सेकंड होम ठेवावे की विकावे?

Submitted by मेधावि on 23 January, 2016 - 07:06

आमचे एक बावधनला घेतलेले सेकंड होम आहे. ३०-३१ लाखाला ३ वर्षांपूर्वी घेतले होते. इथून पुढे किंमत तशी काही फार वाढेल असे वाटत नाहीये. इन्वेस्ट्मेंट म्हणूनच घेतले होते. पण सोसायटीसाठी लागणारे पैसे, मिळू शकणारे भाडे व कर्जाचा हप्ता पहाता घर ठेवण्यापेक्शा विकले तर बरे होईल का असे वाटू लागले आहे. अजून १५ वर्षांनी रिटायर झाल्यावर ते पैसे/घर पेन्शनीसारखे वापरता येतील अश्या कल्पनेनी घर घेतले होते. परंतू सध्या जरा टु बी ऑर नॉट टु बी झालेय. आत्ता लगेच पैशाची गरज नाही. मिळालेले पैसे बँकेत ठेवले तर कदाचित जास्त फायदेशीर होईल की काय असे वाटत आहे म्हणून विचार घेण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्वेस्टमेंट म्हणून दुसरे घर आणि कर्जाचा हप्ता याबाबत तुमचे सुरवातीचे गृहितक काय होते? काय अपेक्षा पूर्ण झाल्या, काय तोटा जाणवतोय ते लिहून काढा. नवे पर्याय कुठले असतील? त्यापासून काय फायदा अपेक्षित आहे? कागदावर आकडे मांडले तर तुम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल.

अजून दहा वर्षांनंतरच्या इन्फ्लेटेड रेट्स वर मात करण्यासाठी घर उपयोगी पडेल का बँकेतील पैसे असा प्रश्न आहे. इन्फ्लेशन माहीत आहे, बँकेतील रेटस माहीत आहेत परंतू दहा वर्षांनी घराची किंमग पडेल का चढेल ह्या प्रश्नाबाबत खात्री नाही.

खालील बाबींचाही विचार करा.
बॅन्केचे रेट स्थीर रहातील का कमी होतील? एकेकाळी १२ टक्के व्याज मिळायचे.
कर्जाचा हप्ता असेल तर निव्वळ व्याजापोटी जाणारे पैसे लक्षात घेता कर्ज फिटल्यावर ते घर कितीला पडले?
भाडे म्हणून मिळणारे उत्पन्न आणि लॅन्ड लॉर्ड म्हणून असलेला खर्च
फ्लॅट जुना होत जाईल त्यानुसार दुरुस्ती वगैरेचा खर्च
आत्ता मिळू शकणारी किंमत आणि घरामधे आत्तापर्यंत घातलेले पैसे
रुपयाचे झालेले अवमुल्यन

सध्या मंदी चालू आहे ती किती दिवस राहणार हे सांगता येत नाही.
पैसे धंद्यात गुंतवणार असाल तर विकायला हरकत नाही. पण बँकेत ठेवायचे असतील तर सरळ सीए किंवा रियल इस्टेटमधील विश्वासू लोकांचा चा सल्ला घ्या. बावधन हे भविष्यातील बाणेर आहे.

पण सोसायटीसाठी लागणारे पैसे, मिळू शकणारे भाडे व कर्जाचा हप्ता पहाता घर ठेवण्यापेक्शा विकले तर बरे होईल का असे वाटू लागले आहे.

इन्वेस्टमेंट म्हणुन आपण जे करु ते सहसा कर्ज न काढता केलेले बरे. नाहीतर आपले कर्ज होते आणि कर्ज देणा-याची इन्वेस्टमेंट होते.

सध्या चांगला भाव मिळणे अशक्य नाही पण कठिण आहे. तुम्ही कर्ज काढलंय तेव्हा सगळा खर्च लक्षात घेता विकुन नुकसान व्हाय्ची शक्यता जास्त आहे.

ते घर काढून जिथे किंमत वाढायची शक्यता आहे, जिथे भाडेही चांगले मिळते अश्या ठिकाणी घर घेऊ शकतात.. त्यातही शक्य असल्यास थोडे होमलोन काढून जास्त किंमतीचे घर घेणे असेही करू शकता.. भाड्यातून ते जास्तीचे होमलोनचे हफ्ते वळवता येतात.. मी काही जाणकार नाही, बस सुचले ते लिहिले

माझे मतः जर लोन वर घर असेल तर आणि कर्ज च्ये व्याज income tax मध्ये वजा मिळत नसेल तर विकावे.

