Submitted by चिनूक्स on 27 March, 2017 - 03:17
गेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.
जुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>> पारीजातक नावाचा एक मोठा
>>> पारीजातक नावाचा एक मोठा मॉल झाला <<< हो , मला पुसटसा आठवतोय Happy त्याचे काय?
इनफ्याक्ट, ग्राहकपेठ ही देखिल एक छोटेखानी "मॉलच" होती/आहे. (असे माझे मत)
Submitted by limbutimbu on 27 March, 2017 - 10:51
लिंब्या ग्राहक पेठ आहेच मॉल. पारीजातक त्याच्या आधीचा. असाच आठवला रे. काळाआड गेलेल्या गोष्टी वास्तु. सणसांचे जवाहर हॉटेल ही एक अशीच वास्तु. तिथे म्हणे कॅबरे चालत असे नुसते ऐकुनच होतो. त्यामुळे जास्तीच कुतुहल. Happy
Submitted by कांदापोहे on 27 March, 2017 - 10:55
>>> सणसांचे जवाहर हॉटेल ही एक अशीच वास्तु. <<< हो हो.....
Submitted by limbutimbu on 27 March, 2017 - 11:04
केपी, तुमने पुकारा और हम चले आये. मला आ ठव तो चांगलाच तो पारिजात मॉल. शॉपिन्ग अनुभव एकदम क्लास होता. नीट पिशव्यात भरून ठेवलेले अन्न. माझे काका लोकमान्य नगर बिल्डिंग नं २५ मध्ये राहात त्यांना भेटून घरी जाताना चालत चालत. आम्ही असेच आत शिरलो व एकदम हरखून जायला झाले. सर्व किती स्वच्छ. महत्वाचे म्हणजे ओ पावकिलो तीळ द्या भानगड नाही. सर्व नीट लेबल्ड. बिलिन्ग मशीन्स पहिल्यांन्दा पाहिली. छान छोटे खानी दुकान होते. जिमखान्यावरच्या लाटे पेक्षा वेगळा अनुभव.
लोकमान्य नगरात राहायचे आणि तिथे शॉपिन्ग करायचे हे एकेकाळी स्वप्न होते. लोकमान्य नगरात काचेची तावदाने असलेल्या खिडक्या,
टाइलस ची स्मूथ जमीन. ज्यावरऊन घसरत जाता येइ. बेतशीर ट्राफिक. ह्या काकू कडे प्लास्टिकच्या वस्तू देखील असत. एक प्रकारचा मॉडर्न संसार. त्यामानाने आमच्याकडे तांब्यापित ळेची भांडी, दही लावायला जलतरंगांचे स ट असा मामला होता.
Submitted by अमा on 27 March, 2017 - 11:28
मामे, इतके आठवते आहे, तर "रॅमन बोनस स्टॅम्प" आठवताहेत का कुणाला? १ रुपयाच्या खरेदीवर अडिचपैसे किंमतीचा स्टॅम्प मिळायचा, ते जमवायचे, अन अमुक संख्येइतक्या स्टँपवर अमुकतमुक गोष्टी फ्री मिळायच्या "हॉटेल अमिर" मधुन. Happy आम्ही तेव्हा पक्कड घेतली होती..... अलंकार थेटर समोरचे (स्टेशनजवळचे) हॉटॅल अमिर हे स्टार हॉटेल होते. ते अन ब्ल्यु डायमंड इतकी दोनच स्टार हॉटेल्स होती..... (तेव्हा कधी गेलो नाही तिथे "खायला प्यायला", आजवर एकाही स्टार हॉटेलात नाही गेलो स्वतःहून.... तिथले इंग्रजाळलेले वातावरण अन "दर" तेव्हाही "झेपत" नव्हते, आताही नाही Proud )
Submitted by limbutimbu on 27 March, 2017 - 11:40
ते अलंकार थिए टर, अमीर हॉटेल व ब्लू डायमंड हॉटेल. ची पायरी कधी चढायला मिळाली नाही. फोडून काढले असते बाबांनी. चोरून जायची हिंमत नव्हती. त्या हॉटेलांभ वती एक सिगरेट पानपट्टीचा व एसीचा वास येत असे. एसी तर अनेक वर्शे चित्रप ट गृहात गेल्यवरच अनुभवायचे. बेस्ट सॉफिस्टिकेटेड वाटायचे म्हणजे राहुल थिएटर मधून इंग्रजी सिनेमा बघून बाहेर पडताना. उगीचच येते तेव्हडे इंग्रजी बोलायचे आणि स्कर्ट ब्लाउज शिवायला टाकायचे मनोरथ रचायचे. एकदम कमाल हाइट!!! पूना कॉफी हाउस मध्ये डोसा खाल्ला की जीव आभाळात. अकरावीत वैशालीत बाहेरच्या बाजूला बसून झाडांची पानगळ पाहिली आहे का? फार मस्त अनुभव. आतून निखळ गोर्या रंगाच्या मुली जीन्स टॉप घालून बाहेर येत व मित्राच्यामागे बाईक वरून जात. हे कधी आपल्याबाबतीत होणे नाही हे लक्षात येउन वाइट वाटा यचे नाही. उल्ट बागड्त उत्कर्ष लायब्ररीतून पुस्तक घेउन यायचे आणि स्वप्नातच राहायचे.
