चिकन ब्रेस्ट बोनलेस १
कांदा १ मध्यम
कोथिंबीर मुठभर
पुदीना मुठभर
हिरव्या मिरच्या ३ - ४ (किती तिखट हवे आहे त्यानुसार)
लसूण १ लहान पाकळी
काजू मुठभर
तेल
मीठ
जिरे
तमालपत्र २
दालचिनी १ कांडी
वेलदोडे २
लिंबाचा रस
कसूरी मेथी
तर पहा काय झालं ना, फार्मर्स मार्केट परत सुरू झालं. एके दिवशी हे मस्त पुदीन्याची जुडी मिळाली. मग घरी आणून तिची चटणी करून ठेवली. मस्त झाली होती अगदी. २ दिवस आवडीने तोंडी लावायला खाल्ली. मग ती तरी टिकणार किती ना. बाहेर मिळणार्या चटणीत ते व्हिनेगर आणि प्रिझर्व्हेटिव घालतात. घरच्या चटणीत असे काहीच नव्हते. मग त्या चटणीचा सदुपयोग कसा करावा असा विचार करत असताना हे चिकन सुचले.
तर पुदीना धुवून आणि निवडून घेतले. देठं टाकून दिली. चटणीत ती चांगली लागत नाहीत. (कोथिंबीरीची देठं मात्र उपयोगी ठरतात. त्यांना खुप सुंदर वास असतो त्यामुळे त्यांचा वापर करा)
एक दोन मिरच्यांचे तुकडे करून घेतले.
लसूण पाकळी सोलून घेतली.
आता हे सगळे चविनुसार मिठ घालून मिक्सर मधून बारीक वाटून घेतले.
अशी तयार झाली एक नंबर चटणी. कंटाळा आला असेल तर हीच चटणी थोडा लिंबू रस घालून पोळीबरोबर खा आणि चिकन उद्या करू असं म्हणा
तर आमच्याकडे चटणी तयार होती. ती चटणी एका भांड्यात घेतली. त्यात लिंबाचा रस टाकला. मग त्यात चिकनचे तुकडे टाकून आर्धा तास मॅरिनेशन करता ठेवले. तेवढ्या वेळात सी आय डी चा आर्धा एपिसोड उरला होता तो पाहून घेतला. चक्क हाताने दरवाजा उघडणारा दया दिसला आणि सुडोमी झालं बरं आपलं चिकन तिकडे फ्रिज मध्ये आहे नाही का.
ते मॅरिनेशन सुरू असताना, सी आय डी संपल्यावर कांदा उभा पातळ कापून घेतला.
त्याच्या बरोबर कोथिंबीर पण थोडी कापली. देठं लक्षात आहेत ना !
मिरची पण घेतली.
मग तेल गरम केलं आणि त्यात थोडे जीरे टाकले. ते परतले की मग कांदा टाकला.
खुप लाल नाही करायचा. थोडा शिजल्या सारखं झालं की काजू टाकले.
कजू आणि कांदा परतला की त्याच्यावर मिरची आणि कोथिंबीर थोडी परतल्यासारखे केले.
हे सगळे परतलेले जिन्नस मिक्सर मध्ये पाणी घालून मस्त वाटून घेतले.
आता पॅन मध्ये परत थोडे तेल गरम केले आणि त्यावर खडा मसाला टाकला. (तमालपत्र, दालचिनी आणि वेलची)
त्याचा वास दरवळल्यावर वाटण टाकले आणि एक उकळी आणली.
मग त्यात मॅरिनेट केलेले चिकन टाकले.
वरून थोडी कसूरी मेथी टाकली.
शेवटी एक उकळी आल्यावर मीठ आणि चिमूटभर साखर टाकली.
सगळे १२ - १५ मिनीटे शिजू दिले. बोनलेस चिकनचे तुकडे किती मोठे आहेत त्यावर तुमचा वेळ अवलंबून असेल. पण खुप जास्ती शिजवू नका नाही तर चिकन कडक व्हायला लागते.
चिकन तयार होत असताना मस्त जिरा पराठे भाजले. ते भाजून लगेच ताटात आणि चिकन व पराठे पोटात
करून पहा आणि आवडलं तर सांगा !
१) हिरवं चिकन ही पाककृती आहे तिचा हिरवं कुंकू या चित्रपटाशी काहीही संबंध नाही, असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
२) सगळे जिन्नस अंदाजे आहेत, तुम्हाला आवडेल तशा प्रमाणात घ्यावेत
३) ही चिकनची पाककृती आहे पण हीच कृती वापरून हिरवं पनीर, हिरवा बटाटा करता येईल. (बटाट्याकरता तो थोडा उकडून आणि परतून घेतला तर जास्ती चांगला लागेल )
फोटु? याला 'धनिया चिकन' नाव
फोटु?
याला 'धनिया चिकन' नाव द्या
मस्त पाकृ. याला 'धनिया चिकन'
मस्त पाकृ.
याला 'धनिया चिकन' नाव द्या डोळा मारा >> सिंडरेला, एक नंबर
सी आय डी संपल्यावर कांदा उभा
सी आय डी संपल्यावर कांदा उभा पातळ कापून घेतला. >>>> सी आय डी सोडून दुसरं काही चालेल का? त्याए कृतीत काय फरक करावा लागेल?
रेस्पि इंटरेस्टींग आहे. करून बघण्यात येईल.
