इकडे गेल्या पंधरवड्यात कोणीतरी मटार पॅटिसचं वर्णन करताना 'मटाराचा लगदा भरायचा' वगैरे काहीतरी(च) शब्दरचना केलेली वाचली आणि तेव्हापासून मटार पॅटिस करण्याचे डोहाळे लागले. मटाराच्या सोललेल्या दाण्यांनी भरलेले डबे फ्रिजमधली जागा व्यापू लागले आणि मग मटार उसळ, मटार करंज्या, मटार पुलाव, मटार पोहे, उसळ पाव वगैरे करून मटार संपायच्या आत लगेचच्याच वीकेंडला मटार पॅटिसचा नंबर लावला. तसं या सीझनला फ्रिजमध्ये मटार नाहीत अशी वेळ शक्यतोवर येत नाही, पण निवांत वीकेंड मिळणं थोडं कठीण असतं. थोडी खटपटीची पाकृ आहे ही.
तर मटार पॅटिससाठी लागणारं साहित्यः
सारणासाठी :
मटार दाणे - ४ वाट्या
कांदा - १ मोठा
गाजर - १ छोटं किंवा अर्ध मोठं (पौष्टिकपणासाठी नव्हे, सारण मिळून येण्यासाठी)
टोमॅटो - १ मोठा
ओलं खोबरं - अर्धी वाटी
फोडणीचं साहित्य आणि तेल
मीठ, साखर, लाल तिखट, गोडा मसाला, गरम मसाला, धनेजिर्याची पूड इत्यादी सगळं चवीप्रमाणे
आवरणासाठी:
बटाटे - १० मध्यम आकाराचे
मीठ, ब्रेडस्लाईसचा चुरा
पॅटिस परतण्यासाठी तेल
सारणासाठी:
१. छोट्या कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून मटार दोन शिट्या करून शिजवून घ्या. मटार अगदी टणटणीत नाही राहिले पाहिजेत, पण म्हणून जास्त शिजून लगदाही व्हायला नको.
२. कांदा, टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्या, गाजर किसून घ्या.
३. कढईत तेलाची फोडणी करून त्यात कांदा, टोमॅटो परतून घ्या. मग गाजराचा कीस घालून परता. सगळं नीट शिजल्यावर मटार दाणे घालून परता.
४. ओलं खोबरं घालून परता.
५. चवीसाठी घालायचे सगळे मालमसाले घालून नीट एकत्र करा. हे सारण छान मिळून यायला हवे. पण तरीही मटार दाणे अख्खे राहायला हवेत.
तयार सारणाचा फोटो:
पॅटिसच्या आवरणासाठी:
१. बटाटे उकडून घ्या. थंड झाल्यावर किसून/ मॅश करून घ्या. बटाट्याच्या गुठळ्या राहता कामा नयेत.
२. त्यात मीठ आणि लागेल तसा ब्रेडचा चुरा घालून नीट मळून घ्या. बटाटे चिकट नसतील तर ब्रेडचा चुरा लागणारही नाही. पॅटिस नीट वळता येतील असा फर्म गोळा व्हायला हवा.
पॅटिस वळताना बटाट्याचा कचोरीएवढा गोळा घेऊन त्याची वाटी करा. त्यात मटाराचे सारण भरून छान गोल पॅटिस वळा. ब्रेडच्या चुर्यात घोळवून तव्यावर तेल सोडून खमंग भाजा. टोमॅटो सॉसबरोबर गर्मागर्म पॅटिस खाऊन टाका.

माझ्या मोबाईलचा कॅमेरा गंडलाय, आणि गरमगरम पॅटिस मटकावण्याच्या गडबडीत नीट अँगल बिंगल साधून प्रेझेंटेबल फोटो काढण्याइतका वेळ मिळाला नाही, त्याबद्दल क्षमस्व!
हा जरा बरा फोटो:
वॉव ! मस्त दिसतायेत मटार
वॉव ! मस्त दिसतायेत मटार पॅटिस. कृती माहित नव्हती. आता नक्कीच करुन पाहणार.
आभारी आहे.
खुपच मस्त...
खुपच मस्त...
करेंगा!!!
करेंगा!!!
आरती, नुसत्या बटाट्याचे पॅटिस
आरती, नुसत्या बटाट्याचे पॅटिस नॉनस्टिक तव्याला नाही चिकटत. आधी दोन थेंब तेल घालायचं, आणि त्या दोन थेंबांवर पॅटिस ठेवायचं.
बटाट्याच्या सारणात मटारचे
बटाट्याच्या सारणात मटारचे मिश्रण भरता नाही आले तर कणकेत घालून परोठे लाटायचे,. हा.का.ना.का.

मंजू येऊन मारायच्या आधी पळते
सारणात मिश्रण भरलंत तर आवरणात
सारणात मिश्रण भरलंत तर आवरणात काय भरणार ओ तुम्ही??
अर्र, कव्हरात म्हणायचे होते
अर्र, कव्हरात म्हणायचे होते हो , समजून घ्या ;).
अनू, मंजुडी, धन्यवाद.
अनू, मंजुडी, धन्यवाद.
