टुरिस्ट लोकांनी कायमच ओसंडून वाहणार्या वर्दळीच्या गोव्यापासून पाऊण तासभर तरी लांब अरबी समुद्राच्या किनार्याला लागून 'अॅक्वा सेरेनिटी' दिमाखात ऊभी होती.. बिल्डिंगपासून केवळ ३० मीटर वर असलेल्या बीचवर समुद्राची गाज आणि समुद्रीपक्षांच्या आवाजाशिवाय ईतर मानवनिर्मित आवाज फार क्वचितंच ऐकायला मिळत. बिल्डिंगमधल्या बारा सूपर लक्झ्युरियस आणि अतिप्रशस्तं अपार्टमेंट मध्ये राहणारे अतिश्रीमंत रिटायरी कपल्स सोडून चार पाच मैलांच्या परिसरात दुसरा मानवी निवारा नव्हता. हा पूर्ण ८० एकरचा बीच एरिया 'गॅलॅक्सी डिवेलपर्स' नावाच्या मोठ्या कन्स्ट्रक्शन ग्रूपने विकत घेतल्याने भविष्यातही तिथे 'गॅलॅक्सी बीच सिटी' अंतर्गत 'अॅक्वा सेरेनिटी' सारख्याच अजून सूपर लक्झ्युरियस बिल्डिंग बांधण्याचा ग्रूपचा मानस होता. त्यांच्या पहिल्याच प्रोजेक्ट 'गॅलॅक्सी बीच सिटी- अॅक्वा सेरेनिटी' ला अपेक्षापेक्षा खूप जबरदस्तं प्रतिसाद मिळाला होता आणि पुढच्या बिल्डिंगची बुकिंग कधी सुरू होणार ह्याची देश विदेशातून प्रॉस्पेक्टिव क्लायंट्सकडून सातत्याने विचारणा होत होती.
तीन वर्षांपूर्वी ज्यावेळी ह्या प्रोजेक्टचे पहिले प्रपोजल/प्रेझेंटेशन 'गॅलॅक्सी डिवेलपर्स' च्या टॉप एक्झेक्युटिव्ज समोर झाले तेव्हा कंपनीचा भविष्यकाळ ह्या प्रोजेक्टमुळे किती ऊज्ज्वल असू शकतो हे ऊमगायला ग्रूप सीईओ 'राजपत गांधींना' ११ वा मिनिट देखील लागला नाही. प्रेझेंटेशन देणार्या ज्या व्यक्तीने आपल्या परिपूर्ण ज्ञान आणि कौशल्याच्या जोरावर पहिल्या दहा मिनिटांतच सगळ्या एक्झेक्युटिव्जना खिशात घातले होते ती असामी होती 'नरीन मिस्त्री'. आय आय एम मधली पदवी, देश विदेशातल्या कंपनीतल्या ऊच्चपदावरच्या अधिकार्यांबरोबर कामाचा अनुभव आणि प्रचंड मोठे प्रोफेशनल सर्कल ह्यामुळे नरीन मिस्त्रींचे नाव गॅलॅक्सी ग्रूप ला अपरिचित निश्चितंच नव्हते. मिस्त्रींनी आजवर नवीन अनएक्स्प्लोर्ड पण प्रॉमिसिंग ठिकाणी लँड अॅक्विझिशन पासून कंपन्यांचे युनिट्स सेट करण्यापर्यंतच्या कामांसाठे अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांसाठी कन्सल्टिंग केले होते, पण कधीच कुठल्या कंपनीची एम्प्लॉयमेंट मात्रं घेतली नव्हती. तसे करणे त्यांना कधीच रूचले नाही आणि जमले तर आजिबातंच नसते. 'रिअल ईस्टेट ग्रूप' ह्या 'जमाती'शी मिस्त्रींचा संबंध पहिल्यांदाच आला होता आणि हे कदाचित त्यांचे दुर्दैवच असावे.
आज वयाच्या ६५ व्या वर्षीही त्यांच्या कामाला प्रचंड डिमांड होती आणि त्यांचा ऊत्साहही २५ वर्षाच्या तरूणाला लाजवेल असा होता. एक My way or Highway असा प्रचंड हेकेखोर स्वभाव सोडला तर ५ फुट १० ईंच आणि ७५ किलो वजनाची त्यांची पर्सनॅलिटी अतिशय इंप्रेसिव आणि ईन्फ्ल्युएन्सिंग होती. मिस्त्री लाईफ लाँग रनर होते रोज सकाळी पूर्ण बीचला ते या वयातही ६० मिनिटांची फेरी मारत आणि वीकेंडलाही बर्याचदा अनेक ठिकाणी मॅरॅथॉन ही पळत. त्यांच्या कायम धाड्सी स्वभावाने त्यांना नेचर अॅडवेंचररही बनवले नसते तर नवलच. अफ्रिका, अॅमेझॉन आणि ऑस्ट्रेलियातली कैक जंगलात त्यांनी एकट्याने भटकंती केली होती . आपल्या अनुभवाबद्दल 'नेचर्स अॅडवेंचर्स' मासिकांत त्यांचे एक दोन लेख देखील प्रकाशित झाले होते. हौशी लोकांनाही ते अश्या मोहिमांत जीव सुखरूप कसा ठेवावा ह्याचे मार्दर्शन त्यांच्या ब्लॉग द्वारे करीत.
परंतू मागच्या सहा महिन्यांपासून गॅलॅक्सी ग्रूप खासकरून सीईओ राजपत गांधी व सीएफओ रतन पारीख आणि नरीन मिस्त्रींमध्ये शीतयुद्ध चालू होते. झाले असे होते की मिस्त्रींनी 'गॅलॅक्सी बीच सिटी' प्रोजेक्ट च्या आधी कन्सल्टिंग सोडून त्यांच्या 'आर्ट्स डीलर' बनण्याच्या लाँग टाईम पॅशनला नवा पेशा म्हणून स्वीकारले होते. 'गॅलॅक्सी बीच सिटी'ला भारताची आर्ट आणि अँटिक कॅपिटल बनवण्याचे त्यांचे भव्यदिव्य स्वप्नं होते. त्यांच्या ३५ वर्षांच्या करियर मध्ये त्यांनी अतिशय दुर्मिळ पेंटिंग्स, पुरातन कला वस्तू पासून तर अँटिक फर्निचर, नामशेष होत चाललेले पण कायदेशीर मार्गाने टॅक्सिडर्म केलेले प्राणी, जुनी शस्त्रे असे काय अन काय जमा केले होते. आपली आयुष्याची कमाई कॅपिटल मार्केट मध्ये ईनवेस्ट न करता त्यांनी अश्या आर्ट्स कलेक्शन मध्येच गुंतवली होती. आज जर त्यांनी त्यांचे कलेकशन लिक्विडेट केले असते तर गेल्या ३५ वर्षात कुठल्याही कॅपिटल मार्केटने दिला असता त्याच्या ३ ते ४ पट परतावा त्यांच्या कलेक्शन ने त्यांना मिळवून दिला असता. आपल्या कलेक्शनसाठी लागणार्या श्रीमंत आणि दर्दी क्लायंट्सना टॅप करण्यासाठी देशोदेशी न हिंडता 'गॅलॅक्सी बीच सिटी' च्या रुपाने असा क्लायंट बेसच तयार करण्याचा मास्टर प्लान त्यांनी गॅलॅक्सी ग्रूपला हाताशी धरून अंमलात आणण्याचा घाट घातला होता. शेवटी मिस्त्री हे एक प्रचंड हुषार आणि महत्वाकांक्षी रसायन होते आणि अश्या मोठ्या गोष्टी घडवून आणाण्याचा पेशंस आणि अनुभव त्यांनी पूर्ण ऊमेद खर्चून कमावला होताच.
तर गांधी-पारीख आणि मिस्त्री मधल्या शीतयुद्धाचे कारण होते 'गॅलॅक्सी बीच सिटी' मधली 'अॅक्वा सेरेनिटीला' लागून असलेली ३ एकर जागा. ह्या जागेवर 'गॅलॅक्सी ग्रूप' मिस्त्रींची कन्सल्टिंग फी म्हणून तीन वर्षापूर्वी झालेल्या करारानुसार मिस्त्रींना एक तीन मजली आर्ट गॅलरी बांधून देण्यास बांधील होता आणि त्यासोबतच सहा मजल्यांच्या 'अॅक्वा सेरेनेटी' मधल्या टॉप फ्लोअरवरच्या दोन पैकी एक सी फेसिंग फ्लॅट '६०२' देण्यासाठी सुद्धा. परंतू 'अॅक्वा सेरेनेटी' च्या जबरदस्तं यशानंतर आणि पुढच्या स्कीमसाठी अपेक्षेपेक्षाही कितीतरी जास्तं किंमत मोजण्यास तयार असणार्या क्लायंटस मुळे गांधी-पारीखना आर्ट गॅलरीची मोक्याची जागा मिस्त्रींना देण्यास प्रचंड जिवावर आले होते. ते आता मिस्त्रींना सेरेनिटीपासून लांब गॅलॅक्सी बीच सिटीची एका कोपर्यातली जागा घेण्यास मनधरणी करत होते. गांधी-पारीखांची ऊफाळलेली लालसा आणि मिस्त्रींचा प्रचंड हेकेखोर स्वभाव ह्यामुळे ही मनधरणी, मनभेद आणि अविश्वासापर्यंत पोचायला महिनाभरही लागला नाही. ठरलेल्या जागेवर आर्ट गॅलरीचे काम सुरू करण्यास मुद्दाम केला जाणारा ऊशीर आणि जागेबाबत कुठलीही तडजोड न स्वीकारण्याचा हेका त्यामुळे मिस्त्रींनी गांधींना कोर्टात खेचण्याची आणि पूर्ण बीच सिटीवरच स्टे आणण्याची धमकी दिली तेव्हा गांधी, पारीखांचे धाबे जोरदार दणाणले. आपली मोक्याची जागा वाचवण्याचा शेवटचा 'दाम-भेद' ऊपाय म्हणून गांधी-पारीखांनी मिस्त्रीं च्या आर्ट्स कलेक्शनचे कस्टोडियन आणि मॅनेजर कुणाल भरूचांना मिस्त्रींचे मन वळवण्यासाठी चार कोटी रुपयांची लाच क्लॉबॅक क्लॉजसहित दिली (क्लॉबॅक म्हणजे जर भरूचा मिस्त्रींचे मन वळवण्यात अपयशी ठरले तर चार कोटी रुपये त्यांना गांधींना परत करावे लागतील). हा ही ऊपाय न चालल्यास मिस्त्रींवर 'दंड' ऊपाय करून त्यांना 'कायमचे' हटवण्याचीही गांधी-पारीखांची तयारी होतीच.
