Submitted by Adm on 7 August, 2016 - 16:22
रिओ ऑलिंपिक्स मधल्या पुरूष आणि महिलांच्या सामन्यांबद्दल चर्चा करण्यासाठी.. ...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पराग | 6 August, 2016 -
पराग | 6 August, 2016 - 21:12
भारताचा हॉकीअ पहिला विजय! ३-२ विरूद्ध आयर्लंड.
चौथ्या क्वार्टरमध्ये आयर्लंडने जोरदार प्रयत्न केले. एक गोल करुन पिछाडी कमी केली. पण वेळ कमी पडला त्यांना. पेनल्टी कॉर्नर घेताना आपली बचावफळी जरा घोळ घालत होती असं वाटलं.
भाऊ नमसकर | 6 August, 2016 -
भाऊ नमसकर | 6 August, 2016 - 21:28
हॉकी - आयर्लंड सारख्या संघाविरुद्ध जरी ३-२ हा कमी फरकाचा विजय असला तरीही भारताची बचावफळी व फॉर्वर्डस पुढील सामन्यांत याहूनही खूप बरी कामगिरी करतीलच असा विश्वास देणारा आजचा त्यांचा खेळ होता. सामना रंगतदार झाला. फिल्ड गोलचा अभाव मात्र खटकला.
स्टार स्पोर्टस वरची सामन्याची कॉमेंटरी फारच आवडली.
भाऊ नमसकर | 7 August, 2016 -
भाऊ नमसकर | 7 August, 2016 - 21:10
भारताच्या महिला हॉकी संघाने जापानला छान लढत दिली; दोन गोल्सने पिछाडीवर असूनही २-२ असा सामना अनिर्णित ठेवून एक पॉइंट मिळवला. जपान व विशेषतः भारताची गोलकीपर [सविता] या दोघानीही गोलकिपींगचं उत्तम प्रदर्शन घडवलं. महिला संघाला पुढच्या कठीण सामन्यांसाठी शुभेच्छा.
दिपा कर्माकार आज रात्री १०.५५ वाजतां आपली कमाल दाखवेल, असं आत्ता हॉकी समालोचकाने सांगितलं. पहाणं आलंच !
महिला हॉकीची मॅच मी पण
महिला हॉकीची मॅच मी पण पाहिली. भारताच्या खेळाडूंनी २-० पिछाडीवरून चांगला खेळ करत बरोबरी साधली. आघाडीच्या खेळाडूंमधला समन्वय तर पुरूषांपेक्षा चांगला वाटला. आपली गोलकिपर खूपच भारी डिफेन्स करत होती. विशेषतः शेवटच्या क्वार्टरमध्ये!
Filmy | 7 August, 2016 -
Filmy | 7 August, 2016 - 22:59
वुमेन्स हॉकी टीम चांगलीच खेळली. स्पार्क दिसतोय. चमत्काराची अपेक्षा ठेवायला हरकत नाही.
आज [सायं. ७.३०] गतविजेत्या
आज [सायं. ७.३०] गतविजेत्या जर्मनीविरुद्ध भारत आपला खेळ किती उंचावतो, यावर स्पर्धेतील आपल्या अपेक्षा बांधता येतील. भारत जिंकण्यासाठी प्रार्थना पण जर्मनीविरुद्ध भारताने सामना अनिर्णित राखला तरी संघाचा आत्मविश्वास दुणावेल,
आपले 'विंगर्स' वेगवान आहेत पण आक्रमण बव्हंशीं डाव्या बगलेकडूनच होतं, असं जाणवलं. जर्मनीचा अभेद्य बचाव भेदायला दोन्ही बाजूनी आक्रमण होणं आवश्यक असावं. जर्मनी विरुद्धच्या सामन्यात धसमुसळेपणा होण्याचीही शक्यता असतेच; कप्तान सरदारने आपलं डोकं शांत ठेवणंही महत्वाचं. शुभेच्छा !
महिला संघाला पण ब्रिटनचं मोठ्ठ आव्हान आजच पण सामना रात्रीं खूप उशीरां. ह्या महिला संघाकडून खूपच अपेक्षा वाढल्या आहेत. << चमत्काराची अपेक्षा ठेवायला हरकत नाही.>> +१ व शुभेच्छा.
