भाषा आणि त्या प्रदेशाची संस्कृती यांचे घट्ट नाते असते. ते नाते ठळकपणे दाखवतात त्या भाषेतल्या म्हणी आणि वाक्प्रचार. हे शब्दसमुह आपल्याला शहाणपणाच्या गोष्टी सांगतात आणि त्या सांगताना त्या प्रदेशातील अनेक संदर्भ त्यात येत असतात. तर आपल्याला खेळ खेळायचाय या म्हणींचा.
आम्ही तुम्हाला इंग्रजी म्हणी देऊ आणि तुम्ही त्याचे मराठी रुपांतर करायचे आहे. लक्षात ठेवा रुपांतर ! भाषांतर नव्हे ! सगळे शब्द आणि संदर्भ अस्सल मराठमोळे असायला हवेत.
एका वेळी एका संचात ५ म्हणी दिल्या जातील. तुम्हाला तुमच्या प्रतिसादात त्या म्हणींचे रूपांतर लिहायचे आहे. जमल्यास सर्व पाचही म्हणींचे रुपांतर एका प्रतिसादात सुद्धा तुम्ही लिहू शकता.
तुमचे रुपांतर चटपटीत शब्दांत असायला हवे - अगदी म्हणींसारखे.
उदा. A penny saved is a penny earned
दमडी वाचली कमाई झाली.
१ मार्च संच १ -
१. Let bygones be bygones.
२. It's better to light a candle than curse the darkness.
३. If the mountain will not come to Muhammad, then Muhammad must go to the mountain.
४. A bird in the hand is worth two in the bush.
५. Early to bed and early to rise makes a man healthy, wealthy and wise.
५. लवकर निजे, लवकर उठे, तया
५. लवकर निजे, लवकर उठे, तया आरोग्य, ज्ञान, संपत्ती भेटे
१. झाले गेले विसरूनी जावे,
१. झाले गेले विसरूनी जावे, पुढे पुढे चालावे.
It's better to light a candle
It's better to light a candle than curse the darkness
नशिबाला दोष देण्यापेक्षा कर्तुत्त्व करून दाखवावे.
३. If the mountain will not
३. If the mountain will not come to Muhammad, then Muhammad must go to the mountain
वणवा आपल्याकडे येण्यापेक्षा आपणच वणव्याकडे जाऊया.
@संयोजक
@संयोजक
चौथी म्हण झालेली आहे (२७ फेब संच ३)
रातच्याला लवकर निजावं
रातच्याला लवकर निजावं
रामपारी लवकर उठावं
शक्ती बुद्धी अन् धनाचं
घबाड आपसूक मिळवावं
It's better to light a candle
It's better to light a candle than curse the darkness
नका घालू अंधाराला शिव्या
बिगी बिगी मशाल पेटवा
If the mountain will not come to Muhammad, then Muhammad must go to the mountain
रायगड येइना शिवबाकडं
तर घोडे दौडले गडाकडं
Early to bed and early to
Early to bed and early to rise makes a man healthy, wealthy and wise
पाखरांबरोबर झोपा अन पाखराम्बरोबरच उठा
नाही आरोग्य, धन आणि ज्ञानाला तोटा.
धन्यवाद कारवी, म्हण बदलून
धन्यवाद कारवी, म्हण बदलून दिली आहे.
४.. हातचं एक जपावं पळत्याच्या
४.. हातचं एक जपावं पळत्याच्या पाठी का लागावं?
१. Let bygones be bygones.
१. Let bygones be bygones.
जे झाले ते झाले
२. It's better to light a candle than curse the darkness.
दु:ख कुरवाळण्यापेक्षा सुखाचा शोध घ्यावा.
३. If the mountain will not come to Muhammad, then Muhammad must go to the mountain.
४. A bird in the hand is worth two in the bush.
हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागू नये.
५. Early to bed and early to rise makes a man healthy, wealthy and wise.
लवकर निजे लवकर उठे, तया सदैव आरोग्य लाभे
It's better to light a candle
It's better to light a candle than curse the darkness.
मेणबत्तीचा उजेड सोडवेल गुंता, कशाला हवी अंधाराची चिंता.
१ मार्च संच १ -
१ मार्च संच १ -
१. Let bygones be bygones.
जितके कुरवाळाल, तितके भळभळेल
चावरं कुत्रं, कवटाळण्यात काय हशील
फाडलं तर चिंध्या, सांधलं तर गोधडी
छाटणीच्या घावा, कोंबाचा परतावा
२. It's better to light a candle than curse the darkness.
अंधाराच्या वाराला, दिवलीची ढाल
तिमिरासी बोल, कासया लावावा, दिवा तेववावा, सुधीरत्वे
मिणमिणती ज्योत, हिंमतीने तेवली, काजळ रातीला, पुरून उरली
३. If the mountain will not come to Muhammad, then Muhammad must go to the mountain.
'मनासारखं' विसरा, होण्यासारखं करा
विहिणबाई रूसून बसली, साखरेच्या पायघडीवरून मांडवात आणली
मनाविपरीत घडलं ते यत्नांनी सुधारलं
४. A bird in the hand is worth two in the bush.
दाण्यांची ओंजळ अपुरी भासली, अजून हवे म्हणताना झोळीच फाटली
कितीजरी भावलं, मिळेलसं वाटलं, फांदीवरचं पाखरू, नसतं बरं आपलं
सांडून ओंजळ, चित्ती धरी मृगजळ, ऐसियाचि तळमळ, कैसी शमे
५. Early to bed and early to rise makes a man healthy, wealthy and wise.
शिस्तीचं वागणं नि मरातबाचं लेणं
रीतीची धरी कास, लाभे समृद्धीचा वास
उजाडता कार्यमग्न, रात्र होता निद्राधीन, त्याचे अक्षय्य निधान