मूळची स छुआन प्रांतातली ही डिश ,चीन मधील सर्वच प्रांतांत लोकप्रिय झालीये.
भारतीय चायनीज रेस्टोरेंट्स मधे मिळते कि नाही, कल्पना नाही!! तसंही इंडियन चायनीज फूड मला अजिबात आवडत नाही. या बाबतीत घरची सर्व मेंब्रं एकदम विरुद्ध टीम मधे आहेत.. पण ऑथेंटिक चायनीज ही त्यांना तितकंच प्रिय आहे
याकरता लागणारे जिन्नस-
१) ५०० ग्राम बोनलेस चिकन ब्रेस्ट, लहान क्यूब्स मधे चिरून घ्या.
२) तेल, शॅलो फ्राय करण्याकरता.
३) १०,१२ वाळक्या लाल मिरच्या- पाण्यात भिजवून तुकडे करून घ्या.
४) लसणा च्या ४,५ कळ्या - ठेचून घ्या.
५) दोनेक इंच लांबीचे कोवळे आले- पातळ काप करून घ्या.
६) १ कप , पाती चा कांदा पातींसकट चिरून घ्या.
७) १०० ग्राम शेंगदाणे - तळून घ्या.
चिकन चे तुकडे मॅरिनेट करण्याकरता-
१) एका अंड्या चा पांढरा भाग
२) १ १/२ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर
३) १ टेबलस्पून सोया सॉस
४) १ टी स्पून पांढरी मिरपूड
ग्रेवी करता-
१) ३ टेबलस्पून ब्लॅक विनिगर
२) २ टेबल स्पून सोया सॉस
३) १ टी स्पून मशरूम-सोया सॉस ( ऑप्शनल)
४) १/२ टेबलस्पून तिळाचे तेल ( चायनीज कुकिंग मधे वापरले जाणारे तिळाचे तेल )
५) २ टेबलस्पून पाणी
१) चिकन चे तुकडे दहा मिनिटे मॅरिनेट करून ठेवा.
२) पसरट पॅन मधे तेल गरम करून, चिकन चे तुकडे , हाय फ्लेम वर शॅलो फ्राय करून घ्या. अॅब्सॉर्बेंट पेपर वर काढून ठेवा.
३) उरलेल्या तेलात मिरच्यांचे तुकडे , रंग बदलेस्तोवर परतून घ्या. लसूण आणी आल्याचे काप घाला. फ्रेगरंट होईस्तो परता. ग्रेवी करता लागणारे जिन्नस अॅड करा. थोडी उकळली की चिकन चे तुकडे अॅड करा.
२,३ मिनिटे परतल्यावर चिरलेले पातीचे कांदे मिसळा. गॅस बंद करा.
४) सर्व करताना वरून तळून ठेवलेले शेंगदाणे घालून सर्व करा.
कुंग बाओ चिकन, स्टीम राईस बरोबर खूप छान लागतो.
रेस्टॉरेंट्स मधे चिकन , डीप फ्राय करतात, पण मी शॅलो फ्राय केले आहे
शॅलो फ्राय करताना चिकन आतून ड्राय आणी चिवट न होऊ देता सेक्युलंट राहावे.
एंड प्रोडक्ट
ही डिश अॅक्चुली पुरेशी तिखट आहे.. पण आधिक तिखट खाणार्यांकरता मी इंडोनेशिअन सांबल ही बनवलंय सोबत
कोथिंबीर, लसूण, आबनेरो मिरच्या , एक लहान कांदा, मिक्सर वर भरड वाटून, थोड्या जास्त तेलात
, तेल सुटेस्तोवर परतले कि झालं जहाल सांबल तयार.. ओह हाँ मीठ घालायला विसरू नका.
व्हेज वर्जन करता
.. . फर्म तोफू चे लहान तुकडे करून आधी मिठाच्या पाण्यात १० मिंटं बुडवून ठेवा. मग पाण्यातून काढून त्यांच्यावर १५ मिनिटे वजन ठेवा जेणे करून त्यांंच्यातले पाणी निघून जाऊन ते जर्रा कोरडे होतील. वर दिलेले मॅरिनेशन चे जिन्नस आणी थोडा कॉर्न फ्लोअर मधे घोळून चारही बाजूने नीट कवर करा ( फार थिक लेयर नको कॉ फ्लो चा) . सोनेरी रंग येईस्तो डीप किंवा शॅलो फ्राय करा.
