Submitted by कबूतर on 5 February, 2016 - 04:46
डबल बेड घेतला तेव्हा स्टोरेज नव्हते पण आता घरातले सामान वाढल्यामुळे अंडर बेड स्टोअरेज करुन घ्यायचे आहे.
ते तयार घ्यावे (pepperfry / amazon) का kitchen trolleys वगैरे करणार्या लोकांकडून करून घ्यावे?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जर तुम्हाला मजबूत आणि
जर तुम्हाला मजबूत आणि जमिनीच्यावर पाहिजे असेल तर सुताराकडून करुन घ्या नाहीतर pepperfry मध्ये
बहुतेक स्टोरेजवाले बेड जमिनीला चिकटलेले आहे.
स्टोअरेज वाला नवा बेड घ्या.
स्टोअरेज वाला नवा बेड घ्या. पण ह्या स्टोअरेज मधील वस्तू कधीच फारश्या वापरल्या जात नाहीत असा माझा अनुभव आहे. घरात तीन बेड मध्ये अभूत पूर्व कचरा जमा झाला आहे. आता शिफ्टिंगच्या वेळी सर्व रिकामे करूनच नेणार.
सुतारा कडुन करुन घ्यावे, जेणे
सुतारा कडुन करुन घ्यावे, जेणे करुन बंद केले म्हणजे व्यवस्थीत बंद होईल आत धुळ जाणार नाही.
मी एका बेडरुम मध्ये अंडर बेड स्टोरेज असलेला तयार सिंगल बेड घेतला आहे. खालचा भाग अलगद सरकुन पूर्ण बाहेर येतो. हवे ते काढता येते, नीट घालता येते म्हणुन आवडला होता. पण आत ढकलला की लांबीच्या बाजु कडुन पूर्ण आत जाउन बंद होतो, पण रुंदीच्या बाजुं कडुन भरपून गॅप रहाते. त्यातून आत केवळ धुळच नव्हे तर मांजर आत जाऊन बसते.
घाण पण करते, कधी मारलेला उंदिर घेउन. त्यामुळे खालचा भाग आता वापरत नाही, तो बाहेर काढुन उभा करुन ठेवलाय बाल्कनीत.
घरात चुकून माकून पाणी शिरणार
घरात चुकून माकून पाणी शिरणार नाही याची खात्री करून घ्या.
आम्ही सागवानी लाकडाचा दणकट बेड करून घेतलेला आहे. त्याखाली स्टोरेज प्रचंड आहे. त्यात क्वचित लागणारी अंथरूणं पांघरूणं. प्रवासी बॅगा, दिवाळीच्या डेकोरेशनचे सामान वगैरे सामान ठेवलेले आहे. जमिनीच्या वर असल्यामुळे झाडू पोछा रोजच्या रोज करता येतो. फक्त सामान काढायचे झाल्यास मला एकटीला काढणे शक्य होत नाही. एवढाच एक ड्रॉबॅक.
आम्ही वरच्या दिशेने उघडणारा
आम्ही वरच्या दिशेने उघडणारा सुताराकडून करून घेतलाय. दोन बोटांच्या ताकदीने वरचा पृष्ठभाग गादीसह हवेत उचलला जातो आणि तिथे थांबतो. ते सोनाराकडचे अंगठीचे डब्बे असतात ना अगदी तसे.
ड्रॉबॅक एकच की त्यावर कोणी बसलेला असेल तर त्याला उठावे लागते.
अर्थात ते ही कंपलसरी नाहीये, फक्त त्याने सरकत उशांजवळ जाण्याची तयारी ठेवावी.
बरेचदा मी त्यातच ठिय्या मारून बसतो. त्यातही मजा येते.
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांना
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद!!
या स्टोरेजमधे, शक्यतो रोज न
या स्टोरेजमधे, शक्यतो रोज न लागणार्या वस्तू ठेवा. कारण वरच्या गादीसकट ते उचलणे फार ताकदीचे असते, रोज रोज तसे करणे त्रासाचे होते. सध्या घडी घालून ठेवण्याजोगे बेड्स ( मॅट्रेसेस ) मिळतात. त्या सोफा आणि बेड दोन्ही प्रकारे वापरता येतात. बेडमूळे जी जागा कायमची अडते ती मोकळी होते.
माझ्याकडला सिंगल बॉक्सबेड
माझ्याकडला सिंगल बॉक्सबेड वरुन पण उघडतो आणि वर कुणी बसलं असेल तर समोरुनही दारं उघडून आतलं सामान काढता येतं.
डबलबेड मात्रं वरुनच उघडायचा आहे. माझ्या नणंदेकडे डबलबेड दोन्ही बाजूंनी ड्रॉवर्स घातलेला होता. ती कल्पना मला जास्त आवडली होती. एकाएका बाजूला दोन दोन ड्रॉवर्स. असे एकूण ४ ड्रॉवर्स होते.
वरुन उघडणारा-कोणी बसलेलं असेल
वरुन उघडणारा-कोणी बसलेलं असेल तर उघडायला अडचण होते,
ड्रॉवर असलेला-ड्रॉवर उघडायला जागा ठेवावी लागते.
दोन बोटांच्या ताकदीने वरचा
दोन बोटांच्या ताकदीने वरचा पृष्ठभाग गादीसह हवेत उचलला जातो आणि तिथे थांबतो. ते सोनाराकडचे अंगठीचे डब्बे असतात ना अगदी तसे.>>>> फोटो प्लीज.
फोटो प्लीज. << कारच्या डिकीला
फोटो प्लीज.
<<
कारच्या डिकीला झाकण वर उचलण्यासाठी असतो तो हायड्रॉलिक रॉड पलंगाच्या गादीखालच्या फळीला जोडलेला असतो. त्यामुळे अडकवून ठेवणारा खटका उघडला, की गादीसह ती फळी कमी कष्टात वर उचलली जाते. गादी व प्लायवुडच्या वजनानुसार एक किंवा दोन रॉड्स लावतात. हे असे:
स्लायडिंग ड्रावर असेल तर खाली चाके व वरती पलंगाची फ्रेम यांच्यासाठी मिळून सुमारे ४-५ इंच तरी स्टोरेज स्पेस वाया जाते. स्लायडिंग ड्रावरच्या खाली फरशीला चरे पडतात ते वेगळे.
पण या प्रकारात पलंग बराच मोबाईल राहतो. ड्रॉवर वेगळे काढता येत असल्याने हलवणे सोपे जाते. पहिल्या प्रकारात वस्तू वजनदार व हलवायला कठीण होते.
नाईस फोटो आणि टिपा दिमा.
नाईस फोटो आणि टिपा दिमा.
Dima, धन्यवाद!
Dima,
धन्यवाद!
मी आतापर्यंत तीन बेड स्टोअरेज
मी आतापर्यंत तीन बेड स्टोअरेज सहीत घेतले होते. त्यातले दोन भंगारात काढावे लागले. एक जुन्या घरात ठेवलेला आहे. त्याचा वापर होत नाही. खाली जागा कमी असल्याने खालून स्वच्छता करता येत नाही. बेड सरकवणे हा एक मोठा उद्योग होऊन बसतो. फरशी पुसतांना त्याला पाणी किंवा सोप लागून लॅमिनेशन फुगायला सुरूवात होते. त्यामुळं बनवायचं असल्यास थोडा तरी क्लिअरन्स हवा. खाली ढकलता येणारे ट्रॉलीसारखे युनिट्स बनवता आले तर ते पुढे सुटसुटीत होईल.
चार पायांचा बेड जेव्हढा दिसायला सुंदर दिसतो आणि सुटसुटीत असतो तेव्हढं स्टोअरेज युनिटरेजवालं बेड नसतं. फर्निचरला भाव पण मिळत नाही विकायला काढलं तर. मागच्या फर्निचरच्या अनुभवावरून घरात सामान माफक असावं जेणेकरून स्टोअरेज ला जागा कमीत कमी लागेल या निष्कर्षाला मी आलोय. जुने कपडे, जुन्या वस्तू ठराविक कालावधीने रिसायकल करत राहील्याने जीवन सुसह्य होतं.
यांच्या कडेच्या धारा पायांना
यांच्या कडेच्या धारा पायांना फार लागतात.सामान खाली राहावं म्हणून उगाचच वीस बावीस इंचांपेक्षा वर करणं म्हणजे बेड न बनता धूड दिसतं.प्रश्न विचारला त्यामुळे कल्पना कळतात.
माझ्या कडे तिनही घरात मिळुन
माझ्या कडे तिनही घरात मिळुन जे बेड आहेत ते सगळे स्तोरेज वालेच आहेत. नवरा अति व्यवस्थीत असल्याने, बेड च्या आतिल सामानाचे नियोजन एकदम पर्फेक्ट आहे. ह्या स्टोरेज मधे आम्ही हायड्रॉलिक रॉड वापरलेले आहेत. सुताराकडुन करणे अति उत्तम. मुळात तुम्ही आहे त्याच बेड ला स्टोरेज करत आहात. रेडिमेड नीट मिळणार नाही.
ह्या स्टोरेज मधे आम्ही मुख्यतः बॅगा ठेवतो. बॅगांच्या आत बेडशीट्स, जास्तिचे कपडे जसे वुलन्स, थर्मल्स, रजाई इ.इ माल जो कधी मधीच वापरला जातो, तो ठेवतो. प्रत्येक स्टोरेज वर आत काय आहे ह्याचा स्टिकर लावलेला आहे. त्याच बरोबर बॅगेतही काय आहे त्याच स्टिकर लावलेले आहेत. त्यामुळे शोधशोध शून्य...... हायड्रॉलिक रॉड मुळे साबा साबु पण व्यवस्थित हँडल करु शकतत....
प्रत्येक स्टोरेज वर आत काय
प्रत्येक स्टोरेज वर आत काय आहे ह्याचा स्टिकर लावलेला आहे. त्याच बरोबर बॅगेतही काय आहे त्याच स्टिकर लावलेले आहेत.
<<
मोबाइलमधे उघड्या व बंद बॅगेचा फोटो काढून ठेवणे हा उद्योग उपयोगी ठरतो.
बँक लॉकरचेही तेच केलेले उपयोगी ठरते असा अनुभव आहे.