]
अॅडमीन आणि भाऊ ))))) +100
अॅडमीन आणि भाऊ ))))) +100
मस्त गोल मारला.. जर्मनीच्या
मस्त गोल मारला.. जर्मनीच्या विरुद्ध १-१ बरोबर. अजून बराच वेळ आहे पण .
नरेश माने , ते अडमीन नसून अडम
नरेश माने , ते अडमीन नसून अडम आहे . अडम म्हणजे कोण ते परागला विचारावं लागेल
ह्या ऑलिंपिकच्या वेळा काही सूट होत नाहीयेत . आता मी ऍप डाऊनलोड करून घेणारे .
भारत जर्मनीवर दबाव टाकतोय,
भारत जर्मनीवर दबाव टाकतोय, हें पाहून बरं वाटतंय. दोन्ही विंगर्स खूप वेगाने चेंडू जर्मनीच्या गोलकडे नेताहेत, पासींगही चांगलं आहे. खेळ तर सुंदरच चालला आहे. जर आपले खेळाडू न थकतां याच वेगाने खेळले तर .... !
भाऊ, अनुमोदन आणि आमेन !!!
भाऊ, अनुमोदन आणि आमेन !!!
जाई.
दोन सेकंद उरले असताना
दोन सेकंद उरले असताना जर्मनीने गोल केला
जर्मनीने शेवटच्या सेकंदात गोल
जर्मनीने शेवटच्या सेकंदात गोल करुन सामना जिंकला. पण आज भारताचा खेळ अप्रतिम झाला व बर्याच वेळां हा संघ जर्मनीपेक्षा सरस वाटला. मुख्य म्हणजे शेवटपर्यंत न थकतां भारतीय खेळाडूनी वेगवान व समन्वय साधत खेळ केला. या संघाकडून मोठ्या अपेक्षा बाळगणं अगदीं रास्त होईल. कीप अप, इंडीया !
निव्वळ नशीब
निव्वळ नशीब
शेवट चांगला नाही झाला पण
शेवट चांगला नाही झाला पण सामना मस्त एकदम!
अरे काय ते नशीब. कुणाला
अरे काय ते नशीब.
कुणाला पोलंडविरुद्धचा सामना आठवतोय का? बहुतेक २००० ऑलिम्पिक्समधला. धनराजचा शेवटचा सामना. आपण आघाडीवर होतो आणि शेवटल्या मिनिटाला पोलंडने बरोबरी केली. त्यामुळे पोलंडचा काहीच फायदा होणार नव्हता मात्र आपण पुढच्या फेरीत गेलो नाही
इतका छान खेळ करूनही असं होणं
इतका छान खेळ करूनही असं होणं हें भारताचं दुर्दैव हें खरंय पण त्यामुळें << ... मात्र आपण पुढच्या फेरीत गेलो नाही >> असा त्याचा परिणाम होणार नाहीय हें नशीब !. गतविजेत्या जर्मनी विरुद्धच्या खेळामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास [ व आमचा त्यांच्याबद्दलचा विश्वास ] दुणावला असेल यांत शंका नाही. !
महिला संघ बलाढ्य ब्रिटनविरुद्ध ३-० ने हरला. आपल्या संघाने एखादा गोल तरी केला असता तर बरं वाटलं असतं . तरी पण ठीक आहे. चांगलं हॉकी खेळताहेत. लढते रहो !
काल हॉकी टीमसाठी बॅड लक होतं
काल हॉकी टीमसाठी बॅड लक होतं
चला, अर्जेंटिना विरुद्ध
चला, अर्जेंटिना विरुद्ध जिंकलो २-१ ने. आता ७ गुण ३ सामन्यातून झालेत. कॅनडा विरुद्ध जिंकलो तर १० होतील आणि आपण उप-उपांत्यफेरीत पोहचू. पण दुसर्या नंबरसाठी प्रयत्न करायला हवा नेदरलँडला हारवून.
<< अर्जेंटिना विरुद्ध जिंकलो
<< अर्जेंटिना विरुद्ध जिंकलो २-१ ने. >> अरेरे, मला चुकली ही मॅच ! क्रिकेटच्या टेस्टमुळे लक्षांत नाही आलं. हायलाईटस केंव्हां व कुठे दाखवतात ? अभिनंदन !
