Submitted by मया on 28 June, 2016 - 04:13
मला यातील काही माहिती तुमच्या कडून हवी आहे काही प्रश्न तुम्हाला विचारतो तसेच तुम्ही आजून काही सुचवलात तरी चालेल जेणे करून पुढे त्रास होणार नाही
१) मी फ्लॅट १ वर्षांसाठी भाड्याने देत आहे त्याचा कागद बनवून घेत आहे तो मी देईन त्यात काही खास गोष्टी नमूद करू तर सांगा.
२) माझ्या बिल्डिंग च्या आजू बाजूवाल्यानी माझ्या कडून NOC मागितली आहे पोलीस स्टेशन मधून या बाबत मला काही माहिती नाही कोणाला माहीत असल्यास सांगावे
३) बिल्डिंग चा maintenance मालक भरतो की भाडोत्री ते सांगावं
४) तुम्हाला आजून काही सुचवायचं आहे तरी सांगा म्हणजे मी काळजी घेईन
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी फ्लॅट भाड्याने दिला तेव्हा
मी फ्लॅट भाड्याने दिला तेव्हा खालील गोष्टी केल्या :
१. ११ महिन्याचा भाडेकरार
२. पोलिस स्टेशन मध्ये भाडेकरूची माहिती अर्ज सबमीट केला : हिच्या बदल्यात NOC मिळते
३. बिल्डिंग चा maintenance मालक भरतो की भाडोत्री ते सांगावं >> हे तुमच्या भाडेकरारामध्ये ज्याप्रमाणे ठरलं असेल तसं.
४. भाडेकरूची माहिती बिल्डिंग च्या सोसायटीमध्ये हि दिली.
५.. भाडेकरूचे आय-कार्ड (नोकरीच्या ठिकाणचे), आधारकार्ड, गावचा पत्ता, फोन नंबर अशी माहिति हि घेतली.
अजून काही आठवेल तसे लिहिते.
चित्रा,११ महिन्याचा भाडेकरार
चित्रा,११ महिन्याचा भाडेकरार रजिस्टर केला होता का? karaavaa laagato kaa?
@ देवकी रु. १०० पेक्षा जास्त
@ देवकी रु. १०० पेक्षा जास्त असलेला कोणताही व्यवहार (pertaining to an immovable property) रजिस्टर करावा लागतो.
चित्रा,११ महिन्याचा भाडेकरार
चित्रा,११ महिन्याचा भाडेकरार रजिस्टर केला होता का? karaavaa laagato kaa?
No need. But if your doing first time better do it. (50-50 cost share kara)
मॅरेज सर्टिफिकेट काढले काय
मॅरेज सर्टिफिकेट काढले काय भाऊ??
धन्यवाद!
धन्यवाद!
11 months contract .... Don't
11 months contract .... Don't do 1 year. Increase rent after 11 months and make new contract
चित्रा,११ महिन्याचा भाडेकरार
चित्रा,११ महिन्याचा भाडेकरार रजिस्टर केला होता का? karaavaa laagato kaa?
No need. But if your doing first time better do it. (50-50 cost share kara) >> हेच केलं होतं .
आमच्या सोसायटीमध्ये ज्या
आमच्या सोसायटीमध्ये ज्या फ्लॅटमधे भाडेकरू राहतात त्या फ्लॅटचा मेंटेनन्स रुपये २००/- ने अधिक आहे.
काही मालक लोक पुर्ण मेंटेनन्स स्वत: भरतात, काही जण अर्धा अर्धा आणि काहीजण पुर्णपणे भाडेकरूवर सोपवतात.
माझ्या मते मालकाने भाड्यातून मेंटेनन्स आकारावा आणि स्वतः सोसायटीत भरावा.
जेणेकरून भाडेकरू कडून मेंटे. भरण्यात हलगर्जीपणा व्हायचा प्रश्न उरणार नाही. मेंटे देण्याच्या निमित्ताने सोसायटीच्या चेअरमन, सेक्रेटरीशी टच राहिल. भाडेकरूबाबत अधिक माहिती मिळेल.
चित्रा : तू दिलेली माहिती लाख
चित्रा : तू दिलेली माहिती लाख मोलाची होती त्याबद्दल धन्यवाद आजून काही सांगायचं असेल तर सांग
दक्षिणा : मेंटेनन्स मध्ये कुठल्या गोष्टी नमूद केल्या आहेत ते बघतो आणि ठरवतो.
