रेसिपी ओरेन्ज, ब्राउन आणी पिन्क कलरची

Submitted by नीत्सुश on 17 June, 2016 - 04:17

नमस्कार,
तुमच्या सगळ्यान्च्या रेसिपी आणी टीप्स खुप छान असतात. माझ्या Jr. KG.तल्या मुलीला ओरेन्ज, ब्राउन आणी पिन्क कलरचे पदार्थ ड्ब्यात द्यायचे आहेत. (वेगवेगळ्या दिवशी). क्रुपया सुचवा.
तुमच्या सुचना उपयोगी पड्तील ह्याची खात्री आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Orange - गाजर हलवा ( पण गाजरांच्या कलरवर अवलंबुन आहे. कधी रेड पण दिसु शकतो)
Brown - व्हेज मंचुरियन ( याचा कलर परत एकदा तळण्यावर अवलंबुन आहे. पण हॉटेल्स मधे मोस्टली ब्राउन असतात. ड्राय किंवा थिक ग्रेवी असली तरी ग्रेवीमुळे तर नक्कीच ब्राउन दिसतात. )
Pink - बीटची कोशिंबीर, स्ट्रॉबेरी केक/मुस, खोबर्‍याच्या वड्या गुलाबी रंग/स्ट्रॉबेरी क्रश घालुन

Brown - नाचणीचे डोसे/लाडू/केक/खिचू
brown चणे भिजवून उकडून चाट

हैला! इडली यासाठी फार उपयोगी पडेल - वर स्मिता यंनी यांनी सुचवलंय ना, तसं मग इडली मध्ये थोडा बीटाचा रस घालून मस्त रंग येइल

खजूर रोल्स - ब्राऊन. करायला अगदीच सोपे असतात.

दह्यामध्ये बिट घातल्यावरही चांगला गुलाबी रंग येतो. मी कोशिंबीरमध्ये थोड बिट घालून दही घालते त्यामुळे सुंदर रंग येतो गुलाबी. पण दह्याचे इतर पदार्थ जसे दही बुत्ती वगैरे थोड्याश्या बिटाचा वापर करून करता येईल.

ऑरेंज कलरसाठी गाजर उपयोगी पडतीलच. पण हळद आणि थोडा मसाला वापरून केलेले पदार्थ तेलावर थोडे ऑरेंज दिसू शकतील.

केशरी: केशर घालून शिरा, गाजर हलवा, आंबा बर्फी, केशर घालून मुग डाळीचा शिरा, गाजर बर्फी, जिलेबी, मोतीचूर लाडू

ब्राऊन: ब्रेडचे प्रकार, पराठे, अहळीवाचे लाडू, अंजीर खजूर रोल, भजी, चॉकलेट बर्फी

गुलाबी: गुलाबी चिरोटे, बिटरूट हलवा, स्ट्रॉबेरी मलई बर्फी, बिट रूट रायता, गुलाबी रंग घालून केलेली खरवस वडी,

नीत्सुश,

ऑरेन्ज
१) आपला भोपळा असतो ना तू किसून त्याची ऑरेन्ज खीर होईल. अगदी सुरेख रंग दिसतो. फक्त वेलची, साखर, दुध, आणि काजू घाल. पौष्टिक आणि चविष्ट प्रकार.

२) जर भोपळ्याची खीर नसेल आवडत तर भोपळा मऊ शिजवून तो कणकेत मिसळून त्याचे छान पराठे कर. तेही ऑरेन्जच दिसतात.

३) पिवळी शिमला मिरची असेल त्याची पिठ पेरुन भाजी कर आणि चपाती वा ब्रेड मधे भर. एक रोल छान दिसेल.

ब्राऊन
१) गुळाचा शीरा हा ब्राऊन रंगाचा दिसतो.
२) पिठाचा उपमा वा उकळपेंड ब्राऊनच दिसते.
३)

पिंक
१) दह्यामधे बीटरुट घालून ते थोडे गोड कर. लस्सी म्हणून पिता येईल.
२) गुलाबी रंगाची फळे घालून शीरा कर.

ब्राऊन - सँडविच ब्रेड स्लाईसवर न्युटेला (चॉकलेट फ्लेवर) फासणे.
ऑरेंज - स्लाईसला संत्र्याचा जॅम फासणे
पिंक - लोणी व स्ट्रॉबेरी क्रश एकत्र फेसून ते स्लाईसला फासणे.
असे रंगीबेरंगी सँडविच देता येईल.

लाल मुळ्याच्या किंवा उकडलेल्या बिटाच्या चकत्या, गाजराच्या चकत्या देता येतील.
जवसाची चटणी (ब्राऊन), बिटाची दह्यातली कोशिंबीर (पिंक) आणि गाजरहलवा (केशरी) पोळीसोबत देता येईल.

(अवांतर : काही केल्या फीश फ्राय केल्यावर त्यात मिठ नसल्यासारखाच लागतोय. सहा महिने वेळोवेळी प्रयत्न करूनही यश मिळत नाहिये. पाकक्रूतीची लिंक किंव उपाय सांगीतल्यास आभार मानले जातील.(बायकोतर्फे))

तुम्हा सगळ्यान्च्या प्र्तिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद.
गाजर वडी, खजुर रोल आणी गुलाबी इडली try करुन बघते.

नीत्सुश मायबोलीवर अजून भरपूर पाकृ रत्नं सापडतील Happy
गाजर कोशिम्बिर म्हणजे भाजीला पर्याय होऊ शकते. केशरी गाजरं किसून घ्यायची त्यात थोडं लिंबू पिळायचं आणि मीठ टाकायचं. वरून मोहरी आणि लाल तिखटाची (तिखट जळू न देता) फोडणी घालायची. छान लागतं.