Submitted by अमा on 27 March, 2017 - 11:49
उल्ट बागड्त उत्कर्ष लायब्ररीतून पुस्तक घेउन यायचे आणि स्वप्नातच राहायचे.>> हे किती साली? मी साधारण ८० ते ८७ काम करत होतो उत्कर्ष मधे.
Submitted by कांदापोहे on 27 March, 2017 - 11:57
हे किती साली? >> त्या आधी. ७७-७८ ७९-८० तिथे दुकानात एक गोरा घारा मुलगा होता तो कोण होता बरे? त्या जोश्यांची मुलगी नीलू पण यायची कधी कधी. काउंटर वर बसून खेळायची. ( हे दुकानात) लायब्ररी आत. गल्लीत होती.
Submitted by अमा on 27 March, 2017 - 12:00
मी दोन्हीकडे होतो दुकान व लायब्ररी. असो. तर पारीजातक भारी होते. Happy
Submitted by कांदापोहे on 27 March, 2017 - 12:02
भारीच बाई गोड दिसायच्चा तो. पण तेच कुठे बोलायची चोरी. लई बेक्कार काळ. आम्रपाली म्हणजे तर सूप्पर. सूप्पर जेवण. काय तर पनीरची भाजी आणि नान!!! इथे मात्र मी स्कर्ट ब्लाउज घालून जेवायला गेले होते.
Submitted by अमा on 27 March, 2017 - 12:22
उत्कर्ष दुकानात मधे ८९ पासून फेर्या मारल्यात! Happy
पारिजात आठवतय ( ग्रापे च्या डाऑ ना? )! काउंटर ला लावलेल्या जी आय च्या नरसाळ्यातून ओतलेल धान्य कुठे अन हे कूठे अस वाटलेल!! :ड
Submitted by इन्ना on 27 March, 2017 - 12:40
>>> काउंटर ला लावलेल्या जी आय च्या नरसाळ्यातून ओतलेल धान्य कुठे अन हे कूठे अस वाटलेल!! :ड <<<<
अर्रे.... हे नरसाळे बहुतेक सगळ्या किराणा दुकांनांमधे असायचे... हल्ली बघायलाही नाही मिळत.... कुणी कापडी पिशव्याच नाही वापरीत..... कसली आठवण काढलित..... भन्नाट...
Submitted by limbutimbu on 27 March, 2017 - 12:41
मी लहानपणी शुक्रवार पेठेत
मी लहानपणी शुक्रवार पेठेत राहायचे. हिराबाग गणपतीच्या जवळ.
आमच्या कॉलनीत रोज दुपारी २-३ वाजता एक कुल्फीवाला यायचा. त्याच्याकडे मडक्यात कुल्फी असायची. अल्युमिनियमच्या साच्यातून ती बाहेर काढायची त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस होती. आधी टोपली आणि चुंबळ खाली ठेवायची, मग लाल भडक फडक्यानी झाकलेली मडकी बाहेर काढायची. कुल्फीच्या साच्यात बाजूला ठेवलेली काडी नीट घालायची. मग आजूबाजूचे सिलिंग (ते कशाचे असायचे आता मला आठवत नाहीये) सूरीने काढायचे. मग टोपण निघायचे आणि कुल्फी मिळायची. कुल्फी खाण्यापेक्षा त्याचा तो सोहळा बघायला मला फार आवडायचे.
