Submitted by ववि_संयोजक on 31 July, 2016 - 12:14
वविकर्स,
इथे वविविषयक आपले वृत्तांत आणि प्रतिक्रिया टाकाव्यात.पहिल्यांदा वविला आलेल्यांनी तर जरूर आपले अभिप्राय दयावेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा म्हणतात वृतांत चला आता
हा म्हणतात वृतांत
चला आता बाकीच्यांनी लिहा भराभरा. उगाच "लतिफ" च्या मागे लागू नका
मस्त वृ दक्षे!
मस्त वृ दक्षे!
मस्त ग दक्षिणा!
मस्त ग दक्षिणा!
दक्षिणा, मस्त वृत्तांत
दक्षिणा, मस्त वृत्तांत
वविमधले मला भावलेले किंवा
वविमधले मला भावलेले किंवा उल्लेख करावेसे वाटणारे काही -
संयोजक टीममधील एकांचा पाय मुरगळलेला, एकांना रात्रीतून ताप, एकांचं छोटं पिल्लू अचानक तापानं फणफणलं.... असं असूनसुध्दा हे सर्वजण कसलीही कुरकूर न करता, आव न आणता वेळेत पोचले, संयोजनाची कामे केली.
पवना हट्सपर्यंतचा प्रवास अतिशय आल्हाददायी वातावरणात व धमाल पिकनिक मूडमधे
नाश्ता रूचकर व गरमागरम. सोबत गवती चहा घातलेला वाफाळता चहा. बाहेर ओला गारठा, सरीवर सरी, बोचरा वारा. चुलीवर अन्न शिजवताना येणारा खरपूस वास.
स्वच्छ रिसॉर्ट परिसर, मोकळी हवा, बेसिक परंतु समाधानकारक सोयी, घरगुती व्यवस्था, पाण्याचे स्वच्छ तलाव. कोठेही दुर्गंधी, कचऱ्याने दुथडी भरून वाहाणारे खड्डे / कचरापेट्या नाहीत.
गरम, ताजे, चविष्ट जेवण. तेलकट, अति मसालेदार पदार्थ नाहीत.
बर्मा वॉक, ट्रँपोलिन किंवा पाण्याच्या तलावात आपल्या पिल्लांसोबत इतर पिल्लांकडेही लक्ष देणारे वविकर.
पुण्याहून पहिल्यांदाच वविला येणाऱ्या व ऑल द वे दुचाकीवर आलेल्या दोघी वविकरणी
पाऊस, डुंबाडुंबीनंतर गारठलेले व सायं चहाला जरा उशीर झाला तरी न कुरकुरता चहाची सैराटून वाट बघणारे वविकर.
निघताना झालेल्या गळाभेटी, वर्षानुवर्षांची ओळख असल्यागत वावरणारे वविकर
बैलगाडीत बसणे, बैलांसोबत फोटोंवरून उडालेले हास्यफवारे
मडबाथनंतर चेहऱ्यावर स्वप्नवत, गुळगुळीत भाव घेऊन हिंडणारे वविकर
तलावाच्या बर्फाळ पाण्यात डुंबून बाहेर आल्यावर पब्लिकची जमलेली कुल्फी
दोन व चार फूट पाण्यात कयाकिंग करताना विश्वचषक स्पर्धेला लाजवेल असे पोझिंग व जल्लोष.
दक्षे भारी लिव्हलस !
दक्षे भारी लिव्हलस !
दक्षिणा , मस्त लिहिलयस !!!
दक्षिणा , मस्त लिहिलयस !!!
दक्षे, १ नंबर!!
दक्षे, १ नंबर!!
दक्षे वेगळा बाफ काढ.
दक्षे वेगळा बाफ काढ.
दक्षे, वृत्तांत लैच मस्त lc
दक्षे, वृत्तांत लैच मस्त
lc तू खुपच बारकासा वृ लिहिलाय्स तुझ्यासारखाच
अकु, सगळे फोटोज सुरेख
दक्षिणा, धमाल वृत्तांत अकू,
दक्षिणा, धमाल वृत्तांत

अकू, तुला भावलेलं तुझ्या क्षणचित्रांसारखंच सुंदर
सुप्रिया तु पण लिही प्लिज
सुप्रिया तु पण लिही प्लिज वृत्तांत ते पण सविस्तर.
