************************
************************
लेह मध्ये पोहोचून पुरेशी विश्रांती झाली होती. वातावरणाला सरावलो होतो, आता फिरायला बाहेर पडायला काही हरकत नव्हती.
आज भेट द्यायची होती जगप्रसिद्ध पँगाँग लेक ला.
३ इडीयट्समध्ये याची झलक बघायला मिळाली आणि नंतर याबद्दल बरेच ठिकाणी भरपूर काही लिहिले गेले आहे, त्यामुळे नमनाला घडाभर तेल न घालवता सरळ म्येन मुद्द्यावर येतो.
आम्ही आज पँगाँग लेकला भेट देणार होतो..!!!!!!
सगळे सामान गाडीवर लोड केले, सोबतच्या फौजी मंडळींनी भरपूर सुचना दिल्या आणि सोबत ब्रेड जॅम वगैरे खाद्यपदार्थ दिले. त्यांना उद्या परत येतो असे सांगून सकाळी सकाळी निघालो.
लेह ते कारू हा या दोनच दिवसांपूर्वी पार केलेला रस्ता आज पुन्हा पार करायचा होता. फारसे काही न घडता तो ३५ किमीचा रस्ता संपवून कारूला पोहोचलो आणि डावीकडे टांगत्से, दुर्बुक कडे गाड्या वळवल्या.
थोडे अंतर कापतो न कापतो तोच BRO वाले जवान सामोरे आले. रस्त्याचे काम सुरू होते.
मागे वळून पाहिले तर मागे पण बुलडोजर घरघरू लागला होता.
अंतर आणि उंची दाखवणारा हा फलक..!
थोडी थोडी हिरवळ दिसत होती.
तोच भाग.. थोड्या उंचीवरून..
BRO.
बुलडोजरने दगड खाली ढकलून झाल्यानंतर हे जोडपे हाताने दगड उचलून टाकू लागले.
"चांग ला" जवळ आल्याची झलक दिसू लागली होती.
हिमस्खलन क्षेत्र.
आता अशा रस्त्यांची सवय झाली होती.
"चांग ला"
बर्फाचा सडा शिंपल्यासारखे डोंगर सजले होते.
MIGHTY CHANG LA - MIGHTY BULL....!!
चांग ला बाबा..
काहवा.
येथे एक काका भेटले, गाडीवरून आलो आहे म्हटल्यावर गप्पा मारू लागले. मराठीचा पुरेपूर लहेजा चढवलेल्या हिंदीत काका बोलू लागताच मी सरळ त्या काकांना "मी पण महाराष्ट्रातलाच आहे" असे सांगून त्यांची मराठी-हिंदी लढाई थांबवली व झकास मराठीमध्ये गप्पा झाल्या.
तेथील भु भु पण अंगावर भरपूर केस बाळगून होते.
काहवा मुळे थंडीत फारसा फरक पडला नाही.. पुन्हा गाडीवर स्वार झालो. पुढे लेह भागामध्ये नेहमी दिसणारी दृष्ये दिसू लागली..
अचानक तो निळा तुकडा दिसला...!!!!!!!
आजुबाजूचा परिसर जबरदस्त होता..!!!
ट्रक दिसतो आहे का..?
यथावकाश लेक जवळ पोहोचलो.
रँचो कॅफे, ३ इडीयट्स कॅफेची रेलचेल होती.
एक रूम बघितली, सामान टाकले आणि भटकायला बाहेर पडलो. रूम लेक शेजारीच असल्याने निळेशार पाणी सतत दिसत होतेच.
पुढचे फोटो बघून लक्षात येईलच..!!!
३ इडीयट्स पॉईंटवर भरपूर गर्दी होती.
शेवटी थोड्या वेळाने रूमवर परतलो. रात्रीसाठी हॉटेलवाल्या मुलीला "तुम्ही जेवता ते जेवायचे आहे" असे सांगितले होते
त्यावर तिने सांगितले की ते लोक जे जेवतात ते आपण खाऊ शकत नाही. तरीही आम्ही आग्रहाने त्यांची स्पेशल डिश बनवण्यास सांगितली.
