'जगावेगळी माय-लेक साकारताना' - माधुरी ताम्हणे
ज्येष्ठ अभिनेत्री रीमा यांचं आज सकाळी निधन झालं.
'सिंहासन', 'कलयुग, 'आक्रोश', 'रिहाई', 'नितळ', 'अनुमती', 'सावली', 'घराबाहेर' अशा चित्रपटांमधल्या त्यांच्या विलक्षण ताकदीच्या भूमिकांपेक्षा प्रसारमाध्यमांमध्ये रीमाताईंच्या चित्रपटांतल्या, विशेषतः सुपरहिट हिंदी चित्रपटांमधल्या, त्यांनी साकारलेल्या आईच्या भूमिकांचीच चर्चा अधिक झाली.
रीमाताईंनी तरुण वयातच या भूमिका साकारायला सुरुवात केली असली, तरी त्यांचं अभिनयकौशल्य खर्या अर्थानं झळाळून निघालं ते मराठी रंगभूमीवर. 'पुरुष', 'सविता दामोदर परांजपे', 'घर तिघांचं हवं' अशा गाजलेल्या नाटकांमधल्या मध्यवर्ती भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांना जिंकलं.
'छापा-काटा' हे इरावती कर्णिक यांनी लिहिलेलं नाटकही रीमाताईंच्या अभिनयक्षमतेचं प्रगल्भ दर्शन घडवणारं होतं. रीमाताई आणि मुक्ता बर्वे यां दोघींनी हे संपूर्ण नाटक अफाट सहजतेनं तोलून धरलं होतं.
२०१४ सालच्या 'मेनका'च्या दिवाळी अंकात माधुरी ताम्हणे यांनी रीमा आणि मुक्ता बर्वे यांच्याशी संवाद साधला होता.
ती मुलाखत इथे पुनर्प्रकाशित करत आहे.
पूर्वप्रकाशन - 'मेनका' (दिवाळी - २०१४)
ही मुलाखत मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास परवानगी दिल्याबद्दल मेनका प्रकाशन. अमित टेकाळे व माधुरी ताम्हणे यांचे मनःपूर्वक आभार.
बातमी कळल्यावर आधी मला
बातमी कळल्यावर आधी मला सिंहासन मधली भूमिका आठवली आणि नंतर नुकतीच केलेली जाऊंद्या ना बाळासाहेब मधली.
सगळीकडे हम आपके, मैने पप्यार किया वगैरे उल्लेख आहेत.
ही मुलाखत इथे दिल्याबद्दल धन्यवाद चिनुक्स!
खूप क्यूट आई होती ही
खूप क्यूट आई होती ही