मस्त वृ दक्षिणा! वविचा वृ
मस्त वृ दक्षिणा! वविचा वृ वाचल्यासारखं वाटलं!
दक्षे, ह्याला म्हणातात
दक्षे, ह्याला म्हणातात वृत्तान्त! जाउन पाहाव का पुढल्या वर्षी अस क्षणभर वाटलच!
मस्तं वृत्तांत
मस्तं वृत्तांत दक्षिणा!
<<त्यांचे अनुभव विचारायचे होते पण मी काही खास करत नसून उगिचच बिझी होते त्यामुळे त्यांच्याशी बोलता आले नाही>>
कुठल्याही मोठ्या कार्याच्या मुख्य संयोजकांचे असेच असते!

दक्षे मस्त लिहीलयस हाहीहू
दक्षे मस्त लिहीलयस
हाहीहू खेळात घार्याचे एक्स्प्रेशन भन्नाटच होते
मी पण लिहू का वृत्तान्त जमेल
मी पण लिहू का वृत्तान्त जमेल तसा?
मध्येमध्ये बोल्ड करून, ग्रह
मध्येमध्ये बोल्ड करून, ग्रह तारे नक्षत्र इत्यादी शब्द न वापरता लिहिलंत तरी चालेल.

आणि एकदाच काय ते लिहा.
शंभरदा एडिटू नका!
हाहीहू खेळात घार्याचे
हाहीहू खेळात घार्याचे एक्स्प्रेशन भन्नाटच होते हाहा
>> सविस्तर उत्तरे लिहा.
मी पण लिहू का वृत्तान्त जमेल
मी पण लिहू का वृत्तान्त जमेल तसा?>>>> तत्पुर्वी चिखलातले फोटो मेल कर
>>> मध्येमध्ये बोल्ड करून,
>>> मध्येमध्ये बोल्ड करून, ग्रह तारे नक्षत्र इत्यादी शब्द न वापरता लिहिलंत तरी चालेल. <<< साती...
मला वेळ लागेल नीट पणे लिहायला, तोवर बाकिच्यांचे येऊदेत.... ! कार्याध्यक्षांची सविस्तर टीपण्णी अजुन आली नाहिये... ती येऊदे.
नीलवेद, बाबु, मालक, घारू अजुन लिहिते झाले नाहीयेत.. त्यांनी लिहुदे... (त्यांच्याकडे(च) बराच मसाला असणार आहे)
वृत्तांत आणि फोटो मस्तच, अजुन
वृत्तांत आणि फोटो मस्तच, अजुन येऊ दे
वृत्तांत मस्त आहेत. हाहीहू
वृत्तांत मस्त आहेत.
हाहीहू धमाल होता खेळ. घारूचं तोंड फिक्स झालं होतं तो खेळ संपल्यावरही कितीतरी वेळ. तोंड तसंच ठेवण्याचे प्रयत्न करताना घारूचे डोळे अर्धोन्मिलीत होत होते :हाहा:. मी आणि नील न हसण्याची पराकाष्ठा करत असताना आमच्या मागे आंदू (आनंद केळकर) आणि अम्या (बागुलबुवा) उभे राहून कमेंट्स करत होते आम्हाला हसवण्यासाठी. हसू येतंय वाटलं की नील त्याचे आधीच मोठे असलेले डोळे अजून ट्यॅवकन मोठे करुन माझ्याकडे बघत बसायचा. अश्याने मी हसले आणि फसले ना!

राखी, मल्ली आणी अकुने हा खेळ मस्त घेतला.
दक्षुतै.. मस्त वृतांत!!
दक्षुतै.. मस्त वृतांत!!
भारी वृत्तांत
भारी वृत्तांत
मला वेळ लागेल नीट पणे
मला वेळ लागेल नीट पणे लिहायला, तोवर >>>>>>
तोवर पुढचा ववि यायचा!
दक्षिणा, मस्त वृत्तांत
दक्षिणा, मस्त वृत्तांत
सगळ्यांचे वृतांत मस्त!! खूपच
सगळ्यांचे वृतांत मस्त!! खूपच धमाल केलीय सगळ्यांनी.