सोन्याबापू : झालं सगळं इथ्ये माहिती मिळवायची आणि नंतर कामाला लागायचं
भरपूर फायदा होतो मात्र मायबोली चा
लीव्ह लायसन्सला काहीही नियम
लीव्ह लायसन्सला काहीही नियम नाहीयेत हो.
तुम्ही हवे तेवढे पैसे हापसा भाडेकरूकडून कोण तुम्हाला विचारणार नाहीये.
टॅक्स भरायचा नसेल तर अर्धे भाडे चेकने आणि अर्धे भाडे कॅश (संपूर्ण वर्षाचे एकदमच) असे घ्या.
गरजवंताला अक्कल नसते त्यामुळे तो हे ही मान्य करतोच.
अव्वाच्यासव्वा भाडे घेऊन वर परत मेंटेनन्स चार्जेस, घर सोडताना क्लिनिंग चार्जेस, सगळी बिले भरली जाईपर्यंत डिपॉझिटची अर्धी अमाऊंट अडकवणे काहीही क्लॉजेस घाला तुम्हाला कोणी अडवलेले नाही.
रजिस्ट्रेशनचा खर्चही घ्या भाडेकरू कडून.
घराला ग्रिल नाही, घरात पाणी गळतं, अमुक तमुक दुरूस्ती.. भाडेकरूला हवे तर करून घ्यावे त्याने नाहीतर रहावे तसेच. तुम्ही बोटही उचलायला बांधील नाहीत कायद्याप्रमाणे. तसा क्लॉजही घालू शकता हवा तर रजिस्ट्रेशनमधे.
परत तुम्हाला नवीन आणि मोठा भाडेकरू मिळाला कापायला आधीचे अॅग्रीमेंट संपायच्या आत तर द्या ३० दिवसांची नोटीस. ३० च दिवसांची नोटीस असंही लिहून घ्या अॅग्रीमेंटमधे. हवंतर १० च दिवसांची नोटीस असा क्लॉज लिहा. मग अजूनच सोप्पं.
लक्षात ठेवा ४ भिंतीच्या आतली जागा तुमची आहे आणि भाडेकरू हा गरजवंत आहे. त्यामुळे काहीही करा सगळं कायदेशीरच आहे.
भारतातील अपार्टमेंट भाड्याने
भारतातील अपार्टमेंट भाड्याने देण्यासाठी कोणी no broker किंवा तत्सम कंपन्यांची व्यवस्थापन सेवा वापरली आहे का? मी पूर्वी no ब्रोकर वरून भाडेकरू शोधला होता पण रजिस्ट्रेशन, Noc आम्हीच एकत्रित केले होते, .परंतु दरवेळेस फक्त घर भाड्याने देण्यासाठी भारतात येणे किंवा भारतात असतानाच्या कालावधीत भाडेकरू शोधून कायदेशीर बाबी सांभाळणे अडचणीचे होते ,no broker ने end to end management देतो असे सुचवले आहे. तरी भारताबाहेर राहून घर भाड्याने कसे द्यावे? याबद्दल काही अनुभव , सूचना असतील तर कृपया मार्गदर्शन करावे.
no broker ने end to end
no broker ने end to end management देतो असे सुचवले आहे.
>>>>
माझ्या भावाने no broker ची पेड सर्व्हिस वापरली होती. त्याला काहीही एक्सट्रा फायदा झाला नाही.
सो end to end management मध्ये काय सर्व्हिस देणार हे मेलवर कळवायला सांगा.
तसेच तुमच्या शंका, प्रश्न वगैरेसाठी रिलेशनशिप मॅनेजर वगैरे आहे की दर वेळी नव्या माणसाला त्याच गोष्टी सांगाव्या लागतील हे विचारून घ्या.
जर ज्ये ना पॉवर ऑफ ऍटर्नी घेऊन सही करणार असतील तर नो ब्रोकर काय किंवा इतर एजेंट काय आपल्या सोयीचा व्यवहार करण्यासाठी त्यांचा पार पिच्छा पुरवतात.
धन्यवाद माझेमान, या कंपन्या
धन्यवाद माझेमान, या कंपन्या एकदा पैसे घेऊन झाल्यावर आपल्याकडे किंवा ईमेल कडे लक्ष देतील असा मला पण वाटत नाही. आणि ज्येष्ठ नागरिकां ना किंवा नातलगाना त्रास होऊ नये म्हणूनच आम्ही no broker सारख्या agency चा विचार करत होतो पण मी साशंक च आहे