"चुमुक" आणि आलू-मटर.
चुमुक हे कणकेचे उकडलेले गोळे होते. आत काहीही स्टफिंग नव्हते. ते खाणे अशक्य झाल्यानंतर भात मागवला.
बादवे, या चुमुक मुळे आणखी एक फायदा झाला. रात्री अडीच वाजता उठावे लागले आणि तारे व चांदण्यांचे अप्रतीम दर्शन झाले.
****************************************
दुसर्या दिवशी उठलो, आवरले व सकाळी खादाडी करून लेह कडे निघालो.
स्वच्छ उन्हातला रस्ता. मातीचे डोंगर जागोजागी दिसत होते.
विजय आणि रोहित.
त्या संपूर्ण रस्त्यावर एखादाच हिरवाईचा तुकडा दिसत होता.
वाटेत अचानक राजस्थानची आठवण करून देणारा वाळवंटी भाग लागला.
पुन्हा चांग ला बाबा कडे...
चांगला ला टीशर्ट, कीचेन, टोप्या वगैरे खरेदी केली आणि पुन्हा लेहकडे कूच केले.
"चांग ला" चांगलाच मागे पडला होता.
येथे परतताना एक मजा झाली.
मी आरामात घाट उतरत असताना अचानक एका वळणावर दोन बुलेट पार्क केलेल्या दिसल्या आणि दोन कपल, चौघांनी हात केला व मला थांबवले.
"पानी है पिनेको..?"
त्यातल्या एका कन्येची तब्बेत बिघडली होती.
मी लगेच सॅकमधून रिझर्व पाणीसाठा बाहेर काढला आणि त्यांच्या स्वाधीन केला. ती थोडी सावरल्यावर मी त्यांना थोड्या सुनावण्याच्या सुरातच विचारले की अशा रस्त्यावर पाणी वगैरे का सोबत ठेवले नाही?? त्यांनी सांगितले की त्यांचा मोठा ग्रूप एकत्र आला होता आणि यांनी सगळे (स ग ळे) सामान टेम्पो ट्रॅव्हलरमधून पुढे पाठवले. ज्यात पाणी आणि इतर खाद्यपदार्थही होते. __/\__
तोपर्यंत विजय व रोहितही येवून पोहोचले आणि एकंदर रागरंग बघून खाऊसाठा बाहेर काढला. मग ते चौघे आणि आम्ही निवांत गप्पा मारत बिस्कीट, बाकरवडी, चिक्की वगैरे पदार्थ पोटात ढकलू लागलो.
त्या मुलीची हुशारी वाटू लागल्यानंतर आंम्ही पुढे निघालो.
कारूला पोहोचलो. तेथे एक म्युझीयम बघायचे होते. मात्र आर्मीवाल्यांकडून वेगवेगळी माहिती मिळाल्याने ते म्युझीयम पाहता आले नाही.
कारू - लेह प्रवासात रस्त्याकडेला एक मोऽऽऽऽठ्ठा वाळवटी सपाट प्रदेश असलेला पॅच लागतो.
यथावकाश लेह ला पोहोचलो.
क्रमशः
फोटो नाही हो दिसत !
फोटो नाही हो दिसत !
खूप सुर्रेख आलेत फोटो आणी
खूप सुर्रेख आलेत फोटो आणी वर्णन ही अगदी वाचनीय...सुपर्ब!!!
जुलै !!!!!
जुलै !!!!!
पेंगोंग लेकमधे माझा लेक !
पेंगोंग लेकमधे माझा लेक !
निवांत वाचूया म्हणून ठेऊन
निवांत वाचूया म्हणून ठेऊन दिला होता. आज मस्त फोटो एंजॉय करत वाचला.
मस्त! प्रत्येक भागाला नविन विशेषणे कुठून आणणार ?
निळाशार पँगाँग लेक फार भन्नाट
निळाशार पँगाँग लेक फार भन्नाट दिसतो... तुम्हाला वाटेत मरमूद नाही का दिसले.. मुंगसासारखे दिसतात ते प्राणी?
मस्त वर्णन आणि फोटोज !
मस्त वर्णन आणि फोटोज !