दक्षिणाचा स्पेशल वृतांत स्पेशली आवडला
सगळे फोटो एकदम छान
कविनच्या 'वेळ पा़ळणे' पोस्टशी सहमत.
काही काही व्यक्तींमत्वांना
काही काही व्यक्तींमत्वांना अचाट गुरुत्वाकर्षणाचे वलय लाभलेले असते की जे कोणी त्यांच्या कक्षेत
येईल ते हमखास आकृष्ट होईल ! होय, दक्षिणाबद्दल बोलते आहे मी....तिचा माबोवरचा उत्साहाने ओथंबलेला वावर ....रंगीबेरंगी फुलपाखरू उड़ताना लांबून पहावे तश्या विविध धाग्यासोबत येणाऱ्या तिच्या कमेंट्स मी आवर्जुन वाचत असते, तर ते एक असो ! तिच्या नावावर अख्खा धागा पाहून मी वाचत सुटले नि खुप वर्षांपासून मनात रुंजी घालत असलेली वविला जायची सुप्त इच्छा उसळी मारून वर यायला लागली. (परग्रहावरचे लोक कसे असतात हे एकदा जाणून घ्यायचे होते माबोकरांना प्रत्यक्ष भेटून ...दिवा घ्या दिवा )
एका संध्याकाळी तिला फोन करून , फोन करण्याच प्रयोजन सांगितल... मॅडम उडालेल्याच (हा आमचा पहिलाच संवाद) मात्र अडचण अशी होती की 24 तारखेला संध्याकाळी नेमका मुशायरा असल्याने मी पैसे भरायला जावू शकत नव्हते. त्यावर तोडगा काढत ती म्हणाली ओके सुताई मी भरते सध्या त्या दिवशीच दे ....मात्र नक्की काय ते सांग ! तितक्यात 31 तारखेला सासवडच्या मुशायर्याचे आमन्त्रण आले...इकड़े आड़, तिकडे विहीर अश्या अवस्थेत तिला पुन्हा कळवले की नाही ग कॅन्सल होते आहे माझे येणे. ती म्हणाली ओके ! तुला जिथे जास्त कंफरटेबल वाटते आहे तिथे जा सुताई (भारी समजुतदार पोर !) मध्यंतरीचे दिवस गोव्याच्या काव्यहोत्रमधे धावपळीचे गेले...परतले तर कळले की 31 चा मुशायरा 18 ऑगस्टला होतो आहे. परत 24 ला फोनाफ़ोनी झाली आणि फाइनली वविला जायचे पक्के झाले.
30 ला घरचा मोठा कार्यक्रम होता...घरभर पाहुणे....रात्री 1 ला झोपलेली पहाटे 5.30 ला उठून 7.10 ला विवाच्या स्टॉपवरून मल्याला कॉल कैला की हायवेच्या साईडला थांबले आहे. तो म्हणाला आत्ता येताय की जाताना कलेक्ट करू ? (हा ही ऑप्शन होता ते तेव्हा समजले ) मी म्हंटल थांबलेय मी, येते आहे आत्ताच ! 15-20 मिनिटांत सांगितलेल्या नंबरची बस माझी दखलही न घेता तड़क निघून गेली. मल्यांला फोन करेतो त्याचा आलाच... पळत पळत चंदणीचौकात बशीत बसले एकदाची ! ज्यात ऑलरेडी शुभांगी कुलकर्णी ( जिचा माझ्यासारखा पहिलाच ववि होता. )ओवी-कविता-केदार, मल्या आणि त्याचा मुलगा विराजमान झाले होते. मजल दरमजल करत किनारा, किमया, सिंहगडच्या स्टॉपवर गाड़ी ऑलमोस्ट भरत आली. सईने आणलेल्या पेटिस आणि गजर्याच्या वासाने बस दरवलुन गेली होती.आईच्या पुतळ्यावर मात्र थांबून थांबून कुल्फी झाली ! चांदणी चौकात श्यामली चढ़ली ...टोटल 55 डोकी गप्पा, भेंडयामध्ये अशी रंगली की रिसॉर्टवर केव्हा पोहोचलो समजलेच नाही. हिरवे हिरवे ढगांनी अच्छादलेले डोंगर...स्वच्छ, मोठा फुलझाडांनी डवरलेला परिसर, ससे, बदक, बैलगाड़ी, तळ्यातली कमळ, कौलारू झोपड्या, डोलणारी शेते आणि रिमझिमता पाऊस ! ववि चे नाव सार्थ करून जात होता.आमच्या आधीच आलेले मुंबईकर वाटच पहात होते...गळाभेटीचा कार्यक्रम आवरता घेत कपडे बदलून आलो गरमागरम उप्पीट आणि प्रसादाने संगीतलेल्या निबंधात्मक सूचना लक्षात ठेवत हुंदडायला सुरवात केली.