दुसरी आठवण म्हणजे "हॉटेलात" जेवायला जायचं म्हणून आई बाबा नेहमी सुवर्णरेखा नावाच्या डायनिंग हॉलमध्ये न्यायचे. जिथे सेम घरच्यासारखे (जरा साग्रसंगीत) जेवण मिळायचे. आता मागे वळून बघताना उगीच त्याचा रागराग केला असं वाटतं. कारण जेवण खरंच छान असायचं!
माझ्या आठवणी साधारण ८५-८९ मधल्या आहेत.
पारीजात हा बहूतेक पुण्यातील
पारीजात हा बहूतेक पुण्यातील पहिला मॉल असावा. आत्ता ग्राहक पेठ आहे त्याच्या समोर एका बोळात हा प्रशस्त मॉल होता. खाली भरपुर पार्कींगकरता जागा व अत्यंत चकाचक व पुण्यातील वाणसामानांच्या दुकांनांना लाजवेल अशा पध्दतीच्या ह्या मॉलमधे अनेक वस्तु मिळत. याच मॉलच्या आवारात लहानपणी पुत्रंजीवीच्या झाडाच्या बिया भिंगरीसारख्या वापरल्याचे आठवत आहे. याच्या आवारात चेन्डुफुलाचे पण झाड होते. (Badminton Ball Tree) ज्याचे टण्णू मस्त कडक असायचे व मारामारीला योग्य होते.
आठ्वणीतलं पुणं म्हणजे निबंध
आठ्वणीतलं पुणं म्हणजे निबंध प्रबंध च ल्याहावे लागतील
वेळ मिळेल तसं लिहेन
लक्ष्मी रोड वर एक लेले म्हणून
लक्ष्मी रोड वर एक लेले म्हणून बटाटे वडे विकायचे फिरत फिरत! फार आवडायचे ते.
खूप आठवणी आहेत लिहिन जमेल तसे
खूप आठवणी आहेत लिहिन जमेल तसे पण हा धागा पाहिल्या पाहिल्या आठवले असेल तर ते विद्यापीठासमोरचे कारंजे आणि विद्यापीठ रस्त्यावरील मोठी मोठी झाडे. आजकाल तो रस्ता पहिला की काळजात कळ येते
अप्पा बळवंत चौकात , एक काका
अप्पा बळवंत चौकात , एक काका असायचे डब्यातून चिवडा विकत. संपला की घरी जाणारे! पण म्हणून कधीही जास्त चिवडा करून आणायचे नाहीत.
सुमुक्ता , तशीच कळ फर्ग्युसन रोड वरची झाड आठवून येते!
सपे हौदाच्या चौकातल्या एका
सपे हौदाच्या चौकातल्या एका वाड्याच्या दारात एक आजोबा डोनट्स घेऊन बसायचे संध्याकाळी.
चिमण्या गणपतीच्या ओळीत भरत नाट्यच्या दिशेने जाताना डावीकडे अनुपम प्रॉडक्ट्सचं दुकान-कम-कारखाना होता. त्यांच्या गोळ्या, काजूकंद म्हणजे यासम हेच. पुढे मरीआईच्या चौकात साठे भाजीवाल्यांचे दुकान, नागनाथपारापाशी जोगळेकरांचे भाजीचे दुकान. नवा विष्णूचौकाकडे जाताना गद्रे वाड्यापाशी राजा आईसेस. मागे निंबाळकर तालमीपाशी सुजाता मस्तानी आणि (त्यांचेच) पानाचे दुकान. बरेच वर्षांनी शेजारे फडके मिठाईवाले आले.
कुमठेकर रोडला सुजाता हॉटेल होतं.
विद्यापीठासमोरचे कारंजे आणि
विद्यापीठासमोरचे कारंजे आणि विद्यापीठ रस्त्यावरील मोठी मोठी झाडे.>>>>>
माझा तर सध्या हा रोजचा जायचा यायचा रस्ता....
