दुधी मुठीया

Submitted by कामीनी on 27 September, 2016 - 07:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दुधी भोपळा- १ मध्यम आकाराचा
गहू पीठ - १ कप
बेसन- १ कप
बारीक रवा - १ कप
जिरे, हिरव्या मिरच्या, आले ठेचा - २-३ टिस्पून
मिरची पूड- १ टिस्पून
तीळ- १/२ टिस्पून
धणे पूड - १ टिस्पून
हळद - १/२ टिस्पून
हिंग - १/२ टिस्पून
लिंबू रस - २ टिस्पून
साखर- १/२ टिस्पून
कोथिंबीर, चिरून
मीठ-चवीप्रमाणे
तेल- २ टीस्पून

फोडणीसाठी:
तेल- ३ ते ४ टेबलस्पून
कढीपत्ता
मोहोरी
तिळ
हिंग

क्रमवार पाककृती: 

कृती:
आले, हिरव्या मिरच्या आणि जिरे एकत्र भरड वाटा.
दुधी किसून घ्या. दुधी, कांदा, गव्हाचे पीठ, रवा, बेसन, जिरे-आले-हिरवी मिरचीचा ठेचा, हळद, बडीशेप, लिंबाचा रस, साखर, कोथिंबीर, हिंग, हळद व मीठ एकत्र करुन घ्यावे.पाणी घालून कणिक माळून घ्या. तेल घालून पुन्हा छान मळून घ्या. कणिक फार मऊ नको आणि फार घट्टही नको .
हातावर थोडे तेल लावून कणकेचे भाग करा. प्रत्येक भागाचा लांबट (दंडगोलाकार) उंडा तयार करा.
स्टीलच्या चाळणीला तेलाचा हात लावा आणि सर्व उंडे चाळणीत ठेऊन मोदकपात्रात २५ ते ३० मिनिटे वाफऊन घ्या. .थोडे थंड झाल्यावर काप करा.
कढईत तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता, तिळ आणि हिंग टाकून फोडणी करावी. त्यात मुठीयाचे काप तुकडे टाकून २ ते ३ मिनीटे मध्यम आचेवर खमंग परतावे.
वरून कोथिंबीर टाकावी.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॉपी पेस्ट कुठे केलीय? ब्लॉगवर दुधी पिळून घ्या आणि ते पाणी वापरा म्हटलेय, वरच्या रेसिपीत कुठे म्हटलेय?

हि अशीच रेसिपी याच साहित्यासकट मी यू ट्युब वर पण पाहिलीय. खूप जणांना माहित असलेली रेसिपी असे फारतर म्हणता येईल.

छान रेस्पी.
माझी पद्धत
किसलेला दुधी, डाळीचे पीठ, कणिक, थालिपिठाची भाजणी, ओवा, धणे-जीरे पूड, बारिक चिरलेली कोथिंबीर, हळद, लाल तिखट, मीठ एकत्र करुन पाणी न घालता (दुधीला सुटलेले पाणी पुरते) घट्ट भिजवुन तेलाचा हात लावुन शेंगोळे वळायचे.
नॉनस्टिक कढईत तेलाची हिंग, मोहरी, हळद घालुन फोडणी करुन अर्धी वाटी पाणी घालुन ते उकळल्यावर त्यात हे शेंगोळे सोडायचे व कोरडे होईतो परतायचे., छान क्रिस्पी शेंगोळे तयार होतात १० मिनिटात. मंद आंचेवर ठेवल्यावर छान खरपूसपणा येतो.

देवकी, योकु धन्यवाद.
काय योगायोग आहे. कालच मी माझी जुनीच रेसिपी 'दुधी मुठिया' पुन्हा काही फेसबुक ग्रुप व पेजवर टाकली होती. अगदी मान्य हि एक पारंपारिक रेसिपी आहे पण काही शब्द वगळले आहेत इथे अन्यथा पूर्णपणे माझेच शब्द दिसत आहेत. हि रेसिपी फक्त सानिकास्वप्नील/मिपा व माझीच मराठीत आहे.
http://marathifoodfunda.blogspot.in/2014/12/dudhi-muthiya.html

अगदी सेम शब्द सुद्धा? आणि वरुन म्हणायचे की नाही पारंपारिक रेसिपी असल्याने तसे वाटते आहे! कमाले!
चोर तो चोर वर शिरजोर!

चोरीच आहे. मूळ रेसिपीत मूळ लेखिका साहित्यामध्ये कांदा लिहायल्या विसरल्या आहेत पण कृतीमध्ये कांद्याचा उल्लेख आहे. सेम तीच चूक कामिनी यांनी केलीय. त्यामुळे रेसिपी चोरलीय हे नक्की.
अवांतरः आमचे काही मित्र इतरांची असाइनमेंट कॉपी करताना रोल नंबर सुद्धा कॉपी करायचे आणि पकडले जायचे. तोच प्रकार Proud