बाकी प्रोसेस सेम सेम!!
१- कृतीत सोया सॉस वापरलंय म्हनून मीठ घातलेलं नाहीये. तरी आपापल्या चवी नुसार अतिरिक्त मीठ घालू शकता.
२- इंडोनेशिअन सांबल , काचेच्या बाटलीत भरून फ्रिज मधे दोनेक महिने स्टोअर करता येतं.
मस्तच! मी बहुतेक चायनीज
मस्तच!
मी बहुतेक चायनीज टपर्यांवर हा पदार्थ चिकन ड्राय मंचोरियन किंवा कधी कधी चक्क चिकन चिली (कॅप्सिकम घातली तर) नावाने खाल्लाय. शेंगदाणे नसतात फक्त!
आम्ही अगदी असेच उकडलेल्या फ्लॉवर तुर्यांचे करतो. मैदा/कॉर्न्फ्लोअर आणि अंडे यांनी मॅरीन्व्ट करून.
आणि त्याला गोबी मंचोरियन म्हणतात.
वर्षूताई, आम्हाला हे देसी चायनीजवाले ना, काहीही 'पकवतात.'
@ वत्सला.. मिन्स्ड चिकन नै
@ वत्सला.. मिन्स्ड चिकन नै पण schezwan अॅक्चुली sichuan ( सछुवान) स्टाईल ने बोनलेस चिकन फ्राईड राईस बनवते मी. sichuan चिली पेपर ( नंबिंग चिली) ला मी सोडून घरात कोणीच वाली न्हाय.. म्हणून या पेपर बिना बनवावा लागतो..
आणी स्पायसी बीन्स आयदर चिकन मिन्स किंवा नुसत्या बीन्स ही छान लागतात . देते तुला रेस्पी..
साती... ट्रू
माझी आई, ति च्या पहिल्या चीन ट्रिप मधे कोणत्याही डिश मधे अजिब्बात कॅबेज न दिसल्यामुळे
आश्चर्यचकित झाली होती
फायनल प्रॉडक्ट मस्तच. व्हेज
फायनल प्रॉडक्ट मस्तच. व्हेज करून बघणार.
Nakkee de! Lekila to prakar
Nakkee de! Lekila to prakar faar avadato. Spicy asala Taree eka vishist chinee dukanaat milnare spicy chicken with beans aani rice khup avadeene khate.
Spicy beans me asha karate: Beans vafavoon ghyayachya, bharapur lasun bareek chirun telaavar paratun ghyayacha. Tyat soy sauce, sweet chilli sauce ghalun thode paratayache. Mag vafavalelya shenga ghalun manasokta paratayache. Meeth chavinusar. He pak kruti me asheech andaje karate.
परत् कधी येतेयस गं????????
परत् कधी येतेयस गं???????? पुढचे गटग तुझ्या घरीच करणार आता..........
हे कुंगपाओ टीसीएसच्या
हे कुंगपाओ टीसीएसच्या ठाण्याच्या कँटीन मध्ये मस्त मिळायचे एकदम..
शॅलो फ्राय करताना चिकन आतून
शॅलो फ्राय करताना चिकन आतून ड्राय आणी चिवट न होऊ देता सेक्युलंट राहावे.
हे कसे जमवावे?
सेक्युलंट चिकन म्हटल की मला
सेक्युलंट चिकन म्हटल की मला दिमांच इंजक्शन आठवतं
सुपर्ब दिसतयं..टू डू लिश्टीत
सुपर्ब दिसतयं..टू डू लिश्टीत टाकुन ठिवलयं
घरच्या तिखट खाऊ मेंबरने तुला
घरच्या तिखट खाऊ मेंबरने तुला खास धन्यवाद दिले आहेत. एंजॉय

इतक्या तडकाफडकी बनवलेली ही पहिलीच रेस्पी आहे असं वाटतं मला
Pages