अंतर्मनाची शक्ती (intuition) की बोला फुलाला गाठ - देव जाणे

Submitted by वृंदा on 8 February, 2017 - 16:15

अंतर्मनाची शक्ती (intuition) की बोला फुलाला गाठ - देव जाणे

असं म्हणतात की सगळ्यांना अंतर्मनाची शक्ती असते फक्त अनेकांना माहित असते किंवा माहित असले तरी वापरता येत नाही.
अनेकांना पुढे काय घडेल ह्याचा अंदाज येतो (logical thinking )किंवा उत्स्फूर्त (intuition )पणे सुद्धा कळते.

मला सुद्धा अंतर्मनाची शक्ती आपल्यात आहे हा शोध आत्ता म्हणजे २-३ वर्षांपासून लागला आहे किंवा तो माझा भ्रम पण असेन . पण काहीतरी आहे हे नक्की .. माझे लॉजिकल थिंकिंग माध्यम आहे म्हणजे त्या पलीकडे असे नक्कीच आहे . मी माझे अनुभव सहज म्हणून शेअर करतेय .

१. २०१४ ची गोष्ट नुकताच व्हाट्स अँप वापरायला सुरू केलेले . तेव्हाचा हा अनुभव . त्या वर्षी अनेकदा लोक शेतकऱ्यांच्या आत्महत्या बद्दल लेख ग्रुप वर पाठवायचे ते पाहून मला खूप अस्वस्थ आणि वाईट वाटायचं जे सगळ्यांनाच वाटते . एकदा मात्र न राहवून एका अशाच ग्रुप ला म्हणाले "आपण काहीतरी करू या " असे वाटत होते की फंडस् गोळा करून (like help age India ) त्यांना पैसे पाठवू या पण कोणी म्हणजे कोणीच प्रतिसाद दिला नाही मग मी पण व विषय सोडून दिला पण आईला म्हणाले " आई , कोणीतरी मोठे माणूस किंवा प्रसिद्ध लोकांनी पुढाकार घेऊन त्या लोकांना मदत केली तर बरं होईन त्यांचे लोक पण ऐकतील ( कारण माझे कोणी ऐकले नाही) " खूप तळमळीने म्हणाले आणि काय आश्चर्य पुढच्याच वर्षी सप्टेंबर २०१५ ला नाना पाटेकर आणि मकरंद अनारसपुरे ह्यांनी "नाम " म्हणून संस्था स्थापन केली आणि हो माझा खूप आवडता नट म्हणजे अक्षयकुमार ने सुद्धा आत्महत्याग्रस्त लोकांना मदत केली !!
मला तर खूप खूप आनंद झाला माझं खरे ठरले त्यापेक्षा काहीतरी चांगली सुरुवात झाली त्याचा !!

२. २००२ ची गोस्ट तेव्हा नुकतंच टीव्ही केबल घेतलेलं तेव्हा "सुरताल" म्हणून गाण्यांचा प्रोग्रॅम लागायचा झी मराठी वर .. तेव्हा एक ६-७ वर्षांची चिमुरडी एका छोट्या स्टुलावर बसून गाणे गायची ..आवाज तर खूप चॅन होता पण त्यापेक्षा ती खूप गोड आणि सुंदर दिसायची मी तेव्हा एकदा म्हणाले " हि मुलगी पुढे हिरोईन होणार बघ " आणि तसंच खरं ठरलं ती म्हणजे "टाइमपास " पिक्चर ची हेरॉईन केतकी माटेगांवकर !!!
अगदी तसंच २००९ ला "लिटल चॅम्प सारेगमपा " ला जेव्हा मी आर्या आंबेगावक ला पहिला तेव्हा ती नववीत आणि सगळ्यात मोठी कॉन्टेस्टंट होती . मी म्हणाले हि छान आहे दिसायला फक्त दात ठीक केले कि छान दिसेन आणि तसं आणि तसाच घडले . आर्या ने हेरॉईन म्हणून सुरुवात "ती सध्या काय करते " मधून केली !!!

