बृहन महाराष्ट्र मंडळाशी संबंधीत माध्यम प्रायोजक उपक्रमासाठी स्वयंसेवक हवेत

Submitted by webmaster on 8 March, 2017 - 22:03

जुलै २०१७ मध्ये ग्रँड रॅपीडस येथे भरणार्‍या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी माध्यम प्रायोजक म्हणून आपली निवड झाली आहे. . त्यासाठी काही स्वयंसेवकाची आवश्यकता आहे.
अधिवेशनाला येणार्‍या मान्यवरांच्या तसेच नाटक चित्रपटाशी संबंधित तंत्रज्ञ व कलाकारांच्या (प्रत्यक्ष भेटून अथवा फोनवरून) मुलाखती घेणे, मुलाखतींचं शब्दांकन करणे, स्पर्धा / खेळ आयोजित करणे, घोषणा लिहिणे अशी कामं माध्यम प्रायोजक करतात. माध्यम प्रायोजक ग्रुपात सहभागी होण्यासाठी तुम्ही भारतातच असला पाहिजेत, अशी अट नाही.
माध्यम प्रायोजक ग्रुपात सहभागी होण्याची इच्छा असल्यास कृपया इथे आपली नावं नोंदवा. चित्रपटासाठी आपण वेगळा ग्रूप तयार करतो. तसंच बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठीच्या कामासाठीही वेगळा ग्रूप असेल. त्यामुळे आवश्यकतेनुसार तुमच्याशी संपर्क साधला जाईल.

या अगोदरचे उपक्रम इथे पाहता येईल त्यावरून कामाचं स्वरूप लक्षात येईल.
http://www.maayboli.com/bmm2013
http://www.maayboli.com/bmm2015

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users