लाल भोपळ्याचा भात / पुलाव / बिर्याणी.

Submitted by आरती on 27 November, 2016 - 11:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदूळ : २ वाट्या
लाल भोपळा : २०० ग्रॅम
कांदा: १ मोठा / २ छोटे.
आल-लसून-हिरवी मिरची वाटण : २ चमचे.
काजू : १५-२०
आमचूर पावडर : पाव चमचा.
बिर्याणी मसाला : २ चमचे.
मिरे : २
लवंगा : २
दाल्चिनी : छोटा तुकडा.
जिरे : अर्धा चमचा.
कोथिंबीर : आवडी प्रमाणे.
मीठ-साखर : चवीप्रमाणे.
तेल : पाव वाटी.

क्रमवार पाककृती: 

तांदूळ धुवून, उकळून, निथळून गार करत ठेवावेत. कांदा उभा चिरून घ्यावा. भोपळ्याच्या छोट्या चौकोनी फोडी करून घ्याव्या. काजूचे उभे तुकडे करुन घ्यावे. कढईत तेल तापवून घ्यावे. काजूचे तुकडे तळून बाजूला ठेऊन द्यावे. लाल भोपळ्याच्या फोडी मंद आचेवर तळून घ्याव्या. गरम असतानाच त्यावर आमचूर पावडर, बिर्याणी मसाला आणि थोडे मीठ घालून, सगळ्या फोडीना मसाला लागेल असे कालवून घ्यावे. त्याच तेलात आता जिरे, लवंगा, मिरे, दाल्चीनी टाकावे. मग कांदा परतून घ्यावा. थोडा लालसर झाला कि आल-लसूण-मिरचीची पेस्ट घालून परतावे. चांगले परतले गेले की कोथिंबीर, मीठ, साखर घालून हलवून घ्यावे. आता गार झालेला भात घालावा. व्यवस्थित हलवून, एकत्र करून झाकण ठेवावे व एक वाफ आणावी. भांड्यात काढून घेऊन मग त्यावर तळलेले काजू आणि भोपळ्याचे तुकडे पसरावे.

bhat.jpg

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांना पुरेल.
अधिक टिपा: 

सगळे पदार्थ लाल भोपळ्याचे करायचे ठरवले होते म्हणून हा प्रकार करून बघितला.
बिर्याणी मसाल्यात घोळवलेले लाल भोपळ्याचे तुकडे अप्रतिम लागले. Happy

माहितीचा स्रोत: 
माझा प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहा! अप्रतिम!! काय योगायोग! आजच सांबारात टाकून बाकी लाल भोपळ्याच्या फोडी फ्रिज मध्ये ठेवल्या आहेत. त्यांची भाजी करणार होते, पण आता बेत बदलला, आता बिर्यानीच Happy धन्यवाद!

मला लाल भोपळा प्रचंड आवडतो. घारगे आणि भाजी सोडून इतर पदार्थ माहिती नाहीत भोपळ्याचे.
हा प्रकार छान वाटतो आहे. दिसतोय पण मस्त. तोम्पासू.

लाल भोपळा आवडतो व रोज घरी लाल भोपळा, दुधी व गाजराचे सूप बनत असल्यामुळे लाल भोपळा घरात असतोच. आता कधीतरी जरा जास्त भोपळा आणून हा प्रकार करून बघेन.