३. मला थोडीफार पत्रिका कळते माझ्या एका मैत्रिणी ची सहजचं पत्रिका पहिली ( मी ज्योतिषी नाही आणि चुकून पण होणार नाही ... कारण नंतर सांगेन ) तर तिच्या पत्रिकेत "प्रेम विवाहाचे " योग होते आणि तिचे पण एका मुलावर प्रेम होते पण घरचे जात वेगळी म्हणून विरोध करत होते म्हणून त्याच्याशी लग्न होईल का म्हणून विचारात होती .. मी म्हणाले "काळजी करू नकोस .. घरचे कितीही विरोधात असले आणि अरेंज मॅरेज साठी कितीही प्रयत्न केले ..मुले पाहिलीस तरी तुझे लव्ह मॅरेज च होणार " तसंच खरं झालं त्या मुलाशी लग्न झालं पण माझ्यामनात ते लग्न यशस्वी होणं नाही असं मन सांगत होतं आणि झालंही तसंच खूप वर्षांनी कळले तीच त्या मुलाशी डिवोर्स झाला आणि लगेच तिचे दुसरे लग्न ठरले आणि मजा म्हणजे त्या मुलाने मागणी घातली आणि तिला हि आवडत होताच म्हणजे दुसरेही लव्ह मॅरेज !!

साल २००७ ची गोस्ट असेन अजून एक मैत्रिणीची पत्रिका पाहिली पण सगळीकडे डिव्होर्स चे योग होते पण मी तसं तिला सांगितलं नाही नंतर कळलं कि तिचे वैवाहिक लाइफ चांगले नव्हते आणि लवकरच डिव्होर्स घेणार आहेत आणि तो झालाही .. मला त्याचे खूप मनापासून वाईट वाटले !!!

४. साल २०१४ असेच एका मैत्रिणीची पत्रिका बघून सांगीतल की तु आणि तुझा नवरा नक्कीच abroad ला जातील आणि लगेच २-३ महिन्यात गेली पण !!( आजकाल १० पैकी ८ जातात ..त्यामुळे हा फक्त योगायोग होता ) मला खरंतर बघून नाही कळत पण सगळे उत्स्फूर्त पणे बोलून गेले !!

५.साधारण एप्रिल २०१४ ची गोस्ट असेन मी जवळच्या ' खंडोबा ' मंदिर ला आई बरोबर गेले . तेव्हा मी आई ला खंडोबा चा इतिहास विचारत होते
पण ती म्हणाली फारशी माहिती नाही तेव्हा मी म्हणाले ' खंडोबाची ' माहिती कुठून मिळाली तर बरे होईन किंवा ह्यावर कुठली सिरीयल यायला हवी आणि काय आश्चर्य लगेच म्हणजे मे २०१४ पासून "जय मल्हार " नावाची सिरीयल सुरु झाली !!

अनेकदा मी जे बोलते तसंच नंतर घडते किंवा तशी बातमी कानावर येते.

मजा म्हणजे मी जे काही खात असेन म्हणजे भेळ , एकादी भाजी किंवा काही खाण्याचं विचा येत असेन तसंच थोड्यावेळाने t.v सिरीयल मध्ये दिसते . मला ह्याची मात्र खूप गम्मत वाटते.

असे अनेक आणि बरेच अनुभव आहेत फक्त खंत म्हणजे स्वतःबद्दल काही फारशी intuition नाही . एवढा आठवतंय २००४ ला खुप अस्वस्थ होते खूप म्हणजे खूपच !!! पुढचा आपला काळ कठीण आहे हे मला आतून वाटत होते ( कदाचित कुणाला नकारात्मक विचार वाटेन ) आणि तसच झालें कठीण काळ अजूनही संपला नाही त्यात अनेक ज्योतिष वाऱ्या झाल्या पण समाधान नाही उलट काही ज्योतिष लोकांमुळे उरले सुरले hopes पण संपलेत ( काही चांगले पण ज्योतीषी असतील )आणि मिळाला तो म्हणजे नुसता मनस्ताप !!!( अजूनही अस्वस्थ आहे आणि मी ह्यावर काहीतरी लिहावे असे वाटते .. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढली तरी चालेन पण ज्योतीषीच्या नादी लागू नये .. तुम्हाला फक्त संताप आणि मनस्ताप मिळेल .. म्हणजे कसं आ बैल मुझे मार )

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

असे अनुभव येतात. पण वैज्ञानिक दृष्ट्या तो यदृच्छेचा भाग असतो. बाकि मनाला दिलासा देण्यासाठी अंतर्मनाचे अनेक खेळ आपण खेळतो.ज्यामुळे बरे वाटते ते खेळ आपण निवडतो.