अरे तुझी सद्य परिस्थिती बघता
अरे तुझी सद्य परिस्थिती बघता (नुकताच बार उडलाय) तू गुलाबी चिकन वगैरे टाकशील असं वाटलं होतं.
बुवा, हिरवं चिकन खाल्ल्यानंतर
बुवा, हिरवं चिकन खाल्ल्यानंतर शाम गुलाबी होते
मस्तच आहे झटपट रेसिपी
मस्तच आहे झटपट रेसिपी (फार्मर्स मार्केट, पुदिना निवडणे, कोथींबीर देठासकट निवडून घेणे हे ह्यात धरलेलं नाही)
>> २ माणसांकरता
भूक अनावर झाली असेल म्हणून मग फोटो राहून गेले.
लगा , लगा, धनि तु तर संजु
लगा , लगा, धनि तु तर संजु कपुरच्या तोंडात मारल असं चिकनं बनवलसं.
फोटू आला आहे
फोटू आला आहे
मस्त आहे फोटो फोटो काढायच्या
मस्त आहे फोटो
फोटो काढायच्या आधी संपलं होतं ना? मग अचानक कसा काय पैदा झाला फोटू? ;))
भारीच आपण आपले ते हे आणि हे
भारीच
आपण आपले ते हे आणि हे ते घालून करून पाहाणार.
भारी दिस्तय रे.
भारी दिस्तय रे.
मस्त!
मस्त!
खास रमजान निमित्त टाकलेली
खास रमजान निमित्त टाकलेली (हिरवी) पाककृती दिसतेय

नशीब काढलं हो मुलीने.
नशीब काढलं हो मुलीने. फार्मर्स मार्केटात जाऊन पुदिना आणून निवडून, धुवून (लिहिलं नसलं तरी गृहित धरलं आहे) चटणी करणारा नवरा मिळाला.
हो ना सायो! नाहीतर आपल्याकडे
हो ना सायो! नाहीतर आपल्याकडे आम्हीच मरणार मग स्वर्ग दिसणार
अरे मस्त जमलंय की! र्म्द,
अरे मस्त जमलंय की! र्म्द, मज्जाय बॉ तुझी. आमच्या धनींनी केलेला वरण भात पण अवघड असतो खायला तेव्हा धनिया चिकन स्वतःच करना पडेगा!
पुदीन्याची चटणी ही आमच्या
पुदीन्याची चटणी ही आमच्या बायकोनीच केली होती आहो
बाकी पाककृतीत पण बरीच मदत आहे 
हो सशल, मेल्यावर स्वर्गात
हो सशल, मेल्यावर स्वर्गात चिकन आणि ते ही हिरवं असेल ह्याची ग्यारंटी काय?
मस्त.
मस्त.
>> पुदीन्याची चटणी ही आमच्या
>> पुदीन्याची चटणी ही आमच्या बायकोनीच केली होती आहो डोळा मारा बाकी पाककृतीत पण बरीच मदत आहे हाहा
नुसतंच फार्मर्स मार्केट मध्ये जाऊन पुदिना आणून निवडून धुवून रेसिपी करणारा नव्हे तर प्रेमाने जी काही मदत केली त्याचं क्रेडिट ही देणारा.
ऐसा नय करनेका फिर धनी.
ऐसा नय करनेका फिर धनी. क्रेडिट देनेका ना?
आमचे (स्वयंपाकघरातले) लवीडवी प्रयोग म्हटलं असतं तरी आम्ही चालवून घेतलंच असतं की.
तर प्रेमाने जी काही मदत केली
तर प्रेमाने जी काही मदत केली >> आं ? ही कोण आता ?
रे सिपी मस्त वाटतेय. प**, ब** वगैरे काही न घालता करणार
मस्त रेसिपी. (पण मेथी किंवा
मस्त रेसिपी.
(पण मेथी किंवा अंबाडीच्या भाजीचा फोटो चिकन म्हणून खपवायचा प्रयत्न केलेला दिसतोय. :P)
'धनिया चिकन' भारी नाव!
अरे फोटु आला की. भारी दिसतंय
अरे फोटु आला की. भारी दिसतंय चिकन. पाककृतीत खुद्द शेफनेच ब्याडवर्डटाटे घालून करा लिहिल्यानं करणं भाग आहे
भारी आहे! धनिया चिकन
भारी आहे!
धनिया चिकन
भारी दिसतंय चिकन! करून पहाणेत
भारी दिसतंय चिकन! करून पहाणेत येईल.
करून बघणार.
करून बघणार.
फोटोतल्या बोलखालचे मॅट सुंदर
फोटोतल्या बोलखालचे मॅट सुंदर आहे. ते कुठे मिळेल?
चिकन ऐवजी बटाटा आणि पुदिन्याऐवजी पालक वापरला तर जास्तच हिरवी होईल नाही.
बाईंना चिकन पण आंबाडीची भाजी
बाईंना चिकन पण आंबाडीची भाजी वाटायला लागलं दिसतंय सध्या
सिंडी, जे वाटेल ते घालून कर
म्याट बेबाबी मध्ये मिळेल - आणि पालक विथ ब** केला तर तो आलू पालक नाही का होणार
मस्त आहे. चिकन ग्रेवीत असला
मस्त आहे.
चिकन ग्रेवीत असला हिरवा रंग मला आवडतो..
चिकनचे पुदिना कबाब सुद्धा आवडतात.. शिळे जास्त चांगले लागतात
बादवे हे सुडोमी झालं काय आह? फुलफॉर्म्
Pages