आधी किती सुंदर होता. आता अगदी भकास वाटतो. त्यात गेल्या महिन्यापासून तिथे दोन लेनचे नूतनीकरण चालू आहे
सुमुक्ता , तशीच कळ फर्ग्युसन
सुमुक्ता , तशीच कळ फर्ग्युसन रोड वरची झाड आठवून येते! >> अगदी अगदी
आधी किती सुंदर होता. आता अगदी भकास वाटतो.>> अगदी दहा-पंधरा वर्षातच एवढ्या वेगाने बदल झाला
>>>सपे हौदाच्या चौकातल्या एका
>>>सपे हौदाच्या चौकातल्या एका वाड्याच्या दारात एक आजोबा डोनट्स घेऊन बसायचे संध्याकाळी.

कारंजे मलापण आठवते! त्याला मी "कारंजाजा" म्हणायचे.
>>> तर ते विद्यापीठासमोरचे
>>> तर ते विद्यापीठासमोरचे कारंजे आणि विद्यापीठ रस्त्यावरील मोठी मोठी झाडे. <<<
आईग्ग, किती विसरायला होतय.
अहो अलका टॉकिज चौकातही एक सुंदर पुतळा होता ना ?
तेव्हा लक्ष्मीरोडला अन बाजुच्या कुमठेकर रोडला आताच्या नेमका उलटा वनवे होता. बाजीरावरोडला वनवे नव्हता.
<<<< कुमठेकर रोडला सुजाता
<<<< कुमठेकर रोडला सुजाता हॉटेल होतं.>>> हो.....
पण तेथे सुजाता हॉटेल व्हायच्या आधी तिथे एक छानसे मंगल कार्यालय होते, नाव आठवत नाही आत्ता, पण आमच्या मुंजि तिथेच झाल्या ते स्पष्टपणे आठवते आहे. मुंजीची आमंत्रण पत्रिका सापडली, तर बघतो त्या मंगलकार्यालयाचे नाव काय होते ते.
तेव्हा लक्ष्मीरोडला अन
तेव्हा लक्ष्मीरोडला अन बाजुच्या कुमठेकर रोडला आताच्या नेमका उलटा वनवे होता. बाजीरावरोडला वनवे नव्हता.>> लकडी पुलावरून दुचाक्या जायच्या. दुचाकीना बंद झाला तेव्हा उगाच शेवटच्या चार फेर्या मारलेल्या पण आठवत्य!
भांडारकर , प्रभात, अन लॉ कॉलेज रस्ते तेव्हा प्रश्स्त भासायचे ( आपला आकार लहान होता म्हणा)
लकडी पुलावरून दुचाक्या
लकडी पुलावरून दुचाक्या जायच्या. दुचाकीना बंद झाला तेव्हा उगाच शेवटच्या चार फेर्या मारलेल्या पण आठवत्य!>> मी अनेकदा ९ नंतर दुचाकी चालवता येते केवळ या कारणाकरता दुचाकीने या पुलावरुन जातो.
माझा एरिआ म्हणजे ७४६ डेक्कन
माझा एरिआ म्हणजे ७४६ डेक्कन जिमखाना पुणे चार.
माझा एरिआ म्हणजे ७४६ डेक्कन
माझा एरिआ म्हणजे ७४६ डेक्कन जिमखाना पुणे चार.
पुणे विद्यापीठाबाहेरचे कारंजे
पुणे विद्यापीठाबाहेरचे कारंजे!! आहा!!
तर आत्ता जो सिंहगड रोड आहे तो अतिचशय अरुंद होता. रस्त्याच्या दुरर्फा वडाची झाडे असल्याने वडगाव हे नाव अत्यंत साजेसे नाव होते. गंमत म्हणजे त्या काळी बनेश्वर वा विट्ठलवाडी ही सहलीची ठिकाणे होती.
माझा एरिआ म्हणजे ७४६ डेक्कन
पोस्ट होत नाही आहे कुछ तो गडबड है दया.
आमच्या जन्माच्याही आधी,
आमच्या जन्माच्याही आधी, पुण्यात काही सुंदर पुतळे उभे केले गेले, त्यातिल एक होता अलका टॉकिज चौकात, तो नंतर पेशवेपार्क मधे हलवला.
