समारोप

Submitted by संयोजक on 13 March, 2017 - 11:31

मंडळी,

यंदाच्या मराठी भाषा दिनाचा समारोप करत आहोत. प्रत्येक उपक्रम हा मायबोलीकरिता एक वसा असतो. ते व्रत यथासांग पार पडावे यासाठी थोडासा हातभार लावतात ते संयोजक. पण व्रत खर्‍या अर्थाने पार पाडतात ते मायबोलीचे अॅडमिन आणि अर्थात प्रत्येक मायबोलीकर.

यंदाच्या उपक्रमाला आमच्या अपेक्षेइतका प्रतिसाद मिळाला नाही. हल्लीच्या युगात विक्रीतंत्र खूप महत्वाचे आहे. आमच्या कल्पना तुमच्यापर्यंत नीट पोहोचवण्यात आणि तुमचा पाठपुरावा करण्यात कदाचित आम्हीच कमी पडलो. मात्र सगळ्या खेळांना मिळालेला भरघोस प्रतिसाद बघून आम्हाला पुरेपूर मजा आली .

सुंदर सादरीकरणाबद्दल सगळ्या छोट्या दोस्तांचे आणि त्यांचा पालकांचे खूप कौतुक.

संयोजक, मराठी भाषा दिन २०१७

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

संयोजक, खेळ तर आवडलेच, इतर उपक्रमही चांगलेच होते.
उर्ध्वश्रेणीनंतर मायबोली अद्याप पूर्ण स्विंग मध्ये यायची आहे, त्यामुळे कार्यक्रमात सहभाग कमी असावा.
उपक्रमांबद्दल आपले धन्यवाद.

उर्ध्वश्रेणीनंतर मायबोली अद्याप पूर्ण स्विंग मध्ये यायची आहे, त्यामुळे कार्यक्रमात सहभाग कमी असावा.
उपक्रमांबद्दल आपले धन्यवाद.
+१