पण मिस्त्रींना कुठूनतरी भरूचांनी चार कोटी रुपये लाच स्वीकारल्याची बातमी कळालीच. त्यांनी लगोलग भरूच्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या ईतर क्लायंट समोरच विश्वासघात केल्याचा आरोप ठेवत त्यांना मानहानीकारक बोल लावले. भरूच्यांच्या जागी लवकरच दुसरा कस्टोडियन नेमणार अशी धमकीही दिली. भरूचांबरोबर तीन महिन्यांत एक्स्पायर होणारे काँट्रॅक्ट रिन्यू न करता मिस्त्रींनी त्यांच्या कलेक्शनमधले काही छोटे मोठे आर्टिफॅक्ट्स आपल्या अॅक्वा सेरेनिटी मधल्या प्रशस्तं फ्लॅट मध्ये ट्र्रान्सपोर्ट करण्यास सुरूवात केली. (असे करण्यामागे आर्ट गॅलरीला लागत असलेल्या ऊशीरा मुळे क्लायंट्सना घरीच बोलावून आपले कलेक्शन दाखवण्याचाही त्यांचा अंतर्गत हेतू होता) भरूचा मिस्त्रींच्या कलेक्शनच्या सेफ किपिंगसाठी कायदेशीर रित्या बांधील होते त्यामुळे मिस्त्रींना अजून तीन महिने काही चिंता नव्हती पण भरूचांवर अजून विश्वास ठेवण्याचीही मिस्त्रींची ईच्छा नव्हती.
मिस्त्री १५ वर्षांची मैत्री आणि संबंध अश्या अपमानकारक रित्या तोडून गेल्याचा भरूचांना प्रचंड राग आला. मिस्त्रींच्या आरोपानंतर समोर बसलेले क्लायंट्स ऊठून गेल्याने मिस्त्रींमुळे आपले आता कमीत कमी ८-१२ कोटींचे नुकसान होणार समजल्याने त्यांनी मनोमन मिस्त्रींचा बदला घेण्याचा चंगच बांधला. गांधी-पारीख बरोबर मिस्त्रींच्या जीवावर ऊठलेल्या लोकांच्या यादीमध्ये भरूचांचेही नाव अॅड झाले.
पण ही यादी ईथेच संपत नाही.
डिमांड्मध्ये असलेले कंन्सल्टींगचे करियर सोडून तीन वर्षांपूर्वी गोव्यातच सेटल होण्याचे मिस्त्रींनी ठरवले त्याला कारण होते त्यांची एकुलती एक मुलगी 'पेरिजाद' आणि तिचा अडीच वर्षांचा मुलगा 'दानिश'. जगातल्या सर्व सुखसोयींनी युक्त कॉलेज/हॉस्टेल्स मध्ये का वाढली असेना पण लहानपणापासूनच वडिलांपासून लांब आणि आईविना वाढलेल्या पेरिजाद ने जेव्हा 'कैझाद दोर्दीशी' लग्नं करायचे ठरवले तेव्हा देशाबाहेर असलेल्या मिस्त्रींना तिने केवळ औपचारिकता म्हणूनच दोन दिवस आधी लग्नाची तारीख कळवली. आपल्या बिझी आयुष्याने आपल्या मुलीला आपल्यापासून किती लांब लोटले ह्याची जाणीव मिस्त्रींना झाली आणि आयुष्यात कधीही तडकाफडकी निर्णय न घेणारे मिस्त्री हातातले काम सोडून लगोलग गोव्यात दाखल झाले. कौटुंबिक सुखासाठी आसुसलेली मलूल चेहर्याची पेरिजाद पाहून त्यांच्या जीवाची कोण घालमेल झाली. त्यांनी पेरिजादकडे तिच्या नातं जपण्यात अपयशी ठरलेल्या बापाला माफ करण्यासाठी हात पसरले. पेरिजादनेही मोठ्या मनाने त्यांना माफ केले आणि मिस्त्रींनी आनंदाने गोव्याला आपले घर बनवले. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कैझादच्या अल्कोहोलिक, बाहेरख्याली आणि वायोलंट वागण्याला कंटाळून आयुष्यात कायम प्रेमाची वानवाच नशिबी आलेल्या पेरिजाद ने दानिश च्या जन्मानंतर दीड वर्षांतच मिस्त्रींना पत्रं पाठवून दानिशची काळजी घेण्याची श्यपथ घालून आपली जीवनयात्रा संपवली. खचलेल्या मिस्त्रींनी पेरिजाद बाबत झालेल्या चुकीचं प्रायश्चित्तं म्हणून दानिशची कस्टडी मिळवून कैझादला पेरीजादच्या आत्महत्येसाठी दोषी ठरवून कायदेशीर शिक्षा करण्याचं ठरवलं. हॉटेलिंगच्या मोठा बिझनेस असलेली कैझादची फॅमिलीही पैसा आणि काँटॅक्ट्सच्या बाबतीत कमी नसल्याने दानिशची लीगल कस्टडी मिळावण्यात मिस्त्रींना खूपच कष्टाची कायदेशीर लढाई करावी लागली. पण आयुष्यात आजवर कधीच हार न मानलेले मिस्त्री ही लढाईदेखील मागच्याच आठवड्यात जिंकले. कैझादला शिक्षा झाली नाही पण आठवड्याभरात दानिशचा ताबा मिस्त्रींकडे देण्याचे अपील कोर्टाने मंजूर केले. पुढच्या आठवड्यात दानिशला घरी घेवून येणार ह्या आनंदात मिस्त्रींनी आजिबात वेळ न दवडता अॅक्वा सेरेनिटी मधली एक बेडरूम दानिशसाठी तयार करण्याचे काँट्रॅक्ट पेरिजादची जवळची मैत्रिण 'अलमिरा ईराणी' च्या फर्निचर आणि डेकॉरला दिले.
आणि तशातच ३१ डिसेंबरची ती रात्रं ऊजाडली. अॅक्वा सेरेनिटीच्या बीचवर ३१ डिसेंबरचे फायरवर्क सेलिब्रेशन करून रात्री १ च्या ठोक्याला परतणार्या सेरेनिटीच्या रिटायरी कपल्सना कॅक्टस बेडमध्ये मिस्त्रींचा मृतदेह दिसला आणि त्यांच्या किंकाळ्या ऐकून फ्रंट एंट्र्रन्सवरचे दोन्ही गार्ड्स धावतपळत बॅक एंट्र्न्सला आले.
पोलिस फायलीतल्या काही नोंदी.
पोस्टमॉर्टेम / मेडिकल रिपोर्ट
-मृत्यू ३१ डिसेंबर रात्री ११:३० ते १२:०० च्या दरम्यान झाला असावा. विक्टिमच्या हातातले घड्याळ रात्री ११:४० ला बंद पडले.
-ऊंचावरून फोर्स ने पडतांना नेमके डोके कॅक्टस बेडच्या (निवडुंगाचे ताटवे) कॉक्रीट बॉर्डरवर आपटून स्कल ब्रेक झाले.
-अंगाखाली कॅक्टस बेड असल्याने शरीरात शेकडो ठिकाणी कॅक्टसचे काटे घुसले.
-डोके आपटले नसते तर डेन्स कॅक्टस बेड मुळे कदाचित प्राण वाचू शकले असते.
-पडण्यापूर्वी विक्टिमला सफोकेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता,
-कॅक्टसच्या काट्यांबरोबरच काचांमुळे झालेल्या जखमा आणि काचांचे बारीक तुकडेही शरीरात व चेहर्यावर घुसल्याचे मिळाले
-पोटात थोडेफार पचलेले अन्न, वाईन आणि काही माईल्ड स्लीप मेडिकेशन मिळाले. विक्टिम हे मेडिकेशन बराच काळापासून घेत असावा.
-जखमा आणि फ्रॅक्चर्स ऊंचावरून पडतांनाशी कन्सिस्टंट आहे.
- सापडलेल्या बाटलीतील २९ गोळ्या जेन्यूईन स्लीप मेडिकेशन आहे.
-कॉज ऑफ डेथ - आत्महत्या किंवा खून नक्की अनुमान लावणे कठीण आहे.
टाईमलाईन
----------------
३१ डिसेंबर
-दुपारी ४:१० - नरीन मिस्त्री एलेवेटरने फ्लॅट मध्ये दाखल
-दुपारी ४:२१ - दोन कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात १२ बॉक्सेस पैकी पहिल्या बॉक्सची डिलीवरी
-दुपारी ४:५७ - कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात १२ बॉक्सेस पैकी शेवटच्या बॉक्सची डिलीवरी
-संध्या ५:२० - दोन कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात रूम फर्निचर आणि डेकॉर बॉक्सेसची पहिली डिलिवरी
-संध्या ६:५१ - कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात रूम फर्निचर आणि डेकॉर बॉक्सेसची शेवटची डिलिवरी
-रात्री ९:४० - नरीन मिस्त्रींची अॅक्वा सेरेनिटीच्या 'बीच न्यू ईयर सेलिब्रेशन' पार्टीत जाण्यासाठी एलेवेटरने एक्झिट
-रात्र १०:०१ - एक मध्यम चणीची हुडेड व्यक्ती(काळी जीन्स पँट , काळा हुडेड स्वेट शर्ट, हातात बॅग) जिन्यातून सहाव्या मजल्यावर दाखल आणि फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून आत गेली.
