हा एक रोटीचाच प्रकार आहे. ज्यांना खूप यीस्टी चव आवडत नाही, त्यांना जमेल आवडेल असा.
इथे पाककृती प्रकारात मोगलाई असा चॉईस न्हवता म्हणून, सिंधी निवडलय.
खमीर म्हणजे यीस्ट. फरक हाच की हे ताजे यीस्ट असते आणि ते घरीच बनवू शकतो किंवा नैसर्गिक रित्या आंबवण्याच्या प्रक्रियेत तयार होते.
इथे खमीर बनवायचे तीन उपाय आहेत.
१) पातळ पीठाची पेस्ट आणि साखर एकत्र करून २४-४८ तास(जितकं आंबूस वास हवा असेल तर) झाकून ठेवून मग पीठात मिसळा.
२) अथवा, अख्खं पीठच आंबवा.
३) तयार बाजारातील यीस्ट(ड्राय यीस्ट) वापरू शकता किंवा ताजं.
मी इथे अख्खं पीठ आंबवून सोपी पद्धत अवलंबलीय. आणि मूळात हि रोटी नंबर १ प्रकारेच बनवावी. बाजारी यीस्ट वापरून केली तर तो खास वास व चव येत नाही.
३ वाट्या कणीक,
एक चमचा घट्ट दही,
चवीला मीठ,
१ चमचा साखर,
१ चमचा लिंबू रस,
२ चमचे बटर नाहितर साजूक तूप वितळवून,
शोभेला:
काळी खसखस,
गरम दूधात केसर व बारीक पूड करून चिमटीभरच बडीशेप घालून
तीळ
सकाळी खायच्या असतील तर संध्याकाळीच भिजत ठेवा. जर तुमच्या ठिकाणी गरम हवा असेल तर रात्रीच ठरवा.
कणीक सोडून, इतर पदार्थ एकत्रित करून फेटून घ्या आणि मगच कणीकेत घाला.
फार पातळ नाही आणि घट्ट नाही असे पीठ भिजवून, एका पातेल्याला तेलाचा हात फिरवून पीठाचा गोळा ठेवून झाकून ठेवा.
१)सकाळी पुन्हा मळून घेवून, मध्यम जाडीच्या रोट्या लाटाव्या. अवन ४५० फॅरेनहाईट वर तापवायला ठेवा. आतमध्ये पिझ्झा लादी ठेवावी. किंव जो काही ट्रे आहे तो की ज्यावर मग रोट्या भाजता येतील.
२)भरपूर केसर व चिमटीभरच बडीशेप पूड घालून गरम करून थंड केलेलया दूधाचा हात लाटलेलया पोळीवर अलगद लावून घ्यावा.
३)मग वरून खसखस आणि तीळ भुरभुरावे व हलकेच दाबावे.
४) गॅसवर लोखंडी तवा मस्त गरम करून आधी दोन्ही बाजून शेकून घ्याव्या.
५) मग जितक्या मावतील तश्या अवन मध्ये भाजाव्या. अवन योग्य गरम असेल तर टम्म फुलतील टाकलया टाकलया. बाहेर काढून बटर फिरवा वरून. इस के सिवा मजा नही.:)
६) मटण, चिकन रस्सा नाहितर चहात बुडवून खावू शकता.
पुर्ण पणे तव्यावरच भाजू शकता. पण अवन मध्ये पटकन होते. बाकी काही नाही.
-खूप गरम हवामान असेल तर रात्रीच ठेवा. तुम्हाला तो आंबूस (sourdough kind) वास आवडत असेल तर हरकत नाही.
-इथे बुरशी अपेक्षित नाहीये. एक प्रकारचा मस्त वास येइल आणि जाळी दिसेल पीठात.
- दही आंबट नको आणि पातळ सुद्धा नको. विकतच दही नको कारण त्यात इतर फिलर्स असतात आणि प्रिझरवेटीव. तेव्हा घरगुती दही घ्या.
- लिंबू रस बाजारातला नको.
यम्मी. मी यीस्ट वापरलेल्या
यम्मी. मी यीस्ट वापरलेल्या सर्व पाव वर्ग पदार्थांची फॅन आहे. नक्की करुन पाहेन.
पोळीत एक चमचा साखर झेपणार नाही मला(चवीला), थोडी कमी करेन.
साखर तुमच्या आवडीप्रमाणे
साखर तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. पण इथे साखर हि आंबवण्याच्या प्रक्रियेत वापरली जाते. तेव्हा इतकं गोड नाही होत. तुम्हाला शुभेच्छा!.
काळी खसखस असते का? काळे तिळ
काळी खसखस असते का? काळे तिळ पाहिले आहेत पण काळी खसखस कधीच नाही पाहिली.
कृती छान आहे पण कुठल्याही अपरिचित कृतीसाठी थोडेतरी फोटो द्यायला हवेत.