मागच्या ३ वर्षात पुण्याची घर व्याजाच्या दरापेक्षा जास्त वाढत नाही आहेत. (चिंचवड भागात किंअती कमी अस्ल्याने त्या भागातिल घरे जास्त दरानी वाढली आहेत) आणि आता मंदी मुळे आजुन २-३ वर्ष वाढायची शक्यता कमी. नंतर ज्या भागात वाढत असतिल तिथे गुंतवु शकता.

पण जर व्याज माफ मिळत असेल आणि भाडे पण येत असेल तर ठेवा.

माझा flat मी भाड्याने देऊन ३ वर्ष झाली तो भाडेकरू renewal मागत आहे family चांगली आहे TCS मध्ये service आहे पण माझा भाऊ व एक - दोघे precaution म्हणुन ३ वर्ष झाली तर नको म्हणत आहेत काय करावे?

१. अ‍ॅग्रीमेंट पासुन तीन वर्ष पुर्ण झाली असतील तरच विका. (म्हणजे लाँग टर्म कॅपिटल गेन पडेल.. नाहीतर शॉर्ट टर्म पडेल जे जास्त असते).
२. जर दुसरी जागा घेणार नसाल तर झालेल्या फायद्यावर लाँग टर्म कॅपिटल गेन भरावे लागेल. ते कसे काढावे ते यात पहा
http://nriinformation.com/nri_guide/calculate_capital_gain.htm

माझे मतः
१. जर गरज नसेल तर प्रॉपर्टी आता विकु नका. रीयल इस्टेट मधे किंमत वाढायला ५ ते १० वर्षे द्यावी लागतात. ते तुम्ही भाड्याने देउ शकता का? त्यातुन तुमचा कर्जाचा भार कमी होइल.
२. बावधन म्हणजे लोकेशन चांगले आहे. आता जरा मंदीचा काळ सुरु आहे आता तुम्हाला चांगली किंमत मिळणे जरा कठीण दिसतेय. काही वर्षे वाट पहा.
३. ही रक्कम मिळुन तुम्ही एफ डी त ठेवले तरी एफ डीचे व्याजदरही कमी झालेले आहेत त्यावर टीडीएस्/टॅक्स स्लॅबप्रमाणे टॅक्स इ. जाउन तुम्हाला जास्तीत जास्त ५.५ ते ६% परतावा मिळेल. तेच जर जागा ठेवलीत तर मंदी ओसरल्यावर तुम्हाला चांगले appreciation मिळु शकेल.

All the best.

मनीशा,
फॅमिली चांगली आहे वगैरे म्हटले तरी शेवटी व्यवहार महत्वाचा. या बाबतीत सावध रहाणे उत्तम. भारतातले भाडेकरु बाबतचे कायदे, काय प्रकारचे अ‍ॅग्रीमेंट केले आहे त्यानुसार विचार करावा. शक्यतो चांगल्या विश्वासू वकिलाचा सल्ला घेवून निर्णय घ्यावा. बर्‍याचदा सुरवातीला लोकं त्यांना गरज म्हणून नीट वागतात आणि नंतर आपल्याला गरज असते तेव्हा ताबा मिळवताना त्रासदायक होतात. माझे मत तरी रीन्यू न करण्याला.

Student paying guest is best option. We get more money and there is no question of continuation for long term.

शक्यतो तीन वर्षापेक्षा जास्त दिवस एक भाडेकरु ठेउ नका. आमच्या चाळीतिल ५ भाडेकरु तरी असे होते की ३ वर्ष झाल्यावर घरावर कब्जा केला होता आणि नंतर भाडे द्यायचे पण बंद केले (हा माझा मुंबईतिल २५-३० वर्षापुर्वीचा अनुभव आहे. पुण्यात कदाचित गोष्ट वेगळी असेल).

आणि जर त्यानाच द्यायचे असेल तर मध्ये एखादा वर्ष करार त्याचा घरातिल दुसर्या कोण्याचा तरी नावावर करा. त्याचा मामा किंवा मावशीच्या नावावर आजुन चांगले कारण त्यात नाव- आड नाव सगळे बदलते. नंतर परत पुन्हा त्याचा नाववर करार करु शकता.

मेधावि, घर अजुन ठेवलेय की विकणे पक्के केलेय?
मला ह्या वर्षी घर बूक करणे आवश्यक आहे, (कॅपिटल गेन मुळे),
जर विकणार असलात, तर तुमची अपेक्षा आणि आमचा अंदाज ह्याचा मेळ लागतोय का पाहु या.