-रात्री १०:३४ - नरीन मिस्त्रींची अॅक्वा सेरेनिटीच्या 'बीच न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टी'तून एलेवेटरने फ्लॅट मध्ये एंट्री
-रात्री १०:४० - तीच हुडेड व्यक्ती फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून बाहेर आली आणि जिन्यावाटे अतिशय घाईघाईने निघून गेली. पाठीवर एक बॅग.
-रात्री ११:५५ एक ऊंच, अंगापिंडाने मजबूत आणि रुबाबदार व्यक्ती (ऊंची पार्टी सुट, हातमोजे, चेहरा आजिबात दिसणार नाही अशी टोपी) जिन्यातून सहाव्या मजल्यावर दाखल आणि फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून आत गेली.
१ जानेवारी (३१ डिसेंबरचीच रात्रं पुढे चालू पण तारीख बदलली)
-रात्री १२:०४ तीच ऊंची पार्टी सुट घातलेली व्यक्ती ६०१ चा दरवाजा ऊघडून बाहेर आली आणि शांतपणे जिन्यावाटे निघून गेली.
-रात्री १:०४ सेरेनिटीचे दोन सिक्यूरिटी गार्डस एलेवेटरने फ्लॅट नंबर ६०१ च्या दरवाज्यासमोर दाखल
-रात्री १:१० सेरेनिटीमधील बर्याच राहिवाशांची सहाव्या मजल्यावर गर्दी
-रात्री १:१८ गार्डसने मास्टर की ने पोलिसांसमोर दरवाजा ऊघडून पोलिसांचा फ्लॅट मध्ये प्रवेश.
-रात्री १:२५ आत येवू पाहणार्या गर्दीला पोलिसांनी ६ व्या मजल्यावरून खाली हुसकावले.
प्रासंगिक माहिती
क्राईम सीन
-मिस्त्रींच्या ६०२ नंबरच्या सी-फेसिंग फ्लॅटची सी-साईड बेडरूमची भिंत जमिनी पासून ८ फूट ऊंच आण १५ फूट रूंद अश्या स्टँडर्ड जाडीच्या काचेची बनलेली आहे.
-मिस्त्रींनी काचा बंद असतांनाच खाली ऊडी मारली वा त्यांना बाहेर फेकले गेले.
-बेड अस्ताव्यस्त अवस्थेत. बेडवर स्ट्रगल झाल्याचे दिसून येते.
-बेडरूमला लागून असलेल्या टेरेसचा दरवाजा आतून (बेडरूममधून) बंद होता.
-बेडच्या डोक्याकडच्या भिंतीत (जी फ्लॅट नं ६०१ ला कॉमन वॉल आहे) एक आरपार बुलेट होल मिळाले , आणि तीन २८ mm कॅलिबरच्या गोळ्या
जिथे साधारणतः झोपले असतांना मिस्त्रींची छाती असली असती तिथे मॅट्रेस मध्ये अडकलेल्या मिळाल्या
-फ्लॅट नं ६०१ मध्ये बुलेट होल असलेल्या कॉमन वॉल वर भिंतीवर गन पावडर रेसेड्यू
-साईड टेबलवर कमी पावरचे (माईल्ड) स्लीप मेडिकेशन सापडले. ३० पैकी २९ गोळ्या बाटलीमध्ये आहेत.
- चष्मा, पुस्तंक, वाईन चा रिकामा ग्लास आणि अजूनही चालू असलेला नाईट लँप खाली जमिनीवर पडलेले होते
-किचन सिंक खालच्या कॅबिनेटला भिंतितून आरपार केलेले ३५० मिमि चे होल सापडले जे बाजूच्या रिकाम्या फ्लॅट नं ६०१ च्या किचन सिंक खालच्या कॅबिनेट मध्ये ऊघडते. भिंतीचा कट केलेला पीस बाजूच्या फ्लॅट मध्ये सापडला. एखादा अॅथलेटिक मनुष्य ह्या होल मधून जाऊ शकतो.
फ्लॅट नं ६०१
- सहाव्या मजल्यावर जिन्याचा दरवाजा बरोबर फ्लॅट नं ६०१ च्या दरवाज्यासमोरच आहे.
- महिन्यापूर्वीच ग्राहकाने खरेदी रद्द केल्याने फ्लॅट नं ६०१ अजूनही विकला नव्हता. पझेशन देण्याची डेड लाईन नसल्याने त्याचे ईंटेरियर डेकोरशन व रंगरंगोटीचे काम अजूनही अतिशय संथगतीने चालू होते. फ्लॅटमध्ये ठिकठिकाणी सामान विखुरलेले होते.
- ह्या फ्लॅट साठी क्लायंट मिळवण्याचे काँट्रॅक्ट मिळालेली रिअल ईस्टेट एजंसी 'फॉन्सेका प्रॉपर्टीज' वीकेंडला फ्लॅट चे 'ओपन हाऊस' शोईंग्ज करते. ह्या शोईंग्ज मध्ये अॅक्वा सेरेनिटी बिल्डींग चा टूर ही समाविष्टं असतो. अपॉईंटमेंट घेवून फ्लॅट बघायला येणार्यांच्या आयडेंटिटीच्या प्रतीची कॉपी करू ठेवली जात असली तरी क्लायंटला नाराज होऊ नये ह्या हेतूने बर्याच वेळा आयडी प्रुफ आणायला विसरलेल्यां क्लायंट्सनाही फ्लॅट आणि बिल्डिंग दाखवल्याचे फॉन्सेका च्या सेल्स एजंट्सनी मान्य केले आहे.
अॅक्वा सेरेनिटी बिल्डिंग
-फ्रंट एंट्र्न्स ने बिल्डिंग मध्ये प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती कॅमेरामध्ये कैद होते आणि २४ तास हजर असलेले सिक्युरिटी गार्डस ती व्यक्ती राहिवासी नसल्यास, राहिवाश्यांनी खाली येवून त्यांना एस्कॉर्ट करेपर्यंत लॉबीमध्येच बसवून ठेवतात.
-एलिवेटर्स, फ्लॅटचा एंट्रन्स आणि कॉरिडोर कॅमेराने ईक्विप्ड आहेत आणि कॅमेरात कॅप्चर न होता फ्लॅट मध्ये जाणे अशक्य आहे.
-बिल्डिंगला एक जिना असून तो प्रत्येक मजल्यावर ऊघडतो, पण जिन्यामध्ये कुठलाही कॅमेरा नाही
मिस्त्रींचे घर
- बिल्डिंगच्या आऊटर भिंती काँक्रीटच्या पण आतल्या वुडन आहेत. फ्लोअर ही वुडन आहे.
-मिस्त्रींचे आर्ट आणि अँटिक गोष्टींसाठीचे प्रेम घरात ठिकठिकाणी दिसत होते. एखाद्या अतिशय कलात्मकतेने सजवलेल्या आर्ट म्युझियम पेक्षा फार वेगळं नसावं त्यांचं घर. भिंतीवर ठिकठिकाणी मोठमोठ्या तस्वीरी, नाना प्रकारचे फर्निचर/अलमार्या, देशविदेशातल्या भिन्न रंगारुपाच्या आणि कालखंडातल्या वाटाव्यात अश्या कलाकुसरीच्या वस्तू, राजघराण्यातली वाटावी अशी झुंबरं, फुलदाण्या, शोभेची श्स्त्रास्त्रं असे बरेच काही.
-पूर्ण घरभर अँटिक आणि आर्ट्स सामानाचे छोटे मोठे अकूण १२ लाकडी बॉक्सेस ठेवलेले आहेत. सर्वात मोठा बॉक्स ६ x ८ x २ आणि सर्वात लहान बॉक्स बॉक्स ३ x ३ x २ फूट डायमेन्शन्सचा आहे.
-अँटिक आणि आर्ट्स पीसेसचे सगळे १२ बॉक्सेस ऊघडलेले आहेत. त्यातल्या लहान ३ x ३ x २ च्या बॉक्समधली मधली वस्तू गायब आहे.
- बॉक्स मधल्या वस्तू वगळता घरातल्या ईतर वस्तू केवळ शोभेच्या असाव्यात आणि त्यांना काही अँटिक वॅल्यू नसावी असे प्रथमदर्शनी वाटते.
-एका बेडरूममध्ये लहान मुलाच्या फर्निचर आणि डेकॉरच्या सामानाचे मोठे बॉक्सेस. बॉक्सेस ऊघडले असता आत काही आक्षेपार्ह सापडले नाही.
-लहान मुलांच्या 'कार्स' सिनेमावर आधारीत बेडरूम सेट अर्धवट लावून सोडून देण्यात आला आहे तो पूर्ण करण्यासाठी लागणारी ५ x ४ x ४ ची कार फ्रेम मागे ठेवलेल्या बेडरूम सेटच्या रिकाम्या मोठ्या बॉक्स मध्ये मिळाली नाही
-'ती' कार फ्रेम आमच्या शोरूम मध्ये फ्रंटला लावलेली असल्याने गोडाऊनमधून डिलिवरी नेणारे बॉईज ती नेण्यास विसरून गेले असा जबाब अलमीरा ईराणींनी दिला. डिलिवरी बॉईजनी ती फ्रेम दुसर्यादिवशी आणून लावण्याची हमी मिस्त्रींना दिली होती. डिलिवरी बॉईजनेही असेच झाले असल्याचे सांगितले.