नुसत्या बटाट्याच ट्राय करते. मी आता पर्यंत बटाटा + ब्रेडचा / पावा चा स्लाईस ओला करून रगडा पॅटीस बनवल आहे. नॉन स्टीक तवा नाही आहे. लोखंडी तव्यावर ट्राय करेन.
बटाटे चिकट नसतीलनतर नुसत्या
बटाटे चिकट नसतीलनतर नुसत्या बटाट्याचे पॅटिस सहज होतात.
बटाटे चिकट असतील तर बटाट्याच्या लगद्यात ब्रेडचा चुरा थोडा थोडा घालून गोळा कर. हाताला बटाटा चिकटला नाही तर तव्यालाही चिकटणार नाही. लोखंडी तवाही चालेल भाजायला. स्लाईस ब्रेडचे तुकडे कोरडेच मिक्सरमधून फिरवायचे, मस्त चुरा होतो.
स्लाईस ब्रेडचे तुकडे कोरडेच
स्लाईस ब्रेडचे तुकडे कोरडेच मिक्सरमधून फिरवायचे, मस्त चुरा होतो. <<<< खूपच छान आयडीया.
वॉव, मस्तच दिसतायंत !
वॉव, मस्तच दिसतायंत !
आरती. पॅटिस तांदळाच्या
आरती.
पॅटिस तांदळाच्या कोरड्या पिठात घोळवून तळले तरी मस्तच होतात.
सकाळी १० ला हवे असतील तर आदले
सकाळी १० ला हवे असतील तर आदले दिवशी रात्री करुन फ्रिज ला ठेवले तर रहतील का? सकाळी फक्त तव्यावर भाजुन घेणार
अय्या मी ही रेस्पि वाचलीच
अय्या मी ही रेस्पि वाचलीच नव्हती...आताही पटकन यम्मी फोटो पाहून घेतले. कुणाकडे (आणि कधी) मिळेल खायला आय डोंट क्नो
चर्चा.कृती वगैरे नंतर केव्हातरी वाचेन. फोटो मस्त आहे मात्र
>>कोणीतरी मटार पॅटिसचं वर्णन करताना 'मटाराचा लगदा भरायचा' वगैरे काहीतरी(च) शब्दरचना
ए कोण ते ? काहीही हा लोकं पण
एअर फ्रा यरमधे भारी झाले.
एअर फ्रा यरमधे भारी झाले.
सकाळी १० ला हवे असतील तर आदले
सकाळी १० ला हवे असतील तर आदले दिवशी रात्री करुन फ्रिज ला ठेवले तर रहतील का? सकाळी फक्त तव्यावर भाजुन घेणार>> हो, राहतील अनुश्री. ब्रेडच्या चुर्यात घोळवून डब्यात भरून ठेव, म्हणजे एकमेकांना चिकटणार नाहीत. आणि सकाळी रूम टेम्परेचरला येऊदेत, मग भाज.
मेधा, काय सांगतेस? फोटो दाखव ना...
आज बनवले .. खाल्ले .. मस्त
आज बनवले ..
खाल्ले .. मस्त बनले
माबो स्त्रीवर्ग असल्या
माबो स्त्रीवर्ग असल्या पाकृंनी आमचा जीव घेतंय बहुतेक! कित्ती ते तोंडला पाणी सोडणार आणखीन?
टीना, फटू फटू!
टीना, फटू फटू!
(No subject)
आज जाऊन वेळ मिळाला फटू
आज जाऊन वेळ मिळाला फटू टाकाला..
टीना, यम्मी फोटो.. मटार पण
टीना, यम्मी फोटो.. मटार पण अगदी अख्खा राहिलाय हं
मंजूडी बघून खूष होईल..
अख्खा राहिला खरं.. बाकी
अख्खा राहिला खरं..
बाकी मंजूडी चे पॅटीस बघ... कसा एकसंध रंगाने भाजलेला.. माझे चंद्रावरचे डाग
आज जाऊन वेळ मिळाला = आज जाके
आज जाऊन वेळ मिळाला = आज जाके समय मिला?
मस्त रेसिपी.त्याहून मस्त फोटो
मस्त रेसिपी.त्याहून मस्त फोटो
वॉव टिना! मस्त फोटो आहे. ती
वॉव टिना! मस्त फोटो आहे.
ती हिरवी मिरची भारी दिसतेय, पण फोटोतच बघायला छान आहे
एकसारखा रंग येण्यासाठी फार पेशन्स ठेवून भाजावे लागतात. मग ते छान क्रिस्पीही होतात.
सही रेसिपी.. मटाराचे सारण
सही रेसिपी.. मटाराचे सारण भरून बटाट्याचे आप्पे अशी पाकृ टाकायला वाव आहे म्हणायचा
मंजूडी, फोटो राहिला ह्या
मंजूडी, फोटो राहिला ह्या वेळेस पण ए. फ्रा. मस्त आहे असल्या उथळ तळणासाठी (शॅलो फ्राय)
उथळ तळण पुढच्यावेळी फोटो
उथळ तळण
पुढच्यावेळी फोटो काढ नक्की. एअर फ्रायरचाही काढ फोटो.
Pages