>>> पण वैज्ञानिक दृष्ट्या तो यदृच्छेचा भाग असतो. <<<<
यातिल "यदृच्छा" म्हणजे काय? "वैज्ञानिक दृष्ट्या" म्हणजे काय?

असे बरेच अनुभव आले आहेत . पण ते समोरच्याला सांगून कळत नाही , आपलं आपल्यालाच मज्जा वाटते .
मला आमच्या नविन घराच्या बाबतित असा अनुभव आला होता . नवर्याला सांगायला गेले , " की मला नेहमी असं वाटायच ... वगैरे"
त्याला इतक अप्रूप वाटलं नाही Happy .

असे अनुभव अनेकांना येतात, पण ते दुसर्‍यांना सांगून उपयोग नसतो. कारण त्याची प्रचिती आणि पडताळा फक्त आपल्यापुरताच असतो.

असे अनुभव अनेकांना येतात, पण ते दुसर्‍यांना सांगून उपयोग नसतो. कारण त्याची प्रचिती आणि पडताळा फक्त आपल्यापुरताच असतो.>>> +१

आपल्या मनात असे किती तरी विचार येत असतात पण जे नंतर खरे होतात तेच अपल्याला आठवतात. निव्वळ योगायोग.

असे अनुभव अनेकांना येतात, पण ते दुसर्‍यांना सांगून उपयोग नसतो. कारण त्याची प्रचिती आणि पडताळा फक्त आपल्यापुरताच असतो.>>> +१

मला स्वतःला पण असे खूप अनुभव आलेले आहेत आणि अजूनही येतात.
उदा. एखाद्या व्यक्तिची मनात आठवण करणे किंवा उल्लेख करणे आणि ती व्यक्ती दिसणे अथवा फोन येते. हे तर बरेचदा घडते.
काही वेळा वाईट गोष्टीन्चे चिन्तन ही सत्यात उतरते.
आमच्या गल्लीतला एक मुलगा क्रिकेट खेळून पडला आणि अ‍ॅडमिट होता, मी सहजा सहजी बोलून गेले की तो काही परत येईल असं मला वाटत नाही, आणि दुसर्‍या दिवशी तो खरोखरी गेला Sad

काही वेळा वाईट गोष्टीन्चे चिन्तन ही सत्यात उतरते. >>> Sad .

त्यावरून आठवलं , माझ्या एका कलिगला मी असच गमतीत म्हटलेलें " तुझे नही लगता , तेरा वजन कुछ ज्यादाही बढ गया है . कितना मोटा होते जा रहा है " तो पण अगदी " हां रे , पेट कुछ ज्यादाही बढ गया है " वगैरे म्हणाला .
आठवड्यात तो आजारी पडला . ४ महिने घरी होता पोटात काहीतरी इन्फेक्शन होतं . जवळ जवळ आणखे ६-८ महिने पथ्य होतं खण्यापिण्याचं . १५-१७ किलो वजन कमी झालं .
परत आला तेन्व्हा आम्ही दोघानी पहिल्यान्दा त्या प्रसंगाची आठवण काढली . . बोलाफुलाला गाठ पडलेली , पण फार वाईट वाटलेलं मला .

इन्ट्युशन खोटे नसते. आपल्याला कधी कधी एखादी घटना किती तीव्र आहे अथवा नाही आहे याची जाणिव होते. (निदान मला तरी)
उदा. एखादी महत्वाची वस्तू हरवते पण आपल्याला आतून वाटत राहते की नक्की सापडेल... आणि सापडते सुद्धा.

ईथे लोकांनी आपापली इन्टुशने लिहा. येत्या दोनचार दिवसात काय असे घडू शकते जे प्रेडीक्ट करणे तितकेसे सोपे नाही हे आधीच लिहा. मग किती खरे किती खोटे याचा दोनचार दिवसात फैसला होईल. उगाच आपसात श्रद्धा-अंधश्रद्धा करत भांडून फायदा नाही.

पण एक मात्र आहे, ज्याच्या जीभेवर काळा डाग असतो त्यांनी लावलेली पनवती हमखास लागते !

