कालसर्पयोग,नारायण नागबळी व नाडी ज्योतिष

Submitted by सह्याद्रीमित्र on 11 April, 2016 - 10:56

१.एखाद्या कुंडलीमध्ये जेव्हा सर्व ग्रह राहू व केतूच्या मध्ये येतात तेव्हा तो कालसर्पदोष मानला जातो असं काही ज्योतिषांचं मत आहे. आंतरजालावर बारा प्रकारचे कालसर्पयोग सांगितले आहेत ज्याचे त्या त्या योगाप्रमाणे माणसाच्या आयुष्यावर होणारे परिणामही नमूद केलेले आढळतील.

कालसर्पयोगाची शांती त्र्यंबकेश्वर येथे जाउन करावी असा सल्ला अनेक ज्योतिषी देतात. प्रश्न असा आहे कि नक्की कालसर्पयोग हा प्रकार अस्तित्वात आहे का ?? आणि असल्यास त्याची शांती करणे हा एकमेव उपाय आहे ?? कालसर्पदोष त्र्यंबकेश्वरला जाऊन निवारण केलास आयुष्यात अमुलाग्र बदल घडतो का ??

२.तसेच नारायण नागबळी म्हणजे नक्की काय ??

३.पुण्यामध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृहसामोरील एका नाडी ज्योतिषाने माझ्या मित्राचे अत्यंत अचूक असे भविष्य वर्तवले आहे. त्याचा भूतकाळ व वर्तमानकाळ त्या त्या चांगल्यावाईट घटनांसाहित त्याने सांगितला व भविष्यही वर्णन केले. खात्रीसाठी त्याचे बोलणे रेकॉर्ड करून एक सीडीसुद्धा मित्राला दिली ज्याप्रमाणे सध्या घटना घडत आहेत.

नाडी ज्योतिषावर कृपया अधिक प्रकाश टाकावा.

नम्र विनंती : हे सर्व प्रकार सत्य किंवा असल्यास कृपया प्रत्यक्ष उदाहरण देऊन शंकेचे निरसन केल्यास वादाला तोंड फुटणार नाही याची कृपया काळजी घ्यावी. एक कुतूहल म्हणून हा धागा निर्माण करण्यात आला आहे/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे भो विठ्ठला,

कशाला उगा फुकाचा वाद घालत बसलाहात? तुमचा विश्वास नाहीये न? मग नका करु की. कोण कोणाची श्रद्धा असेल तर करु देत न. लोक काय दोन्ही बाजुंची उदाहरणे देतात. जर तुम्ही फायदा होत नाही ह्या बाजुचे असाल तर किमान ज्यांना फायदा झाला, अशांचे डेटा घेउन तो कसा ह्या विधीने झाला नाही, हे सिद्ध करुन टाका बघु.

तुमच्या हिशोबानी तर सगळ्या धर्मांवरच बंदी आणावी लागेल. कारण सगळेच धार्मिक विधी, देव असतो अन असे केले तर असे होते ह्या विश्वासावर असतात Proud

डोण्ट ट्राय टु मेक इट अ सायंस, व्हेअर पीअर रिव्ह्युड प्रुफ्स आर अव्हेलेबल.

कालसर्प म्हणजे काय? याचा आणि खर्चा चा काय संबध ?साप सोन्याचाच करावा लागतो का? ते सोन कोणाला मिळते? एकाचा कालसर्प दुसर्‍यासाठी धनलाभ योग असतो का?

पैसे असतील तर एखाद्या चांगल्या संस्थेला दान करा. एखाद्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च करा.

साप सोन्याचाच करावा लागतो का?
>> अस काही नाही. धर्मात उत्तम मानल्या गेलेल्या पंचधातुंपैकी कोणताही धातु चालतो.तांबा, पितळ, चांदी, लोखंड, सोने असे गुरुजींनी सांगितले. माझा सोन्याचा साप ४०० रुप्यात आला होता.

ते सोन कोणाला मिळते?
>>
ते नदीत विसर्जित केले होते. नंतर ते नदीतुन कोठे गेले माहीती नाही.

