१९ जानेवारी हा दिवस नेहमीसारखाच उगवला आणि मावळला. २१ तारखेचा स्मार्ट सिटीवरील परिसंवाद ऐकेपर्यंत http://www.maayboli.com/node/57288
१९ जानेवारीच्या दैंनिक सकाळच्या पिंपरी- चिंचवड पान ३ ची बातमी शोधुन लगेच हा लेख लिहायला घेतला. ही बातमी तशी होतीच आश्वासक आणि महत्वाची. सर्वच शहरात वहातुकीचे प्रश्न आहेत. पिंपरी चिंचवड आणि पुणे त्याला अपवाद नाही. याला पर्याय म्हणुन जवाहरलाल नेहरु शहर पुननिर्माण योजनेमधे बी आर टी घुसडुन पैशाची नासाडी झाली. येवढ करुन बी आर टी ही जन्मत: अपंग जन्माला आली. या साठी घेतलेल्या बसचे दरवाजे दोन महिन्यात खिळखिळे झाले आहेत. यातुन मोठा अपघात होई पर्यंत यावर कोणी लक्ष देणार नाही बहुतेक.
याच योजनेतुन सहापदरी रस्ते बनवले गेले मग त्यात ग्रीड सेपरेटर आले. यासाठी फ़्लाय ओव्हरपेक्षा तीनपट खर्च झाला आणि वहातुकीचा प्रश्न सुटला नाही. आपण फ़क्त जुना मुंबई- पुणे रस्ता आणि त्यावरील निगडी ते शिवाजीनगर किंवा पुणे स्टेशनची वहातुक गृहीत धरु. सध्या या मार्गावर सार्वजनीक वहातुक व्यवस्थेने दोन पर्यायाने प्रवास करता येतो. पहिली पुणे -लोणावला लोकल ज्याची वारंवारता ( Frequency ) साधारण १ तासाला एक या दराने आहे. दिवसभरात याच्या सध्या ४४ फ़ेर्या होतात. दिवसा जरा जास्त होतात. रात्रीच्या कमी होतात. याचाच अर्थ साधारण ३० फ़ेर्या दिवसा तर १४ रात्री होतात. या पैकी दिवसाच्या १५ फ़ेर्या अप म्हणजे पुणे -लोणावळा तर १५ फ़ेर्य़ा डाऊन म्हणजे लोणावळा ते पुणे होतात. प्रत्येक फ़ेरीत सुमारे १६०० लोक बसुन तर १९०० लोक उभे राहुन प्रवास करतात. म्हणजे साधारण १ लाख लोक यातुन फ़क्त दिवसा प्रवास करु शकतील इतकी क्षमता आहे.
याचाच अर्थ एका बसने जर ६० प्रवासी प्रवासी प्रवास करु शकत असतील तर रेल्वेची क्षमता आणायला या मार्गावर १०००००/६० म्हणजे साधारण बसेसच्या १५०० फ़ेर्या करायला लागतील. याचाच अर्थ जर रेल्वेने फ़ेर्या दुपटीने वाढवल्या तर १२०० ते १५०० बसेसच्या फ़ेर्या या मार्गावरील घटतील. बर यासाठी चार रेक्स व्यतिरिक्त आणखी भांडवली खर्च नाही. फ़क्त रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करावा लागणे गरजेचे होते. पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांनी तसेच पिंपरी चिंचवडच्या जाणत्या नेत्यांनी निगडी ते शिवाजीनगर मार्गाचे रुंदीकरण तसेच ग्रीड सेपरेटर आणि बी आर टी वर यावर साधारण १००० कोटी खर्च केले. काही वर्षे यासाठी घालवली आणि जी बी आर टी उभी राहीली ती अजुन सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहे. म्हणजे रस्ते रुंद झाले याचा सुध्दा पुर्ण फ़ायदा लोकांना मिळाला नाही कारण त्याच्या १/३ रस्ता बी आर टी ने विनाकारण अडवला आहे.
जाणत्या नेत्यांची खर्च करण्याची खुमखुमी अजुन संपली नाही याच मार्गावर आता नेते मेट्रो आणण्याचे स्वप्न पहात आहेत. ही खिचडी पकायला अजुन १० वर्षे जातील. तो पर्यंत जनता एकतर अपुर्या लोकल फ़ेर्यामधुन किंवा बसमधुन लटकत जाण्याचे नशीब घेऊन आली आहे काय?
१९ जानेवारीची बातमी सर्व प्रशासन व्यवस्थेची डोळे उघडणारी आहे. सध्या लोकल ट्रेनच्या रेक्स ची संख्या फ़क्त चार आहे ती आठ झाली तर ४४ वरुन एकदम ८० पर्यत फ़ेर्य़ा वाढु शकतात. याचाच अर्थ फ़क्त चार रेक्स आणुन वेळापत्रक सुधारले की अजुन १ लाख लोक दिवसा प्रवास करु शकतात. मग आणा ना ? आता वाट कसली पहात आहात ? यामुळे प्रदुषणाचे प्रश्न निर्माण होणार नाहीत. लोकल मासीक पास काढला तर अजुनही स्वस्तच आहे. आता वेळ लाऊ नका. तीन महिने बास होतील फ़ार झाले तर सहा. पण यापेक्षा जनतेला त्रास सहन करायला लाऊ नका.
जनतेने आता आपले प्रश्न सोडवायला रस्त्यावर आल पाहिजे. ४ ऐवजी ८ रेक आणि ४४ ऐवजी ८० फ़ेर्या ही मागणी रेल्वे प्रशासन, स्थानीक खासदार, आमदार यांना लक्ष घालयला सांगुन लवकर पदरात पाडुन घेतली पाहिजे.