अर्जेंटिना विरुद्ध जिंकलो २-१
अर्जेंटिना विरुद्ध जिंकलो २-१ ने.
>>>>>>> येस्स , हिप हिप हुर्रे !
हिप हिप हुर्रे ! 3 cheers
हिप हिप हुर्रे ! 3 cheers
मी अगदी थोडी पाहिली. पण मस्त
मी अगदी थोडी पाहिली. पण मस्त खेळत होती आपली टीम.
अटलांटा ऑलिंपीकमध्ये पहिल्याच सामन्यात अर्जेंटीनाने आपल्याला हरवलं होतं. त्याची थोडीफार परतफेड म्हणायला हरकत नाही. तेव्हा मी अगदी पहाटे ४ ला वगैरे उठून मॅच पाहिली होती.
अरे शेवटच्या क्वॉर्टर मधे
अरे शेवटच्या क्वॉर्टर मधे नाकी नऊ आणले होते आर्जेंटीनानी.. सुदैवानेच जिंकलो.. अन्यथा बरोबरी फिक्स होती.. श्रीजेश ने दोन सेव्ह मस्त केले..
श्रीजेश ने दोन सेव्ह मस्त
श्रीजेश ने दोन सेव्ह मस्त केले.. >>> हो... ४थ्या क्वाटरच्या शेवटच्या दहा मिनिटांत सलग ३ की ४ पेनल्टी कॉर्नर मिळाले अर्जेनटिनाला आणि ते सगळे परतवले.. ग्रेट!
टिम स्पिरीट इज हाय... चक दे!
<< श्रीजेश ने दोन सेव्ह मस्त
<< श्रीजेश ने दोन सेव्ह मस्त केले.. >>> तो खरंच मोठा आधारस्तंभच आहे या संघाचा. जर्मनीविरुद्धच्या सामन्यातही त्याने खूप चांगली कीपींग केली. शेवटच्या क्षणीं जर्मनीने केलेल्या गोलनंतर तो सुन्न होवून बराच वेळ गोलमधेच डोक धरून बसला होता. लक्ष्मण [ज्याची त्याच्या केवळ निवृत्तीनंतरचीच अप्रतिम कीपींग मला पहायला मिळाली व जो मराठी होता ], सेड्रीक परेरा, इ.इ. अनेक अफलातून गोलरक्षकांची आपली उज्वल परंपरा आहे व त्यांत श्रीजेश चपखलपणे बसतो असं जाणवतं.
आपल्या या संघाचा खेळ व संघाची देहबोली खूपच आश्वासक आहे. भारताला हॉकीच्या सुवर्णयुगाकडे परत नेणार्या मार्गातला 'ऑलिंपिक २०१६' हा महत्वाचा मैलाचा दगड ठरो, ही प्रार्थना !
हॉलंड विरुद्धची मॅच
हॉलंड विरुद्धची मॅच महत्त्वाची आहे.. ती जर व्यवस्थित पणे पार पडली तर मग मजा येईल.. ड्रॉ किंवा कमीत कमी गोल फरकाने हार. जिंकण्याची अशा करतच नाहीये मी..
<< ड्रॉ किंवा कमीत कमी गोल
<< ड्रॉ किंवा कमीत कमी गोल फरकाने हार. जिंकण्याची अशा करतच नाहीये मी.. >> जर जर्मनीविरुद्ध कसलाही काँप्लेक्स न बाळगतां हा भारतीय संघ आक्रमक व प्रभावी खेळ करूं शकतो तर हॉलंडविरुद्ध कां नाहीं करणार ? उलट, जर क्वार्टर फायनलसाठी स्थान निश्चित झालं असेल, तर भारताने हॉलंडविरुद्ध आपले सगळे डांवपेंच उघड करायचीही गरज नसावी. [ प्रत्येक ग्रुपमधून सहापैकी चार संघ क्वार्टर फायनलला जाणार आहेत ].
लेडिज मधे पहिल्या हाफ नंतर
लेडिज मधे पहिल्या हाफ नंतर भारत ० - २ पिछाडीवर.. ऑस्ट्रेलिया विरुद्ध.
भारतीय महिला हरल्या
भारतीय महिला हरल्या
Pages