कालच एकात्मिक भरणा पद्धती हा लेख मराठी विकिवर टाकला तोच येथे ही देत आहे. प्राप्त परिस्थितीत त्याचा उपयोग होईल असे वाटते. एकात्मिक भरणा पद्धती हे युनिफाईड पेमेंट इंटरफेस या इंग्रजी नावाचे भाषांतर आहे. यापेक्षा चपखल शब्द सुचत असतील तर जरूर द्या.
तसेच या लेखात भर घालण्यासाठी स्वागत आहे! दुवा: https://mr.wikipedia.org/wiki/युनिफाईड_पेमेंट_इंटरफेस
(https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4...)
-----------
एकात्मिक भरणा पद्धती - युनिफाईड पेमेंट इंटरफेस Unified Payment Interface (UPI) ही एक अत्यंत सोपी, सुरक्षित व तत्काळ पैसे चुकते करता येणारी सुविधा आहे. यामुळे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा सरकारतर्फे देण्यात आली आहे. दि. ११ एप्रिल २०१६ पासून भारतीय रिझर्व बॅंक व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) संयुक्त विद्यमाने ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही सुविधा वापरून एकावेळी किमान रु. ५० व कमाल एक लाख रुपये इतका भरणा तत्काळ करता येतो. यासाठी लाभार्थींच्या बॅंकेचे नाव, खाते नंबर, आयएफएससी कोड यासारखी कोणतीही माहिती आवश्यक नसते.
युनिफाईड पेमेंट इंटरफेस सुविधा वापरल्याने कोणत्याही व्यक्तीला कोणालाही पैसे देणे शक्य आहे. तसेच कोणाकडूनही पैसे घेता येणार आहेत. याशिवाय विविध बिले ऑनलाईन देता येणे शक्य आहे. या सुविधेचा उपयोग ऑनलाइन शॉपिंग साठीही करता येणार आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस वापरण्यासाठी फक्त संबंधिताचा व्हर्च्युअल पेमेंट अड्रेस (व्हीपीए) माहीत असणे आवश्यक असते. यूपीआय वापरासाठी नोंदणी - रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यासाठी यूपीआय ऍप उतरवून घ्यावे. व आपल्या बॅंकेशी जोडावे. ( कसे जोडावे या विषयी या विभागात मुळ लेखात अधिक माहिती आवश्यक आहे)
याचे फायदे:
- सरकारी एकात्मिक भरणा (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) पद्धतीचा वापर केला तर दैनंदिन रोखीचे व्यवहार कमी होतील.
- चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम यांचा वापर कमी होते.
- अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे व्यवहार कमी होऊन जोखीम कमी होते.
- पैसे आपल्या बॅंक खात्यातच रहात असल्याने व्याजाचेही नुकसान होत नाही.
एकात्मिक भरणा पद्धती - युनिफाईड पेमेंट इंटरफेस Unified Payment Interface (UPI) हे बॅकबोन आहे. यावर आधारीत अॅपस बनवली आहेत बँकांनी. युपीआय वापरणारे कोणतेही अॅप गुगलवरुन उतरवून घ्या आणि वापरा.
बँकेचे आहे तसेच फ्लिप्कार्ट चे पे पण मिळते आहे...
कोणतेही वापरले तरी सेफ असावे असे वाटते कारण बाटली बदलली तरी युपीआय ही दारू तीच असणार आहे.
यूपीआय वापरासाठी नोंदणी
Steps for Registration:
1.User downloads the UPI application from the App Store / Banks website
2.User creates his/ her profile by entering details like name, virtual id (payment address), password etc.
3.User goes to “Add/Link/Manage Bank Account” option and links the bank and account number with the virtual id
Generating M – PIN:
1.User selects the bank account from which he/she wants to initiate the transaction
2.User clicks on requried option
(हे वरचे कुणी सुलभ मराठीत भाषांतर करून देईल का? मग ते ही विकिवर टाकता येईल.)
खालील ब्यांकांनी हे उपलब्ध करून दिले आहे:
Banks live as PSP and Issuer:
1 Andhra Bank
2 Axis Bank
3 Bank of Maharashtra
4 Canara Bank
5 Catholic Syrian Bank
6 DCB Bank
7 Karnataka Bank
8 Union Bank of India
9 United Bank of India
10 Vijaya Bank
11 Punjab National Bank
12 Oriental Bank of Commerce
13 TJSB
14 Federal Bank
15 ICICI Bank
16 UCO Bank
17 South Indian Bank
18 HDFC
---
या पद्धतीची माहिती आपल्या जवळच्या दुकानदाराला आणि व्यावसायिकाला द्या. तत्काळ पैसे देण्यासाठी याच उपयोग होईल. अगदी चहा ते भाजीवालाही असे पैसे स्विकारू शकेल.
--
टीपः हा लेख कॉपी पेस्ट करून व्हॉट्सअॅप फेसबुक वर वापरला तर चालेल!
---
मर्चंट एण्ड साठी काय सेट अप आहे याची मात्र कल्पना आली नाही..
त्यावर कुणी काही सांगेल का?
तसेच मोबाईल मधले एनएफसी वापरून पैसे कसे देता येतील यावर काही माहिती मिळेल का?
UPI आणि (BBPS) is an
UPI आणि (BBPS) is an integrated bill payment system यामधे काय फरक आहे ?
पेटीएम (BBPS) is an integrated bill payment system गेटवे वापरते. छोट्या दुकानदारांना पेमेंट करताना २% चार्जेस लागत नाहीत.
युपीआय अॅप विंडोज फोन ला
युपीआय अॅप विंडोज फोन ला सपोर्ट करीत नाही फक्त अॅन्ड्रॉईड फोन तेही हायर व्हर्जन ला सपोर्ट करतात. फक्त पीएन बी चे अॅप लोअर व्हर्जनला सपोर्ट करते
Pages