Submitted by कबूतर on 1 March, 2016 - 06:19
आम्ही घर घेतलं तेव्हा फक्त ट्रॉलीज करून घेतल्या होत्या. बिल्डरने व्हाईट मार्बल चा ओटा (कट्टा) एकाच भिंतीला दिल्यामुळे मी नंतर L shape करून घेतला. पण मध्यंतरी ओट्याला एक मोठी भेग पडल्यामुळे त्यातून सिंक मधले किंवा ओट्यावरचे पाणी झिरपते व ओट्याखालील जागेत ठेवलेले सामान ओले होते.
या साठी फोडाफोडी न करता काही उपाय करता येईल का?
शिवाय बिल्डरने दिलेले सिंक सुध्दा व्हाईट मार्बल चेच आहे ते स्टील चे करून घ्यायचे आहे पण त्या साठी ओटा व सिंक फोडावे लागेल का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोडाफोडी न करता काही उपाय
फोडाफोडी न करता काही उपाय करता येईल का?>>> araldite म्हणून hardware shop मधे मिळते ते वापरून भेग बुजवता येइल.
ओटा व सिंक फोडावे लागेल का?>> न फोडता पण करता येत पण तसा तज्ञ कारागिर मिळायला हवा. आधिच विचारायचे फोडाफोड न करता करणार ना.
ओट्याला पडलेली भेग किती मोठी
ओट्याला पडलेली भेग किती मोठी आहे? लहानशी चीर गेली असेल तर अॅरल्डाईट उपयोगी आहे. पण मोठी भेग असेल तर तज्ञ व्यक्तीला विचारा. सतत पाणी गळून ओट्याशी ओल रहात असेल तर ते चांगलं नाही. ओल असल्यावर बुरशी आणि इतर उपद्रव वाढू शकतात.
फोडाफोडी न करता सिंक चेंज
फोडाफोडी न करता सिंक चेंज करता येईल.. आहे त्या सिंक मध्येच स्टीलचे सिंक बसवता येते.. योग्य तो कारागिर मिळायला हवा..
प्रज्ञा - भेग बर्यापैकी मोठी
प्रज्ञा - भेग बर्यापैकी मोठी आहे आणि त्यातून पाणी leak होतं. पण प्रॉब्लेम असा आहे की ओट्याची तोडफोड केली तर दुसरा ओटा (L चं extension) पण फोडावा लागेल