-मिस्त्री आणि सेरेनिटी मधल्या ईतर कुठल्याही राहिवाश्याचा कोणत्याही प्रकारचा कधी संबंध आल्याचे पुरावे मिळाले नाहीत. सर्व जण त्यांना एक दर्दी आर्ट डीलर म्हणूनच चेहेर्याने ओळखत होता.
३१ डिसेंबरची बीच पार्टी
-३१ डिसेंबरला गॅलॅक्सी ग्रूप-सेरेनिटीने मोठी बीच पार्टी आयोजित केली असल्याने ६०१ चे क्लायंट शोईंग करण्यास फॉन्सेकाला मनाई करण्यात आली होती.
-बिल्डिंगमधील राहिवासी आणि त्यांच्या पाहुण्यांना बिल्डिंगला वळसा घालून बीच पार्टीला जावे लागू नये म्हणून त्यांच्या सोयीसाठी बिल्डिंगच्या बॅक साईडला (जी बीच सईड आहे) ऊघडणारे जिन्याचे दार (जे ईतरवेळी कायम बंद असते आणि ऊघडल्यास अलार्म वाजतो) रात्री ९ वाजल्यापासूनच अलार्म डिझेबल करून ऊघडेच ठेवण्यात आले होते.
-३१ डिसेंबर रात्री ९ पूर्वी बिल्डिंगचे बॅक डोर महिन्याभरात आजिबात ऊघडले गेले नव्हते.
-बॅक डोर मधून आत येणारा वा जाणारा कॅमेरामध्ये कैद होतो पण ३१ डिसेंबरच्या रात्री कैक सेरेनिटीचे राहिवासी आणि त्यांचे विजिटर्स अनेक वेळा घोळक्याने आत व बाहेर करत असल्याने त्यातून नेमकी संशयित व्यक्ती शोधणे अशक्य आहे.
-बीच पार्टीला सेरेनिटीच्या सध्याच्या राहिवाशांबरोबरच त्यांच्याकडच्या पाहुण्यांची आणि अनेक प्रॉस्पेक्टिव क्लायंटसची ऊपस्थिती होती.
-गॅलॅक्सी ग्रूपने आयोजित केलेल्या या बीच पार्टीचे ईवेंट मॅनेजमेंट गोव्यातल्या नावाजलेल्या आणि अतिशय महागड्या 'मूनलाईट असोसिएट्सला' देण्यात आले होते.
-मिस्त्रींच्या बीच फेसिंग फ्लॅट मधून पार्टीची जागा, बीचकडून बिल्डिंगकडे येणारी ४० मीटरची पायवाट आणि चालणारी व्यक्ती स्पष्टं दिसते.
खबरींकडून कळालेली माहिती
-अलमीरा ईराणीच्या 'फर्निचर & डेकॉर स्टोर' मध्ये आणि खाजगी आयुष्यातही 'कैझाद दोर्दी' सिक्रेट स्लीपींग पार्टनर आहे अशी वदंता आहे.
-मुलाची कस्टडी गेल्याने कैझाद दोर्दी मिस्त्रींवर फार खवळलेला आहे. त्याच्या फॅमिलीचे त्यांच्या हॉटेल बिझनेसच्या माध्यमातून गुन्हेगारी वर्तुळात काँटॅक्ट्स असण्याची खूप शक्यता आहे.
**************************************************
कसा झाला असेल नरीन मिस्त्रींचा करूण अंत? काही घातपात असण्याचा संभव आहे की त्यांनी अचानक अशी खिडकीतून ऊडी मारून आत्महत्या केली? मॅट्रेस मध्ये गोळ्या कुठून आल्या? मिस्त्रींची आत्महत्या नसून खून असेल तर कोणी केला आणि कसा?
घटना सोडून वरती मिस्त्रींबद्दल मी जी लांबड लावली आहे ती फक्तं मिस्त्री आणि त्यांचे 'हितचिंतक'
एक व्यक्ती म्हणून कसे आहेत हे सांगण्यासाठीच. एकदा एकेकाचे कॅरिकेचर समजले की ती माहिती पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज पडू नये. घटनाक्रम आणि ईतर डीटेल्स
वर्क-आऊट करूनच खुनी ( जर हा खूनच आहे असा तुमचा विश्वास असल्यास) आणि त्यांची पद्धत समजू शकते. मान्य आहे माहिती खूप दिली आहे पण ऊलट त्याचा ऊपयोग अॅम्बिग्विटी टाळून स्ट्रीमलाईन्ड थिंकिंगसाठीच होईल असे वाटते.
*बीच पार्टी म्हणजे केवळ बीचवर झालेले ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन अपेक्षित आहे. बिकिनी,रेव वगैरे तसले काही नाही. 
खुनी मांजर ची एक कथा
खुनी मांजर ची एक कथा मायबोलीवर होती. त्यात ती कुणाला दिसली की त्याचा मृत्यु होतो बहुदा कवठीचाफा यांची होती.
कुठल्यातरी प्रजातीचं मांजर
कुठल्यातरी प्रजातीचं मांजर असेल. मिस्त्रीबरोबर मांजर पण पडलं पण ते बरोबर चार पायांवर पडलं आणि निघून गेलं. मिस्त्री गेला. Lol>>>>
प्राण्याची आयडिया
प्राण्याची आयडिया इन्टरेस्टिंग आहे
खुनी एक माणूस आहे असं धरून
खुनी एक माणूस आहे असं धरून चाललोय आपण सगळे.
जनावरही असू शकेल, जे पाहून घाबरून पॅनिक मधे मिस्त्रींनी काच फोडून बाहेर उडी मारली. पण स्लीपिंग पिलमुळे अॅक्शन अन अंदाज चुकला.
जनावर जर साप असेल असं समजलं तर तो ओपनिंगमधून सरपटत बाहेर निघून गेला असं म्हणता येईल.
तो पाठवला असणार नक्कीच अँटीक्स च्या बॉक्स मधून भरूचा नी.
जेणेकरून जेंव्हा केंव्हा मिस्त्री तो बोक्स उघडेल, साप चाऊन मरेल. >>> SOLVED
फक्तं सापाच्या जागी फुलग्रोन भुकेला बोआ किंवा रेटिक्युलेटेड कन्सट्रिक्टर (पायथन/अजगर) ठेवून बघा.
हुडी आणि त्याला लागलेला वेळ बघता त्याने सिंक खाली होल करून आत प्रवेश केला केला आणि सगळ्यात लहान बॉक्समधले जे त्याला नेता येवू शकले असते असे आर्टिफॅक्ट चोरून आला त्या मार्गानेच पोबारा केला. तो घाई घाईत गेला कारण त्याची अनुपस्थिती खाली लक्षात आली असती अन्यथा तो सावधानतेने कॉरिडोर मध्ये कोणी आहे का बघून गेला असता. तो ईवेंट मॅनेजमेंट कंपनी च्या क्रू बरोबर आला असण्याची दाट शक्यता आहे. फॉन्सेका च्या ६०१ आणि बिल्डींग टूर घेणार्यांची विडिओ क्लिप बघितली तर कदाचित तो सापडण्याची खूप शक्यता आहे अर्थात चेहरा ओळखू येणार नाही. शिवाय भरूचाच्या कंपनीशीही त्याचा डायरेक्ट वा ईन डायरेक्ट संबंध असायला हवा त्याशिवाय मिस्त्रींनी मौल्यवान आर्टिफॅक्ट्स घरात आणून ठेवल्याचे त्याला कळणार नाही. फॉन्सेका शोईंग दरम्यानच त्याला भिंतीचे मटेरिअल, बीच पार्टी, जिन्यात कॅमेरे नसणं, लॉक्स वगैरे कळालं असणार.
केवळ नऊ मिनिटांत ६०१ मध्ये येवून निघून जाणारा नक्कीच अॅसॅसिन/हिटमॅन असायला पाहिजे आणि तो नक्कीच गांधी-पारीख कडून असला पाहिजे. ६०१ ला अॅक्कवर, पार्टीचे क्लोदिंगचे कवर, जिन्याचे बॅक डोर ओपन ठेवणे, भिंतीतून गोळी जाऊ शकते हे नक्की माहित असणे, मिस्त्रींच्या बेडरूमची आणि बेडची जागा, काम झाल्यानंअतर पुन्हा पार्टीमध्ये मिक्स होता येणे ई. माहिती ईनसायडर सोर्सकडून आल्याशिवाय मिळणार नाही.
कारची फ्रेम मिसिंग असणे ही जेन्यूईन मिस्टेक असावी कारण एका गोष्टीमुळे दोन डिलिवरी बॉईज, अलमीरा, कैझाद सगळे गोत्यात येणार होते. बेड असेंबल केलेला होता आणि एक आक्खा माणूस मिस्त्री घरात असतांना लपवणे अवघड वाटते आहे. पुन्हा एक्झिट स्ट्रॅटेजीचा पंगा आहेच.
