Submitted by केदार जाधव on 26 July, 2016 - 09:10
माझी बहिण स्मिता १८ ऑक्टोबरपासून तिच्या कंपनी कडून अमेरिकेत आहे . ती १६० दिवस भारतातून बाहेर असल्याने एन आर आय होत नाही आहे . तिचा इनकम टॅक्स अमेरिकेत कट होत आहेच . तिला भारतात तो इनकम दाखवावा लागेल का ? नेट वर बराच गोंधळ दिसतोय अन दोन सी ए परस्पर विरोधी सल्ले देत आहेत.
इथे बर्याच जणाना ही समस्या आली असेल म्हणून विचारतोय .
काय कराव लागेल ? अन अमेरिकेत टॅक्स भरल्याचा काही बेनेफिट मिळेल का ? (डीटीएए मुळे) ?
प्लीज कुणी मदत कराल का ? आणखी काही माहिती हवी असेल तर मी लिहिन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिला भारतात तो इनकम दाखवावा
तिला भारतात तो इनकम दाखवावा लागेल का ? >>>>>>
तुम्ही एन आर आय नसलात तर तुम्हाला "ग्लोबल" इन्कम भारतात दाखवावा लागेल. भारतात "रेसिडेन्स स्टेट्स" वर आधारीत करप्रणाली आहे. तुम्ही १८३ दिवसापेक्षा जास्त देशाबाहेर नसाल तर तुम्ही रेसिडेंट ठरता त्यामुळे तो इन्कम (जेव्हा मिळाला तेव्हा तो एक्स्चेंज रेट आहे त्यानुसार दाखवावा लागेल). तिथे भरलेला टॅक्स तशाच प्रमाणात रुपयात कन्वर्ट करुन दाखवावा त्याचे (Double Tax Avoidance Agreement) प्रमाणे वजावट घेता येइल.
थोडक्यात सांगायचे तरः
१. सगळा इन्कम दाखवावा लागेल.
२. तुमचा देय टॅक्स हा पुर्ण उत्पन्नावर असेल पण तुम्ही अमेरिकेत दिलेला (इन्कम ट्क्स फक्त) टॅक्स क्रेडिट धरता येइल. तिथे जो सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर टॅक्स कापला जातो तो धरता येणार नाही. त्याची वजावट मिळणार नाही.
२०% टॅक्स ब्रॅकेट धरत आहे.
उदा.
समजा भारतातील उत्पन्न ३,००,००० आणि अमेरिकेतील उत्पन्न ४,००,००० आहे.
संपुर्ण ग्लोबल उत्पन्न ७,००,००० आणि त्यावरील टॅक्स ६५,००० रु. देय (भारतात)
अमेरिकेत भरलेला टॅक्स ४०,०००.
भारतात भरावा लागेल तो टॅक्स (६५,००० - ४०,०००) = २५,०००.
धन्यवाद मनस्मी, अमेरिकेत
धन्यवाद मनस्मी,
अमेरिकेत भरलेला टॅक्स ४०,००० . यावर भारतात पूर्ण रिलिफ/ वजावट मिळेल का ? की काही कॅलक्युलेशन्स आहेत ?
अमेरिकेत जो w-2 मिळतो त्यावर
अमेरिकेत जो w-2 मिळतो त्यावर हे सगळे टॅक्स लिहिलेले असतात. त्यातील सोशल सिक्युरिटी आणि मेडीकेअर चा टॅक्स वगळुन बाकीचा कन्सिडर करायचा. इन्कम टॅक्स असतो त्यावर पुर्ण वजावट मिळेल.
(बेस्ट म्हणजे तुमच्या बहिणीला तेथील CPA - शक्यतो भारतीय असेल त्याला भेटुन चौकशी करायला सांगा..जास्त डीटेल मधे ते सांगतील.)
जर शक्य असेल तर अजुन २५ दिवस
जर शक्य असेल तर अजुन २५ दिवस परदेशात घालवा आणि NRI स्टेटस मिलवा ( जर ह्या आर्थिक वर्षात असेल तर )
धन्यवाद मनस्मी . श्री , ती
धन्यवाद मनस्मी .
श्री ,
ती आता एन आर आय आहे , पण मार्च पर्यंत नव्हती