जुन्या मायबोलीवर सुक्या अंजीराच्या कृति आहेत, अंजीर फळाच्या नाही सापडल्या, म्हणून मीच प्रयोग केला
अर्धा किलो तयार अंजीर (साधारण २ वाट्या गर निघेल इतके)
पाऊण वाटी साखर
एक वाटी मिल्कपावडर
पाऊण वाटी काजूपावडर
अर्धी वाटी दूध
सजावटीकरता पिस्ता आणि बदाम काप
१. अंजीर धुवून, त्याचे साल आणि देठ काढून गर काढून घेणे. (हा गर दोन वाट्या आहे असे गृहित धरून बाकी पदार्थांचे प्रमाण दिले आहे)
२. या गरामध्ये पाऊण वाटी साखरेमधली २ चमचे साखर घालून मिश्रण एकत्र करून नुसतेच ठेवायचे १० मिनिटे. गराला थोडे पाणी सुटते. १० मिनिटानी हे मिश्रण मंद गॅसवर ठेवायचे. पाणी उकळेल. गर शिजल्यावर, गराची थोडी चव बघायची. कधीकधी अंजीराच्या बीया कडू निघू शकतात. त्यासाठी आधी चव बघून घ्यायची (ही टीप mmm333 यांची)
३. मग उरलेली साखर आणि थोडे दूध घालून घोटायचे. साय असेल तर आत्ताच घालायची (साय ऐच्छिक). दूध आटले की आधी मिल्कपावडर घालायची. मिल्कपावडर घातली की मिश्रण आळेल, पण बर्यापैकी सैलच असते. मग अंदाज घेऊन काजू पावडर घालायची.
४. भरपूर आटले की साधारण घट्ट गोळा होतो. (इतर वड्यांसारखे हे मिश्रण कडेने सुटत नाही)
५. ताटात पसरून वड्या पाडण्याऐवजी, एखाद्या खोल भांड्यात मिश्रण उतरवावे. बर्फी जाड पडायला हवी. गार झाल्यावर पिस्ता-बदामाने सजवावे.
१. ही बर्फी नारळाच्या बर्फीसारखी खुटखुटी होत नाही, मऊसर रहाते- मलई बर्फीसारखी.
२. खूप वेळ गॅसवर ठेवायचे असल्याने जाड बुडाचे भांडे घ्यावे.
३. अंजीराचा सुरेख वास येतो. त्यामुळे शक्यतो कोणताही इसेन्स, वेलदोडे घालू नयेत.
काजूकतलीएवढी खुटखुटीत नाही
काजूकतलीएवढी खुटखुटीत नाही होत.
मला कोणीतरी रेडीमेड काजूपावडर भेटीदाखल दिली होती, ती वापरून मी ही अंजीर बर्फी केली होती. भेट देणारी वहिनी देशात परतल्यानंतर मला कोणी काजूपावडर दिली नाही आणि मी अंजीरबर्फी केली नाही
ही मी केलेली अंजीर बर्फी -
ही मी केलेली अंजीर बर्फी - पनीर घालुन - अंजीर कलाकंद म्हणा हवेतर
मस्त दिसत आहेत.
मस्त दिसत आहेत.
छान आहे. घरी करून बघायला
छान आहे. घरी करून बघायला हवी.
अनंत हलवाईची अंजीर बर्फी आणतो नवरा बऱ्याचदा, चांगली असते.
Pages