पैसे असतील तर एखाद्या चांगल्या संस्थेला दान करा. एखाद्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च करा.
>>
हे दरवर्षीच करतो. तरीही काय प्रॉब्लेम सुटला नाय. सोनं नदीत टाकल, माझा प्रॉब्लेम सुटला.

ओके मग सोनेच का? लोखंड का नाही? एखादा मातीचा नाग द्यायचा ना बनवुन...
>>
तांब्याचा, लोखंडाचा, चांदीचा, सोन्याचा असा कोणताही नाग बनवुन वाहुन टाकता येतो, अस आम्हाला गुरुजींनी सांगितले होते. मातीच्या बाबतीत तुम्ही तुमच्या गुरुजींना विचारा.

तात्यानू, सहीच Happy
मुळात धार्मिक विधींचा आणि फळ मिळण्याचा जमानाच राहिलेला नाहीये.
जसे पुर्वी यज्ञ संपन्न झाल्या झाल्या त्यातून कोणी देवता वगैरे येत असे, इ. इ.
(हे सुद्धा ऐकीवच आहे, खरे कोणी पाहिलेय ?)
त्यामुळे मी तरी या विधी आणि फळ यांची सांगड घालत बसत नाही.
काही मनापासुन करावेसे वाटले तर करावे, फळाच्या अपेक्षेनेच केले पाहिजे असे नाही.

आमचा कृष्ण सांगुन गेलाय, कर्म करो फल की चिंता मत करो.
(वो मै रख लुंगा, हे अवांतर मी जोडलंय Wink )

विधी करायचाय तर कराच. फायदा झाला तर चांगल, किमान मनाला रुखरुख राहणार नाही, हा उपाय करुन बघितला असता तर कदाचीत ... बाकी काय.

ज्येना म्हणजे ज्येष्ठ नागरीक पण काना म्हणजे काय?
(वर कोणीतरी ज्येना ते पण काना म्हणाले म्हणुन विधी केला असं लिहिलंय त्यावरुन आठवलंय. अगदीच अवांतर नाहीये.)

कालसर्प योगाचा माझा अनुभव असा आहे----------
माझ्या पत्रिकेत कालसर्प योग आहे आणि मी कॉलेजमधे असताना त्याची शांती केली होती........तेव्हा मला काही पत्रिका वैगेरे कळत नव्हती त्यामुळे गुरुजीनी सांगितली म्हणून केली एवढच..........
मग काही वर्षानी पत्रिका,कुंड्ली वैगेरे ची थोडी माहिती घेतली..मग ल्क्षात आल की कालसर्प योग म्हण्जे नक्की काय होत पत्रिकेत..............मग कुठे तरी वाचल कि ज्याना कालसर्प योग असतो त्याना सतत नागाची स्वप्न पड्तात........मग विचार केल्यावर कळल की लहानपणापासून जी नागसापाची स्वप्न पडायची ती आता अजिबात पडत नाहीत.......... हा एक मोठा फायदा मला कदाचित ती शांती केल्याने झाला असावा

नारायण नागबळी त्र्यंबकेश्वरला केला तरच त्याला अर्थ आहे. नाक्यावरचा भटजी बोलवाल आणि सत्यनारायणाच्या पूजेसारखे घरातच कराल तर फसाल. कोणी घरच्याघरी करून प्रचिती मिळवून देतो म्हटले तर त्याला बळी पडू नका नाहीतर तुमचाच नारायण होईल. त्यापेक्षा त्र्यंबकच गाठा. जवळच शिर्डी आहे हा बोनस. आता महिलांनाही सर्व ठिकाणी प्रवेश मिळत असल्याने सहकुटुंब जाण्याची मजा काही औरच. त्र्यंबकेश्वर सहल म्हणून सुद्धा एक चांगला स्पॉट आहे. येताना खरेदी म्हणून टोपलीभर पेरू घेऊन शेजारीपाजारी वाटले तरी स्वस्तात काम झाले. अनुभवावरून सांगत आहे. माझ्या बालपणी आम्ही नागबळी नारायण करून झालाय. आज मी जे काही आहे ते त्याच्याच कृपेने म्हटल्यास वावगे नाही ठरणार.

