दिनांक ३ एप्रील ला चिंचवड विभागात वीज पुरवठा भर दुपारी खंडीत झाला. सुमारे पाच तास चिंचवड विभागातले ग्राहक हाश्य - हुश करत राहिले.
अनेकांनी फोन करुन वीज महावितरण कंपनीकडे किती वेळ लागेल इ. विचारणा केली पण वीज वितरणाचे अधिकारी फोनवर उपलब्ध नव्हते. याची नोंद दि. ४ एप्रीलच्या दैनीक सकाळच्या पिंपरी चिंचवड अवृतीतही घेतली गेली.
सामन्यपणे आपला ( ग्राहकाचा ) आवाज वर्तमान पत्रात दिसला या नादात ग्राहक खुष झाले असतील. जर सप्लायचा फ्युज गेला असेल आणि शहरात ४ तासांपेक्षा जास्त काळ वीज बंद असेल तर दर तासाला पन्नास रुपये पेनल्टी ग्राहक मागु शकतो या बाबत मात्र ग्राहक जागरुक नाहीत. संदर्भ - २० मे २०१४ चे शासनाचा जी आर.
अश्या पेनल्टी मागण्याचा उद्देश इतकाच की वीज महावितरणाच्या कारवाईत जर दिरंगाई झाली असेल तर संबंधीतांना याची जाणिव व्हावी इतकाच आहे.
याची काल मर्यादा साठ दिवसांची आहे. अद्याप हा विद्युत पुरवठा नेमक्या कोणत्या कारणासाठी बंद आहे हे समजले नाही. हे कसे समजेल याबाबत महा वितरण कंपनीच्या वेब साईटवर माहिती नाही.
जर माहितीच्या अधिकारात अर्ज केला तर ६० दिवसात उत्तर येईल अशी अपेक्षा ठेवता येत नाही आणि माहिती जरी मिळाली तरी नेमकी कोणत्या ऑफीसमधे अशी पेनल्टी मागावी या बाबतही माहिती वेब साईट वर उपलब्ध नाही.
याबाबत मायबोलीकरांनी कधी अशी पेनल्टी वसुल केली आहे का ? जर असेल तर माहिती द्यावी.
हा महत्त्वाचा लेख इतका
हा महत्त्वाचा लेख इतका दुर्लक्षित झाला. उन्हाळा असून सध्या वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने हा लेख पुन्हा वर काढत आहे.
सुज्ञ नागरिक हितवर्धिनी
सुज्ञ नागरिक हितवर्धिनी (रजिस्टर्ड)
- संचालित -
माहिती अधिकार कट्टा (13 एप्रिल 2017)
(कट्टा व आठवडा क्रमांक 172)
दर गुरुवारी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत भिमाले गार्डन, सॅलिस्बरी पार्क, गुलटेकडी, पुणे 37 येथे नियमितपणे आयोजित केला जातो.
इथे माहिती अधिकार, ग्राहक संरक्षण कायदा, लोकशाही दिन, महावितरण, बँक, सरकारी कार्यालयातील प्रलंबीत प्रकरणे इत्यादींवर विनामूल्य मार्गदर्शन केले जाते.
सर्व इच्छुकांनी वेळेवर उपस्थित रहावे.
- माधव दामले