गाजर मिरचीचे लोणचे

Submitted by टीना on 24 December, 2016 - 06:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ दिवस
लागणारे जिन्नस: 

१. अर्धा किलो गाजर
२. १ पाव हिरवी मिरची
३. अर्धी वाटी मिठ
४. पाव वाटी मोहरी डाळ
५. ४ चमचे मोहरी
६. २ चमचे हिंग
७. ४ वाटी तेल
८. १ वाटी किसलेला गुळ
९. २ मोठ्या लिंबाचा रस
१०.२ चमचे हळद

क्रमवार पाककृती: 

१. गाजर छिलुन त्याच्या लांब उभ्या फोडी कराव्या. हिरव्या मिरचीच्या सुद्धा लांब उभ्या फोडी कराव्या.

२. गाजर मिरचीला एकत्र करुन त्यात अर्धी वाटी मिठ टाकावे. (मी हे मिश्रण रात्रभर मुरत घातले त्यामुळे त्याला पाणी सुटले ज्याचा लोणच्याचा रस तयार झाला. )

३. दुसर्‍या दिवशी तेल गरम करुन त्यात मोहरी, हिंग व मोहरीच्या डाळीची फोडणी द्यावी.

४. तेल थंड होईस्तोवर गाजर मिरचीच्या मिश्रणात हळद, लिंबु व गुळ घालुन एकत्र करावे.

५. थंड तेलाची फोडणी घालुन निट एकत्र करुन लगेच खायला घ्यावे. Proud

वाढणी/प्रमाण: 
हा एक अभ्यासाचा विषय आहे.
अधिक टिपा: 

१. हे लोणचं वर्षभर टिकेल कि नाही माहिती नाही. आमच्याकडे एक दोन महिन्यातच रपातपा होतं.

२. गाजर मिरचीच्या मिश्रणाला पाणी सुटु द्यायच नसल्यास रात्रभर मुरत ठेवु नये.

३. गुळ ऑप्शनल आहे.

४. वर लागणारा वेळ मधे दिडदिवस/२ दिवस असा ऑप्शन नसल्याने ३ दिवस असे सिलेक्ट केले आहे Wink Proud

माहितीचा स्रोत: 
मातोश्री
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतेय.
या गाजर मिरचीच्या लोणच्याशी बरेच आठवणी आहेत. लहानपणी एके ठिकाणी वरचेवर खीमा पावची पार्टी व्हायची. आजही मित्र तेथील खीमापावपेक्षा तेथील गाजर मिरचीच्या लोणच्याची आठवण काढतात.
त्याचे रंगरूप जरा वेगळे होते, पण हे सुद्धा रापचिक दिसत आहे.

मस्त चट़क लागत असणार.
आमच्याकडे गाजर, फ्लॉवर आणि मटारचे ताजे करतात, पण ते एक-दोन दिवसच टिकते (आणि भाजीप्रमाणे खाल्ल्याने संपतेही)

धन्यवाद सार्‍यांना...
मिरच्या काही एवढ्या तिखट नव्हत्या दिदा..
आम्ही तर गाजराप्रमाणेच मिरच्या सुद्धा खातोय त्यातल्या..नो तिखट अ‍ॅट ऑल... काश तिखट असत्या तर आणखी मजा आली असती.. मिरच्या असल्यामुळे त्यात लाल तिखट पावडर घालत नाही ना..
करुन बघा तुम्हाला नक्की आवडेल..

मी केले....मस्त झालेय...मिरच्या खुपच तिखट होत्या म्हणून कमी घातल्या....पण चव झकास!

सायु, क्रोममधे दिसेल तुला फोटो शायद.. टाकलाय मी आधीच..

कुरुडी, अभिनंदन.. Happy
माझ्याकडलं संपलसुद्धा..

आमच्याकडे गाजर, फ्लॉवर आणि मटारचे ताजे करतात, पण ते एक-दोन दिवसच टिकते (आणि भाजीप्रमाणे खाल्ल्याने संपतेही) + १११

हे पण भारी आहे Happy

टीनातायचे फोटू क्रोमातच दिसतात.

भारी फोटू आणि रेसिपी.

अमेयने लिहिल्याप्रमाणे फ्लॉवर, गाजर, मटार करतो आम्ही. गुळ नाही टाकत. नणंदेने पुण्याहून पाठवलं होतं नुकतंच फ्लॉ ग म लोणचं. आत्ताच संपवलं. शेवटी कच्चे पोहे घालून खाल्ले.

मी गाजर आणि मिरच्या कापून मीठ घालून ठेवल्यात. पण एक गडबड झाली. मी कमी तिखट म्हणून ज्या हिरव्या, लांब वाल्या मिरच्या घेतल्या त्यांना अगदी ढोबळी मिरची सारखा वास येतोय. एक छोटा तुकडा खाऊन बघितला तर चव सुद्धा ढोबळी सारखीच लागतेय Sad आता लोणचं बरं लागेल का यांचं ??!!!
की फक्त गाजरांचं करू?

सुलक्षणा... आता नेहमीच्या मिरच्या आणुन कापुन त्यात घातल्या तरी चालेल...
पण ते गाजर अन ढोबळी मिरचीच लोणच कसतरीच लागेल..
अन मुळात गाजराच्या लोणच्यात तिखटपणा हा त्या हिरव्या मिरच्यांपासुनच येतो..आपण वेगळी लाल मिरची पावडर त्यात टाकत नाही ना म्हणुन गाजर हिरवी मिरची कॉम्बो जास्त छान लागेल निव्वळ गाजरापेक्षा.. Happy

अगं मी तसंच त्या मिरच्यांबरोबर केलं. आणि खूप छान झालंय Lol
काल जाम खारट आणि थोडं कडू लागत होतं. पण आज लय लय लय भारी लागतंय. रेसिपी साठी धन्यवाद.

काल जाम खारट आणि थोडं कडू लागत होतं. पण आज लय लय लय भारी लागतंय. रेसिपी साठी धन्यवाद.>> जमल तर मग... अभिनंदन Lol