मिस्त्री झोपी गेले तेव्हा एक यमदूत त्यांच्याकडे ईंचाईंचाने आणि एक पायरी पायरीने सरकत होता. भरूचावर भरवसा न ऊरल्याने म्हणा वा आपले अँटिक कलेक्शन पहाण्यासाठी म्हणा मिस्त्रींनी पार्टीला जाण्याआधी हर एक बॉक्स ऊघडून वरवर खात्री केली. मात्रं त्यांनी सगळ्या वस्तू
बाहेर काढल्या नसाव्यात. रात्री जेव्हा सरकता यमदूत मिस्त्रींच्या बेडवर आला (हे बोआ बुवा माणसाची बॉडी हीट आणि चालू असलेल्या लँपच्या हीटने रात्रीच्या अंधारात लगेच कार्यरत होतात, माणूस खाणे वा पचवणे शक्य नसले तरी शिकार समजून त्याचा बळी घेण्याचे कार्य ते ईमानदारी ने करतात. हृदयाचे ठोके थांबेपर्यंत माणसाला आवळत राहणे हेच त्यांचे मुख्य वेपन. आणि ईतरांच्या मदतीशिवाय त्यांचा विळखा सोडवणे केवळ अशक्य असते) आणि त्याने मिस्त्रींना विळखा घातला त्यावेळी गोळीच्या अंमलामुळे मिस्त्रींना सावरायला क्षण दोनक्षण लागले असतील आणि त्यांची बेडवरच स्ट्रगल चालू झाली. अॅमेझॉन, अफ्रिका जंगलात भटकंती केल्याने आणि ईतरांना त्याठिकाणी सर्वाईव कसे व्हावे ह्याबद्दल मार्गदर्शन करीत असल्याने अश्या प्रसंगी लागणारे बेसिक सर्वायवल स्कील त्यांच्या अंगात भिनलले असणारंच. बोआ बुवांनी पाश आवळताच मिस्त्रींचे सफोकेशन सुरू झाले, स्ट्रगल वाढले. आपल्याकडे काही सेकंदांच्या वर आता वेळ नाही समजून त्यांनी जगण्याची शक्यता असलेला एकमेव ऊपाय अवलंबला आणि स्वतःला बोआ बुवांसहित झोकून दिले. पण दुर्दैवाने डोके आपटले. बोआचे दात निवडुंगाच्या काट्यांसारखेच असतात त्यांनी थोडे फार रक्तं येते पण विष बगैरे काही नसते. जखम काटा टोचल्यावर होते तशी एका दिवसात ठीकही होते. कॅक्टस बेडवर पडल्यानंतर अचानक झालेल्या ह्या एक प्रकारच्या हल्ल्याने म्हणा वा मिस्त्रींची हार्टबीट थांबल्याने बुवा सरपटत दूरवर पसार झाले. कॅक्टसच्या काट्यांमुळे बुवांचे बाईट मार्क्स वेगळे शोधणे अशक्य होते.
मिस्त्रींचा अंत ११:४० ला घडून गेला होता पण ह्याची खबर कुणालाच नसल्याने आपल्या रुबाबदार हिटमॅन ने ठरल्याप्रमाणे ६०१ च्या भिंतीतून ३ गोळ्या चालवल्या, पाच मिनिटे मिस्त्रींची धडपड वा आरडाओरड ऐकू येते का ह्याचा कानोसा घेतला आणि तो शांतपणे निघून गेला. हे काम त्याने बरोबर १२ च्या ठोक्याआधी दोन क्षण केले असावे कारण न जाणो बिल्डिंमध्ये कोणी असेल आणि त्याने आवाज ऐकला तर फटाके होते समजावे.
पण मिस्त्री बेडवरंच नसल्याने गोळ्या मॅट्रेसमध्ये घुसल्या आणि त्यांच्या शांततेमुळे त्याने मिस्त्री मेले असा अंदाज लावला असावा.
खुनी कोण तर? तर भरूचाच . अँटिक बॉक्सची कस्टडी त्याच्याकडे होती आणि मिस्त्रींचा बदला घेण्याचा चंग त्याने बांधला होताच. मिस्त्रींनी कॉंट्रॅक्ट फक्तं रिन्यू नवह्ते केले पण चालू कॉंट्रॅक्ट अजूनही तीन महिने चालणार असल्याने कायदेशीर रित्या तो अजूनही कस्टोडियन होता. कधी तरी बोआ बुवांनी आपले काम केलेच असते आणि मिस्त्रींच्या घरातल्या शेकडो फर्निचर आयटेम्स पैकी कुठल्यातरी सांदी कोपर्यात जाऊन लपले असते. मिस्त्रींची बॉडी सापडून पोस्टमॉर्टेम वगैरे होवून काही कळे वा मिळेपर्यंत भरूचा कडे बुवांना बाहेर काढण्यासाठी भरपूर वेळ होता. आणि जमले नाही तरी बुवा ह्या बॉक्स मधूनच आले असे पुराव्याने शाबित करणे निश्चितच शक्य नव्हते.
स्पेकल्ड बँड वाचली वा पाहिली नाही. ऑफिसमधल्या मित्राने ईथे पायथन आला तर मी ह्या काचेच्या खिडकीतून ऊडी मारेन असे मजेमजेत म्हंटले तेव्हा हे सुचले. साप अश्यासाठी नाही कारण ते सफोकेट करत नाहीत आणि त्यांचे विष व बाईट मार्क्स पोस्ट मॉर्टेम मध्ये कळाले असते. शिवाय मिस्त्रींनी साप हँडल करायचे स्कील त्यांच्या भटकंती दरम्यान शिकले असेलच. अॅमॅझोन मध्ये असलेच तर असते सगळे.
बहुत खूब अँकी .... शाबाश
बहुत खूब अँकी .... शाबाश पठ्ठे !!
हो आणि लिहायचे राहिले...
हो आणि लिहायचे राहिले... अँटिकच्या बंद लाकडी बॉक्सेस मधून बोवांना आणणे/पाठवणे सोपे आहे..... फर्निचर आणि डेकॉर मध्ये असेंब्ली ईनवॉल्व असल्या कारणाने डिलिवरी बॉईज ती रिस्क घेणार नाहीत.
अँटिकच्या बंद लाकडी बॉक्सेस
अँटिकच्या बंद लाकडी बॉक्सेस मधून बोवांना आणणे/पाठवणे सोपे आहे>>> तो अजगर गुदमरणार नाही तिथे? पूर्ण वाढ झालेला अजगर मिस्त्रींच्या लक्षात येणार नाही जरी त्यानी वरवरून बॉक्स बघितली तरी?
समजा अजगराने मिस्त्रींना यशस्वीपणे मारले असते तरी त्याने त्यांना गिळायला सुरवात केली असती आणि पुढचे अनेक तास तो सुस्तीतच तिथेच पडला असता. अगदी दुसर्या दिवशी जरी पोलीस, साफसफाई करणारे कामगार आले असते तरी तो सापडला असता. तो कुठून आला याचा तपास करत असताना संशयाची सुई भरूचांकडून आलेल्या लाकडी बॉक्सेस कडे नक्की जाईल. समजा मिस्त्री जिवंत राहिले असते किंवा त्यांना तो अजगर घरात दिसला असता तर त्यांनाही हाच संशय आला असता. भरूचा अशी risk का घेतील?
कधी तरी बोआ बुवांनी आपले काम
कधी तरी बोआ बुवांनी आपले काम केलेच असते आणि मिस्त्रींच्या घरातल्या शेकडो फर्निचर आयटेम्स पैकी कुठल्यातरी सांदी कोपर्यात जाऊन लपले असते>>> पायथॉन इतक्या easily लपून राहू शकतो का?
उंचीवरून cactus bed वर जर तो पडला असता तर तोच मेला असता.
शाबाश पठ्ठे !! >> धन्यवाद
शाबाश पठ्ठे !!
>>
धन्यवाद
चीकु
चीकु
अजगर माणसांना गिळत नाहीत. ३० एक फुटी रेटिक्युलेटेड पायथन किंवा अतिशय मोठा अॅनाकोंडा असेल तर श्यक्य आहे पण असा साप मिळवणे आणि पाठवणे शक्य नाही. १५ फुटी पायथन्स पेट म्हणून चिक्कार लोकांकडे असतात. पेट ओनर्स वा घरातली लहान मुले सफोकेट होऊन मेली आहेत पण पायथन त्यांना खात/गिळत बसत नाही. घरात हरवलेला १२-१५ फुटी पायथन शोधून देण्यासाठी भरमसाठ फी आकारणारे स्क्वाडस आहेत. पायथनला शोधणे वाटते तेवढे आजिबात सोपे काम नाही आणि एबढ्या मोठ्या अँटीकच्या जंजाळात तर बिलकुलच नाही.
भरोचा अडकू शकला असता त्याबद्दल आधीच्या पोस्ट मध्ये लिहिले आहे.
पायथन्स पटकन गुदमरत नाहीत आणि अँटिकचे मोठे लाकडी बॉक्सेस अगदीच हवाबंद नसतात.
नाही ते ऊंचावरून पडल्यावर
नाही ते ऊंचावरून पडल्यावर शक्यतो मरत नाहीत (खाली फरशी वगैरे असती तर शक्य आहे मरणे) आणि ईथे तर खाली कॅक्टस बेड होता. त्यांची बॉडी एक मोठा फॅट/मसल असते, हाडे खूप लवचिक आणि अतिशय जाड अश्या फॅट लेअर ने कवर्ड असतात. पडल्यानंतर त्यांची बॉडी स्प्रिंग सारखी थोडी ऊडते.
सगळे अॅक्टिव लोक अचानक गायबच
सगळे अॅक्टिव लोक अचानक गायबच झाले.
आवडली नाही का ही केस? की डिडक्शन/ रिझोल्युशन पटले नाही किंवा प्लॉजिबल वाटत नाही? खुनी म्हणून माणूसच अपेक्षित होता का?
चांगल्या वा वाईट प्रतिक्रिया दोन्हीही तितक्याच महत्वाच्या आहेत आणि प्रामाणिक प्रतिक्रियांची निर्लज्य अपेक्षाही.
