Submitted by सोनू. on 31 October, 2016 - 05:24
अफरातफरींबद्दल काही माहिती मिळाल्यास या धाग्यावर त्यांचे एकत्र संकलन करण्याकरीता धागा. काय करावे व काय करू नये हे देखील माहीत असेल तर ते ही नमुद करावे.
एखाद्या विशिष्ट अफरातफरीबद्दल अधिक माहिती द्यायची असेल तर वेगळा धागा काढता येईलच, पण थोडक्यात महत्त्वाचे सांगायचे असेल, लिंक द्यायची असेल तर असे संकलन बरे पडेल असे वाटले.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.pc-tablet.co.in/re
http://www.pc-tablet.co.in/reliance-jio-4g-sim-scams-know/50497/
Reliance Jio 4G SIM scams you should know about
मागच्या आठवड्यात माझा एक
मागच्या आठवड्यात माझा एक मित्र माझ्याकडे मलेशिया विषयी काही माहिती आहे का विचारायला आला होता . मी त्याला कशासाठी म्हणुन विचारलं तर त्याने सांगितलं ' PETRONAS ह्या मलेशियन कंपनीकडुन त्याला जॉब ऑफर आलीय आणि पॅकेज खुप मस्त आहे .' त्याने पासपोर्टची कॉपी , आणि इतर खाजगी माहीती भरुन पाठवली होती. इंटरव्यु वगैरे सगळं व्यवस्थित पार पडलेलं होतं. आणि त्यांनी आता मलेशियातल्या त्यांच्या बॅरिस्टर शी कॉन्टॅक्ट करायला सांगितलं होतं. वीजा , वर्क परमिट वगैरे सगळं त्या वकिलाचं ऑफीस करणार होतं . फक्त सुरवातीच्या पेपरवर्क साठी फी भरावी लागणार होती , त्याने फी भरावी लागेल म्हणताच माझी घंटी वाजली. मी त्याला सगळे पेपर्स ईमेल्स दाखव म्ह्णालो. त्याचे पेपर्स इतके ऑथेंटिक वाटत होते की मी पण क्षणभर कन्व्हिंन्स झालो.
मग मी त्या कंपनीच्या scam विषयी सर्च केलं तर त्यांच्या वेबसाईटवर बरीच माहिती मिळाली.
त्यांच ऑफिशियल e-mail domain आहे @petronas.com.my. पण मित्राला ईमेल आली ती @petronasoil.com वरुन.
मित्राला म्हटलं आता ह्यापुढे त्या लोकांशी कसलही कम्युनिकेशन करु नकोस आणि तुला आलेले इमेल्स खर्या कंपनीच्या फ्रॉड प्रिव्हेनशन्च्या ईमेल अॅड्रेसवर फॉरवर्ड कर.
त्यामुळे कुठल ही ईमेल ,जॉब ऑफर आलीतर आधी तो इमेल आणि वेब्साईट ऑथेंटिक आहे की नाही हे आधी चेक करा. जर ईमेलमध्ये Urgent , immediate action required किंवा Link वर क्लिक करायला सांगितलं असेल तर सावधान.
Few Tips,
Avoid opening unfamiliar and/or unexpected email attachments
Avoid automatically clicking website links in emails before you examine the entire message for phishing clues
Avoid downloading pictures in emails
Be wary of any email urging you to act immediately
Never reply to suspicious emails
Look for the s in https:// and the padlock symbol in your browser’s address bar before you enter private information
Know that the only “secure” graphic you can trust is the padlock symbol in a browser's address bar
Know that legitimate entities should never ask you for your account password
हा धागा बंद करतो
हा धागा बंद करतो आहोत.
अफरातफरीचे विषय इतके वेगवेगळे आहेत की सगळ्याच अफरातफरीचे एकत्रित संकलन केले तर एकतर शोधणे कठीण जाईल आणि दुसरे म्हणजे प्रतिक्रियाही कुठल्या अफरातफरीशी निगडीत आहेत हे वाचणे अवघड होईल.
> एखाद्या विशिष्ट अफरातफरीबद्दल अधिक माहिती द्यायची असेल तर वेगळा धागा काढता येईलच,
दुर्देवाने सगळे लेखक ही सूचना वाचतीलच असे नाही आणि एकाच धाग्यावर सगळी सरमिसळ सुरु होईल
उदा. वर मोबाईल बद्दलची अफरातफर आणि इमिग्रेशनबद्दलची अफरातफर याचा काहीही संबंध नाही.
कृपया नवीन विषयाशी संबंधीत अफरातफरीबद्दल नवीन धागा सुरु करावा. एकाच धाग्यावर संकलन नको.