साहित्यः
मैदा/ बारीक रवा किंवा रवा मिक्सरवर बारीक करून घ्या. - दोन वाटी ( मी मैदा वापरला आहे.)
साखर किंवा ब्राऊन शुगर - दोन वाटी
बटर - एक वाटी
दही - पाउण वाटी
बेकिंग पावडर - अडीच टी स्पून
मीठ - १/४ टी स्पून
ऑरेंज ज्यूस - १ वाटी
ड्राय फ्रुट तुकडे (अक्रोड, काजू, बदाम), टुटी फ्रुटी - पाव वाटी
अफगाण मनूका - १५- २०
सीडलेस काळी मनुका - १५- २०
लवंग - ४
काळी मिरी - ४
दालचिनी तुकडा - अर्धा इंच
जायफळ - एक छोटा तुकडा
वेलची पावडर - १/४ टि स्पून
लेमन झेस्ट (एका मोठ पिवळ लिंबू हातात घेऊन किसणीवर साल किसून घ्यावी) - १ टी स्पून
रम इसेन्स - १/४ टी स्पून
खजूर स्मॅश करून - १ टेबल स्पून
कृती -
१. एका छोट्या डब्यत अर्धी वाटी संत्र्याचा रस,ड्राय फ्रुट तुकडे, दोन्ही मनुका मिक्स करून हा डबा ७-८ तास किंवा रात्री फ्रिजमध्ये ठेवा. सकाळी डबा बाहेर काढून ठेवा आणि त्यात ताज किसलेल लेमन झेस्ट घालून मिक्स करून ठेवा.
२. दालचिनी, मिरी, लवंग, जायफळ ह्याची पावडर बनवा.
३. एका जाड बुडाच्या कढईत साखर घालून मंद गॅसवर कॅरमलाइज करून घ्या. साधारण १० - १५ मिनिटात साखर कॅरमलाईज होते. गॅस बंद करून त्यात अर्धी वाटी थंड पाणी आणि उरलेली अर्धी वाटी संत्र्याचा रस घालून मिश्रण ढवळून घ्या.
४. ओव्हन १० मिनिट प्री हिट करायला ठेवा.
५. बेकिंग ट्रे ला बटर लावून त्यावर थोडा मैदा स्प्रिंकल करा आणि सगळीकडे मैदा पसरवून घ्या.
६. एका मोठ्या पातेल्यात दोन वाटी मैदा घ्या त्यात ड्राय फ्रूटसचे मिश्रण घालून मिक्स करून घ्या. त्यात कॅरमलाईज साखर आणि संत्र्याचे मिश्रण, दालचिनी, लवंग, जायफळ ह्यांची पावडर, वेलची पूड घालून मिक्स करा. त्यात बटर, रम इसेन्स घालून अलगद मिक्स करा. ह्या मिश्रणावर मीठ व बेकिंग पावडर घाला त्यावर लगेच दही घाला आणि सगळ मिश्रण पुन्हा एकदा अलगद मिक्स करून घ्या.
७. बेकिंग ट्रेमध्ये मिश्रण घालून प्री हिट केलेल्या ओव्हनमध्ये ३० मिनिट बेक करा.
अवन नाही . कसे करावे ?
अवन नाही . कसे करावे ?
मस्त जमलाय ! डॉक्टर, लगंडी
मस्त जमलाय !
डॉक्टर, लगंडी पातेल्यात रेती घालूनही छान होतो केक. आधी नुसती रेती तापवायची. मग त्यातली थोडी झाकणावर ठेवायची आणि आत केकचे भांडे ठेवायचे.. पण यासाठी कूकर नाही वापरायचा !