केस चांगली आहे पण रिझॉल्यूशन
केस चांगली आहे पण रिझॉल्यूशन फारसे पटले नाही. भरूचांना मिस्त्रींना मारायचेच असेल तर पायथॉन बेभरवशाचा वाटतो. तो मारेल, नाही मारेल, आधीच सापडेल वगैरे. तसेच त्याने मिस्त्रींना सफोकेट करायला सुरवात केली असती तर वळ अंगावर दिसले असते. night lamp चालू होता, चष्मा, पुस्तक बेडच्या बाजूलाच पडले होते म्हणजे मिस्त्री बहुतेक बेडवर बसून वाचत असणार, झोपी गेलेले नसणार. त्यांना पायथॉन अंगावर चालून येतोय हे आधीच समजणार नाही?
चीकू +1.
चीकू +1.
अजगर पाठवून मारणे, हा अजिबात फुलप्रूफ प्लॅन नाही. मिस्त्री चपळ होते, बचावले तर भरूचा अडकला असता. याही प्रसंगात केवळ उडी चुकल्याने प्लॅन सफल झाला. ज्याला मिस्त्रीना संपवायचे आहे तो इतका बेभरवशी प्लॅन करणार नाही. शिवाय त्याने गांधी पारीख यांच्याकडून पैसे घेतले आहेत, त्यांच्याशी तो संपर्कात असणार. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट किलर हायर केलाय हे ते सांगणार नाहीत भरुचांना?
ह्या केस साठी मी पायथन्स
ह्या केस साठी मी पायथन्स बद्दल मागच्या दोन दिवसात बरेच वाचले, एक्स्पर्ट्सच्या दोन चार डॉक्यु. बघितल्या.
ते नॅचरल प्रीडेटर आहेत आणि घरात सोडलेल्या भुकेल्या वाघा एवढा नसला तरी भुकेला पायथन तिकतकाच घातक असतो. 'अँबुश' घात लावून बसणे हे त्यांची सॉलीड स्कील असते. ते अंधारात वा मंद प्रकाशात लगेचच कार्यरत होतात आणि माण्साची/ईतर प्राण्यांची बॉडी हीट पर्फेक्ट ट्रॅक करतात. केवळ काही सेकंद लागतात त्यांना दोन कॉईल्स मारायला आणि चावाही त्यांचा खूप वेदनादायी असतो. कॉईल्समध्ये हातही अडकल्याने माणूस दुसर्यांच्या मदतीशिवाय सुटू शकत नाही.
तुमचा वळ ऊठण्याचा मुद्दा मात्रं बरोबर वाटतो आहे मी त्याचा विचार करायला हवा होता. तीन महिन्यात फ्लॅट मध्ये ईतर भक्ष्य न मिळाल्याने आज न ऊद्या मिस्त्रींची त्याच्याशी गाठ निश्चितच होती.
गोळी, वाईन घेतल्याने वाचतावाचताच त्यांना झोप लागली असेल आणि ते चष्मा पुस्तक झटापटीत पडले असे काहीसे डोक्यात होते.
आधीच्या एकदम सुरुवातीच्या
आधीच्या एकदम सुरुवातीच्या प्रतिसादांत लिहिले होते मी खुनी त्यांचा जावई असेल कारण ४कोटी किंवा अँटिक्स पेक्षा जास्त रक्कम ही त्यांची आयुष्य भरातील कमाई !
अँटिक्स ची किंमत ही त्यांनी स्वताच्या कमाईतुन चुक्वलेली आहे कारण इल्लीगल ते कधी त्याबाबत वागले नाहीत मग कस्टोडियन चा उद्देश् तेवढा पटत नाही.
बाकी ती खुनाची स्ट्रैटेजी माणसा पेक्षा प्राणी हे पटते पण अजगराची थिअरी काही त्यात फिट नाही बसत बुवा
जबरी!! बोआ असेल हे सुचणं
जबरी!! बोआ असेल हे सुचणं शक्यच नव्हतं. स्पेकल्ड बँड ची पारायणं केली असली तरी!!
अँकी!! सॉल्लिड्ड!!
हाब, मस्त चालू आहेत कोडी..फुल्ल डोक्याला शॉट!!
अजगर ची थेअऱी बरोबर
अजगर ची थेअऱी बरोबर
पण मांडणी थोडी गंडली अजून एकदा मांडा एकदम फुल्लप्रफ होईल
हा अजिबात फुलप्रूफ प्लॅन नाही
हा अजिबात फुलप्रूफ प्लॅन नाही. मिस्त्री चपळ होते, बचावले तर भरूचा अडकला असता. याही प्रसंगात केवळ उडी चुकल्याने प्लॅन सफल झाला. >> हे तर कुठल्याही प्लान बाबतीत होऊ शकते. हिटमॅनशीही मिस्त्री दो-दो हात करू शकले असते. त्याचीही टेक्निक अँबुश करणेच होती.
ज्याला मिस्त्रीना संपवायचे आहे तो इतका बेभरवशी प्लॅन करणार नाही. >> खरंच सांगतो भुकेला पायथन, अतिशय बेसावध असलेले मिस्त्री हे एकमेव लिविंग प्रे, रात्र, वुडन फ्लोर आणि लपण्याच्या शेकडोंनी जागा....मिस्त्री हॅड वेरी लिट्ल चांस टू सर्वाईव. अॅमेझॉन, अफ्रिकेमध्ये अंबुश अपेक्षित असते मनुष्य सावधही असतो पण ६ व्या मजल्यावरच्या फ्लॅट्मध्ये. मिस्त्रींचे ऊडी मारणे प्लान्ड असणे हा मला स्ट्रेच वाटतो. ती एक प्रतिक्षिप्त क्रिया जास्त आणि प्लान्ड ऊडी कमी हे कारण जास्तं वॅलिड वाटते. खाली कॅक्टसचे बेड असणे हा केवळ योगायोगही म्हणू शकतो.
शिवाय त्याने गांधी पारीख यांच्याकडून पैसे घेतले आहेत, त्यांच्याशी तो संपर्कात असणार. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट किलर हायर केलाय हे ते सांगणार नाहीत भरुचांना? >> नाही भरूचांना गांधीकडून मिस्त्रींचे मन वळवण्यासाठी पैसे मिळाले होते जे परत द्यावे लागले. अॅसेसिनेशन करण्यास गांधी-पारीख समर्थ होते त्यात त्यांना भरुचाची गरज नव्हती.
सही. आवडली.
सही. आवडली.
बॉक्स मधून कोणीतरी आलं असणार इतपर्यंत काल आले होते सगळे. पण माणूसच असणार वर अडकून राहायला नको होतं. फूल प्रुफवर वरती म्हणतायत तशा शंका आहेत. पण पायथन लपतो आणि अंधार झाला की हीट शोधत येतो असं असेल तर शक्य आहे. हुडी गाय, किंवा स्मार्टी गाय मेले नाही नशीब.
पोलीस कदाचित त्या धिप्पाड व्यक्तीला पकडतील. पण त्याने खून केलाय हे त्याने जरी अंडर ओथ सांगितलं तरी पुलिसनाच पटणार नाही.
सेकंड थॉट : त्या भोकातून पायथन ६०१ मध्ये गेला आणि स्मार्टी गाय चा खातमा केला, त्याचं प्रेत तिकडेच सापडलं मग ६०२ मध्ये येऊन वर झालेली हकीगत घडली, आता खुनी ओळखा अशी पण ट्वीस्ट देता येईल. अर्थात खून भरा पायथन ह्या नावाने आणखी प्रसिद्धी मिळण्याचे चान्सेस वाढतील हा बोनस.
जो खरोखर जंगलात फिरलाय
जो खरोखर जंगलात फिरलाय शिकारीसाठी किंवा सफारीसाठी त्याला साप अजगर किंवा तत्समच प्राण्यांचे अस्तित्व जाणवते हे अनुभव आहेत. नाग फुरसे घोणस असो की धामण , प्रत्येकाच्या लकबी विशिष्ट आणि त्यानुसार परिसरात जाणावणारा आवाज आणि गंध ! अजगरसुद्धा ह्याला अपवाद नाही.
फक्त ईथे मिस्त्री ह्यांनी झोपेची गोळी प्लस दारू घेतलीय त्यामुळे सेंसरी पोटेंशियल थोड़ा मन्दावला हे पटायला पुरेसा वाव आहे.
पण जेव्हा अजगराच्या विळख्याची जाणीव होते तेव्हा काउंटर अटॅक म्हणून अनेक पर्याय खोलीत उपलब्ध असतात आणि जो अमेंझोन वगैरे एकटा फिरलाय अश्या जिगरबाजाने 2ऱ्या माळ्या वरुन स्वतास वाचवण्यास खाली झोकून देण्याची खरेच आवश्यकता नसते
पायथन भुकेला असला तरी
पायथन भुकेला असला तरी त्यावेळी बरोब्बर मिस्त्री अतिशय बेसावध असतील हे पॉसीबल नाही ना! शिवाय पुढच्याच आठवड्यात दानिश त्यांच्याकडे येणार होता, दानिश बरोबर त्याला पाहायला एखादी नॅनी आलीच असती. घरात लिव्हिंग जीव वाढले म्हटल्यावर मिस्त्रीऐवजी ते टार्गेट होण्याची शक्यता खूप आहे.
बरं 11:40 ला मिस्त्री समुद्राच्या बाजूला पडले जिकडून तो असासीन आला. त्याला काहीच दिसलं नाही? जस्ट मिस केलं असेल असं धरून चालू.
आणि दुसरं म्हणजे प्रोफेशनल असासीन असा अंदाजपंचे भिंतीपलिकडून का गोळी घालेल? गांधी पारीखना 602चीच किल्ली मारेकऱ्याला देणे कितपत कठीण होते?