त्र्यंबकेश्वर सहल म्हणून सुद्धा एक चांगला स्पॉट आहे.
>>>

धार्मीक कार्य करण्यासाठी जात असाल तर , मनात तोच विचार ठेवा , धार्मीक भावनेनेच जा.

सहल साठी जात असाल तर सहलीचा.,

नारायण नागबळी त्र्यंबकेश्वरला केला तरच त्याला अर्थ आहे >>> कोण म्हणे? कशालाच काही अर्थ नाही. Happy अर्थात काबफांतु झाले, योगायोगाने संकटनिवारण झाले तर चांगलेच म्हणा..

देव भावाचा भुकेला. तो सोन्याचा साप वगैरे मागत नाही... Sad

माझ्या बालपणी आम्ही नागबळी नारायण करून झालाय. आज मी जे काही आहे ते त्याच्याच कृपेने म्हटल्यास वावगे नाही ठरणार.>> अरे काय रे. स्वतःला नास्तिक म्हणतोस आणि हे असलं काहीतरी लिहितोस? शोनाहो.

सस्मित मी एक टवाळ मुलगा आहे. याची जबाबदारी मी देवावर ढकलत असेल तर मला तसे करू द्या की. तसेही देव ही संकल्पना मानवाने आपल्या फायद्यासाठीच तर बनवलीय. दिल तो पागल है मध्ये शाहरूख खान नाही का करिश्मा कपूरला समजावत, बुरे हम नही, बुरा तो वो है.

बाकी माझ्या बालपणी घरच्यांनी नागबळी दिलाय हे मात्र खरेय. तेव्हा मी नास्तिक नव्हतो हे सुद्धा खरेय.

राजेश्वर, ते मी मोठ्या कुटुंबांसाठी लिहिलेय. त्यात सारेच धार्मिक कसे असू शकतील. तर जे नाहीत ते देखील सहल म्हणून फिरून येऊ शकतात. माझ्या आठवणीप्रमाणे आम्ही गेलेलो तेव्हा थंडी आणि पाऊस असे दोन्ही होते. गरमागरम पिठले, कांदाटमाटरची चटणी आणि भाकरी खायला अफलातून मजा यायची. माझ्या आयुष्यातील पहिली टक्कर चहा मी तिथेच प्यायलो होतो. आज मला त्या आठवणी सहलीसारख्याच आठवतात.

राजेश्वर, ते मी मोठ्या कुटुंबांसाठी लिहिलेय. त्यात सारेच धार्मिक कसे असू शकतील. तर जे नाहीत ते देखील सहल म्हणून फिरून येऊ शकतात. माझ्या आठवणीप्रमाणे आम्ही गेलेलो तेव्हा थंडी आणि पाऊस असे दोन्ही होते. गरमागरम पिठले, कांदाटमाटरची चटणी आणि भाकरी खायला अफलातून मजा यायची. माझ्या आयुष्यातील पहिली टक्कर चहा मी तिथेच प्यायलो होतो. आज मला त्या आठवणी सहलीसारख्याच आठवतात.

>>>

बरोबर आहे.. एकमेंकाना जर सांभाळून आनंन्द आणी धार्मीकता अनुभवता आली तर उत्तम, पण
जेव्हा आपण देव दर्शणाला जातो तेव्हा धार्मीक भावना समोर ठेउनच करायला पाहिजे ना की सहलला चाललो. Happy

मी धार्मिक प्रव्रुत्तीच्या लोकांबद्दल बोलतच नाहीये. तर कुटुंबातील जी व्यक्ती धार्मिक नसेल ती घरात एकटी बसून अंडी उबवण्यापेक्षा त्र्यंबक फिरून येऊ शकते ना.

धार्मिक भावना देव दर्शनाला जातानाच असते/असावी का?
>>>>>>
मी मानवधर्म मानतो आणि माझ्यामते माणूसकीची भावना सतत नेहमीच आयुष्यभर असावी.

