श्री वेतोबा मंदिर - आरवली

Submitted by माधवा on 14 March, 2017 - 07:31

प्रचि ०१
vetoba1.JPG
प्रचि ०२
vetoba2.JPG
प्रचि ०३
vetoba3.JPG
प्रचि ०४
vetoba4.JPG
प्रचि ०५
vetoba05.JPG
प्रचि ०६
vetoba5.JPG
प्रचि ०७
vetoba6.jpg
प्रचि ०८
vetoba7.JPG
प्रचि ०९
vetoba8.JPG
प्रचि १०
vetoba9.JPG
प्रचि ११
vetoba10.JPG
प्रचि १२
vetoba11.JPG
प्रचि १३
vetoba12.JPG
प्रचि १४
vetoba13.JPG
प्रचि १५
vetoba14.JPG

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान फोटो.
या फोटोंबरोबर या मंदिराची थोडक्यात माहीती, तिथे जायचे कसे हे देखिल लिहिले असतेत तर बरे झाले असते.

दिनेश... मला सुद्धा मंदिरामधील फोटो काढण्यास मनाई केली होती पण मंदिराच्या ट्रस्टी यांना भेटून त्यांना विनंती केल्यावर त्यांनी मला परवानगी दिली.

मस्त फोटो.
आरवली आमच्या गावच्या जवळच आहे. मी गेलेलो नाही,. किंवा अगदी लहानपणी गेलो असेन, आठवत नाही.
पण वेतोबाला जोडे वाहतात आणि रात्री तो गावात फिरत असतो, तेव्हा त्याच्या जोड्यांचा कर्र कर्र आवाज येतो, असं सांगतात.

हे असे मोठे सभामंडप ही तिकडच्या देवळांची खासियत वाटते. माझ्या लक्षात राहिलेल्या अनेक देवळांचे सभामंडप असेच होते.

माधवा, मस्त फोटो रे Happy

हि माहिती (माझ्याच आधीच्या धाग्यावरून Happy )
वेंगुर्ल्यापासुन साधारण १५ कि.मी. अंतरावर रेडीकडे जाताना आरवली हे गाव लागते. विजयनगरच्या हिंदू साम्राज्यात "हरवल्ली" नावाने अस्तित्वात असलेल्या गावाचे नाव कालौघात बदलून "आरवली" झाले. "हर" म्हणजे "शिव" आणि "वल्ली" म्हणजे "वस्ती". हरवल्ली म्हणजे जेथे शिवाची वस्ती आहे असा गाव. आरवलीचे श्री देव वेतोबा मंदिर मूलतः वेताळाचे आहे. "बा" हा आदरार्थी शब्द जोडला गेल्याने "वेताळाचे" वेतोबा झाले असावे. "वेताने वेळेवर मन ताळ्यावर आणणारी शक्ती म्हणजे वेताळ!" दक्षिण कोकणात वेताळ उर्फ वेतोबाची सुमारे १४३ मंदिरे आहेत.

मंदिरात प्रवेश करताच सुमारे सात फूट उंचीच्या श्री वेतोबाचे भव्य दर्शन घडते. एव्हढी मोठी मूर्ती क्वचितच पहावयास मिळते. श्री वेतोबाची मूर्ती पूर्वी फणशी लाकडाची होती. त्यामुळे या गावात बांधकामात व इतर व्यवहारात फणसाचे लाकूड वापरत नाही. कालांतराने १९९६ मध्ये भक्तांच्या साह्याने मूर्ती पंचधातूची करण्यात आली. श्री वेतोबाच्या हातात साडेतीन फूट लांबीची तलवार आहे. गावची ती रक्षक देवताच आहे. विशेष म्हणजे या देवास नवस म्हणून केळीचे घड आणि चपला वाहण्याची प्रथा आहे. सभामंडपात अशा मोठ्या आकाराच्या चामड्याच्या चपलांचा ढिगच पाहावयास मिळतो. गावात फिरण्यासाठी त्या देवाला वाहिलेल्या असतात. देवासमोर केवळ नवस म्हणून ठेवलेल्या चपलांचे तळ दुसर्‍या दिवशी झिजलेले आढळतात. श्री वेतोबाची यात्रा वर्षातून दोनदा कार्तिक वद्य पौर्णिमा आणि मार्गशिर्ष शुद्ध तृतीया या दिवशी भरते.

छान फोटो.
थोडी माहिती दिली असती तर अजून मजा आली असती...

अरे वा, परवानगी दिली ते छानच.
गोव्याला डिचोली ( बिचोलीम) गावात एक आजोबा देवस्थान आहे. तिथली मूर्ती पण अशीच आहे, पण आकाराने खुप मोठी आहे.
कदाचित हे कुणी रक्षणकर्ते गावकरीच असावे, पुढे त्यांना देवत्व प्राप्त झाले असावे.