Submitted by रेणु on 11 February, 2017 - 22:52
हाय,
बरीच भटकंती वाचली पण मला हवी असलेली माहीती मिळाली नाही, म्हणुन हा नवा धागा.
आम्ही दोघे व अजुन ४ सिनीअर सिटीझन्स मिळुन वैष्णोदेवी दर्शनाचा प्लान करत आहोत. एप्रिल मधे पहिल्या आठवड्यात जाणार आहोत. राहण्याची काही बुकिंग्स श्राईन बोर्ड च्या साईट वर केली, पण २ दिवस पटनी टॉप ला ही रहाण्याचा विचार आहे. ऑनलाईन बुकिग्स साठी हॉटेल च्या साईटस पाहिल्या, पण मागे एक्दा काल्का च्या हॉटेल चा अनुभव भयंकर आहे, साईट वर वेगळे आणि प्रत्यक्षात वेगळे असला प्रकार होता, ३ स्टार असुनही. त्यामुळे लगेच बुकिंग करायला धजावत नाहीये.
कोणाच्या माहीतीत एखदे चांगले हॉटेल आहे का?
जे & के टुरिझम वरुन रिसॉर्ट बुक केले तर चांगले असेल का?
४ सिनीअर सिटीझन्स बरोबर असल्याने जरा जास्त काळजी वाटतेय.
सो, प्लीज काही माहीती असल्यास कळवा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा