गजानन मेहेंदळे यांचे संशोधन आणि पानसरे यांचे 'शिवाजी कोण होता' हे पुस्तक
.
या आठवड्यातील एका फुसके बारमध्ये मी इतिहासाचे अभ्यासक गजानन मेहेंदळे यांच्या एका व्हिडियोचा संदर्भ दिला होता. त्याचा प्रतिवाद कोणी केलेला आहे का हे विचारले होते. शिवाजीराजांना आताच्या संदर्भातल्या व्याख्येप्रमाणे सर्वधर्मसमभावी ठरवले जाते हाही इतिहास खोट्या व चुकीच्या पद्धतीने सादर करण्याचा काही जणांचा प्रयत्न असतो त्याचाच भाग आहे.
आताच्या शिवजयंतीच्या निमित्तानेही नेहमीप्रमाणे शिवाजीच्या सैन्यात हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिम सैनिक व सरदार होते असे ऐकण्या-वाचण्यात आले.
सर्वधर्मभावाच्या चौकटीत त्यांना जबरदस्तीने बसवले नाही तरी त्यांच्या कार्याचे महत्त्व तसूभरही कमी होत नाही, असे असतानाही कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाचा संदर्भ याबाबतीत अनेकदा देण्याचा प्रघात पडला आहे. सदर पुस्तक मीही वाचलेले आहे. हिंसेतून क्रांती ही जी कम्युनिस्टांची विचारसरणी आहे, त्यातून पानसरेंनी तळागाळातील लोकांसाठी जे केले त्यावर येचुरी, करात यांच्यासारखे कम्युनिस्ट नेते ताव मारतात आणि आपला अजेंडा साधतात हा यातला धोक्याचा भाग आहे. मग त्यांनी केरळमध्ये कॉंग्रेस व रास्व संघांच्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या हत्या घडवून आणल्या यागोष्टीही सोयीस्करपणे विसरल्या जातात. केरळमध्ये रास्व संघ तर सत्तेच्या जवळपासही नव्हता व अाताही दिसत नाही.
फुसके बार वरील एका कमेंटमध्ये पानसरेंच्या पुस्तकावरील एका लेखाचा संदर्भ प्रकाश घाटपांडे यांनी मायबोली या पोर्टलवर दिला आहे. तो लेखही वाचनीय आहे. योगेश परळे यांच्या सकाळमधील या लेखाची लिंक खाली देत आहे
गजानन मेहेंदळेच्या व्हिडियोची लिंकही पुन्हा देत आहे. या लेखावरील प्रतिक्रिया जरूर द्याव्यात, त्याचबरोबर मेहेंदळेंच्या या व्हिडियोतील मतांचा कोणी इतिहासातल्या तथ्यांच्या आधारे प्रतिवाद केलेला आहे का यावर प्रकाश टाकला जावा ही अपेक्षा.
https://www.youtube.com/watch?v=LbZ5p2IIZD0
http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5227700114689738832
हिंसेतून क्रांती ही जी
हिंसेतून क्रांती ही जी कम्युनिस्टांची विचारसरणी आहे, त्यातून पानसरेंनी तळागाळातील लोकांसाठी जे केले त्यावर येचुरी, करात यांच्यासारखे कम्युनिस्ट नेते ताव मारतात आणि आपला अजेंडा साधतात हा यातला धोक्याचा भाग आहे>>
या वाक्यातून मला काहीच अर्थबोध होत नाहीये.
फ्रॅग्मेंटेशन करणार का?
जो बदल घडवून आणायचा, त्यावर
जो बदल घडवून आणायचा, त्यावर चर्चा, समन्वय वगैरेच्या ऐवजी किंवा बरोबरीने हिंसेनेही तो घडवला तरी त्याला हरकत नाही अशी कम्युनिस्ट विचारसरणी आहे. म्हणून कंबोडिया, रशिया, चीन, जेथे जेथे अशी क्रांती झाले त्याचे आकडे हिटलरलाही लाजवतील असे होते. आपल्याकडे लोकशाही आहे म्हणून यांची कुचबणा होते, पण शक्य तेथे ते हे करतातच. बंगालमध्ये इतकी वर्षे सत्ते होते तेही अशा हिंसा-धाकधपटशा यांच्या जोरावरच. तेथे ममता त्यांना त्यांच्या तोडीच्या नव्हे थोड्या वरचढच मिळाल्या त्यामुळेच ते गेले. अर्थात ममताच्या दादागिरीचे कौतुक नाहीच. केरळमध्येही ते तेच करतात.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=etY9O-_eHak
शिवाजी कोण होता.
https://www.youtube.com/watch?v=DJOFba5wl4M
भ्याड हल्ल्या पुर्वीचे ठाणे येथिल भाषण
https://www.youtube.com/watch?v=Dje7LSiJ2xw
पानसरे यांची भाषणे.
नाही नाही, वाक्य मोठे
नाही नाही,
वाक्य मोठे असल्याने कन्फ्यूजिंग आहे.
परत रिफ्रेम कराल का?