थायलँड च्या सहलीला प्राथमिकता देणार्या भारतीयांची संख्या बरीच वाढलीये हल्ली आणी त्यामुळे भारतात ही थाय जेवण लोकप्रिय झाले आहे. इथे थाय जेवण बनवण्याकरता लागणारे जिन्नस सहज उपलब्ध असल्याने अस्सल चवीचे थाय फूड घरीच करता येते.
तर आता या डिश करता लागणारे साहित्य जमवू
१) १/३ कप फिश सॉस( फिश सॉस आवडत नसल्यास कोणताही डार्क सोया सॉस चालेल)
२) अर्धा कप साखर किंवा पाम शुगर
३) अर्धा कप चिंचेचा घट्ट कोळ
४) ४,६ लसणाच्या कळ्या वाटलेल्या
५) ४ औंस वाळक्या राईस स्टिक्स ( भारतात रिअल थाय या ब्रँड चे पॅक मिळते)
६)२ टेबल स्पून तेल
७) १ कप उभे पातळ काप केलेला कांदा
८) दीड कप बोनलेस चिकन च्या पातळ स्लाईसेस
९) १ अंड
१०) १ कप गाजराचे आगपेटीच्या काड्यांसारखे केलेले पातळ काप
११) १ कप कांद्या च्या पातीचे अर्धा इन्च लांबीचे तिरके काप
१२) १ कप हिरव्या मुगाचे लांब स्प्राऊट्स
१३) १ कप उभी ,पण बारीक चिरलेली पाक छॉय ची पाने
१४) १ कप भाजलेल्या दाण्यांची भरड पूड
१५) लिंबाच्या फोडी
१६) ५,६ लसणी च्या पाकळ्या चिरून
१- एका लहान पातेल्यात फिश सॉस किंवा डार्क सोया सॉस , लसणाची पेस्ट, चिंचेचा कोळ आणी साखर एकत्र मिसळून उकळत ठेवा. साखर संपूर्ण विरघळली पाहिजे. गॅस बंद करा. थोडा तिखटपणा आवडत असल्यास थाय मिरच्यांची पूड अॅड करा.
२) नूडल्स ना ४,५ मिनिटे उकळा. लगेच चाळणीत घालून थंड पाण्याखालून काढा. नूडल्स शिजवताना पार शिजवू नयेत. थोडे कच्चेच हवेत. नंतर परतताना ते शिजले जातात.
३) एक टेबल स्पून एका पसरट कढईत तापत ठेवा. त्यात चिकन चे पीसेस घालून हाय फ्लेम वर परता. चिकन ५,६ मिनिटात शिजेल. ते वेगळ्या बोल्मधे काढून ठेवा.
४) त्याच कढईत उरलेले १ टेबलस्पून तेल गरम करा.त्यात लसणाचे काप लाल होईस्तो परता. लाल होत आले कि त्यावर कांद्याच्या स्लाईसेस परता. आता तयार करून ठेवलेले सोया सॉस मिक्शचर घाला . थोडे परतल्यावर लगेच नूडल्स आणी चिकन परता. नीत परतल्यावर कढईच्या एका बाजूला सारून उरलेल्या जागेत एक अंड फोडून घाला. ते भरभर परतल्यावर त्यावर चिरलेल्या भाज्या घालून हाय फ्लेम वर एक, दोन मिनिटे
परता.
वरून कोथिंबीर आणी भाजक्या शेंगदाण्याचे भरड कूट शिवरून गरम फात थाय सर्व करा.
आवडत असल्यास फात थाय वर लिंबू पिळून घ्या.
१) चिकन ऐवजी प्रॉन्स घेऊ शकता
२) नूडल्स थंड पाण्यातून काढून पूर्ण निथळले कि १ चहाचा चमचा तेल लावून ठेवा, म्हंजे नूडल्स चिकटत नाहीत.
३) मला गाजराचा गोडपणा आवडत नसल्याने मी पाक छॉय घेतले आहे.
४) सॉस मधे मी फिश सॉस ऐवजी सोया सॉस वापरलेय आणी साखर अजिबात घातली नाहीये.
५) चिंचेचा कोळ पुरेसा आंबटपणा आणतो या डिश ला, तरी आवडत असल्यास वरून लिंबू पिळून घ्यावे.
रेसेपी मस्त, याचा योग्य
रेसेपी मस्त, याचा योग्य उच्चार सांगितल्याबद्दल लैच धन्यवाद. आम्ही काय तर पड थाय, पाड थाय म्हणायचो![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पिकासा वेब अल्बम बंद
पिकासा वेब अल्बम बंद झाल्यामुळे फोटो अपलोड करण्यात अडचण येत आहे.. दिलेल्या लिंक वर क्लिक केले तरच दिसत आहेत फोटोज![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हेल्प समबडी!!!