इतर ठिकाणातील उल्लेखनिय पुतळा म्हणजे रास्तापेठ वीज केंद्राच्या चौकातला मासेवालीचा. अत्यंत देखणा पुतळा.
कोर्टाकडुन संगमब्रीज-जुन्या बाजाराकडे जाताना "टू बी ऑर नॉट टू बी" अशा काहीतरी विचारात असलेला पांढरा पुतळा, ज्यास "कामगार पुतळा " म्हणून का ओळखले जाऊ लागले माहित नाही.
शनिवारवाड्यासमोरील पुलावर जाताना काकासाहेब गाडगीळांचा पुतळा नव्हताच , तो नंतर आला. पहिल्या बाजीराव पेशव्यांचा पुतळादेखिल नंतर आला, अन शनिवारवाड्याला कुंपणाची भिंत घालुन लांबुन दिस्णारी शनिवारवाड्याची भव्यता मोडीत काढणारे तत्कालिन पीएमसी नगरसेवक धन्यच म्हणायला हवेत.
कुंभारवेस ते कोर्ट/अन्न महामंडळ गोडाऊन यांना जोडणारा (शिंदे? ) पुल तेव्हा अस्तित्वातच नव्हता.
बहुधा १९६७ किंवा १९६९ साल असेल , तेव्हा सध्याच्या पीएमसी बिल्डीम्ग समोरील नदीकडेच्या जागेत फटाक्यांचे स्टॉल्स लागायचे. तर त्या साली त्यांना आग लागली होती, ती आमच्या शुक्रवारपेठेतील बिल्डींगमधुनही आगीच्या उजेडामुळे दिसत होती असे पुसटसे आठवते. नंतर काही वर्षांनी फटाक्यांचे स्टॉल्स सारसबागेशेजारच्या स्काऊट ग्राऊंडवर उभारले जाऊ लागले.
ती आग १९७०=७१ साली लागली असेल
ती आग १९७०=७१ साली लागली असेल बहुतेक. लै डेंजर होती.
माझ्या आठवणीतल्या पुण्यात
माझ्या आठवणीतल्या पुण्यात (१९७०) कर्वे रोड नळ स्टॉपला संपायचा. कोथरूड, औंध, विट्ठलवाडी ही दूरची गाव होती. येरवडा फक्त एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होतं. सातारा रोड वर जकात नाक भापकर पेट्रोल पंपा जवळ होत व त्याच्या पुढे दुतर्फा शेती होती. पिंपरीला पेनिसिलीन फॅक्टरी होती. लॉ कॉलेज खूप शांततामय परिसर होता. पुणे , पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी व्हायची होती. लकडी पूल, नवा पूल आणि होळकर ब्रिज असे तीनच पूल होते.
राहूल बरोबर नटराज (हिंदविजय) चाही तितकाच रूबाब होता. जंगली महाराज रोड टू वे होता. मिनर्व्हा, आर्यन टॉकिज जोरात होत्या.
चितळे, किर्ती, गाडगीळ आत्ता आहेत तसेच होते.
अपूर्ण.
मुकंद नगरला , कॅनॉल मधे
मुकंद नगरला , कॅनॉल मधे गणपती विसर्जनाला जायचो आम्ही. तेव्हा तिथे किर्लोस्कर प्रेस होती. आता तिथे एक मॉल अन एक अपर्टमेंट कॉम्प्लेक्स आहे.
मी शाळेत असताना , मार्केट यार्डाचा मागचा भाग डेव्हलप होउ घातला होता. प्लॉट घेउन एक लहानस घर बांधल होतं तेव्हा. मागच्या डोंगरावर पारश्यांची विहिर होती. अन बर्याचदा पक्षी हाड घेउन यायचे. पारशी लोकांची भूतं होत नाहीत अस काहीस समजावल्यामुळे भिती वाटायची नाही . ( आता आठवून गम्मत वाटतेय)
त्या भागात तेव्हा बस सेवा नव्हती अन जवळचा बस स्टॉप म्हणून महर्षी नगरला एक मैदान पार करून जाव लागायच . शनिवारी तिथे गुरांचा बाजार भरायचा. मार्केटयार्डला पूर्वीच पासपोर्ट ऑफिस होतं . अन त्यामागे हे मैदान.