आमच्या सासरी करतात म्हणे
आमच्या सासरी करतात म्हणे खमिरी रोटी. मी कधीच खाल्ली नाहीये. साबांकडून ऐकलंय. उन्हाळ्याच्या सुरवातीला किंवा मग भर उन्हाळ्यात करतात. लिंबु नाही घालत आटा खमीरवण्यासाठी / आंबवण्यासाठी. दही घालतात. आणि ओवा पण घालतात बर्याचदा.
बर्याचदा उन्हाळ्यात साधी पोळ्यांची कणीक पण उन्हाळ्यामूळे किंचीत आंबली असेल तर त्यात बाकी मीठ, ओवा इ घालू न खमीरी रोटी करतात असंही ऐकलंय.
केसर पण बहुतेक नाही घालत आमच्याकडे. साबांशी बोलले की विचारून घेईल त्यांची पद्धत.
फोटो ???
फोटो ???
खरंच फोटो हवाय.
खरंच फोटो हवाय.
कित्येकदा माझी कणिक आंबून
कित्येकदा माझी कणिक आंबून चिकट होते आणि पसरते. मी ती फेकून देतो मग. अशी कणिक आता मुद्दाम करावी लागणार आहे.
वेगळाच प्रकार आहे. कुणी
वेगळाच प्रकार आहे. कुणी पाहुणे मुक्कामी असल्यास नाष्ट्यात करायला मस्त वाटेल हा प्रकार. फोटो टाका
खमीरी रोटी ऐकली नव्हती. नान,
खमीरी रोटी ऐकली नव्हती. नान, कुलचा घराण्यातली दिसते. ओव्हनमध्ये भाजता येतात म्हणजे छानच की. पण स्टेप ६ डिटेल्ड लिहा.
काळी खसखस की कलौंजी?
छान प्रकार. आफ्रिकेतील काही
छान प्रकार.
आफ्रिकेतील काही देशातील उष्ण हवामानाने, हे सहज घडायचे पण कधी कधी अशा पिठावर बुरशी येते हा अनुभव, म्हणून करायला घेण्यापुर्वी नीट बघून घ्यावी लागते.
बी, काळी खसखस असते, फक्त रंगाने काळी. पण सिंगापूरला बहुतेक कुठलीच खसखस नाही मिळणार.
अजून एक वेगळीच रेसिपी ..
अजून एक वेगळीच रेसिपी .. उन्हाळ्यात करून बघायला हवं एकदा पण दिनेश म्हणतात त्याप्रमाणे बुरशी यायची शक्यता असेल ..
आंबवणे प्रकारात खरी गोम दिसते .. खमीर करण्याच्या पहिल्या उपायात (जो मोस्ट प्रिफर्ड आहे असं म्हंटलं आहे) त्यात पीठाची पेस्ट आंबवायची असं दिलं आहे .. तर मीठ, साखर, दही, लिंबू ह्या मिश्रणात कणिक किंवा आणि कुठलं पीठ घालायचं का (आणि किती) अशी पेस्ट आंबवायला?
देवीका फोटो असता तर बरं झालं
देवीका फोटो असता तर बरं झालं असतं.. बरोब्बर कल्पना आली असती.. वाचून जमेलसं वाटतंय तरी..
देविका, तुम्ही २(कडाह प्र्शाद
देविका, तुम्ही २(कडाह प्र्शाद आणि रोटी) छान पाकक्रुती टाकल्यात पण फोटोशिवाय मजा नाही,परत केल्यास फोटो नक्की डकवा (इथे आम्ही साधे थालिपिठ ते आप्पे कशाचेही फोटो टाकतो)
मोगलाई पर्याय आता दिला आहे.
मोगलाई पर्याय आता दिला आहे.
म मोगलाईला पर्याय
म
मोगलाईला पर्याय नाही.
करण्यात येईल
ऑथेंटिक खमीरी रोटी खायची असेल
ऑथेंटिक खमीरी रोटी खायची असेल तर "करीम" ला पर्याय नाही.
जामा मस्जिदच्या गली नं १ च्या समोरच्या बोळात ८/१० पावलं चालुन आणखी डाव्या बोळात घुसलात की मांसाहार्यांचा स्वर्ग आणी शाकाहार्यांसाठी काश्मीर समोर येतो.
तिथे मिळणारी खमीरी रोटी मट्न कोरम्या बरोबर खा की शाही पनीर बरोबर, लज्जतच न्यारी. परत मैदा खाल्याने दिवसभर पोट जसे गच्च वाटते तसला काही प्रकार होत नाही.
सगळ्यांना परत धन्यवाद. मला
सगळ्यांना परत धन्यवाद. मला वेळ मिळालाच नाही परत पदार्थ करायला रविवारी.
प्राजक्ता, नक्कीच फोटो टाकेन. मी एकटीच करणारी असते, तेव्हा विसरायला होते.