असाच एक बाफ वाचल्याचे वाटू
असाच एक बाफ वाचल्याचे वाटू लागले आहे. देजावू फीलिंग आहे कि कसे ?
तुमचे लेखन सटीक झाले आहे.
तुमचे लेखन सटीक झाले आहे. तुम्ही बीआरटी, ग्रेड सेपरेटरच्या खर्चाचा उल्लेख केला आहे. यासारख्या योजना खर्चिक असल्यानेच प्राधान्याने राबविल्या जात असतात, विशेषत: पुरोगामी आणि प्रगतिशील महाराष्ट्रात! चार रेक्स आले की पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्या लगेच वाढल्या असे होणार नाही. बाकीचे नियोजन करावे लागणार आहे.
किंवा आहे त्या काही लोकलचे
किंवा आहे त्या काही लोकलचे तुकडे करून डब्यांची संख्या कमी करून जवळच्या स्टेशन दरम्यान वारंवारता वाढवणे
६ डब्यांच्या लोकल दर २० मि. ला पुणे चिंचवड / दुसरी लोकल चिंचवड ते तळेगाव दर २५ मि. एक या प्रमाणे केले तरी चांगले होईल. दर २० मि. ला असल्याने एकदम गर्दिचा प्रश्ण येणार नाही सध्या तरी.
या मार्गावर बसचे तिकिट पुणे ते चिंचवड २५ रु तर लोकल चे ५ रू पडते
पास काढला तर बसचा १२००-१३०० आणि लोकलचा जनरल चा १०० रू तर प्रथम श्रेणी चा ५५० रु मधे पडतो
पराग, ४ रेक्स वाढल्याने बाकी
पराग,
४ रेक्स वाढल्याने बाकी कोणताही वाढीव भांडवली खर्च न करता ४४ फेर्या वाढुन ८० होऊ शकतील हे रेल्वेच्याच श्री सुद साहेबांच्या दै. सकाळ १९/१/२०१६ या बातमीवर आधारीत आहे.
खूप चान्गला लेख आहे. २००४-५
खूप चान्गला लेख आहे.
२००४-५ मध्ये पुण्यात स्काय लाईन आणायचा बराच बोलबाला होऊन नंतर स्काय लाईन ला पर्याय म्हणून बी आर टी आणायचे ठरल्याचे आठवते. बी आर टी ला एकन्दरच आधीपासून विरोध होता.कात्रज निगडी बी आर टी चालू झाली तेव्हा त्या ट्रॅक मधून रस्ता ओलांडल्याने एक दोन जणांनी जीव गमावला होता. रस्त्याच्या मध्ये ट्रॅक, रस्ता क्रॉस करुन तिथपर्यन्त जायला लागणे, फक्त मोजक्या बी आर टी बसेस तिथून सोडून बाकी बसेस चा भार मुख्य रस्त्यान्वर तसाच राहणे असे अनेक तान्त्रिक मुद्दे होते.
पुण्यात दुसरे म्हणजे जिथे लोहमार्ग स्टेशन आहेत ते भाग मुख्य ऑफिसेस च्या भागान्पासून बरेच लाम्ब आहेत. एखाद्याला अन्धेरी स्टेशन ला उतरुन सीप्झ ला बसेस ने जाता येते,विक्रोळीला उतरुन शेअर रिक्शाने गोदरेज ला जाता येते पण पुणे स्टेशन ला उतरुन खराडी ला जाणे भयन्कर व्यापाचे पडेल, हिन्जवडी तर प्रचन्ड व्यापाचे.
पुण्याला काय सोल्युशन चांगले लागू पडेल ते खरंच कळत नाही.
मी अनुजी, या लेखाचा उद्देश
मी अनुजी,
या लेखाचा उद्देश मेट्रो नको असा बिलकुल नाही. हिंजवडीला किंवा खराडीला मेट्रो झाली तर हवी आहे. निगडी ते शिवाजीनगर किंवा स्वारगेट अशी मेट्रो जेव्हा येईल तेव्हा कदाचित हवी असेलच.
बी आर टी ही फेल झालेली योजना पिंपरी चिंचवड मधे आली पण पुण्यातल्या मनपाने त्यावर दमडा खर्च केला नाही कारण त्याचा फोलपणा सिध्द झाला होता. पाच वर्षे गेली. पिंपरी चिंचवड्ची बी आर टी निगडी ते मनपा सुरु झाली नाहीच पण गेले तीन वर्षे तो मार्ग तसाच पडुन आहे.
या ऐवजी जर लोकल रेक आणायची योजना आली असती तर आजवर लटकणारी जनता सुखावह प्रवास करु शकली असती.
पण स्थानिक नेत्यांचा यात स्वार्थ आला आणि जनता होरपळते आहे
१९८० पासुन पुणे/पिंची दरम्यान
१९८० पासुन पुणे/पिंची दरम्यान लोकल/रेल्वेने प्रवास केलाय. वर मांडलेले प्रश्न व त्यावरची उत्तरे पटताहेत.
खराडी बाजूला जाणार्यांसाठी
खराडी बाजूला जाणार्यांसाठी मुंढवा, वानवडी, हडपसर कडे जाणार्या लोकल्स पण सुरु झाल्या तर त्याही फायद्याच्या ठरतीलच की.. आणि तो रुट आहेच पण ट्रॅक आणि स्टेशनसची व्यवस्था तितकीशी नाहीये.
श्री. सुद यांनी म्हटले आहे ते
श्री. सुद यांनी म्हटले आहे ते खरे आहे.