कृत्रिमरीत्या तयार केलेल्या झुलत्या पुलावरून सैरसपाटा मारणे हा एक रोमहर्षक अनुभव होता वरकरणी नाजुक वाटत असलेला हा पुल प्रत्यक्षात मात्र बराच दणकट होता. एकाचवेळी अनेक अजस्त्र प्राणी तो लिलया पैलतिरी पोहचावत होता. नैसगिक तलावातला नौकाविहार करताना लहान-मोठ्यांच्या उत्साहाला नुसते उधाण आलेले होते. एकूण 3 नावा आणि एक स्वयंचलित बोट असा जामानिमा असलेल्या कमरेपर्यन्त पाणी असलेल्या तलावात बोटिंगसाठी रांग लागलेली होती. काही काही बोटी मध्यावर गेल्यावर अचानक उलटत होत्या. तिथेच रंगलेला मायबोलीकरांचा वॉटर पोलो नौकाविहाराला काट मारत असे...कधी कधी त्या नावा एखाद्या निर्जन बेटावर अडकलेल्या जहाजांनप्रमाणे एखाद्या कोपर्यात अडकून बसत मग वल्हे वापरून त्या परत पाण्यात ओढल्या जात किंवा एखादा पोलोप्लेयर त्या ओढून मार्गस्थ करून देत असे. शेजारच्याच लहान मुलांच्या तलावात वॉटर स्लाइड्स होत्या त्यामधेही त्यांच्या बरोबरीने मोठ्यांनी वर्णी लावलेली होती. इथे मात्र बच्चे कंपनी मोठ्यांना कसे खेळायचे ह्याचे धड़े देत होते.
मनसोक्त डुंबून झाल्यावर मडबाथ घेणाऱ्यांपाशी रेंगाळलो. त्यांचा हैदोस बघण्यासारखा होता. ओले कपडे बदलून होईतो पोटात भुकेचे कावळे ओरडायला सुरवात झालेली. मुलांची पंगत उठता उठता मोठ्यांची सुरू झाली होती. ओवीला भरवता भरवता हैराण झालेली कविता आणि आम्ही काहीजणींनी एकत्रच जेवण केले. गरम-गरम भाकरी पिठल कांदा, छोले, वरण-भात, शिरा...अफलातून ! जेवणानन्तर फोटो सेशन सुरू झाले तेव्हा मात्र कळत नकळत नवे-जुने मायबोलीकर असे ग्रुप पडल्या गेलेले जाणवले. (इतना तो चलता ही है ! )
सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांची रंगीत खुर्ची जाम रंगली...मोठ्यांचा हाहूही सुध्दा !!
ओळखपरेड झाली मात्र....एकतर इतके सारे माबो प्रथमच भेटत असल्याने आणि मुळ नाव...आय डी ह्या घोळात फ़क्त काही काही व्यक्तिच नावासकट ध्यानात राहिल्या. उरलेल्यांची ओळख करून घेण्यासाठी पुढच्या वविला नक्की येणार.
संयोजकांनी इतक्या सुरळीतपणे सर्व आयोजन केलेले होते की स्वतःच्या कुटुंबासोबत फिरताना वाटणारी सुरक्षितता शेवटपर्यन्त जाणवत राहीली.
सुप्रिया.
सुप्रियाताई, एकदाच काय ते
सुप्रियाताई, एकदाच काय ते एडिट करा बघू!
Pages