१. सफरचंदे - अर्धा किलो, ३ मिडियम साईझची
२. मैदा- २०० ग्रॅम
३. साखर- २५० ग्रॅम
४. बटर- २५० ग्रॅम
५. हेझलनट पावडर- १२५ ग्रॅम ( पर्याय- बदाम पावडर)
६. कोको पावडर- २ टेबलस्पून
७. बेकिंग पावडर- २ टी स्पून
८. रम- ५ टेबलस्पून
९. अंडी- ४
१०. पिठी साखर- वरून भुरभुरवण्यासाठी
११. अक्रोड/ बदाम- बारीक तुकडे करून १- २ टेबलस्पून
१. बटर, अंडी आणि साखर फेटून घ्यावी.
२. सफरचंदाची साले काढून, बिया काढून छोटे तुकडे करून घ्यावेत. त्यात रम घालून ठेवावी.
३. मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, हेझलनट पावडर आणि दालचिनी पावडर चाळून, एकत्र करून ठेवावे. ओव्हन प्री हिट करत ठेवावा.
४. बटरच्या फेटलेल्या मिश्रणात प्रथम मैदा ई. चे कोरडे मिश्रण घालून परत फेटावे.
५. त्यानंतर सफरचंदाचे तुकडे घालून हलक्या हाताने सर्व मिश्रण एकत्र करुन घ्यावे.
६. बदाम अथवा अक्रोडाचे तुकडे घालायचे असल्यास ते सुद्धा मिश्रणात घालावेत.
७. केकच्या मोल्डला थोडे बटर लावून त्यावर मैदा भुरभुरवून त्यात वरील मिश्रण घालावे. मी स्वतः मोल्डमध्ये बटर पेपर घालून त्यात मिश्रण घालून बेक करते. केक बाहेर काढणे सोपे जाते.
८. १७५° से. वर १ तास बेक करावे.
९. साधारण २०- २५ मिनिटांनंतर केक वरून बर्यापैकी गडद होतो, तेव्हा मोल्डवर अॅल्युमिनियम फॉईल घालून पुढचे बेकिंग करावे. अन्यथा वरच्या लेयरची चव जळकट लागायची शक्यता असते.
१०. ओव्हन बंद करण्याआधी टूथपिक घालून केक पूर्ण शिजला आहे ना हे पाहावे.
११. केक थंड झाला की वरून पिठीसाखर भुरभुरावी आणि केक सर्व्ह करावा.
१. रम घातल्याने स्वाद खुलतो, पण रम वापरायची नसल्यास नुसता व्हॅनिला इसेन्स घातला तरी चालेल.
२. मिश्रण फेटण्यासाठी फूड प्रोसेसर किंवा हँड मिक्सर काहीही वापरले तरी चालेल. मात्र सफरचंदाचे तुकडे घातल्यावर चमच्यानेच सर्व मिश्रण एकत्र करावे, अन्यथा सफरचंदाचे फार बारीक तुकडे होऊन मिश्रण पाणचट होईल.
३. ओव्हन कमीत कमी १० मिनिटे प्री-हीट करावा.
मस्त! केक यम्मी दिसतोय.
मस्त! केक यम्मी दिसतोय.
छानच दिसतोय. सफरचंद कुठली
छानच दिसतोय. सफरचंद कुठली वापरली ?
मी एल्स्टार वापरली आहेत. ही
मी एल्स्टार वापरली आहेत. ही व्हराईटी खूप आंबट नसते, योग्य कडक असल्याने बेकिंगला चांगली असा माझा अनुभव आहे.
ओके... हि मिळतात आमच्याकडे.
ओके... हि मिळतात आमच्याकडे.
वाह मस्तच
वाह मस्तच