पण एक मात्र आहे, ज्याच्या जीभेवर काळा डाग असतो त्यांनी लावलेली पनवती हमखास लागते !>>>> हे खरं आहे. माझ्या जीभेवर काळे डाग आहेत. अनुभव आला आहे.

वैज्ञानिक दृष्ट्या हे पण सिद्ध झालाय की आपण मेंदूचा फक्त ५ % भाग फ़क्त वापरतो . त्यापलीकडेही अनाकलनीय अशा गोष्टी आहेत . एखादा योगायोग होऊ शकतो नेहमी नाही तसंही मला अनेक अनुभव आलेत तर मनात आलेले विचार आणि प्रत्यक्षात आलेले ह्यात कधी कधी काही महिन्यांचा नाही तर काही वर्षांचा फरक आहे . अगदी उदा द्यायच तर जेव्हा मी १५ वर्षांपूर्वी "दुनियादारी " कादंबरी वाचली तेव्हाच वाटलेलं कि ह्यावर पिक्चर यायलाच हवा आणि हो आलाही २०१३ ला !!!

@सिंथेटिक जिनिअस : मी अंधश्रद्धा पसरवत नाही मी माझे अनुभव सांगतेय . मग ज्यांना अनाकलनीय , गूढ ,अमानवीय अनुभव आलेत ते पण अंधश्रद्धा पसरवतात का ??की देव आपल्याला दिसत नाही ,अनुभव पण नाही तरी पण देवाला मानणारे आहेत ना ? मग देवाला पण मानणारे अंधश्रद्धा पसरवतात का ?? हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे.

आणि हो अंधश्रद्धा ह्याला म्हणावी ज्याला त्यातून इजा होईन किंवा मानसिक त्रास वेदना होईन !! मी असे काही तर नाही ना लिहिलेले मग डायरेक्ट आरोप कसा करता ????

अगदी उदा द्यायच तर जेव्हा मी १५ वर्षांपूर्वी "दुनियादारी " कादंबरी वाचली तेव्हाच वाटलेलं कि ह्यावर पिक्चर यायलाच हवा आणि हो आलाही २०१३ ला !!!

--> लगेच १ वर्शात अला असता तर मनला असते.... १५ वर्शे इस तु मच

माझ्या जिभेवर काळा डाग वगैरे नाही पण एक आहे मला कोणी खूप विनाकारण त्रास दिला किंवा मनस्ताप दिला तर त्याला थोडी का होईना शिक्षा होतेच !!

एक ओळखीची व्यक्ती होती तिने मला खूप म्हणजे खूपच मनस्ताप दिला (personal ) . मी नेहमी शिव्याशाप द्यायचे .. एकदा तर देवाला म्हणजे स्वामी समर्थांना ultimatum दिलेला एक तर त्या व्यक्तीला शिक्षा द्या किंवा मी तरी राहणार नाही . मी असं बोलले आणि दुसऱ्याच दिवशी त्या व्यक्ती ला अटक झाली सांगलीला !! मजा म्हणजे मी सहजच abp maza बातम्या बघत होते तर एक न्यूज दिसली की काही लोकांना पैशांसाठी मध्ये फसवल्याबद्दल अटक केली माहित नाही पण आतून मनाला वाटत होते कि त्यात मला त्रास दिलेली व्यक्ती गुंतलेली असणार पण मी दुर्लक्ष केलं पण दुसऱ्यादिवशी खूप स्ट्रॉंग फीलिंग आले मग मी इंटरनेट वर बसून सांगली मधील कालचा न्यु पेपर पहिला आणि खरोखरच त्या व्यक्तीचे नाव होते !! तेही फोटोसकट !!!त्यानंतर मात्र मी बरीच शांत झाले.

@ च्रप्स .. टू मच म्हणजे ?? तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ?? जे झालं जे वाटलं ते लिहिलंय ... काळ तर माझ्या हातात नाहीये ना .