श्यामली मी याहूनही भयाण
श्यामली मी याहूनही भयाण उच्चार ऐकलेत![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
दिसतायत ग फोटो. भयाण उच्चार
दिसतायत ग फोटो. भयाण उच्चार![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
अजून थाय रिसिपिज शेअर कर. आवडेल करुन बघायला.
अग.. आधी बर्याच लिहिल्या
अग.. आधी बर्याच लिहिल्या आहेत .. पाककृती विषयानुसार या लिंक वर जाऊन पाहा
आणी हो, वेज वर्जन हवे असल्यास पनीर चा उपयोग करा
आहा, मस्तं आहे!
आहा, मस्तं आहे!
मस्तच
मस्तच
मस्त.. आमच्याकडे रताळ्याच्या
मस्त..
)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्याकडे रताळ्याच्या मिळतात नूडल्स त्याचे करता येते. ( शुद्ध शाकाहारी व्हर्जन
स्फोटोसाठी फ्लीकर वर अकाऊंट उघड, तिथून पिकासा सारख्याच लिंक्स देता येतात. नॅव्हीगेशन थोडे वेगळे आहे, पण जमते
ओक्के..तेच ट्राय करते
ओक्के..तेच ट्राय करते आता..
वॉव रताळ्याचे नूडल्स??? चिकट नाही का होत??
बापरे आता पर्रत
बापरे आता पर्रत फ्लिकर????
वर्षू मस्तय रेस्पी. वेज वरजन् चा विचार आहे.
वर्षु ही नॉनव्हेज रेसिपी आहे
वर्षु ही नॉनव्हेज रेसिपी आहे ना? त्यात साखर? आणि ते पण तु?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अर्धे घटकपदार्थ मी आज पहिल्याम्दाच वाचले.
दक्षी,..मूळ रेस्पीत आहे ना .
दक्षी,..मूळ रेस्पीत आहे ना . साखर... तुझ्याकरताये..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वेज वर्जन ही करता येईल तुला पनीर घालून.. हाकानाका...
मी कुठे घातलीये..
मस्तच गं वर्षू.. डिश लय झ्याक
मस्तच गं वर्षू..
डिश लय झ्याक दिसुन राय्ली :)..
रताळ्याच्या स्टार्च चे
रताळ्याच्या स्टार्च चे असतात. चिकट नाही होत.
तोंपासु!!!
तोंपासु!!!
मस्त तोंपासू रेसिपी! आणि खरा
मस्त तोंपासू रेसिपी! आणि खरा उच्चारही आजच कळला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मीपण पड थायच म्हणायचे :p
थांकु दिनेश.. मॅगी धन्यवाद
थांकु दिनेश..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मॅगी
धन्यवाद सर्वांना
मस्त रेसिपी . पनीर घालून
मस्त रेसिपी . पनीर घालून करीन.
सोपी आहे. मी थाय रेड व ग्रीन
सोपी आहे. मी थाय रेड व ग्रीन करी करते ब नेहमी. ये भी करूंगी. फिश सॉसने बरोबर चव येइल.
वर्षू, हे फाड थाई एकदम
वर्षू, हे फाड थाई एकदम फाडु आहे ग..... (माझ्या उच्चारांकडे दुर्लक्ष कर, मी उगीचच ....)
रच्याकने, मलेशियाला काय खायचे याबरोबर तुझ्याकडुन काय घ्याय्चे याच्या टिप्सही मी घेणार आहे. तुझ्या रेसिपी एकदम फाडू असल्या तरी रेसिपीतले जिन्नस इथे ज्या भावाने मिळतात ते भाव खिसा फाडणारे असतात. त्यापेक्षा थोडे तिथुनच आणुन काही दिवस तुझ्या रेसिपींचा आनंद घेईन.
हो अमा.. माझी लेक फिश सॉस
हो अमा.. माझी लेक फिश सॉस च्या बिना खात नाही.. एन्हांस होते टेस्ट फिश सॉस मुळे (म्हणे
)
साधना..( उच्चाराकडे दुर्लक्ष केलंय बरं..
)ऑलरेडी तुझ्या धाग्यावर मलेशिअन फूड्स ची लिस्ट दिलीये.. हां कुकिंग करता लागत असणारे इन्ग्रेडिएंट्स ची सूचि तिकडेच देते..
फाड थाई >> खिखि ... पण pad
फाड थाई >> खिखि ... पण pad चा उच्चार फात करतात तर स्पेलिंग असे का केले काय की. उगाच आम्ही पामरं गोंधळतो मग.
सुनिधी कधीतरी इंग्लिश चायनीज
सुनिधी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कधीतरी इंग्लिश चायनीज उच्चार लिहीन.. उदाहरणार्थ- ते लोक्स D ला त, तर Q ला छ्वी असं वाचतात..
P चा उच्चार मात्र नेहमी फ असाच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)