबर कोंडीत पकडायचा तो...

आणि तिला डाऊट येतोय ना कुणी आहे.. अगदी..असच वाटलं. तिला जाणवतं कोणीतरी आहे इथे तर कशाला जायचं अर्जुन च्या आईला एकटं सोडुन? कु णीतरी म्हणजे माया शिवाय कोण असणार?
.मला तर ती सांझ काहीच कामाची वाटत नाही...+१

दक्षिण - काल माया अर्जुनच्या आईच्या घरी पोचली. तिला बघुन आई घाबरते व मागे मागे सरकत असताना तोल जाऊन मागे बेडरुम मधे बेड बॉक्स चा बॉक्स ओपन असतो त्यात पडते. मग माया तो बेड लावुन टाकते वरुन गादी घालुन त्यावर बसुन राहते.

नाही वाचली अर्जुनची आई.
पुढच्या प्रोमो मधे अर्जुन ला माया चा खुन केल्याच्या आरोपा खाली अटक झालेली दाखवलीये.

मायाच्या आई ला काय झालय? मायानेच केलीये का तिची अशी हालत?
कितीही वाईट प्रसंग असला तरी दोघींची हेअर स्टाईल, मेक अप व्यवस्थित असतो.

पुढच्या प्रोमो मधे अर्जुन ला माया चा खुन केल्याच्या आरोपा खाली अटक झालेली दाखवलीये. >>>> माया जर मेली तर मग सिरियल कशी चालेल?:अओ:

मागे मागे सरकत असताना तोल जाऊन मागे बेडरुम मधे बेड बॉक्स चा बॉक्स ओपन असतो त्यात पडते. मग माया तो बेड लावुन टाकते वरुन गादी घालुन त्यावर बसुन राहते. >>>> तो बॉक्स रिकामा असतो ??? आमच्या कडे सामान ईतकं भरलेलं असतं की तो बंद करण्यासाठी वर बसायला लागतं Wink

आमच्या कडे सामान ईतकं भरलेलं असतं की तो बंद करण्यासाठी वर बसायला लागतं >>> मम Lol

मीन्स बेहदची मेन नायिका व्हिलन आहे का , नेहेमीपेक्षा वेगळी स्टोरी वाटतेय.

हो अन्जू.. त्या वरच बेतली आहे ही मालिका. मायाचं बेहद प्रेम.
आणि त्यात ती एकेकाला असं मारत सुटते जसे एखाद्या खेळात एकेक गडी बाद करतेय. आणि शिवाय गून्हा करुनही वर मोकाट फिरते..

Pages