वेटलिफ्टींग (रिओ ऑलिंपिक्स)

Submitted by Adm on 7 August, 2016 - 16:52

रिओ ऑलिंपिक स्पर्धेतल्या वेट लिफ्टींगच्या सामन्यांबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.. ... ..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिम्सकूल | 7 August, 2016 - 12:41

काल भारतीय वेट लिफ्टर मेडल जिंकण्याची संधी असणारी होती पण क्लीन अँड जर्क मधे तिन्ही प्रयत्न वाया गेले.. गोल्डचा प्रयत्न करण्यात बाकीची मेडल्स पण दुरावली..

आज महिलांच्या ५३ किलो वजनी गटात तैपेईच्या शू ने सुवर्ण पदक जिंकलं.
ती एकदम सहजपणे वजनं उचलत होती. कांस्यपदक विजेत्या कोरीयन स्पर्धक यून हीला दोन मुलं आहेत. तिने बिजिंगच्या स्पर्धेत मेडल मिळवलं होतं. मग बाळंतपणांमुळे तिने खेळ सोडला आणि आता परत येऊन पुन्हा मेडल मिळवलं !!
ह्या स्पर्धेत चिनी स्पर्धक लि स्नॅच नंतर आघाडीवर होती. (१०१ किलो) पण तिची एकंदरीत वजनं उचलायची पद्धत बघता ती 'अमानवीय' प्रकारातली वाटत होती!! Uhoh क्लिन अँड जर्कमध्ये तिनही वेळी तिने तब्बल १२५ किलो उचलायचा प्रयत्न केला आणि न जमल्याने तिचं मेडलं गेलं.. एकंदरीत ती विचित्र वाटत होती. जिंकली नाही ते बरच झालं.