मिनि बाकरवडी २ वाट्या
२ मुठी हिरवे अख्खे मूग भिजत घालून मोड काढलेले (हा वेळ पाकृच्या वेळात धरलेला नाही.)
भेळेची तिखट चटणी - गरजेनुसार
गोड चटणी - गरजेनुसार
१ लालबुंद, घट्ट टोमॅटो बारीक चिरून
ऐच्छिक - १ कांदा बारीक चिरून, फरसाण
वरून सजावटीसाठी - खारी बुंदी, शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर
१. मोड काढलेले मूग अगदी किंचित वाफवून घ्या. शिटी करायची गरज पडत नाही.
२. ते वाफवून होईपर्यंट चिराचिरी करून घ्या. चटण्या हव्या त्या कन्सिस्ट्न्सीच्या करून घ्यअ.
३. बाकरवड्या, टोमॅटो आणि मोकळे केलेले मूग मिसळून घ्या.
४. त्यात चटण्या कालवून घ्या.
५. मिश्रण नीट मुरू द्या.
६. सर्व्ह करताना वरून खारी बुंदी आणि शेव-कोथिंबीर घालून द्या. कांदा-फरसाण ऐच्छिक्च आहे.
मी २-३ दिवसांनी पुन्हा करणार आहे तेव्हा फोटो टाकते.
कांदा, फरसाण वगैरे बाकरवडीसोबत आवडत असेल तरच घाला. मी दोन्ही चवी बघितल्या, मला आवडल्या. हे मिश्रण जेवढं मुरेल तेवढं चविष्ट लागतं. त्यामुळे खायच्या किमान तासभर आधी करून ठेवलं तर उत्तम. "थोडं दही अधूनमधून खायला छान वाटेल" अशी घरून आलेली सूचवणी आहे. मी ट्राय नाही केलं, तुम्ही करू शकता. अनेक वेरिएशन्स करता येतील.
("तू हे घरी केलंस? अगदी बाहेरून मागवलेल्या प्रोफेशनल ऑर्डरसारखी चव आली होती" अशी छान कॉम्प्लिमेट मिळाली! मंजूडीला स्पेशल थँक्स! )
कल्पना तर छान आहे... फोटो
कल्पना तर छान आहे...
फोटो असायला हवे होते...
छान आहे रेसिपी...करुन बघायला
छान आहे रेसिपी...करुन बघायला पाहिजे! फोटो येऊ द्या लवकर!
फोटो इकडे आहे -
फोटो इकडे आहे - http://www.maayboli.com/node/57622