हे घराचे लोकेशनच फार भन्नाट
हे घराचे लोकेशनच फार भन्नाट होते. भागवत बिल्डिंग तिसरा मजला. अजूनहि आहे इमारत पण बरीच पड्झड झाली आहे. रिडेव्हलपमेंट वगैरे काही केलेली दिसत नाही अजून अगदी मोक्याची जागा. लकडी पूल संपतो तिथे मशीद व थोडे पुढे आले की पांचाळेश्वराचे देउळ आहे. देवळाकडे जायच्या कडेला सायकल रिपेअर गॅस बत्ती रिपेअर शॉप. व इतर काही सटर फटर वस्तू पान इत्यादि विकणारे दुकान. इथे एक मध्यमवयीन बाई बसलेली असे. काळा सुरकुतलेला चेहरा व पांढर्यावर डिझाईनच्या प्रिंटेड साड्या. कथलाचे दागिने. हा लुक लिहीला अश्यासाठी की घरातले कोणी असे कपडे करत नसत. दुकाने संपली की पायर्या उतरत उतरत मंदिरात जायचे. अजून खाली पायर्या उतरल्याकी नदीच. पण तितके खाली फक्त गणपती विसर्जन करायला जाउ तेव्हाच. पावसाळ्यात ह्या सर्व पायर्या पाण्याखाली जात.
आता सध्या जे मैदान व जाहिरातीच्या बोर्ड साठीचे अजस्त्र सिमेंटचे क्यूब्ज व खांब तिथे नव्हते.
तेव्हाची गोष्ट. तिथे साधे
तेव्हाची गोष्ट. तिथे साधे मैदान होते. व काही झाडे. बरेच वाइल्ड लाइफ होते. मग एक दिवस लॉरी भर भरून फरश्या, वाळू माती आली. लाल फरश्या बसल्या व नवे लोखंडी रेलिंग आले. शंकराच्या देवळाचे ही काही प्रमाणात नूतनी करण केले गेले. पण पूर्वी कळस अगदी जुना होता. त्यात मॅचिंग सिमेंटचे काम केले गेले. देव्ळाच्या मागे एक प्रचंड मोठे झाड व त्याच्या पारावर शनी/ हनुमाना चे देउळ होते. आजुबाजूला कोरां टी, घाणेरी, गुलबक्षी ची झा डे होती. हे सर्व नदीच्या बाजूने मोकळेच होते.
म्हणजे तुम्ही जर साहसी असाल
म्हणजे तुम्ही जर साहसी असाल तर मागे उतरून जाउन मग पुढे गरवारे शाळेच्या समोर निघता येइ. व भागवत इमारतीची एक बाजू दिसे. ही इमारत १९६२ च्या पुरातूनही वाचली होती. देवळाला कमान केली होती पण पुढे एका पुरात ती निखळून पडली. तेवढे वर पाणी आले होते. शंकराची पिंडी पाण्यात बुडली होती दोन दिवस. अश्यावेळी नदीतून अतिशय जोरात कचरा, पाने फुले, साप पाण कोंबड्या वाहात जात. देवळात वाहिलेले दूध, फुले व निर्माल्य, पाणी उदबत्त्या ह्यांचा एक साचलेला वास असे.
शिवरात्रीला देउळ पताका लावुन सुशोभित करत व लायटिंग वाले आदल्या दिवशी कळसा पर्यंत चढून सेटिंग करून जात. हे आम्ही घरातून बघत बसू. दुसृया दिवशी शिवरात्रीला अगदी सकाळ् पासून चौघडा चालू होई व लायनीने लोक दर्शन घेत.