मला कोणी खूप विनाकारण त्रास दिला किंवा मनस्ताप दिला तर त्याला थोडी का होईना शिक्षा होतेच << च्रप्स चा काही खर नाही Lol Light 1

@ अदिति .. हाहा असं काही नाही.. त्यांची हि फक्त रिऍक्शन होती त्यात काही दुखावण्यासारखे नाही !! Happy

मनात येते व मग त्याप्रमाणे घडते असे म्हणण्यापेक्षा,
जे घडणार असते त्याप्रमाणे काहीवेळेस मनात विचार उत्पन्न होतात.
Happy

यातले कुठले अनुभव नक्की इन्ट्यूशन (आतला आवाज) या प्रकारात मोडतात असे तुम्हाला वाटते?
कारण जे वाचले त्यावरुन तरी तसे जाणवले नाही.
इंट्यूशन म्हणजे तसे काही कारण नसताना, तर्कसुसंगत नसताना अचानक काहीशी जाणीव होणे / आतून आवाज येण्यासारखे वाटणॆ. (किंवा तार्कीक विचार, अनुभव एक सांगत असताना, त्याच्या उलट अथवा वेगळेच काही असण्याचा/ करण्याचा आतून संदेश येणे / तीव्र इच्छा होणे.)
उदा. भरधाव गाडी चालवत असताना अचानक गाडी थांबण्याची, वेग एकदम कमी करण्याची तीव्र इच्छा होणे. आणि मग पुढे अचानक झाडाची मोठी फांदी तुटुन रस्त्यात पडणे, वगैरे.

कुणाचा आवाज छान, दिसायला खूप गोड आणि सुंदर असताना ती मुलगी पुढे हिरोईन होणार असे वाटणे याला इंट्युशन / इतर अंतर्मनाची शक्ती म्हणता येईल का?
पत्रिका बघुन सांगणे हे सुद्धा इंट्युशन / इतर अंतर्मनाच्या शक्तीत मोडेल का?
आणि इतर दोन गोष्टी योगायोग दर्शवितात. खास करुन पाचवी. एप्रिल मध्ये खंडोबावर माहिती मिळावी / मालिका सुरु व्हावी असे वाटणे आणि ती मे मध्ये सुरु होणे. मालिका मे मध्ये सुरु व्हायला तीची योजना आणि त्यावरिल काम कितीतरी आधीपासून सुरु झालेले असेल.