पण जेव्हा अजगराच्या विळख्याची
पण जेव्हा अजगराच्या विळख्याची जाणीव होते तेव्हा काउंटर अटॅक म्हणून अनेक पर्याय खोलीत उपलब्ध असतात आणि जो अमेंझोन वगैरे एकटा फिरलाय अश्या जिगरबाजाने 2ऱ्या माळ्या वरुन स्वतास वाचवण्यास खाली झोकून देण्याची खरेच आवश्यकता नसते >>> +१
त्या अजगराने हुडी गायवरही हल्ला केला असता, जर त्यावेळी तो बॉक्स मधून बाहेर आला असता तर, किंवा हुडी गायने अजगराचाच बॉक्स उघडला असता तर. हो आणि धिप्पाड माणसालाही धोका होताच जर अजगर त्या भोकातून ६०१ मधे आला असता आणि दबा धरून बसला असता तर!
पायथन भुकेला असला तरी
पायथन भुकेला असला तरी त्यावेळी बरोब्बर मिस्त्री अतिशय बेसावध असतील हे पॉसीबल नाही ना! शिवाय पुढच्याच आठवड्यात दानिश त्यांच्याकडे येणार होता, दानिश बरोबर त्याला पाहायला एखादी नॅनी आलीच असती. घरात लिव्हिंग जीव वाढले म्हटल्यावर मिस्त्रीऐवजी ते टार्गेट होण्याची शक्यता खूप आहे. >> लाईट आणि हलणारे आपल्यापेक्षा मोठे प्रे....पायथन कुठल्याही नॅचरल प्रीडेटरप्रमाणे त्याला अॅडवंटेजिअस संधीची वाट बघणार. त्यांच्या नॅचरल अॅबुश स्कील मध्येच हे येते. दानिश, नॅनी प्रे होऊ शकतील पण भरूचांना भविष्यात मिस्त्री कोणाला फ्लॅट मध्ये घेवून येतील ह्याची आज कल्पना असणं शक्य नाही.
बरं 11:40 ला मिस्त्री समुद्राच्या बाजूला पडले जिकडून तो असासीन आला. त्याला काहीच दिसलं नाही? जस्ट मिस केलं असेल असं धरून चालू. >> हो त्याला कल्पना असती तर पुढचे शुटिंग करण्याची गरज त्याला पडलीच नसती.
आणि दुसरं म्हणजे प्रोफेशनल असासीन असा अंदाजपंचे भिंतीपलिकडून का गोळी घालेल? गांधी पारीखना 602चीच किल्ली मारेकऱ्याला देणे कितपत कठीण होते? >> ६०१ अजून विकला न गेल्याने त्याची किल्ली गांधींकडे असणार किंवा मिळवणे सोपे असणार. ६०२ च्या बनावट चावीने थेट फ्लॅट मध्ये एंटर करणे रिस्की स्ट्रॅटेजी वाटते. पुन्हा मिस्त्रींनी मुल्यवान वस्तू आहेत तर एक्स्ट्रा सेफ्टी अॅड करण्याचा ही धोका असेलच. त्यापेक्षा भिंतीआडून गोळी चालवणे ही सेफ आणि कॅलक्युलेटेड रिस्क स्ट्रॅटेजी आहे. आणि मिस्त्री बेडवर असते तर ती १००% वर्क झालीच असती
त्या अजगराने हुडी गायवरही
त्या अजगराने हुडी गायवरही हल्ला केला असता, जर त्यावेळी तो बॉक्स मधून बाहेर आला असता तर, किंवा हुडी गायने अजगराचाच बॉक्स उघडला असता तर. >> बॉक्स सगळे आधीच ओपन होते. हुडी गाय ला होल बनवायला वेळ लागला असणार आणि आत येताच तो कायम मोशन मध्ये असणार. पटकन एक छोटे आर्टिफॅक्ट ऊचलून क्विक ईन अँड आउट झाला असणार.
हो आणि धिप्पाड माणसालाही धोका होताच जर अजगर त्या भोकातून ६०१ मधे आला असता आणि दबा धरून बसला असता तर! >> हो किचन कॅबिनेट ऊघडे असते तर असे होऊ शकले असते.
कल्पना आणि एकूण प्लॉट मस्त
कल्पना आणि एकूण प्लॉट मस्त आहे.
आपल्या घरात बेड वर झोपले असताना अचानक अजगराने विळखा घालून गुदमरवणे ही कल्पना - इट क्रीप्स यू आउट!!
मला एक प्रश्न पडला पण. बेड वर झोपलेल्या माणसावर (तेही न बघता) भिंतीतून गोळी झाडण्याची काय आयडिया आहे? या भिम्तीतून येऊन त्या भिंतीत जाईल की ती गोळी. आडव्या झोपलेल्या माणसाला कसे मारणार तसे?
त्यासाठी छतातून गोळी यायला हवी ना?
पण जेव्हा अजगराच्या विळख्याची
पण जेव्हा अजगराच्या विळख्याची जाणीव होते तेव्हा काउंटर अटॅक म्हणून अनेक पर्याय खोलीत उपलब्ध असतात आणि जो अमेंझोन वगैरे एकटा फिरलाय अश्या जिगरबाजाने 2ऱ्या माळ्या वरुन स्वतास वाचवण्यास खाली झोकून देण्याची खरेच आवश्यकता नसते >> प्रत्येक सेकंदाला तुम्ही सफोकेट होत आहात, ब्रेनला ऑक्सिजन पुरवठा कमी होत असतांना कॉग्निटिव स्कील्स कमी होत आहेत, तुम्ही दचकलेले घाबरलेले आहात आणि मुख्य म्हणजे हात अडकलेले आहेत कुठले पर्याय कामी येवू शकतात असं तुम्हाला वाटतं आहे.
m.youtube.com/watch?v
m.youtube.com/watch?v=aTlftS9B7QA
अजगराची पकड़ सोडवण्याची (विळखा आणि दाताची असे दोन्ही) एक सोपी पद्धत हयात सांगितलीय जी अर्थातच मिस्त्री ह्यांना माहीती नसणे अशक्य आहे
मै, अॅट अॅगल गोळी झाडली की
मै, अॅट अॅगल गोळी झाडली की बसेल. बेड कॉमन भीतीला लागून नसेल आणि पुरेसं अंतर असेल तर होईल शक्य असं वाटतं. पण बेडच्या मध्यावर माणूस असेल, लोळत नसेल अशा अझंपशन आहेत.
धिप्पाड गाय स्टड फाईंडर घेऊन आला असेल का? असा प्रश्न पडला मला. पण मग ते हाउस इन्स्पेक्शन करणारे हिट मॅप दाखवणारे कॅमेरे आणतात तसा का नाही आणला त्याने?
सॉरी, अजून एक पॉईंट लिहितेय.
सॉरी, अजून एक पॉईंट लिहितेय.
हुडी गाय भोक पाडून आत आला आणि चटकन एक आर्टिफॅक्ट घेऊन निघून गेला असं तुम्ही लिहिलंय. अजूनही मिस्त्रीचा बराचसा खजिना त्याच्या कस्टडीत असताना एकाच कुठल्यातरी गोष्टीची प्रोफेशनल चोराकरवी अगदी मिस्त्रीकडे पोचल्यादिवशीच भरूचा चोरी का करवेल? हां आता त्याने अगदी स्पेसिफिक दुर्मिळांत दुर्मिळ सगळ्यांत मौल्यवान गोष्ट चोरली असती तर वेगळी गोष्ट..
कल्पना आणि एकूण प्लॉट मस्त
कल्पना आणि एकूण प्लॉट मस्त आहे.
आपल्या घरात बेड वर झोपले असताना अचानक अजगराने विळखा घालून गुदमरवणे ही कल्पना - इट क्रीप्स यू आउट!!
मला एक प्रश्न पडला पण. बेड वर झोपलेल्या माणसावर (तेही न बघता) भिंतीतून गोळी झाडण्याची काय आयडिया आहे? या भिम्तीतून येऊन त्या भिंतीत जाईल की ती गोळी. आडव्या झोपलेल्या माणसाला कसे मारणार तसे?
त्यासाठी छतातून गोळी यायला हवी ना? >>> भिंतीतून डाऊनवर्ड अँगल ने गोळी मारणं सहज शक्यं आहे. अॅसेसिन स्टँडिंग आहे मिस्त्री बेडवर आडवे लोअर लेवल ला आहे म्हणून डाऊनवर्ड अँगल ने मारलेल्या गोळ्या मॅट्रेस्मध्ये घुसल्या.
हुडी गायचा कदाचित आणखी चोरी
हुडी गायचा कदाचित आणखी चोरी करण्याचा प्लान असेल, पण मिस्त्री १२ पर्यंत न थांबता आधीच येतायत हे त्याने बघितल्याने तो भरकन आटपून पळाला असेल. त्यात तो वुडन पीस लावायलाही वेळ मिळाला नाही. पण चोरी करणे आणि खिडकीतून मिस्त्रीना बघणे हे मल्टीटास्किंग त्याने कसं केलं असेल ते कळत नाही.
हुडी गायचा कदाचित आणखी चोरी
हुडी गायचा कदाचित आणखी चोरी करण्याचा प्लान असेल, <<<<<
पण जितकं सामान वाढेल तितकं त्या छोट्या भोकातून जाईल कसं? आणि ते तो जिन्यावरून कुणालाही कळू न देता नेईल कसं?
अजुन एक मुद्दा म्हणजे
अजुन एक मुद्दा म्हणजे अजगराच्या विळख्यातुन उठून स्वताच्या पायावर उभे राहून 12mm सारखी जाड़ काच तोडण्यासाठी जोर लावणे त्याउप्पर विळखा असताना खिड़कीतून उड़ी मारणे कितपत पॉसिबल होवू शकेल ?