मंदिराच्या पायर्यांच्या मध्य भागी एक झोपडी वजा घर होते. तिथे निलिमा नावाची मुलगी तिचा बारका भाउ बहुतेक वडील व आजी राहात. ह्यांचा नक्की काय किस्सा होता कधी कळले नाही. माझ्या अभ्यासाच्या जागेवरून हे घर मी बघत बसे. " लिल्मा लिल्मा म्हणून आजी तिला हाक मारत असे." मागे मशीद. ही देखील आता आहे तेव्ढी मोठी नव्हती. काही चटया सिमेंटच्या कोब्याव र पसरलेल्या व घड्याळाचे चित्र असे. हे नमाजाचे टायमिंग असे हे नंतर कळले. शांत जागा होती. आता आहे ती लागून असलेली बिल्डिंग व मोठे जाहिरातीचे बोर्ड तेव्हा नव्हते त्यामुळे लक्ष्मी रोडच्या सुरवाती पासून ते अल्का टॉकीज लक्ष्मी रोडच्या अलि कडचा रोड जवळ जवळ अर्धा दिसे. नवीन मराठी शाळेची बस त्या तिथून येताना दिसली की आम्ही तीन जिने उतरून खाली वाट बघत. अशी व्यवस्था होती.
मला पारिजात आठवत नाही किंवा
मला पारिजात आठवत नाही किंवा मी फारच लहान असेन मग
ग्रापेच्या समोरचा बोळ म्हणजे नक्की कुठे? विजयानगर कॉलनीकडे जाणारा मोठा रस्ता तो?
"पारिजात" ला " डिपार्टमेन्टल
"पारिजात" ला " डिपार्टमेन्टल स्टोअर" म्हणत असत.
कुमठेकर रस्त्यावरील सुजाता चे मालक कोणी गोडसे होते , बाल्गन्धर्व मागील "कॅफेटेरिआ" त्यान्चेच होते.
ग्राहक पेठेच्या जागी "जीवन " नावाचे हॉटेल होते असे वटते.
पेशवे उद्यानाचे दरवाजे २४ X ७ उघडे असायचे. तिथले सुमित्रा आणि अनारकली हे हत्ती आणि पूर्णपात्र्यान्ची सोनाली हे सार्या पुण्याची आवडती होती. फुलराणी हे "आकर्षण" होते. आम्ही अगदी पर्वतीच्या पायथ्याशी रहायचो त्यामुळे सिहा ची डरकाळी दिवसातून ३ - ४ वेळा अॅकू यायची. आमचा जाण्या येण्याचा रस्ता पेशवे उद्यानातूनच असायचा.
.पर्वतीवर रोज पहाटे चौघडा वाजायचा आणी भोपे सर मन्दिरात रोज गायन करायचे.
पर्वतीचा फ्लाय ओवर बान्धतानाच पडला होता.
नटराज (हिंदविजय) चाही तितकाच
नटराज (हिंदविजय) चाही तितकाच रूबाब होता>> नटराज बंद करुन खरच कोणी मुर्खपणा केला देव जाणे. काय मस्त टॉकीज होते ते. बच्चनचे चित्रपट तिथे बघण्यात जो काही आनंद होता.
स्टेशनजवळील अलंकार टॉकीज मॉर्नींग शो करता फेमस.
हो, पेशवे पार्कमधे तेव्हा
हो, पेशवे पार्कमधे तेव्हा उंटावरून आणि हत्तीवरून हिंडवून आणायचे.
जादूगार रघुवीरांच्या घरासमोर मोठ्ठाच्या मोठ्ठा उकिरडा होता. काही काळाने तिथे राणाप्रताप उद्यान झाले. मनपा असं काही चांगलं करू शकते बघून आश्चर्य वाटले होते
लिमयेवाडीत एक खूप सुरेख जुने शंकराचे देऊळ होते. तिथे बसायला खूप छान वाटायचे. मध्यंतरी बघितलं तर एकदम नव्याने बांधून काढले आहे. सगळा चार्म गेलाय त्याचा. ती गल्ली संध्याकाळनंतर खूप सुनसान आणि अंधारी असायची. त्यामुळे मंडळातून परतताना आम्ही सिधये तालमीकडूनच यायचो. तेव्हा सिलाई हे कोपर्यावरचे जुनाट मळकट कधीच फारशी गर्दी नसलेले असे एक नगण्य दुकान होते. ते अचानक इतके मोठे झाले ते पाहून जाम आश्चर्य वाटले होते (अजूनही वाटते).
रेणुका स्वरूपमधे सवाई व्हायचा त्यामुळे मध्यरात्रीनंतर बराचसा ऐकू यायचा घरी.
Pages