मराठी असे आमुची मायबोली .
मराठी भाषा दिन पार पडला! एका दिवसाचे जे असंख्य समर्पित दिवस साजरे (?) करण्याचे प्रस्थ , फॅशन सध्या आहे त्यात हा ही एक दिवस!
ह्या वर्षीच्या म भा दिनाच्या संयोजक मंडळात काम करताना ( माझा सहभाग त्यातही किडूक मिडूकच होता) वारंवार काही तरी बोचत होतं. एका दिवसा च्या ऐवजी चार दिवस उपक्रम ठेवले , तरी कार्यक्रम संपल्यावर मराठी भाषा दिन संपला . समारोप!
मदर्स डे ला आईला 'विश' करण्यासारखच झाल .
माधव ज्युलियन यांच्या कवितेत म्हटलय तस,
हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा
नका फक्त पाहू हिच्या लक्तरां,
पण लक्तरं एका दिवसाच्या उपक्रमानी राजवस्त्र होतील का?
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षे-
मुळे खोल कालार्णवाच्या तळी
ही उपेक्षा संपणार का? कशी? मराठी शाळांची रोडावणारी संख्या, पुढच्या पिढी बरोबर सैल होत जाणारे मराठीचे बंध, रोजच्या बोलण्यात वाढत जाणारे इतर भाषांतील शब्द. त्याहीपुढे जाउन , विचार करण्याची भाषा बदल्तेय का? अगदी माझ्याही बाबतीत हा बदल मला ठळक जाणावतोय.
मराठी भाषा दिनाचा हा कार्यक्रम एक दरवर्षी होणारा सोहळा ह्यापलिकडे , निरंतर चालू रहाणार्या उपक्रमांचा उगम व्हावा अस वाटल.
असे कोणते उपक्रम असावेत ह्याबद्दल काही कल्पना आहेत . पण त्याबद्दल ब्रेन स्टॉर्मिंग ( विचारमंथन , कल्पना विस्फोट) व्हाव म्हणून हा धागा.
मला सुचलेल्या काही कल्पना -
१)विकीपिडीयावर मराठीत लिहिणे ( हे खरतर इथे २०११ च्या मभादिनी सुरू केलेल आहे ) http://www.maayboli.com/node/24419 ह्याच धाग्यात तिथे लिहिले गेलेल्या मराठी लेखांची सुची आहे . कस लिहायच ह्याबाबत सुचना /माहितीही.
२) यंदाच्या शब्दवेध उपक्रमात सुरु केलेला प्रचलीत इंग्रजी शब्दाना चपखल मराठी शब्दां शोध
अजून काही सुचतय तुम्हाला?
२) यंदाच्या शब्दवेध उपक्रमात
२) यंदाच्या शब्दवेध उपक्रमात सुरु केलेला प्रचलीत इंग्रजी शब्दाना चपखल मराठी शब्दां शोधणे
ह्याकरता एक धागा उघडला आहे.
http://www.maayboli.com/node/58047
Pages