मानव, अचुक प्रश्न Happy सगळ्यांचीच उत्तरे देत नाही, कारण प्रश्नातच दडलेली आहेत, थोडे तारतम्य वापरले की उत्तर कळतय.
>>>>> पत्रिका बघुन सांगणे हे सुद्धा इंट्युशन / इतर अंतर्मनाच्या शक्तीत मोडेल का? <<<
यावर मात्र सांगू शकेन.
याचे उत्तर हो वा नाही असे एका शब्दात नाही.
कारण, पत्रिका बघुन ग्रहगणिताद्वारे काही एक सांगायला पाठांतर व गणित व ग्रहांच्या एकमेकांच्या स्थानगत नजरांमुळे होणार्या असंख्य शक्याशक्यतांचा आढावा घेता येण्यास अंतर्मनाचि शक्ति नव्हे, तर तल्लख बुद्धि लागते, जशी ती बुद्धिबळाच्या खेळात वापरली जात असेल.
मात्र तरीही, अंतर्मनाची ताकद, या बुद्धिपेक्षाही अफाट आहे, जर ती जागृत झालेली असेल तर. व वेळेस फार कमी, पन काही ज्योतिषी "अंतर्मनाच्या ताकदीचा" वापर करुन भविष्य वर्तवतात, जेव्हा समोरिल कुंडली ही केवळ सुतावरुन स्वर्ग गाठण्या इतपतच वापरली जाते.
मूळात भविष्य वर्तविणार्‍यांच्या स्वतःच्या "खासियत " असतात, ज्यामध्ये क्वचित असेही ज्योतिषी असतात की ज्यांना समोरिल जातकाच्या शरिरास्/हातास स्पर्ष केल्याशिवाय काहीही सांगता येत नाही. तर काही जण केवळ अन केवळ गणित व पुस्तकी गृहितके यांचा वापर करतात. काही जण केवळ अंतस्फुर्तिवर विसंबतात. जे लोक यातिल दोन वा अनेक प्रकारांचा ताळमेळ साधु शकतात, त्यांची भविष्य कथने जास्त अचुक येतात. याव्यतिरिक्त, ज्योतिष वर्तविणार्‍या व्यक्तिची स्वतःची "वृत्ती" व "साधना" देखिल परिणामकारक ठरते.
माझ्यापुरते म्हणाल, तर मी कधीही समोरच्याला स्पर्ष करीत नाही, उलट स्पर्ष झाल्यास उत्स्फुर्ततेत बाधा येते असा अनुभव आहे.
याचबरोबर पत्रिका वगैरे न बघताही, केवळ व्यक्ति बघुन, समोरुन नव्हे, तर पाठमोरी देखिल, फोटो बघुन अंतस्फुर्तिद्वारे त्या त्या व्यक्तिची ठळक वैशिष्ट्ये व ठळक भविष्य सांगता येते. याचीच पुढचि पायरि म्हणजे व्यक्तिच्या केवळ डोळ्यात बघुन तिच्या मनःस्थितीचा आढावा घेणे. हा "सिक्स्थ सेन्स" जवळपास प्रत्येक स्त्रीपुरुषात असतोच असतो, फक्त तो जागृत केलेला असतोच असे नाही.
याच्याव्यतिरिक्त, तुम्ही उच्चारलेल्या शब्दांमागे, त्याशब्दांतील अर्थवाहीत्वाबद्दल तुमची सकारात्मक/नकारात्मक "इच्छाशक्ति" किती प्रबळ आहे यावरुनही ते ते शब्द खरे ठरणार वा वाया जाणार हे ठरते. आशिर्वचन व शाप-तळतळाट, या दोन्ही संकल्पनांमध्ये व्यक्तिची हीच आंतरिक इच्छाशक्ति कार्यरत असेल, प्रबळ असेल, तर उच्चारलेले शब्द प्रत्यक्षात उतरतात. प्रत्यक्षात, आशिर्वाद व खास करुन शापवाणी उच्चारताना अतिशय काळजी घ्यावि असे संकेत आहेत. आशिर्वाद उलटले, तर अडचण नाही, पण शापवाणी "उलटली" (का उलटते हा स्वतंत्र विषय) तर उच्चारणार्‍यावर त्याचा वाईट परिणाम होतो. अन त्यामुळेच वाईट शब्द, शिव्याशाप उच्चारु नयेत, नेहेमी घरादारात शुद्ध चांगले शब्द वापरावेत वगैरे शिस्त आमच्या लहानपणी घरी/शाळेमध्ये असायची.
असो.
माझे स्वतःचे बरेच अनुभव आहेत पण येथिल लाल बावटी अन्निसवाल्या बुप्रावादी "अंधविज्ञानवादी" लोकांचा संभाव्य "उपद्रव" लक्षात घेता मी ते मांडत नाहीये.

>>यातिल "यदृच्छा" म्हणजे काय? "वैज्ञानिक दृष्ट्या" म्हणजे काय?<<
रॅन्डमली ज्याला आपण म्हणतो ते यदृच्छा. निरिक्षण अनुमान प्रयोग आणि निष्कर्ष या टप्पात विज्ञानाचे काम चालते. अशा दृष्टीने झालेले ते वैज्ञानिकदृष्ट्या
आश्चर्य वाटावे असे योगायोग आपल्या वाट्याला येतात. तार्किक दृष्ट्या त्याचे विश्लेषण करणे मनाला समाधान देत नाही.एवढेच घ्यावे. काही अनुभव देजावू प्रकारचे असतात. सगळ्या गोष्टींची उकल विज्ञानाला झाली आहे असे अजिबात नाही. म्हणून काही गोष्टी गुढ वाटतात.

>>माझे स्वतःचे बरेच अनुभव आहेत पण येथिल लाल बावटी अन्निसवाल्या बुप्रावादी "अंधविज्ञानवादी" लोकांचा संभाव्य "उपद्रव" लक्षात घेता मी ते मांडत नाहीये.<<
आत्ताच माझ्या अंतर्मनाने सांगितले की लेमनटेमनजींनी त्यात तुला पकडलेले नाही. Happy

लिंबु, पत्रिका बघुन सांगणे हे अंत:स्फूर्ती किंवा अंतर्मनाच्या इतर शक्तीत मोडत नाही हे कळले.
पण लेखिकेला याबद्दल काय वाटते ते जाणुन घ्यायला आवडेल. कारण एके ठिकाणी त्या मला बघून कळत नाही उत्स्फुर्तपणे बोलून गेले असं म्हणतात. तेव्हा याचा खुलासा त्याच करुन शकतील.

Pages