हुडी गाय भोक पाडून आत आला आणि
हुडी गाय भोक पाडून आत आला आणि चटकन एक आर्टिफॅक्ट घेऊन निघून गेला असं तुम्ही लिहिलंय. अजूनही मिस्त्रीचा बराचसा खजिना त्याच्या कस्टडीत असताना एकाच कुठल्यातरी गोष्टीची प्रोफेशनल चोराकरवी अगदी मिस्त्रीकडे पोचल्यादिवशीच भरूचा चोरी का करवेल? हां आता त्याने अगदी स्पेसिफिक दुर्मिळांत दुर्मिळ सगळ्यांत मौल्यवान गोष्ट चोरली असती तर वेगळी गोष्ट.. >> भरुचाने चोरी करवली असं मी कधीच सुचित केलेलं नाही. फक्तं मिस्त्रीच्या घरात आर्टिफॅक्ट्स आहेत ही माहिती ते भरूचाकडून ते घेवून येणार्या कार्गो डिलिवरी बॉईज ना होती किंवा भरूचा कडच्या एम्प्लीईजना ही हे माहित असावे. त्यापैकी एकाने स्वतः वा कुण्या प्रोफेशनल चोराला (लोन वुल्फ) फॉन्सेका चा वापर करून ती चोरी घडवून आणली.
अजुन एक मुद्दा म्हणजे
अजुन एक मुद्दा म्हणजे अजगराच्या विळख्यातुन उठून स्वताच्या पायावर उभे राहून 12mm सारखी जाड़ काच तोडण्यासाठी जोर लावणे त्याउप्पर विळखा असताना खिड़कीतून उड़ी मारणे कितपत पॉसिबल होवू शकेल ? >> तुम्ही तर आत्ताच ईतर अनेक पॉसिबल पर्यायांविषयी बोलत होतात.

स्वतःचे बॉडी वेट झोकून देणे हा मला त्यातल्या त्यात सोपा डिफेंस किंवा डिफेंस म्हणण्या पेक्षा प्रतिक्षिप्त क्रिया वाटते. मी वरही तसे म्हंटले आहे.
अमितला विचारा त्याने कालच्या प्रतिसादात हे कसे शक्य आहे ते लिहिले आहे
हुडी गायचा कदाचित आणखी चोरी
हुडी गायचा कदाचित आणखी चोरी करण्याचा प्लान असेल, पण मिस्त्री १२ पर्यंत न थांबता आधीच येतायत हे त्याने बघितल्याने तो भरकन आटपून पळाला असेल. त्यात तो वुडन पीस लावायलाही वेळ मिळाला नाही. पण चोरी करणे आणि खिडकीतून मिस्त्रीना बघणे हे मल्टीटास्किंग त्याने कसं केलं असेल ते कळत नाही. >> बस का! लहानपणी, मोठे कोणी येत आहेत का ह्याच्यावर एका डोळ्याने खिडकीतून नजर ठेवत खाण्यापिण्याच्या गोष्टी लांबवणे किती तरी वेळा केले आहे.
वुडन पीस लावायला >>> हे कळाले नाही बॉक्सेस आधीपासून ओपनच होते..... मिस्त्रींनी माघारी आल्याअवर त्यामध्ये डोकावले नाही ईतकेच त्यामुळे त्यांना चोरी झाल्याची कल्प्नना नव्हती.
हुडी गायचा कदाचित आणखी चोरी
हुडी गायचा कदाचित आणखी चोरी करण्याचा प्लान असेल, <<<<<
पण जितकं सामान वाढेल तितकं त्या छोट्या भोकातून जाईल कसं? आणि ते तो जिन्यावरून कुणालाही कळू न देता नेईल कसं? > एक त्यातल्या त्यात बेस्ट वाटेल आणि नेता येईल असं काहीतरी ऊचलून तो घाईघाईत निघून गेला. त्याला एखादी स्पेसिफिक मौल्यवान वस्तू माहित असल्यास त्या बॉक्सेस मधून ती हुडकून काढूनही त्याने नेली असेल. रँडम किंवा स्पेसिफिक काहीही नेले तरी त्याने त्याच्या प्लान आणि अॅक्शनमध्ये मध्ये काही फरक पडतो असे मला वाटत नाही
उडी पेक्षा तो वीडियो मधला
उडी पेक्षा तो वीडियो मधला उपाय अधिक सोपा आणि जंगलात फिरणाऱ्यांच्या सोईचा असतो
विळखा असताना म्हणजे पाय कमर हात असे जखडलेले राहिले तर काच फोड़णे आणि उड़ी मारणे इतकेच काय बेड वरून उभे राहणे सुद्धा अशक्य आहे. ह्यसाठी त्या अजगराची पकड़ ढीली करणे आवश्यक आहे आणि तसे घडले (जे मिस्त्रीना नक्कीच शक्य आहे) तर उड़ी मारायची गरज उरत नाही
उडी पेक्षा तो वीडियो मधला
उडी पेक्षा तो वीडियो मधला उपाय अधिक सोपा आणि जंगलात फिरणाऱ्यांच्या सोईचा असतो Happy
विळखा असताना म्हणजे पाय कमर हात असे जखडलेले राहिले तर काच फोड़णे आणि उड़ी मारणे इतकेच काय बेड वरून उभे राहणे सुद्धा अशक्य आहे. ह्यसाठी त्या अजगराची पकड़ ढीली करणे आवश्यक आहे आणि तसे घडले (जे मिस्त्रीना नक्कीच शक्य आहे) तर उड़ी मारायची गरज उरत नाही >> पुढच्यावेळी लक्षात ठेवेन
असो
असो
काही का असेना स्टोरी आणि सस्पेंस एकदम झक्कास
रच्याकने - विविध साप निसर्गदत्त अवतारात अनुभवणे आणि अगदी
अमेझोन नसली तरी कोकणमधील जंगलभ्रमंती ह्यामुळे अजगराच्या विळख्या बाबत आणि एकूणच अश्या प्राण्यांचे अस्तित्व न बघतासुद्धा जाणवणे (फिल करणे) अनुभवांती शक्य आहे ह्याबाबत बोललो.
पुढील सस्पेंसस्टोरी येवू लवकर
भारी लिहिता एकदम
वुडन पीस लावायला >> म्हणजे ते
वुडन पीस लावायला >> म्हणजे ते भोक पाडले त्याचा उरलेला पीस काम झाल्यावर परत तिकडे लावला तर काही झालंय हे चटकन कळलच नसतं.
त्या गोल सॉ असलेल्या ड्रील बीट ने कापलं तर एक्दम स्मूथ पीस तुटतो.
म्हणजे ते भोक पाडले त्याचा
म्हणजे ते भोक पाडले त्याचा उरलेला पीस काम झाल्यावर परत तिकडे लावला तर काही झालंय हे चटकन कळलच नसतं. >> अच्छा भिंतीचा वुडन पीस .. आलं लक्षात... मी वुडन बॉक्सेस वर अडकलो होत म्हणून लक्षात आले नाही.
त्या गोल सॉ असलेल्या ड्रील बीट ने कापलं तर एक्दम स्मूथ पीस तुटतो. >> हो हो अगदी.. मी स्वतः केले आहे.... तसा गोल वूडन पीस थोड्या फार प्रॅक्टिसने १० मिनिटात निघू शकतो.
तो धिप्पाड माणूस हर पोष्टी गणिक ईतका धिप्पाड होत गेला आणि त्याच्या धिप्पाड असण्याचा ईतका बाऊ झाला की मला मार्क रफेलो चा हल्क आठवला. ते मध्यम चणीचा (हुडवाला) एक आणि ऊंच रुबाबदार दुसरा (सुटवाला) हे फक्तं ६०१ मध्ये येणारी ही दोन वेगळी माणसे आहेत एवढेच सांगण्यासाठी लिहिले होते.
धन्यवाद अंबज्ञ... असाच लोभ
धन्यवाद अंबज्ञ... असाच लोभ असूद्या.
हो स्टोरी मस्त होती एकदम!
हो स्टोरी मस्त होती एकदम! पुढची लवकर येऊ द्या!
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
खेळात भाग घेतल्याबद्दल आणि प्रांजळ फीडबॅकबद्दलही.
सॉलीड मजा आली मलापण. फार मस्तं वाटत होते ऊत्तरे लिहितांना.
अजूनही काही प्रश्नं असतील तर नक्की विचारा.
तो धिप्पाड माणूस हर पोष्टी
तो धिप्पाड माणूस हर पोष्टी गणिक ईतका धिप्पाड होत गेला आणि त्याच्या धिप्पाड असण्याचा ईतका बाऊ झाला :d
थोड्याफार त्रुटी मान्य करूनही जबरदस्त प्लॅन!! त्याकरीता एवढं वाचन, अभ्यास केलात! _/\_
तो धिप्पाड माणूस हर पोष्टी
तो धिप्पाड माणूस हर पोष्टी गणिक ईतका धिप्पाड होत गेला >>>
अजून येऊ द्या!
हायझेनबर्ग, त्रुटी वगैरे
हायझेनबर्ग, त्रुटी वगैरे बाजूला पण खरेच इतके गुंगवून टाकणारे कोडे दिल्याबद्दल तुम्हांला धन्यवाद. आज किती वेळा हा बीबी रिफ्रेश केला असेल मी! एमराल्ड पॅराडाईझलाही भरपूर मजा आली.
तो धिप्पाड माणूस हर पोष्टी गणिक ईतका धिप्पाड होत गेला आणि त्याच्या धिप्पाड असण्याचा ईतका बाऊ झाला की मला मार्क रफेलो चा हल्क आठवला.<<<<<
मी तर एका स्टेजला एक मोठ्या कोटात घुसून दोन माणसे आली असा सुद्धा विचार केला होता. हो, कुठलीही शक्यता राहून जायला नको.
नवीन कोड्याची वाट पाहते आता. आता मध्यमवर्गीयांची कोडी येऊदेत.
भारी कोडं होत.
भारी कोडं होत.
Pages