ज्योतिषावर विश्वास ठेवायचे याचा अर्थ पुढे जे काही घडणार आहे ते आधीच ठरले आहे यावर विश्वास ठेवणे. आणि जर काही आधीच ठरले असेल तर ते तपशीलवार ठरले असणार. पण ते कोणालाही सांगणे जमत नाही. सारे हवेतच तीर मारतात. याचा अर्थ सध्या तरी ज्योतिष खरे आहे हे कोणी सिद्ध केले नाहीये. केले तर विश्वास ठेवेन. हट्टाने अविश्वास दाखवणार नाही. Happy

मी मानवधर्म मानतो आणि माझ्यामते माणूसकीची भावना सतत नेहमीच आयुष्यभर असावी.
>>>
Happy

सस्मित मी एक टवाळ मुलगा आहे.>>> ह्याचा अंदाज आलाच आहे रे. वेगळे सांगायची गरज नाही.

पण तरीही, नास्तिक म्हणजे जो देव मानत नाही तो कसलीही जबाबदारी देवावर कसा ढकलु पाहिल?
(संदर्भ : <<<याची जबाबदारी मी देवावर ढकलत असेल तर मला तसे करू द्या की.>>)

आणि शाखाने आकाशाकडे हात दाखवुन बुरा तो वो है म्हणलं तर वो म्हणजे देवच कसा ते ही सांग. Happy

बाकी विश्वास नसलेल्यांनी सहल म्हणुन कुटुंबियांबरोबर फिरुन येण्याबद्दल सहमत. पण कुटुंबियांबरोबर जावे जरुर.

काल सर्प योग आणि नारायण नागबळी दोन्हींवर विश्वास नाही! त्र्यंबकेश्वरला जाऊन हा विधी करावा लागतो असे ऐकीवात आहे. नवरा आणि दिराचा विधी कोल्हापूर नरसोबाची वाडी इथे केला गेला. काही गोष्टी चांगल्या तर काही वाईट घडल्या. जे जसे घडणारच आहे तर पैसे खर्चून वेगळे विधी का फक्त मनःशांतीसाठी?

नितीनचंद्र | 12 April, 2016 - 17:18 हा प्रतिसाद महत्वाचा!

जो देव मानत नाही तो कसलीही जबाबदारी देवावर कसा ढकलु पाहिल?
>>>>>>>
माझ्यामते जे देव मानत नाहीत तेच देवाचा आपल्या फायद्यासाठी योग्य वापर करतात. म्हणजे जे देवाच्या नावावर श्रद्धेचा बाजार मांडतात. या लोकांचा स्वताचा देवावर जराही विश्वास नसतो. देव आपले खरेच काही वाकडे करेल याची भिती नसते. म्हणून तर त्याचे नाव घेत ते बिनधास्त लोकांना लुटतात. मी स्वताही शाळा कॉलेजात आस्तिक असल्याचे दाखवत एका देवाचे नाव घेत बिनधास्त खोटी शपथ खायचो. लोकांना मग मी मारलेल्या टेपांवर सहज विश्वास बसायचा.

बाकी आकाशाकडे बघून काही म्हटले तर ते देवालाच असते..
इथे जमिनीवर प्रत्येकाचा देव मंदीर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा अश्या विविध ठिकाणी राहत असला तरी त्या सर्व देवांचा पर्मनंट एड्रेस आकाशच आहे. दुवाही तिथेच बघून मागितल्या जातात, शिव्याशापही तिथेच बघून दिल्या जातात, मेल्यावर आपलाही हिशोब तिथेच जाऊन होतो हा सर्व धर्मीयांचा विश्वास असतो.

त्यात सारेच धार्मिक कसे असू शकतील. तर जे नाहीत ते देखील सहल म्हणून फिरून येऊ शकतात.

>> पटेश! उगाच त्या "रात्रीस खेळ चाले" वाल्या शास्त्रज्ञ निलिमा सारखे नाके मुरडत तोंड फुगवत बसण्यापेक्षा सर्वांबरोबर मिळून मिसळून राहिलेले बरे.

Pages